BUY PROJECT PDF Click Here!

कामगारच नसते तर... | Kamagarach naste tar...

कामगारच नसते तर... | Kamagarach naste tar...
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

कामगारच नसते तर...



कामगारच नसते तर... | Kamagarach naste tar...

कामगारच नसते तर... | Kamagarach naste tar...


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

        आमच्या घराच्या इमारती शेजारी दुसर्या नवीन इमारतीचे काम चालू होते. तेथे काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा जास्त होती. मी आमच्या घराच्या बाल्कनीत बसून इमारतीचे चाललेले काम पाहत बसलो होतो. अचानक माझ्या मनामध्ये विचार आला की हे काम करणारे कामगारच नसते तर... तर काय झाले असते? आणि माझे मन लगेच कामगारच नसते तर... या विषयाच्या विचारात गुंतले आणि मी त्याच विचारात मग्न होऊन गेलो.


        जर कामगारच नसते तर... आज आपण राहत असलेली घरे कोणी बांधली? घरे, इमारती बांधण्यासाठी कामगारच उपलब्ध झाले नसते तर आपण चांगली घरे बांधू शकलो नसतो. आपला विकास झाला नसता. कामगार नसल्याने परिणामी मोठ-मोठे कारखाने उभे राहिले नसते. कारखान्यांतून विविध वस्तूंचे उत्पादन कामगारांच्या अभावी शक्य झाले नसते. आज आपण दळणवळणासाठी रस्ते तसेच नदी पार करण्यासाठी पूल यांचा मोठ्या प्रमाणवर वापर करतो हे पूल रस्ते उभे कोणी केले तर कामगारांनीच. मग हे कामगार नसते  तर... पूल रस्ते उभे राहिले नसते परिणामी दळणवळणासाठी मार्गाच उपलब्ध ण झाल्याने देशाचा विकास दर कमी झाला असता.


        आज आपण वापरत असलेले कपडे, गाड्या आणि घरातील इतर वस्तू कारखान्यांतच तयार होतात. कारखान्यांमध्ये काम करणारे कामगारच त्यांची निर्मिती करतात तेचाच या विविध वस्तू आपल्याला वापरायला मिळतात कामगाराच नसते तर आज असलेले विविध प्रकारचे कारखाने आज अस्तित्वात नसते. आज आपल्याला इमारती बांधण्यासाठी लागणारा चिरा तसेच दागिने बनविण्यासाठी  लागणारे सोने, चांदी आणि आपण वापरत असलेली पेट्रोल, डीझेल सारखी इंधने आपल्याला या खाणींच्या माध्यमातूनच मिळत असतात. या खणी खोदण्यासाठी तसेच खाणीतील कच्चा माल बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करून तो आपल्यापर्यंत  पोहचवण्याचे काम कामगारच करत असतात. कामगारच नसते तर आज खाणीच नसत्या परिणामी इंधने, दागिने आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण झाला असता.


        कामगार नसते तर आपल्याला विविध सेवा- सुविधा मिळू शकल्या नसत्या दळणवळव्यवस्था असतीस्त्वात आली नसती परिणामी देशाच्या आर्थिक प्रगैत्ल मोठा अडथळा निर्माण झाला असता. आज आपण सकाळी उठल्यावर वापरतो तो ब्रश तिथपासून ते रात्री झोपताना लावत असलेल्या पंख्या पर्यंत सर्वच गोष्टी या कामगारांमुळेच आपल्याला मिळाल्या आहेत. त्यांच्या श्रमांतूनच आपल्याला या सेवा –सुविधा मिळणे शक्य झाल्या आहेत. आपण पाहत असेलली टी. व्ही. कोणी तयार केली तर कामगारांनीच न . कामगार नसते तर हे सारे तयार करणे शक्य झाले नसते. परिणामी आपल्याला जीवनउपयोगी वस्तू मिळाल्या नसत्या. आपल्याला आपल्या जीवनात प्रगती करता आली नसती. आपले जीवन सामन्य राहिले असते.


        आपण जर या आधीच्या कालखंडाचा विचार केला, तर तेव्हापासूनच बहुतांश काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती गरीब असलेली आपल्याला पहावयास मिळते. याचे कारण म्हणजे कामगारांना त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचा मोबदला मिळत नाहीत. कामगारांना त्यांच्या कामाचा कमी मोबदला दिला जातो. परिणामी त्यांची परिस्थिती गरीब असते. कमी वेळेला तर कामगारांकडे त्यांचे पोट भरण्यासाठी दोन वेळचे जेवण मिळताना सुद्धा मुश्कील होऊन जाते. ते आपले जीवन कसेबसे जगत असतात.


        देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांत मोठे योगदान  कोणाचे असेल, तर ते या कामगारांचेच. ते नसते तर आज देशाचा विकास झालाच नसता. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्याच नसत्या. आज कामगारांना त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देणे गरजेचे आहे. त्यांच्या या योगदानानुसार समाजामध्ये त्यांना मनाचे स्थान मिळाले पाहिजे आणि ते आपण मिळवून देणे खूप गरजेचे आहे.


        कामगारच नसते तर.... काय झाले असते. ही कल्पना करणे सोपे आहे. परंतु खरच कामगार नसते तर आपला विकास झाला नसता आपण मागासलेले जीवन जगलो असतो. आपल्याला कोणत्याही सुख – सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या. हे सर्व आपल्याला हवे असेल तर ते पूर्ण करणारे कामगार आपल्या जीवनात असणे खूप गरजेचे आहे.

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

प्रस्तावना

घरे, इमारती, कारखाने रस्ते, पूल वगैरे काहीही उभे राहिले नसते

कारखाने नसते

खाणी नसत्या

आर्थिक प्रगतील प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला असता

जीवनोपयोगी सर्व वस्तू कामगारांच्या श्रमातून

प्रत्येक कालखंडात बहुतांश कामगार गरीब

त्यांच्या योगदानानुसार त्यांना समाजात स्थान मिळणे गरजेचे

समारोप.]

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 

  • कामगारच नसते तर...
  • कामगार नसते तर मराठी निबंध
  • Kamagar naste tar…
  • Kamagar naste tar Marathi nibandha

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.