BUY PROJECT PDF Click Here!

माझ्या स्वप्नातला भारत | Mazya swapnatla bharat

माझ्या स्वप्नातला भारत | Mazya swapnatala bharat. free pdf file download. essay pdf file free download.
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

माझ्या स्वप्नातला भारत


माझ्या स्वप्नातला भारत | Mazya swapnatla bharat

माझ्या स्वप्नातला भारत | Mazya swapnatla bharat


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


            मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही. ज्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपल्या पंतप्रधानांनी एक अभिनव घोषणा केली. ती म्हणजे १०० स्मार्ट शहरे निर्माण करायची ! तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट २९१४ ती गोष्ट ऐकली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या देशातली शहरे तरळू लागली. चकाचक , सुंदर ! आजच्या युरोप- अमेरिकेतील शरण्पेक्षाही अधिक सुंदर पं माझ्या मनात विचार आला की फ़्क़्त शंभर शहरेच कशाला अखंड देशच स्मार्ट करायचा ! ‘माझा भारत, स्मार्ट भारत’ माझ्या डोक्यात कल्पनांची गर्दी जमली. मी उठलो आणि संगणकावर ‘गुगल अर्थ’ हे संकेतस्थळ सुरु केले. मग भारताच्या स्थानावर क्लिक केले आणि काय आश्चर्य! माझ्या स्वप्नातल्या भारतातील अनेक दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर साकारू लागली!


            पहा, पहा. माझ्या स्वप्नांतल्या भारतातील एकही खेडे, निस्तेज, दीनवाणे दिसत नाही. प्रत्येक घर सुंदर आणि संपन्न आहे. प्रत्येक घराला वृक्षवेलींनी प्रसन्न बनलेले असे मोठे आवार आहे. माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती ही आरोग्यसंपन्न, उत्साही व आनंदी दिसत आहे .प्रत्येक घरामध्ये गाडी आहे. प्रत्येक घराला वीजपुरवठा आणि पाणीसुद्धा चौवीस तास चालू असते. प्रत्येक घरामध्ये गोबर गस तंत्रानं बसवून चौवीस तास इंधन वायूचा मोफत पुरवठा चालू केलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दूरध्वनी आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्ट फोन देखील आहे. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेने आपल्या क्षेत्रामध्ये मोफत वाय फाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला इंटरनेट सेवा मोफत मिळत आहे.


            माझ्या स्वप्नातील भारतामध्ये खड्डेविरहित, स्वच्छ रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांच्या कडा देखील इतक्या आखीव रेखीव आहेत की पट्टीत घेऊन आखल्यासारख्या वाटतात. रस्त्याची कडा संपली की हिरवळ सुरु होते. अशी हिरवळ की तिच्यावरून पायी चालत जाण्याचा मोह व्हावा !


            माझ्या या स्मार्ट भारतातील सर्व व्यवहार ऑनलाईन होतात. फळे, भाजीपाला, अन्नधान्ये, अन्य वस्तू किंवा सेवा यांची खरेदी विक्री ऑनलाईन होते. स्वतः उद्योजक व शेतकरी या बाजारात उतरल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. ग्राहकांना ही रास्त किमतीती वस्तू मिळतात. सरकारी कार्यालयांमध्ये सर्व प्रकारची कामे आत्ता ऑनलाईन पार पडतात. त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो. लाचखोरी बंद झाली आहे. कामे त्वरित होतात लोकांचा विनाकारण वाया जाणारा पैसा आणि वेळ यांची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांना स्वताच्या आवडीनिवडी , छंद जोपासण्यासाठी वेळ आणि पैसा उपयोगात येतो. वाड्मय , कला , क्रीडा यांना चांगले दिवस आले आहे. देशाची सांस्कृतिक भरभराट वेगाने होत आहे.


            माझ्या या स्मार्ट भारतातील वाहतूक व्यवस्था सर्वोत्तम आहे. अन्य कोणत्याही देशामध्ये माझ्या देशाप्रमाणे प्रगत आणि स्मार्ट वाहतूक सेवा नाही. माझ्या देशातली ही व्यवस्था स्वस्त, आरामदायी व जलद आहे. कोणालाही कुठूनही व कोठेही सहज व कमी वेळात त्वरेने जाता येते. बहुसंख्य लोक तिचा वापर करतात. वाहुसंख्य व्यवहार हे ऑनलाईन होतात. बरेचसे लोक घरबसल्या सारे व्यवहार करतात. त्यामुळे वाहतुकीवर ताणच येत नाही. विनाकारण वाया जाणारा वेळ आत्ता या स्मार्ट देशात वाचत आहे. वाचलेला वेळ लोक सत्कारणी लावताना दिसत आहेत. त्याची प्रगती होते. पर्यायाने देशाच्या प्रगतीमध्ये भर पडते.


            सर्वांत महत्वाचे म्हणजे तुम्ही देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरीही तेथे तुम्हाला स्व्छ निर्मळ व प्रसन्न वातावरण आढळेल. कुठेही कचऱ्याचे ढिगारे, फुटलेली गटारे, चिखल, कुजलेले पदार्थ, उंदीर, घुशी वगैरे दिसणारच नाहीत. त्यामुळे माझ्या स्वप्नातल्या स्मार्ट भारतामध्ये सर्वत्र पवित्र, मंगल दर्शन घडते. पाहणाऱ्यांचे ही मन मंगलमय बनून जाते. या मंगल दर्शनासाठी जगभरातून पर्यटकांचा लोंढा सतत वाहत येतो.फक्त माझ्या देशाचे सौंदर्य पाहण्यसाठी.


            असा हा माझा स्वप्नातला भारत हा सुखी, समृद्ध आणि प्रबळ राष्ट्र असेल.

 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे: 

        स्वप्नातल्या भारताचे रूप स्फुरण्याचे क्षण – खेड्याचे स्वरूप – रस्ते – बहुसंख्य व्यवहार ऑनलाईन – भरपूर वेळ आणि श्रम यांची बचत – सांकृतिक प्रगतीला हातभार – शिक्षण, आरोग्य यांबाबत यांबाबत मदत – उत्तम वाहतूक व्यवस्था – स्वच्छता – सर्वत्र प्रसन्न – मंगल वातावरण. ]

 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

माझ्या स्वप्नातील भारत
माझ्या स्वप्नातील भारत निबंध
माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध लेखन
माझ्या स्वप्नातील माझा देश निबंध
Mazya swapnatil bharat
Mazya swapnatil bharat essay in Marathi
Mazya swapnatil bhat essa
y


 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


  • Nibandh pdf file downlod free 

या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 

 

माझ्या स्वप्नातील भारत.निबंध pdf file 

 

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुमच्या स्वप्नातील भारत  कसा असेल आम्हाला तुमचे विचार  नक्की COMMENT द्वारे कळवा.

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

 

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.