BUY PROJECT PDF Click Here!

आरसा नसता तर... | Aarasa nasata tar..

आरसा नसता तर जर आरसा नसता तर.. मराठी निबंध आरसा नसता तर मराठी निबंध Aarasa nasta tar Jar aarasa nasta tr… Marathi nibandh
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

आरसा नसता तर...


आरसा नसता तर... | Aarasa nasata tar..

आरसा नसता तर... | Aarasa nasata tar.. 


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 


        आरशासमोर उभे राहिल्यानंतर कधी कधी मनात असा विचार येतो की, हा आरसा नसताच तर..., तर काय झाले असते? हा विचार माझ्या मनात आला आणि मी त्याच विश्वात रममाण होऊन कधी गेलो माझे मलाच समजले नाही. त्याच गोष्टीवर मी विचार करू लागलो. माणूस हा देखील इतर प्राण्यांप्रमाणे एक पृथ्वीतलावरचा प्राणीच आहे. परंतु त्यच्या प्रगत मेंदूमुळे त्याच्यात मनुष्यत्वाचे गुण निर्माण झाले आणि तो बुद्धिमान प्राणी माणूस बनला. हा जो अमुलाग्र बदल घडून आला तो आरशामुळेच असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. आत्ता तर आरसा हा माणसाच्या दैनदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.


        मानवाच्या जीवनात आरशाचा उपयोग काय आहे? असा प्रश्न जर एखाद्या लहान मुलाला विचारला तरी तो देखील सांगेल कि स्वतःला पाहण्यासाठी! स्वतःला पाहणे, स्वतःचे रूप आरशात न्याहाळणे, ही तर माणसाची सवयच आहे. आपण सुंदर दिसावे यासाठी माणूस धडपड करीत असतो. आपण घराबाहेर पडताना आरशात पाहून मगच घराबाहेर पडतो हे आहेच पण, पण घरी पाहुणे आले, तर आरशात पाहिल्याशिवाय कोणतीही स्त्री दार उघडायला पुढे जात नाही. इतकेच काय, दार उघडायला उशीर झाला, तरी आरशात पाहण्यासाठी काही क्षण खर्च करणारे पुरुषही मी पहिले आहेत.


        आपण सुंदर आणि प्रसन्न दिसावे, इतरांच्या मनात आपल्याला महत्व प्राप्त व्हावे, ही प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आते.  किंबहुना, आपल्याला महत्व मिळावे, आपले मोठेपण, वेगळेपण प्रस्थापित व्हावे, हे माणसाच्या प्रत्येक  कृतीमागे प्रबळ अशी प्रेरणा असते, असा सिद्धांत डॉ. सिग्मंड फ्राईड या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने मांडला आहेच. मला तर खात्रीच आहे की, प्रत्येक पराक्रमानंतर पराक्रमी व्यक्तीने आरशात डोकावले असणारच! आरसा नसता, तर माणसाच्या मनातला हा पराक्रमाचा उत्सव त्याला साजरा करता आलाच नसता. मी तर पुढे जावून असे म्हणेन की, आरसा नसता, तर पराक्रम गाजवण्याची प्रेरणाच निर्माण झाली नसती!


        पूर्वी जेव्हा जत्रा भरायच्या त्या जत्रांमध्ये आरसेमहालाचा एक तंबू असायचा. त्या तंबूत नेहमीच गर्दी पाहायला मिळायची. त्या आरसेमहालात विविध प्रकारचे आरसे असायचे. त्या विविध आरशांत आपल्याच विविध प्रतिमा दिसायच्या. गोल गुबगुबीत, भरपूर जाड, काठीसारखी उंच किंवा एकदम बुटकी अशी स्वतःची ती वेडीवाकडी , चित्रविचित्र रूपे पाहून प्रत्येक जन मनसोक्त त्या प्रतिमांचा आनंद घ्यायचा. स्वतःचीच थट्टा करणे, स्वतःचीच गंमत पाहणे! आरसा नसता, तर माणूस स्वतःकडे इतक्या निखळ आणि निर्मळपणे पाहूच शकला नसता.


        आज तर आरशाने मानवाचे अवघे जीवनच व्यापून टाकले आहे. रस्त्यांवर, दुकानात, कपड्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये इथे तिथे सर्वत्र आरसा ठाण मांडून बसलेलाच असतो. कोणत्या घरात आरसा नाही असे घर जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. सौंदर्याचे विविध रूपे, विविध आकार लेवून आरसा सर्वत्र मिरवत असतो. सौंदर्यनिर्मिती ही माणसाच्या मुलभूत प्रवृतींपैकी एक आहे. आरशाने माणसाच्या या प्रवृतीला केवढा मोठा वाव दिला आहे! आरसा नसता, तर सौंदर्य निर्मितीच्या महामार्गावरील माणसाची वाटचाल कायम अयशस्वी राहिली असती!


        अगदी प्राचीन काळी, माणूस हा माणूस बनला, प्राणी अवस्थेतून बाहेर पडला, तेव्हा त्याला पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले असणार. ‘मी कोण?’ हा प्रश्न त्याला त्या वेळी स्वतःला न्याहाळताना पडलेला असणार. तिथपासून ते आजपर्यंत माणूस आरशात न्याहाळतोय. स्वतःच शोध घेतोय. माणूस आरशात पाहतो, तेव्हा तो स्वतःतील सुंदरता शोधतो. ही सुंदरता म्हणजेच आत्माच होय. आत्म्याचा शोध घेता घेता माणूस परमात्म्याचा शोध घेतो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, दर्पणी पाहता रूप | ण दिसे हो आपुले || आरशात आपल्याला परमात्म्याचेच रूप दिसते. मोक्षाच्या मार्गावरचे हे पहिले पाऊल होय! आरसा नसता, तर माणसाला इतक्या उदात्त मार्गावर कोणी नेले असते?


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 


 मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

प्रास्ताविक

एखादा प्रसंग

आरशाचा उपयोग

स्वतःला न्याहाळणे

स्वतः प्रसन्न दिसावे, स्वतःला महत्व मिळावे, ही मुलभूत प्रेरणा डोकावण्याच्या कृतीमागे

विवध प्रतिमा दाखवणारे आरसे

सौंदर्य निर्मितीच्या प्रेरणेला सहाय्यक

स्वतःला पाहता पाहता स्वतःमधून परमेश्वराला पाहणे

समारोप.]


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • आरसा नसता तर
  • जर आरसा नसता तर..
  • मराठी निबंध आरसा नसता तर
  • मराठी निबंध  
  • Aarasa nasta tar
  • Jar aarasa nasta tr…
  • Marathi nibandh
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.