महात्मा जोतीराव फुले-एक आदर्श समाजसेवक. (चरित्रात्मक निबंध) | Mahatma jotirao phule.

Admin

 

महात्मा जोतीराव फुले-एक आदर्श समाजसेवक 


     महात्मा जोतीराव फुले हे नाव उच्चरतानाच एका आदर्श समाजसेवकाची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अश्या या महात्म्याचा जन्म १८२७ मध्ये एका माळी कुटुंबात झाला. पेशवाईचा अखेरच्या काळामध्ये जातिनिर्बंध जास्त कडक झाले होते. धनसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्ता या एका उच्चवर्णीयांच्या हाती एकवटल्यानंर तो वर्ग इतरांना तुच्छतेने वागणूक देत होता. त्याचे चटके इतरांना बसतच होते या सर्व गोष्टींचा जोतिबा फुले विचार करीत होते. अमेरिकन विचारवंत असलेल्या थॉमसन पेन यांची पुस्तके वाचून ते धर्मचिकित्सा करायला लागले. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या अधोगतीचे कारण कोणते. याचा ते सातत्याने शोध घेत. अशिक्षितपणा आणि अविद्या हेच या सगळ्या अनर्थाचे मूळ कारण आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला


महात्मा जोतीराव फुले-एक आदर्श समाजसेवक. (चरित्रात्मक निबंध) | Mahatma jotirao phule.

महात्मा जोतीराव फुले-एक आदर्श समाजसेवक. 


        अत्यंत गावठी शाळेमध्ये शिकत असतानाच जोतीरावांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या घराशी परिचित असलेले, गफार बेग मुन्शी या उर्दू, पर्शियन शिकविणाऱ्या शिक्षकाच्या पुढाकाराने त्यांचा इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश झाला. स्वतः शिकता शिकता त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिक्षणाचे धडे द्यायला सुरवात केली. इंग्रजी शाळेचे वातारण जोतिबा फार जवळून पाहत होते. अस्पृश्य समाजाला मिशनरी कसे वागणूक देतात, हे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून डोक्यात कल्लोळ उठायला सुरवात झाली. शूद्र आणि ब्राह्मण यांमध्ये असणारा हा भेद काय आहे, ब्राह्मणांपेक्षा मी कोणत्याही बाबतीत कुठेही कमी नाही मग हा भेदभाव  कुठून आला ? धर्मांच्या नावाखाली  ब्राह्मणांनी समाजाला किती यातना दिल्या ? आम्हाला अज्ञानी का राहावे लागले ? असे प्रश्न उपस्थित करायला त्यांनी सुरवात केली.


        महात्मा फुलेंनी बुधवार पेठेमध्ये जेव्हा मुलींची शाळा सुरु करायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या घरातूनही विरोध झाला. हे काम करायचे असेल तर घर सोडावे लागेल, असे त्यांच्या वडिलांनीच त्यांना सांगितल्यावर त्यांनी घर सोडले. पण काम सुरूच ठेवले. वडील प्रेमळ होते, पण समाजाच्या चौकटीत राहून ते त्यांच्या पिढीतले बोल बोल बोलत होते. हे त्यांच्या लक्षात आले. घर सोडताना त्यांच्या कार्यामध्ये साथ देण्यासाठी सावित्रीबाईफुले सोबत होत्या त्यांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी जोतिरावांकडून शिक्षणाचे धडे घेतले  आणि ते ज्ञान त्यांनी मुलींना शिकविले. लोकांनी त्यांच्यावर दगड, शेण फेकले पण तरीही त्या डगमगल्या नाहीत. समजलं गेले मिळवायची असतील तर वीज म्हणून कोणाला तरी गाडून घ्यावेच लागेते. त्याप्रमाणे सावित्रीबाईंनी बीजाचे काम सुरु केले. कित्येक संकटे आली पण त्यांनी आपले कार्य सुरु ठेवण्याचा निर्धार पक्का केला होता.


        जोतीरावांच्या प्रत्येक कृतीला त्यांच्या अभ्यासाची जोड होती. धर्म आणि धर्मगुरू, धर्मपंडित यांचा अभ्यास करून धर्मगुरू आणि धर्मपंडितांचा स्वार्थ कोणत्या पातळीवर पोहोचलाय याचा त्यांनी अभ्यास केला. धर्माच्या नावाखाली स्त्रियांवर कसा अन्याय केला जातो; हे ही ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. स्त्री वर एका बाजूला अन्याय करायचा आणि दुसऱ्या बाजूला तिचा धर्मात लक्ष्मी-देवी असा उल्लेख केला जायचा. हे त्यांनी पहिले होते.


        जोतीरावांनी स्वतःला उत्तम इंग्रजी शिक्षण घेतले. पण प्रत्यक्ष कार्य करताना त्यांनी इंग्रजांचे चांगले गुणही उपयोगात आणले; परंतु हे करत असताना एक क्षणसुद्धा ते स्वदेशातल्या गरीबाला विसरले नाहीत. ड्यूक ऑफ कॅनॉट च्या भेटीसाठी पुण्यामध्ये एक समारंभ आयोजित केला होता. या समारंभात जोतिबा शेतकऱ्याच्या वेशात गेले. सर्वाना वाटले की हा मनुष्य सभेत काय बोलणार? फुल्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. ते भाषणात म्हणाले.


' ड्यूकसाहेब या ठिकाणी उत्तम पोषाख करून आलेले हे लोक हिंदुस्थानचे प्रतिनिधी नाहीत. या देशातील बहुसंख्य जनता शेतकरी आहे, त्यामुळे शेतकरी माणूस जो पोषाख वापरतो त्याच पोषाखात मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. हिंदुस्थानच्या या बहुसंख्य जनतेचे हित तुम्हालासाधायचे असेल, तर त्यांना शिक्षण देऊन त्यांचे अज्ञान दूर करा घालवा. त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा. या लोकांचा प्रतिनिधी  या नात्याने हा मी दिलेला निरोप  तुमच्या राणीसाहेबांना कळवा. पॉव्हर्टी अँण्ड इग्नोरन्स आर द कर्स ऑफ अवर कंट्री माय रिक्वेस्ट टू देअरफॉर टु कॅरी धिस हम्बल मेसेज टू यूअर काइंड मदर आय मिन हर ग्रेशियस मॅजिस्टिक क्वीन व्हिक्टोरिया ऑफ इंग्लंड. दॅट द सॅल्व्हेशन ऑफ धिस कंट्री लाइज इन एज्युकेशन. एज्युकेशन अँन्ड  नथिंग बट एज्युकेशन. 

        महात्मा फुल्यांचे हे इंग्रजी पाहून ड्यूकसाहेब चकित झाले आणि त्यावेळी सभेत गांभीर्य निर्माण झाले.


        कोणतेही कार्य करण्यासाठी संघटनेची स्थापना केल्याने त्यात सुसूत्रता येते आणि योजनाबद्ध रीतीने काम करता येते, हे लक्षात घेऊन २३ सप्टेंबर १८७३ रोजी फुल्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली.. जोतीरावांनी नुसता विचार न मांडता तो आचरणात आणला आणि  एक पुनर्विवाह स्वतःच्या घरी घडवून आणला. सत्यशोधक समाजातर्फे हडपसरला शाळा उघडण्यात आली. शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांविषयी जोतिरावांना  विशेष आस्था होती. जोतिबा शेती आणि शेतकऱ्यांबद्दल जी भूमिका आग्रहीपणे मांडत त्याची दखल इंग्रज सरकारला घ्यावीच लागली इंग्रज सरकारने १८७९ मध्ये शेतीविषयक कायदा पास केला.  समाजसुधारणा करण्याचा एक अत्यंत मूलगामी दृष्टीकोन फुल्यांनी दिला. 


         जोतीराव फुलेंचा जनतेने महात्मा म्हणून गौरव केला. अशा या महात्म्याने २७ नोव्हेंबर १८८९साली सर्वांचा निरोप घेतला. जोतीराव आज या जगात नाहीत पण ते त्यांच्या कार्यांच्या रूपामध्ये अजरामर आहेत.




मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇


[मुद्दे- 

  • जन्म
  • समाजातल्या उणीवा शोधून त्यांचा अभ्यास
  • शिक्षण
  • फुलेंचे कार्य
  • पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा
  • समाजहितासाठी विविध गोष्टींचा त्याग
  • कार्य न थांबवण्याचा दृढनिश्चय
  • प्रत्येक कार्याला अभ्यासाची जोड
  • शेतकऱ्यांसाठी झटले
  • सत्यशोधक समाजाची स्थापना
  • समाजसुधारणेचा मूलगामी दृष्टीकोन
  • जनतेचा निरोप.




हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता. 

Mahatma jotiba phule nibandh
Mahatma jotiba phule Marathi nibandh
Mahatma jotirao phule essay
Mahatma phule in Marathi
Mahatma jotiba phule speech
Mahatma jotiba phule Marathi though


निबंध pdf file :

मित्रांनो या निबंधाची  Pdf  फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा

महात्मा जोतीराव फुले-एक आदर्श समाजसेवक.Pdf file



  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे असते , याबाबत तुमचे मत आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.



धन्यवाद. 



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.