BUY PROJECT PDF Click Here!

आजचा संसारी माणूस | aajcha sansari manus

आजचा संसारी माणूस | aajcha sansari manus
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

आजचा संसारी माणूस



आजचा संसारी माणूस | aajcha sansari manus

आजचा संसारी माणूस | aajcha sansari manus 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


            मी शाळेतून घरी आलो आणि चप्पल काढून घरात पाउल टाकले; तर आईबाबा चिंताग्रस्त दिसले. आई तर हताश होऊन एकटीच बडबडत बसली होती. माझे बाबा माथाडी कामगार आहेत. आज त्यांना काही कामच मिळाले नव्हते. काम नाही मिळाले की ते उद्विग्न होतात.सारखा हिशेब मांडत राहतात. पगार किती कमी मिळेल ? कोणता खर्च करता येणार नाही? हे त्यांचे सारखे चालूच असते. काल काम मिळाल्यामुळे ते थोडे खुशीत होते. शिवाय काल शेठजींच्या घरी सामानाची हलवाहलव केल्याचे चे पैसे मिळाले होते. परंतु त्यांच्यावर जास्त दिवस घरचा प्रपंच चालणार नव्हता.

           माझा आवडता सण : होळी  

            पण इकडे आईची चिंता वेगळीच होती. थंडीचे दिवस. आजीला थंड पाण्याची आंघोळ सोसणार नव्हती. तिला गरम पाणी देणे आवश्यक होते. पण त्यामुळे गस संपण्याची भीती होती.. अनुदानातले सिलिंडर संपले होते. आत्ता जास्त पैसे देऊन सिलिंडर घ्यावा लागणार होता. पुढच्याच महिन्यात आजीचा साठावा वाढदिवस होता. तिला साडी घ्यायची बाबांची इच्छा होती, पण ते काही आत्ता शक्य होणार नव्हते. आई प्याकिंग कारखान्यात कामाला जाते. तिचा बसचा पास संपत आला होता. आमच्या घरातली रोजची सकाळ अशी काळ्या ढगांची काळवंडून जाते. आईबाबांचा तुटपुंजा पगार एकही महिन्यात तो पुरा पडत नाही. आम्ही दोन भावंडे, आईबाबा आणि आजी असे पाच माणसांचे आमचे कुटुंब. अपुर्या पगारामुळे आम्ही सर्वजन नेहमीच त्रस्त असतो. तुम्हाला सांगतो कधी कधी सिलिंडर घ्यायला पैसे नसले तर आम्ही वडापाव खाऊन कसे तरी दिवस पुढे ढकलतो.


            २०२० साल उजाडले आहे. नवी शहरे वसवली जात आहेत. पण आम्हा गरीब संसारी माणसांच्या जीवनामध्ये अजूनही सुखाचे क्षण येत नाहीत. २०२० साली आलेल्या कोरोना महामारीने तर आमचे जगणेच कठीण करून ठेवले आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, असे आम्हाला शाळेत शिकवतात. अन्नसुरक्षा कायदा झाला आहे. पण अगदी साधे जेवण आम्ही आमच्या घरामध्ये समाधानाने जेवलोम असा दिवस मला काही आठवत नाही.

माझा आवडता ऋतू : पावसाळा

            माझी ताई रोज सकाळी कॉलेज ला जाण्याआधी १-२ घरची धुणी भांडी करते. त्यामुळे त्याच्या कोलेजच्या खर्चाला हातभार लागतो. माझी आजी कपड्यांना टिकल्या लावणे, बटणे शिवाने, मणी ओवून माळा तयार करणे असली कामे करते. कधी कधी मी देखील या कामात तिला मदत करतो. वर्तमानपत्रांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या आम्ही दुकानात विकतो. दिवाळीला कंदील तर संक्रांतीला पतंग करून विकले जातात यातून थोडे फार पैसे मिळतात. तुमचा विश्वास बसणार नाही, तरीही सांगतो, ही अशी वरकड कामे करून आम्ही हप्त्याने टीव्ही घेतला आहे !


            दरवर्षी परीक्षेनंतर निकाल लागतो त्यामध्ये आम्ही दोन्हीही भावंडे चांगल्या मार्काने पास होतो, तो दिवस म्हणजे आमच्या घरामध्ये दिवाळी,दसरा असतो. आमच्या या निकालात आईबाबांना सुखाची स्वप्ने दिसतात. चांगले शिक, खूप शिका, असे ते आम्हाला सतत सांगत असतात. ते एवढेच करू शकतात. पैसे खर्च ना करता देता येण्यासारखी त्यांच्याजवळ हीच एक गोष्ट आहे. खरे सांगायचे तर या शब्दांतून ते आम्हाला ‘सुखी व्हा’ असा जणू आशीर्वादच देत असतात.

रम्य ते शालेय जीवन

            आमच्या वस्तीमध्ये २४ कुटुंबे आहेत. सर्वांची आयुष्ये विवंचनांनी भरलेली आहेत. सदोदित त्रासलेली; सतत ताणाच्या भाराखाली असलेली. संध्याकाळी एकत्र आली की हास्यविनोद करून मन रमवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी साध्या कारणानेही हमरीतुमरीवर येतात. सुख त्यांना सदोदित हुलकावण्या देत फिरत असते. सुखाने मांडलेल्या लपंडाव म्हणजे संसारी माणसाचे जीवन होय!


 वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

घरामध्ये चिंताग्रस्त वातावरण

सगळ्यांना हताश करणारे प्रश्न

गार्ब संसारी माणसाचे प्रश्न न सुटणारे

मुलेसुद्धा उत्पन्नाचे मार्ग शोधतात  

मुलांच्या शिक्षणात भविष्य बदलण्याची आशा  

संपूर्ण वस्ती विवंचनाग्रस्त.]


 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 आजचा संसारी माणूस माहिती 
आजचा संसारी माणूस 
आजचा संसारी माणूस निबंध मराठी
Aajacha sansari manus marathi nibandh
aajcha sanasari manus

 

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • संसारी माणसाचे जीवन विषयावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला  नक्की COMMENT द्वारे कळवा.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


धन्यवाद

 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.