BUY PROJECT PDF Click Here!

हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी | Hava pradushan project 11th 12th paryavarn prakalp

11th 12th paryavarn prakalp Marathi Hava pradushan prakalp Vayu pradushan prakalp 11vi 12vi Paryavaran prakalp pdf hava pradushan हवा प्रदूषण प्रकल्प
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 हवा प्रदूषण प्रकल्प 

पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती | पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf | पर्यावरण प्रकल्प मराठी | Paryavarn prakalp Marathi 12th | Paryavarn prakalp pdf |Paryavarn prakalp karypadhati

        ११वी १२ वी पर्यावरण प्रकल्प आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले. आहेत. या प्रकल्पांमध्ये नवीन अभ्यास क्रमानुसार प्रकल्प प्रस्तावनाप्रकल्पाची उद्दिष्ट्येप्रकल्प विषयाचे महत्वप्रकल्प कार्यपद्धतीविश्लेषणनिरीक्षणेनिष्कर्षअहवाल लेखनइत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

project pdf link given below

हवा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना 


आजच्या युगात पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत जाणारी लोकसंख्या, नियंत्रणाबाहेर वाढत चाललेले औद्योगिक क्षेत्र आणी वाढती शहरे आणि नैसर्गिक संसाधनांचा बेजबाबदार पणे वापर यामुळे पर्यावरण दुषित होऊन जाते. प्रदूषणामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. मानवाच्या तीन मुलभूत गरजा म्हणजे जल, जमीन आणि हवा या वेगवेगळ्या मानवी कृतींमुळे प्रदूषित होतात.

हवा प्रदूषणाचा जर आपण इतिहास पहिला तर पूर्वीची हवा ही आत्ताच्या हवेपेक्षा कित्येक पटींनी शुद्ध होती. औद्योगिक क्रांतीची सुरुवात आणि त्यानंतर वाढत जाणारे उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणवर वाढत जाणारी लोकसंख्या या लोकसंख्येला पुरवल्या जाणाऱ्या सोई सुविधा  त्यासाठी तयार केली गेलीली उपकरणे यांतून दिवसेंदिवस वाढ होऊन त्यांमधून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या वायूंमुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील हवा ही प्रदूषित होत चालली आहे.

हवा प्रदुषणाची कारणे कोणती आहेत, हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी या केल्या नाही पाहिजेत याबाबत ‘हवा प्रदूषण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत.

11th 12th paryavarn prakalp Marathi Hava pradushan prakalp Vayu pradushan prakalp 11vi 12vi Paryavaran prakalp pdf hava pradushan हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प वायू प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्प प्रस्तावना

हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी


अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

प्रकल्प कार्यपद्धती

३)

वायू प्रदूषण संकल्पना

४)

वायू प्रदूषके

५)

वायू प्रदूषणाचे स्त्रोत आणि वायू प्रदूषण नियंत्रण उपाय

६)

हवा (प्रतिबंध आणि नियंत्रण )कायदा, १८८१

७)

निरीक्षण

८)

विश्लेषण

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ

११)

प्रकल्प अहवाल




विषयाचे महत्व


हवा, पाणी आणी मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलांमुळे सजीवांच्या जीवनावर घातक परिणाम होतात. किंवा कोणत्याही सजीवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, याला प्रदूषण असे म्हणतात.

आज उद्योगधंद्यांची बेसुमार वाढती संख्या जर आपण पहिली तर त्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या विविध विषारी घटकांचा समावेश असलेल्या वायूमुळे हवा प्रदूषित होऊन जाते आणि याच वायू प्रदूषणामुळे अनेक व्याधी जडत आहेत. सजीवांमध्ये बुध्दीमान प्राणी म्हणून मानव वावरत आहे. त्याच्या वागणुकीतून सजीवसृष्टीच्या विकासापेक्षा स्वहितार्थ त्या सृष्टीच्या विनाशाच वाटेवरच पाऊल पडत आहेत.

 औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होत असले तरीही स्वतःची प्रगती करण्याच्या चढाओढीत जलद विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. पर्यावरणाची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज विकास प्रकल्पातून होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला.

आज मानवाच्या च कृतीमुळे निष्काळजीपणामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर घातक परिणाम होत असेलेल दिसून येत आहे. आज हवा प्रदूषणाबाबत सर्वांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. म्हणून .हवा प्रदूषण हा विषय आजच्या आधुनिक जगात फार महत्वाचा आहे.


प्रकल्प उदिष्टे 

 

·       हवा प्रदूषण म्हणजे काय त्याची संकल्पना जाणून घेणे.

·       हवा प्रदुषणाचा पर्यावरणावर कोणता परिणाम होतो याची माहिती मिळवणे.

·       हवा प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती घेणे.

·       हवा प्रदूषणाची करणे, आणि हवा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक यांची माहिती मिळवणे.

·       हवा प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाय योजना माहिट करून घेणे.

·       हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या घातक परिणामांची माहिती इतरांना करून देणे.

 

प्रकल्प कार्यपद्धती


‘वायू प्रदूषण’ हा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली. प्रकल्पाच्या विषयानुसार पाण्याचा मोठ्या प्रमाणात होत असेलेल वायू प्रदूषण आणि त्यामुळे होत असलेले मानवी जीवनावर परिणाम तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यावरील माहिती मिळविण्यासाठी मी मुलाखत, प्रश्नावली व क्षेत्रभेट या कार्यपद्धतीचा अवलंब केला.

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील वाढत्या प्रदूषण पातालीबाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

 


वायू प्रदूषण


वायू प्रदूषणात अपायकारक कण, जैविक रेणू किंवा इतर हानिकारक पदार्थांचा पृथ्वीच्या वातावरणात शिरकाव होतो. यामुळे रोग, मानवांचा मृत्यू व इतर सजीवांचे नुकसान होते.

वायू प्रदूषण ( प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १८८१ नुसार वायू प्रदूषणाची व्याख्या :

वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थांचे अस्तित्व अशा प्रमाणात, की जे मानवाला, सजीवांना, वनस्पतींना हानिकारक ठरू शकते.

 

 


वायू प्रदूषके


·       प्रमुख वायू प्रदूषके खालील प्रमाणे आहेत.

 

Ø अतिसूक्ष्म कण  – काजळी , धूर , डांबर किंवा धूळ आणि घरगुती कचरा.

Ø विषारी वायू- कार्बन मोनोऑक्साईड , नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड व संप्लावीत सेंद्रिय संयुगे.

Ø धातू- शिसे , जस्त, लोह आणि क्रोमिअम

Ø औद्योगिक प्रदूषके – बेंझीन, इथर, असीटिक असिड, सायनाइड संयुगे इत्यादी.

Ø कृषि प्रदूषके- किडनासके, तण नाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खते.

Ø फोटोकेमिकल प्रदूषके – ओझोन, नायट्रोजन चे ऑक्साईड, अल्डीहाइड, इथिलीन, फोटोकेमिकल धुके आणि पेरोक्सी असिटील नायट्रेट (PAN)व सल्फर ऑक्साईड (SOx).

Ø किरणोत्सारी प्रदूषके – किरणोत्सारी घटक व अनु चाचणीमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग



Paryavaran prakalp pdf hava pradushan / हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प / वायू प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्प प्रस्तावना

वायू प्रदूषणाचे स्त्रोत आणि वायू प्रदूषण नियंत्रण उपाय


 

v वायू प्रदूषणाचे मुलभूत स्त्रोत नैसर्गिक व मानवनिर्मित आहेत.

नैसर्गिक स्त्रोत:

प्रदूषणाचे नैसर्गिक स्त्रोत, जे नैसर्गिक घटनांमुळे उद्भवतात. उदा. ज्वालामुखी उद्रेक, जंगलातील वणवा, जैविक विघटन, परागकण, दलदल किरणोत्सारी घटक इ.

मानव निर्मित स्त्रोत :

प्रदूषणाचे मानवनिर्मित स्त्रोत हे मानवी क्रियांमुळे होतात. उदा: घरातील हवेतील प्रदूषके, वाहनांचे उत्सर्जन, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, कृषिजन्य क्रिया, औद्योगिक उत्सर्जन, औष्णिक वीज प्रकल्प इत्यादी.

 

v वायू प्रदूषण नियंत्रण उपाय

वायू प्रदूषण नियंत्रित कण्यासाठी पुढील उपाय सुचविले गेले आहेत.

1.    कोळसा, जळाऊ लाकूड आणि कचरा यांना जाळणे टाळा.

2.    पुनर्नवीकरणीय उर्जा संसाधनांचा उपयोग करा.

3.    प्रदूषण नियंत्रण कायद्याचे काटेकोर पणे पालन करा.

4.    भूपृष्ठावरील प्रदूषण कमी करण्यासाठी धुरांच्या धुराड्यांची उंची शक्य तेवढी उंच करा.

5.    वातावरण शुद्ध राहण्यासाठी वृक्षारोपण करण्यावर भर द्या. वृक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात व त्यांच्या पानांवर हवेत तरंगणारे कणयुक्त घटक चिकटतात.

6.    खाजगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करा.

7.    वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची उत्तम पद्धत म्हणजे ‘प्रदूषण प्रतिबंध’, ज्याला स्त्रोत कमी करणे असेही म्हणतात, ही प्रक्रिया स्त्रोत प्रदूषण कमी करते, नाहीसे करते किंवा प्रतिबंधित करते.

8.   प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला नियमितपणे पीयूसी (PUC) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जे भारतातील मोटार वाहने उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण करणारे प्रमाणपत्र आहे.

 

हवा (प्रतिबंध आणि नियंत्रण )कायदा, १८८१


हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १८८१

देशातील सभोवतालच्या हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केला गेला आहे. या कायद्याद्वारे उद्योग व कारखान्यांतून उत्सर्जनाचे नियंत्रण केले जाते, ज्यायोगे हे उत्सर्जन हानिकारक पातळी पेक्षा कमी ठेवले जाते. या कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषण करणारे औद्योगिक उपक्रम करण्यास परवानगी नसलेले काही भाग चिन्हांकित करू शकतात.

हवा प्रदूषण कायद्यातील तरतुदींचे कोणी उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो आणि अशा व्यावसायिकाला किंवा त्या व्यक्तीला हवा प्रदूषित केल्याबद्दल फौजदारी खटल्यांना सामोरे जावे लागते. या कायद्यानुसार परिसरात राहणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारले असेल तेव्हा माहिती धने बंधनकारक आहे.

 

निरीक्षणे
 

काही मुख्य प्रदूषके व त्यांचे परिणाम

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल(  tilt )आडवा करा.

सल्फर ऑक्साईड

श्वसनाचे विकार , हदय व फुफ्फुसाच्या व्याधी कमजोर दृष्टी

क्लोरोसिस, वनस्पतीच्या ऊती मृत पावणे .

नायट्रोजन ऑक्साईड

परोक्सी असिटील नायट्रेट (PAN) तयार करते, श्वसनाचे विकार, जास्त प्रमाणत असल्यास विषारी.

पिकांची उत्पादकता कमी होते.

धूळ, धूर व धुके

फुफ्फुसांच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळे.

प्रकाश परिवर्तीत करून हवामानावर परिणाम करते.

कण पदार्थ

श्वसनसंस्थेचे विकार , दमा , फुप्फुसाचा दाह , फुप्फुसांची कार्यक्षमता मंदावणे , दयविकाराचा झटका , हाडाचे विकार , कर्करोग , जड धातूंमुळे होणारे विषारिकरण.

जैव विविधतेवर विपरीत परिणाम उदा. पानांवर कला थर अथवा काजळी जमा होणे.

कार्बन मोनोऑक्साईड

रक्ताची ऑक्सिजन वहनक्षमता कमी होते, हृदय व रक्ताभिसरण संस्थेचे विकार, नवजात बालके, गरोदर स्त्रया व वृद्ध यांना जास्त धोका असतो.

जागतिक तापमानवाढ

ओझोन

तपांबरातील ओझोनमुळे श्वसनसंस्थेचे विकार होतात. जसे घशाचे त्रास, दमा, फुफ्फुसांचे विकार, छातीत दुखणे.

वनस्पतींवर विपरीत परिणाम होतात. परोक्सी असीटील नायट्रेट तयार करण्यास मदत करते. हरितगृह वायूप्रमाणे कार्यरत.

शिसे

रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवर परिणाम.

वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते.

अमोनिया

डोळ्यांची जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग व डोळे जळजळणे, दीर्घकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा, मृत्यू.

जलचरांवर परिणाम

 

विश्लेषण

 

v हवेचा गुणवत्ता निर्देशांक

v  

हा गुणवत्ता विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासनातर्फे या निर्देशांकाचा उपयोग केला जातो. जसा हा निर्देशांक वाढतो, तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका वाढत जातो.

 

 

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक

हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक मूल्य

आरोग्याच्या दृष्टीकोनातून

०-५०

चांगले

५१-१००

समाधानकारक

१०१-२००

मध्यम प्रदूषित

२०१-३००

खराब

३०१-४००

अगदी खराब

४०१-५००

तीव्र प्रदूषित

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

निष्कर्ष

 

·       हवा प्रदूषण म्हणजे काय त्याची संकल्पना काय आहे याबाबत माहिती मिळवली.

·       हवा प्रदुषणाचा पर्यावरणावर कोणता परिणाम होतो याबाबत माहिती मिळवून तिचे संकलन केले.

·       हवा प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची अधिक माहिती घेणे शक्य झाले.

·       हवा प्रदूषणाची करणे, आणि हवा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक याबबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

·       हवा प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाय योजना माहित करून घेतल्या

 


संदर्भ

 

 

·       www.educationalmarathi.com

·       www.wikipidia.org

·       www.mazaabhyas.com

·       पर्यावरण पुस्तिका


प्रकल्प अहवाल


आजच्या युगात पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत जाणारी लोकसंख्या, नियंत्रणाबाहेर वाढत चाललेले औद्योगिक क्षेत्र आणि वाढती शहरे आणि नैसर्गिक संसाधनांचा बेजबाबदार पणे वापर यामुळे पर्यावरण दुषित होऊन जाते. प्रदूषणामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात.

आज मानवाच्या च कृतीमुळे निष्काळजीपणामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर घातक परिणाम होत असेलेल दिसून येत आहे. आज हवा प्रदूषणाबाबत सर्वांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. म्हणून .हवा प्रदूषण हा विषय आजच्या आधुनिक जगात फार महत्वाचा आहे.

मी शैक्षणिक वर्ष २२०२०-२१ मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी‘‘वायू प्रदूषण’’ या विषयाची निवड केली. या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण मुलाखत या कार्यपद्धतीचा अवलंब केला. हा प्रकल्प करत असताना परिसरातील वाढत जाणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत माहिती घेणे. वायू प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम जाणून घेणे. सभोवतालच्या पर्यावरणावर कोणता परिणाम होतो याची माहिती मिळवणे. पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती घेणे. यांसारखी उद्दिष्ट्ये समोर ठेऊन मी या प्रकल्पाची माहिती एकत्रित केली.

मुलाखतीच्या च्या माधमातून परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या आणि मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरक्षणाची नोंद केली.  मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण केले. तसेच निष्कर्ष काढण्यात आला.  वाढत्या वायू प्रदूषणाचे आजूबाजूच्या परिसरावर घातक परिणाम घडून येतात हे निष्पन्न झाले. अशा प्रकारे पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.


विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

हवा प्रदूषण प्रकल्प.pdf प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.


११वी १२वी प्रकल्प विषयांची यादी 


प्रकल्प विषयांची यादी

आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

पाण्याचे स्थानिक स्त्रोत प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प

येथे क्लिक करा.

टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प

येथे क्लिक करा.

पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती प्रकल्प

येथे क्लिक करा.

परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प

येथे क्लिक करा.

प्लास्टिक पुनर्चक्रीकर्ण प्रक्रिया प्रकल्प

येथे क्लिक करा.

सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती प्रकल्प .

येथे क्लिक करा.

क्षेत्रभेट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१०

दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प

येथे क्लिक करा.

११
 

स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१२

रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प

येथे क्लिक करा.

१३

घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१४

लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प

येथे क्लिक करा.

१५

पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प

येथे क्लिक करा.

१६

जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा  प्रकल्प

येथे क्लिक करा.

१७

औद्योगिक प्रदूषण प्रकल्प

येथे क्लिक करा.

१८

नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प

येथे क्लिक करा.

१९

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प

येथे क्लिक करा.

11th 12th paryavarn prakalp Marathi
Hava pradushan prakalp
Vayu pradushan prakalp 11vi 12vi
Paryavaran prakalp pdf hava pradushan
हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.