BUY PROJECT PDF Click Here!

नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Naisargik aapatti paryavarn prakalp 11th 12th

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प , प्रस्तावना, उद्दिष्ट्ये,विषयाची निवड,विश्लेषण,प्रकल्पNaisargik aapatti paryavarn prakalp 11vee 12vi paryavarn prakalp
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 नैसर्गिक आपत्ती पर्यावरण व  जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी 


            या लेखातून आपण 'नैसर्गिक आपत्ती'  या पर्यावरण विषयक प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. ही माहिती शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक प्रकल्प करताना उपयुक्त ठरेल. नैसर्गिक आपत्ती या प्रकल्पाची माहिती आपण पुढील मुद्यांच्या आधारे घेणार आहोत.

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प , प्रस्तावना, उद्दिष्ट्ये,विषयाची निवड,विश्लेषण,प्रकल्प कार्यपद्धती.  नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प निष्कर्ष, निरीक्षणे. ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प Naisargik aapatti prakalp prastavana, uddishtye, vishaychi nivad, prakalp karypadhati Naisargik aapatti paryavarn prakalp nishkarsh nirikshane 11vee 12vi paryavarn prakalp Environmental project 11th 12th Marathi



१)   प्रकल्प प्रस्तावना २) प्रकल्प विषयाची निवड ३) प्रकल्पाची उद्दिष्ट्ये ४) प्रकल्प कार्यपद्धती ५) प्रकल्प निरीक्षणे ६) प्रकल्प विश्लेषण ७) निष्कर्ष ८) संदर्भ इत्यादी.

 

नैसर्गिक आपत्ती या प्रकल्पाची माहिती आवडली आम्हाला comment करून सांगा .

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प , प्रस्तावना, उद्दिष्ट्ये,विषयाची निवड,विश्लेषण,प्रकल्प कार्यपद्धती.  नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प निष्कर्ष, निरीक्षणे. ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प Naisargik aapatti prakalp prastavana, uddishtye, vishaychi nivad, prakalp karypadhati Naisargik aapatti paryavarn prakalp nishkarsh nirikshane 11vee 12vi paryavarn prakalp Environmental project 11th 12th Marathi

नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी



चला तर मग सुरुवात करूया नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प या विषयच्या माहितीला 



प्रकल्प प्रस्तावना


          गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर असे निदर्शनास येते की, पर्यावरणात मोठ्या प्रमाणवर नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये समोर येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी आपत्तीच्या काळामध्ये योग्य ते निर्णय जलद गतीने घेणे गरजेचे असते. वाढते उद्योगधंदे ,

मोठ्या प्रमाणवर झालेली जंगलतोड यांमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे आज दरवर्षी एका नव्या संकटाला सामोरे जावे लगत आहे. आपल्यावर येणाऱ्या आपत्तींचे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असे दोन प्रकारे पडतात.

काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये नैसर्गिक आपतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. निसर्गामध्ये घडत असलेले बदल आणि त्यांमुळे सातत्याने नवनवीन निर्माण होत असलेल्या नैसर्गिक आपत्ती याबाबत सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात भारताने, अतिवृष्टी, पूर, भूकंप, भूस्खलन यांसारख्या आपत्तींमध्ये वाढ झाली आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती यांची संकल्पना, नैसर्गिक आपत्ती येण्यास कारणीभूत घटक कोणते आहेत, नैसर्गिक आपतींचे समाजावर कोणते परिणाम घडून येतात, आणि नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या आहेत, तसेच नैसर्गिक आपतींच्या काळात कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.



अनुक्रमणिका



अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

नैसर्गिक आपत्ती संकल्पना

४)

विविध नैसर्गिक आपत्ती आणि आपत्ती काळात घ्यायची काळजी  

५)

नैसर्गिक आपत्तींची करणे

६)

आपत्तींचे परिणाम

७)

विश्लेषण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ



विषयाचे महत्व


नैसर्गिक आपत्ती  म्हणजे काय ? त्याची संकल्पना काय आहे हे जाणून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे होत चालले आहे. आपण आधुनिक जगात जगत आहोत. या आधुनिक जगात जगत असताना आपल्या अनेक नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती या कोणतीही पूर्व सूचना न मिळता येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी होते. अशा संकटांचा धैर्याने सामना करणे गरजेचे आहेत. आपत्तीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिच्यावर मात करण्यासाठी नव्याने उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना सक्षम पणे करता यावा यासाठी आपल्याला नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक माहिती असणे गरजेचे आहे.  म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. ‘नैसर्गिक आपत्ती’ या बाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी मी पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी या विषयाची निवड केली आहे.

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प , प्रस्तावना, उद्दिष्ट्ये,विषयाची निवड,विश्लेषण,प्रकल्प कार्यपद्धती. नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प निष्कर्ष, निरीक्षणे.११वी १२वी पर्यावरण प्रकल्प Naisargik aapatti prakalp prastavana, uddishtye, vishaychi nivad, prakalp karypadhati

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

       आपत्ती म्हणजे काय ? आपत्तीची संकल्पना जाणून घेणे.

       नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ? नैसर्गिक आपत्तीची संकल्पना जाणून घेणे.

       नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणती काळजी घ्यावी याबबत सविस्तर माहिती करून घेणे.

       नैसर्गिक आपत्तींमध्ये कोणकोणत्या आपत्तींचा समावेश होतो याबाबत सविस्तर माहिती मिळवणे.

       नैसर्गिक आपतींचे समाजावर कोणते परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.

नैसर्गिक आपत्तींबाबत सर्वांना सविस्तर माहिती करून देणे.


आपत्ती संकल्पना


अचानक अपघातात किंवा अशी एखादी नैसर्गिक घटना की जिच्यामुळे मोठ्या प्रमाणवर हानी किंवा जीवित व वित्तहानी होते

 

आपत्तीच्या परिस्थितीमध्ये काही घटना पाठोपाठ घडून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर मालमत्तांचे नुकसान, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आवश्यक सेवा आणि उपजीविकेच्या साधनांची हानी होते.

 

जगभरामध्ये, उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे विकासामध्ये  अडथळा निर्माण होतो. गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र आलेल्या भूकंप, स्तुनामी, वादळ, पूर आणि इतर आपतींमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी आपतीग्रस्त भागातील लोकांना पुनर्वसनाची गरज भासते.


आपत्तींचे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असे दोन प्रकार पडतात.

 

 

नैसर्गिक आपत्ती


१)    भूकंप

२)   पूर

३)   चक्रीवादळ

४) स्तुनामी

५)  दुष्काळ

 

 

१)              भूकंप :


पृथ्वीचा पृष्ठभाग कंपनिय हालचालींमुळे, अचानकपणे मागे-पुढे किंवा वर-खाली होऊ लागतो. यामुळे पृष्ठभागावार काही ठिकाणी भेगा पडतात. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ज्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू असतो त्या भागातील परिसरात मोठ्या प्रमाणवर हानी होते. भूकंपाचा वैज्ञानिक अभ्यास केला जातो याला ‘भूकंपशास्त्र’ असे म्हटले जाते.

सर्वात विनाशकारी आणि धोकादायक आपत्ती म्हणून भूकंपाचा उल्लेख केला जातो. कारण या घटनेचा प्रभाव काही क्षणात पाहायला मिळतो. भूकंप होणार याची पूर्वसूचना देता येत नाही. तो अचानक घडून येतो.  याचे परिणाम इतके भयानक असतात की भव्य इमारत नष्ट करण्याइतपत ताकद या आपत्तीमध्ये असते त्यामुळे भूकंपग्रस्त भागातील पायाभूत सुविधा काही सेकंदांमध्ये नष्ट होऊ शकतात.


·       भूकंप आपत्तीत घ्यायची काळजी.


१)    बाहेर असल्यास उद्युत खांब आणि तारांपासून दूर राहा.

२)   काच, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि पडणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब रहा.

३)   जवळ बळकट टेबल किंवा फर्निचर असल्यास त्याचा आश्रय घ्या . डोक्याचा बचाव करण्यासाठी उशीने किंवा मजबूत फर्निचर खाली जावून बसा. भूकंपाचे धक्के बंद होईपर्यंत तेथून बाहेर येऊ नका.

४) वाहन चालवताना भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी उभे करा आणि वाहनामध्येच थांबा.

५)  भूकंप होत असताना लिफ्ट चा वापर करू नका.


२)            पूर


पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणवर वाहून जाणे किंवा साठणे म्हणजेच पूर होय. नदीतील आत येणारे आणि बाहेर जाणारे पाणी यांमधील संतुलन झाले की पूर परिस्थिती उद्भवते. मोठ्या प्रमाणवर अतिवृष्टी होणे, वेगाने बर्फ वितळणे, नदीचा बांध किंवा पाईप लाईन फुटल्याने पूर परिस्थिती उद्भवते. पुरांमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अनेक लोक मृत्युमुखी पडतात तर काही जखमी होतात. पूरग्रस्त भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागोत. अन्नधान्य अपुरे पडू लागते.


·       पूरपरिस्थितीत घ्यायची काळजी.


१)    पुराच्या पाण्यामधून चालत जावू नये.

२)   पूरग्रस्त भागातील विहिरींतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.

३)   शक्य असेल तितक्या उंच जागेवर स्थलांतर करा.

४) पुरानंतर नदी किनाऱ्याजवळ, बांधावरून, कालव्याच्या किनाऱ्यांवर जावू नका कारण ते कोसळण्याची शक्यता असते.

५)  गॅस तसेच विद्युत उपकरणे यांचा जर पुराच्या पाण्याशी संपर्क झाला असेल तर त्याचा वापर करू नये.

 

Naisargik aapatti paryavarn prakalp nishkarsh nirikshane 11vee 12vi paryavarn prakalp Environmental project 11th 12th Marathi


३)            चक्रीवादळ


चक्रीवादळांची गती ही तीव्र आणि चक्राकार असते. मोठ मोठ्या महासागरांमध्ये चक्रीवादळाचे प्रमाण जास्त असते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे जास्त होताना आढळतात. जोरदार वृष्टीमुळे पूर येतात. चक्रीवादळांमध्ये वरा १२० किमी पेक्षा जास्त वेगाने वाहू शकतो. जेव्हा चक्रीवादळ किनाऱ्याच्या दिशेने सरकते तसतसे समुद्राचे पाणी किनाऱ्याकडे फेकले जाऊ लागते आणि या जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्राचे पाणी चक्राकार फिरते आणि समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र लाटा येऊन धडकतात. यांमध्ये जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणवर होते. या वादळांना अमेरिकेत ‘हरिकेन’म्हटले जाते.


·       चक्रीवादळा पूर्वी घ्यायची काळजी


१)    घरांचे छपर, कौले सैल झाली असल्यास त्यांची दुरुस्ती करून घ्या.

२)   घराजवळ असणारी सुकेलेली झाडे, आणि लाकडे तोडून टाका

३)   केरोसीन मशाल, कंदील, दिवा जवळ ठेवा.

४) जुन्या पडक्या इमारती पाडून टाकाव्यात

५)  आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वापर करण्यासाठी सुकलेले अन्न सोबत तयार ठेवा.

 

४)          त्सुनामी:


समुद्रामध्ये एकामागोमाग एक अशा जास्त तरंगलांबी असलेल्या लाटा उसळतात याला त्सुनामी असे म्हटले जाते. समुद्राच्या तळाशी निर्माण झालेल्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे  या लाटांची निर्मिती होते. आणि समुद्रामध्ये अजस्त्र लाटा निर्माण होऊन त्या प्रचंड भूभागावर पसरतात.

त्सुनामी च्या केंद्रबिंदुपासून सुमारे ३० मिनिटांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या भागांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होण्याचा धोका असतो. या पाण्याचा वेग इतका असतो की समोर येणारि प्रत्येक गोष्ट नष्ट होऊ शकते. त्सुनामीमुळे पायाभूत सुविधा, जीवित व वित्तहानी, घरांचे मोठ्या प्रमावर नुकसान होते तर, घरे समुद्रात वाहून जातात. किनारे नष्ट होतात. अनेक लोक पाण्याच्या लाटांबरोबर वाहून जातात.


·       त्सुनामी परिस्थितीत घायची काळजी.


१)    अशा परिस्थितीमध्ये आपण प्रथम स्वतःचे संरक्षण करावे.

२)   कुटुंबातील लोकांना एकत्र करून समुद्रकिनाऱ्यापासून दूर उंचावरील ठिकाणी जा.

३)   विद्युत तारा तुटल्या असल्यास त्यांपासून दूर राहा.

४) आपत्कालीन संच सोबत ठेवा.



५)           दुष्काळ.


पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळ पडतो. भारतामध्ये सर्वात जास्त पासु हा जून ते सप्टेंबर या महिन्यांत पश्चिम मान्सून मुळे पडतो. पावसाची अनियमितता , मोठा कोरडा कालावधी आणि वाढते तापमान यांमुळे दुष्काळ पडतो. जवळ जवळ ८ ते ९ वर्षांनी दुष्काळाची परिस्थिती एकदा येते.

दुष्काळाचे विविध प्रकार पडतात.

हवामानशास्त्रीय दुष्काळ: पर्जन्यवृष्टि कमी

कृषी दुष्काळ: ज्या ठिकाणी शेती केली जाते त्या ठिकाणच्या जमिनीतील पाण्याची कमतरता.

जल दुष्काळ: जलाशयांमधील पाण्याची पातली कमी असणे.

सामाजिक –आर्थिक दुष्काळ :  पाण्याच्या कमतरतेमुळे समाजात अन्नधान्य, चार इ. तुटवडा जाणवणे.


·       दुष्काळी परिस्थिती घ्यायची काळजी:


१)    जे पाणी उपलब्ध आहे त्याचा वापर जपून करा.

२)   शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची पातळी  निश्चित करा.

३)   पिण्याचे पाणी मौल्यवान असल्याने त्याची नासाडी करू नका.

४) ज्या पिकांना कमी पाणी लागते अशा पिकांची लागवड शेतात करा.

५)  दक्षिण पश्चिम मान्सूनच्या कालावधीत नियमितपणे पावसाच्या स्थितीचे निरीक्षण करणे.


 

 नैसर्गिक आपतींची कारणे



  • अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण होते.
  • भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादींमुळे आपत्ती निर्माण होतात.
  • जंगलांना अचानक आग लागणे.
  •  वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशांमध्ये लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता.
  • बेसुमार प्रमाणात वाढत चाललेली बांधकामे.
  •    निसर्गाचा ढासळत चालेला समतोल.
  • दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यांतून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी , अपघात इत्यादींमुळे आपत्ती निर्माण होतात.

 

 

 

 

 

 

आपत्तींचे परिणाम


अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपतींमुळे आपत्तीच्या ठकाणी असणाऱ्या तेथील लोकांवर वाईट परिणाम घडून येतात. जे देश पूर्णपणे विकसित झालेले नसतात त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता असते. आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य करणाऱ्या प्रणाली सुद्धा या देशांमध्ये कमी असतात. त्यामुळे अशा ठिकाणी नैसर्गिक आपतींचे गंभीर परिणाम दिसून येतात. नैसर्गिक आपतींमुळे मोठ्या प्रमाणवर जीविताची हानी होते, अन्नाचे स्त्रोत नष्ट होतात, आपत्तीग्रस्त भागामध्ये रोगांच्या साथी पसरतात, जनजीवन विस्कळीत होते. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे हे परिणाम तेथील लोकांना दीर्घकाळापर्यत भोगावे लागतात. आपत्तीग्रस्त भागातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणवर आर्थिक, भौतिक, स्त्रोत आणि साधनसंपत्तीची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्ती या अचानक किंवा अल्पसूचनांसह येतात यामुळे याचा परिणाम थेट परिमाण घरे, उपकरणे, पिके, पायाभूत सुविधा आणि जीवित हानी यांचा समावेश होतो.

 

Ø भूकंपाचे परिणाम:

 

ü पूल, रस्ते, लोहमार्ग आणि बांधकामे भूकंपामुळे उध्वस्त होतात.

ü भूकंपामुळे नद्यांचा प्रवाह बदलू शकतो.

ü मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी होते.

 

Ø पूराचे परिणाम:

ü पिकांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते.

ü पूर ओसरल्यानंतर आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते.

ü जमिनीची मोठ्या प्रमाणवर धूप होते.

 

Ø चक्रीवादळाचे परिणाम:

ü वादळ ग्रस्त प्रदेशांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते.

ü जीवित व वित्तहानी मोठ्याप्रमाणावर होते.

ü दळणवळण यंत्रणा ठप्प होते.

ü वीजपुरवठा खंडीत होतो.


 

निरीक्षणे 


निरीक्षणे पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सदर माहिती मध्ये दिलेली निरीक्षणे ही हा प्रकल्प करताना वापरू शकता. 






प्रकल्प  विश्लेषण


महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती


  •  पूर

        तापी, वर्धा आणि कधीकधी वैन-गंगा या नद्यांमुळे राज्यात पूर निर्माण होतो.

        राज्यातील पूर्वेकडील भागात पूरस्थिती आहे. 1996 पुरामध्ये राज्याचे 2,899 लाख हेक्टर जमीन , १९८ लोक आणि ३८ जनावरे मारली गेली.

        महाराष्ट्र राज्यातील पश्चिमेकडील रत्नागिरी जिल्ह्यात २०२१ मध्ये चिपळूण, कोल्हापूर, खेड येथे निर्माण झालेली पूरस्थिती

 

  • दुष्काळ 


        राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील 50 टक्के डेक्कन पठार आहे. 12 टक्के लोकसंख्या दुष्काळग्रस्त भागात राहते. पाच वर्षांतून एकदा पाऊस कमी पडतो.

        गंभीर दुष्काळाची परिस्थिती दर--9 वर्षांनी एकदा होते. 1996 च्या दुष्काळाचा परिणाम 7 जिल्हे आणि 266.75 लाख लोकांवर झाला होता.


  • भूकंप

        महाराष्ट्र  राज्य भूकंपग्रस्त विभाग I मध्ये आहे. महाराष्ट्रातील लातूर दरम्यान भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत.

        १९९२ साली ऑगस्ट आणि ऑक्टोबर मध्ये लातूर ला ६.४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे लातूर हादरला.

        30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूर आणि जिल्ह्यांमधील जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

        धाराशिव भूकंपामुळे 7,938 लोक ठार, 16,000 जखमी आणि 15,847 पशुधन हानी झाली. 52 गावे जमीनदोस्त झाली आणि सुमारे 27,000 घरे पूर्णपणे खराब झाली.

        कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात सक्रिय भूकंपग्रस्त प्रदेशांपैकी एक आहे आणि 35 वर्षांत या भागाला एक लाखाहून अधिक हादरे बसले. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे एक तीव्र भूकंप झाला. हा भूकंप 20 व्या शतकातील महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठा भूकंप होता. याची तीव्रता 6.5 ते 7.5 च्या दरम्यान होती आणि ती पश्चिमेकडे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक; केंद्रबिंदू कोयना धरणाजवळ होता. 200 पेक्षा जास्त लोक मरण पावले आणि आणखी शेकडो जखमी झाले. 3.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप मार्च 2001 मध्ये महाराष्ट्र कोयना प्रदेश मध्ये झाला.

 



निष्कर्ष


·       आपत्ती म्हणजे काय ? आपत्तीची संकल्पना जाणून घेतली.

·       नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ? नैसर्गिक आपत्तीची संकल्पना जाणून घेतली.

·       नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणती काळजी घ्यावी याबबत सविस्तर माहिती घेऊन तिचे संकलन केले.  

·       नैसर्गिक आपत्तींमध्ये कोणकोणत्या आपत्तींचा समावेश होतो याबाबत माहिती एकत्रित केली.

·       नैसर्गिक आपतींचे समाजावर कोणते परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती मिळाली.

 

संदर्भ
 

 

v Educationalमराठी (www.educationalmarathi.com)

v माझा अभ्यास (www.mazaabhyas.com)

v पर्यावरण पुस्तिका

 

✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

नैसर्गिक आपत्ती प्रकल्प प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

1 comment

  1. Khup issential information ahe ani useful ahe....☺👏🏻
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.