बातमी लेखन स्वच्छता अभियान (नमुना )
शाळेत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा वृतांत तयार करा. शाळेत राबवण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमावर बातमी लेखन करा.बातमी लेखन मराठी १०वी २०२१ तुमच्या गावात राबलेल्या स्वच्छता मोहिमेचा वृतांत तयार करा.स्वच्छता मोहीम वृतांत लेखन मराठी २०२१ बातमी लेखन नमुना.
प्र.१) तुमच्या गावात राबवण्यात आलेल्या
स्वच्छता अभियानावर बातमी लेखन करा.
उत्तर :
![]() |
स्वच्छता अभियान बातमी लेखन १०वी नमुना |
खेड दि. ३ ऑक्टोबर - खेड
तालुक्यातील सावरपाडा गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक तसेच गावातील
ग्रामस्थांनी संपूर्ण गावाची स्वच्छता मोहीम हाती घेऊन गावातील कचरा, रस्त्यावरील
शेवाळ, सांडपाणी इत्यादींची स्वच्छता करून गाव स्वच्छ व सुंदर केले. मा.
पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाला दाद देऊन सावरपाडा गावाने संपूर्ण गाव स्वच्छ
व सुंदर बनवण्याचे आव्हान स्वीकारले. स्वच्छता करण्यासाठी सारा गाव एकवटला होता. २९
सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पाच दिवसांत स्वच्छता अभियान गावात राबवले गेले . या पाच
दिवसांत गावाचे रूपच पालटून गेले.
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत
सावरपाडा ग्रामपंचायतीने गावातील मंदिरे, अंगणवाडी, स्मशानभूमी, प्राथमिक शाळा, रस्ते
चौक इत्यादी ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग स्वच्छ केले. रस्त्यांवर इतरत्र पडलेले
कागद, प्लास्टिक बाटल्या, पालापाचोळा एकत्र करून त्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण केले. सरपंच तनया
चव्हाण, उपसरपंच योगेश कीर , गावातील गावकरी आणि तरुण मंडळी या सर्वांचा या
स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग होता.
शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या
कार्यक्रमात स्वच्छेचे महत्व सांगताना गावाच्या स्वच्छता समितीचे अध्यक्ष सार्थक
गावखडकर म्हणाले, ‘स्मार्ट व्हिलेज च्या
दिशेने पावले टाकताना, विविध
उपक्रमांबरोबरच स्वच्छतेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे. आणि हे साध्य
करण्यासाठी सावपाडा गाव कुठेही कमी पडणार नाही’ सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
विकास गोरे यांनी केले . केतन सागवेकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी ग्रामस्थांना विशेष
प्रमाणपत्र देऊन या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.
बातमी लेखन मराठी १०वी २०२१ बातमी लेखन नमुना Swachhata abhiyan mohim vrutant lekhan Marathi 2021 Batami lekhan namuna
१) तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा वृतांत तयार करा.
2) तुमच्या शाळेत साजरा केलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचा वृतांत तयार करा.
३) तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गांधी जयंतीचा वृतांत तयार करा.
४) तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेल्या बालदिनाचा वृतांत वृत्तपत्रात देण्यासाठी तयार करा.
प्र.२) तुमच्या महाविद्यालयात राबवलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रमाची बातमी तयार करा. (वृतांत लेखन)
मंचर, दि. ३ ऑक्टोबर : महात्मा
गांधी जयंतीच्या निमित्ताने मंचर येथील शारदा विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांनी काल
महाविद्यालाचा परिसर तसेच महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली.
महाविद्यालयातील स्वच्छता समितीचे प्रमुख श्री. प्रशांत भागवत आणी सौ. उर्मिला
सदावर्ते यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख
पाहुणे म्हणून सार्वजनिक स्वच्छता विभागाचे अधिकारी श्री. राठोड तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मोहन विचारे, शिक्षक , पालक आणि विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
सकाळी ठीक १० वाजता महविद्यालयातील
विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरातून स्वच्छतेचा संदेश देणारी प्रभात फेरी काढली
यामध्ये स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. यांनतर
महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छतेचे कार्य पार पडल्यानंतर सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये
एकत्रित जमले या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मोहन विचारे यांनी
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या
स्वच्छता विभागाची विद्यार्थी प्रतिनिधी केतकी तेंडूलकर हिने केले.
सोहम भागवत या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार
मानले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वरील माहिती ही नमुना बातमी लेखन म्हणून देण्यात आली आहे. तुम्हाला माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
बातमी लेखन कसे करावे त्यात कोणते मुद्दे असावेत हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?
बातमी लेखनाचे अजून काही नमुने पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत | महाविद्यालयात रेड रिबिन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत
प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन
वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?