वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche mahatwa nibandh 8vi 9vi marathi.

वेळ – एक मौल्यवान संपत्ती वेळेचे महत्व मराठी निबंध वेळेचा सदुपयोग मराठी निबंध ८वी ९वी वेळेचे महत्व मराठी निबंध Veleche mahatwa Marathi nibandh
Admin

 वेळेचे महत्व मराठी निबंध 

वेळ – एक मौल्यवान संपत्ती / वेळेचे महत्व मराठी निबंध / वेळेचा सदुपयोग मराठी निबंध ८वी  ९वी / वेळेचे महत्व मराठी निबंध
Vel- ek molyavan sampatti / Veleche mahatwa Marathi nibandh

                वेळ हा खूप मौल्यवान आहे. एकदा निघून गेलेली वेळ ही कधी परत येत नाही. त्यामुळे वेळेचा नेहमी सदुपयोग केला पाहिजे. जे लोक आपल्या जीवनामध्ये वेळेचा योग्य वापर करतात, तेच लोक त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात. त्यांना कधीही पश्च्चाताप करावा लागत नाही.

               

वेळ – एक मौल्यवान संपत्ती वेळेचे महत्व मराठी निबंध वेळेचा सदुपयोग मराठी निबंध ८वी  ९वी वेळेचे महत्व मराठी निबंध Vel- ek molyavan sampatti Veleche mahatwa Marathi nibandh Velelcha sadupayog Marathi nibandh 8th 9th Veleche mahatwa Marathi nibandh .

 वेळेचे महत्व मराठी निबंध


                 काही लोक वेळेचे महत्व समजून घेत नाहीत. जे लोक वेळेचा योग्य वापर करीत नाहीत त्यांचे कोणतेही काम वेळेवर झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. जेव्हा उठण्याची वेळ होते तेव्हा ते झोपतात आणि जेव्हा झोपण्याची वेळ होते तेव्हा ते जागे राहतात ! सकाळी जरी झोपेतून जागे झालेच तरीही अंथरुणात काही तास पडून राहतात. दिवसभर गप्पा गोष्टी केल्यानंतर त्यांच्याकडे जो वेळ वाचतो , तो वेळ ते दुसऱ्या लोकांची निंदा करण्यामध्ये वाया घालवतात.

                वेळेचा योग्य वापर करणे म्हणजेच जीवनाला सार्थक बनवणे. पण हे तेव्हाच शक्य होऊ शकते, जेव्हा आपण वेळेप्रमाणे चालू, वेळेचा सदुपयोग करू. आपले प्रत्येक काम आपण वेळेवर केले पाहिजे. जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा अभ्यास केला पाहिजे, जेव्हा व्यायाम करायचा वेळ आहे तेव्हा आपण व्यायाम केला पाहिजे आणि जेव्हा मनोरंजन करण्याचा वेळ असेल तेव्हाच आपण तो वेळ मनोरंजनासाठी वापरला पाहिजे. वेळेची विभागणी करून जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा कोणतेही काम वेळेत आणि सहजतेने पूर्ण होते. यामुळे वेळ वाया जात नाही. हाच वेळेची विभागणी करण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. वेळेची विभागणी करून काम केल्याने कोणत्याही कामाचे वजन वाटत नाही.

                आपल्या महापुरुषांनी वेळेला खूप महत्व दिले आहे. महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक यांनी कायम वेळेचा सदुपयोगच केला आहे. ज्ञान, कौशल्य, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टींची प्राप्ती ही जेव्हा आपण वेळेचा सदुपयोग करतो तेव्हाच होते.

                एक वेळ चोरीला गेलेले धन आपल्याला परत मिळू शकते पण एकदा का वेळ आपल्या हातातून निघून गेली की परत कधीच येत नाही. कितीही धन देऊन वेळेला कधी विकत घेतले जाऊ शकत नाही. म्हणून वेळ ही एक महत्वाची संपत्ती आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात वेळेचा सदुपयोग करणे खूप गरजेचे आहे.


हा निबंध तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

हा निबंध लिहित असताना खालील मुद्द्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे:

वेळेचे महत्व

वेळेचा दुरुपयोग

वेळेचा सदुपयोग

वेळ आणि आपले समाजसुधारक

वेळ – एक मौल्यवान संपत्ती.

संदेश

शेवट]


वेळ – एक मौल्यवान संपत्ती
वेळेचे महत्व मराठी निबंध
वेळेचा सदुपयोग मराठी निबंध ८वी  ९वी
वेळेचे महत्व मराठी निबंध
Vel- ek molyavan sampatti
Veleche mahatwa Marathi nibandh
Velelcha sadupayog Marathi nibandh 8th 9th
Veleche mahatwa Marathi nibandh .


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.