BUY PROJECT PDF Click Here!

माझा आवडता प्राणी: कुत्रा | Maza aavadata prani kutra nibandh.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी निबंध कुत्रा माझा आवडता प्राणी माझा प्रिय प्राणी कुत्रा इयत्ता पाचवी मराठी निबंध निबंध पीडीएफ फाईल डाऊनलोड पीडीएफ
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

माझा आवडता प्राणी: कुत्रा 

माझा आवडता प्राणी: कुत्रा  | Maza aavadata prani kutra nibandh.

माझा आवडता प्राणी: कुत्रा  | Maza aavadata prani kutra nibandh. 



            कुत्रा आणि माणसाचा अगदी जुना संबंध आहे. कुत्र्यांना पाळीव प्राणी बनवण्यामागे खूप काही कारणे आहेत. काही तुकडे घराची राखण करतात तर काही कुत्रे माणसाला शिकार करण्यासाठी मदत करतात. एवढेच नाही तर काही कुत्रे सर्कस मध्ये विविध प्रकारचे खेळ दाखवतात. काही कुत्रे पोलिसांना चोराचा शोध घेण्यासाठी मदत करतात. यामुळे कुत्र्यांना पालण्यामागे माणसाचा कोणता ना कोणता स्वार्थ दडलेला असतो.


            आज जगात कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत. आज विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या जातींचे कुत्रे आढळतात. त्यांचे रूप, रंग आणि आकार हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कोणत्या जातीचा कुत्रा हा लांब असतो, तर कुठल्या जातीचा कुत्रा हा मोठा असतो. काही कुत्रे तर मांजरा एवढे छोटे असतात, तर काही मोठे असतात. कुत्रे काळा, राखाडी, मातेरी इत्यादी विविध रंगांचे असतात.


            कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी लगेच बनतो. आपल्या थोड्या प्रेमाने च तो आपल्या नियंत्रणात येतो. आपण त्याच्यावर करत असलेल्या प्रेमामुळे काही दिवसात तो आपल्या कुटुंबाचा एक भाग बनून जातो. आपल्या प्रेमळ इशाऱ्याना तो लगेच समजून घेतो.


            कुत्रा हा खूप प्रामाणिक प्राणी आहे. तो आपल्या सूचना आणि इशारे लगेच समजून घेतो. जेव्हा आपण त्यांना आपल्या जवळ बोलावतो तेव्हा तो लगेच असेल तिथून धावत आपल्यापाशी येतो. जेव्हा आपण त्याला जायला सांगतो तेव्हा तो लगेच तेथून निघून जातो. जेव्हा एखाद्या कुत्र्याचा मालक जेव्हा घरी येतो तेव्हा कुत्रा त्याच्यासमोर  शेपटी हलवून त्याचे स्वागतच करतो. कुत्रा हा एक असा प्राणी आहे की तो चांगल्या आणि वाईट गोष्टींची अगदी कमी वेळातच पारख करतो.


            निसर्गाने कुत्र्यांना वास घेण्याचे एक अद्भूत शक्ती देऊ केली आहे. आपल्या वास घेण्याचा शक्तीनेच ते मोठ मोठया गुन्हेगारांचा शोध घेतात. त्यांच्याच मदतीमुळे आज पोलिसांचे चोरांना शोधण्याचे काम काही प्रमाणात सोपे झाले आहे. सर्कशीतील खेळांमध्ये कुत्र्याने केलेल्या कसरती पाहून दर्शक आश्चर्यचकित होऊन जातात.


            कुत्रा हा स्वामीभक्त प्राणी आहे. तो  खूप प्रामाणिकपणे आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करतो. कुत्रा हा नेहमी सतर्क राहणारा प्राणी आहे. कुत्र्यांच्या  प्रामाणिकपणाच्या आणि आपल्या  मालकाप्रती  दाखवलेल्या प्रेमाच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. प्रामाणिक कुत्रे कधी कधी आपल्या मालकाची रक्षा करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात.  असे कुत्रे आपले नाव अमर करूनच जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच एका प्रामाणिक कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावर बांधली गेली आहे.


            कधी कधी कुत्रे पिसाळतात आशा पिसाळलेल्या कुत्र्यांपासून आपण सावध रहायला हवे. असा पिसाळलेला कुत्रा जर माणसाला चावला तर काही प्रसंगी माणसावर मृत्यूही ओढवू शकतो. त्यांचा जीवही जाऊ शकतो.


            कुत्रा पाळायचा  असल्यास काही वेगळा कोणताही खर्च करावा लागत नाही. आपल्या जेवणातील उरलेला भात आणि भाकरी , चपाती खाऊन पोट भरतो आणि जीवन भर आपल्या मालकाची सेवा करतो. कुत्रा हा त्याच्या वेगळेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणामुळे आणि त्याचा उपयोगीतेमुळे मुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

 

हा निबंध लिहीत असताना खालील दिलेल्या मुद्द्यांच्या अवश्य वापर करा

 

[मुद्दे:

माझा आवडता प्राणी कुत्रा

लगेच पाळीव बनण्याचा गुण

समजूतदार आणि चतुर

कुत्रा प्रामाणिक प्राणी

चोरांना पकडण्यासाठी उपयोग

 कुत्र्याचे इतर गुण

 कुत्रा पाळण्यासाठी कोणताही खर्च नाही]



मित्रांनो तुम्ही हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकता


माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध

मराठी निबंध
कुत्रा माझा आवडता प्राणी
माझा प्रिय प्राणी कुत्रा
इयत्ता पाचवी मराठी निबंध
निबंध पीडीएफ फाईल डाऊनलोड
पीडीएफ फाईल डाऊनलोड
Free pdf download
My favourite pet essay in Marathi
May favourite pet essay free pdf download


E1

धन्यवाद.



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.