BUY PROJECT PDF Click Here!

जल प्रदूषण प्रकल्प pdf download | Water pollution evs project in marathi pdf download

जल प्रदूषण प्रकल्प pdf download जलप्रदूषणावरील उपाय जल प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठीWater pollution project pdf Water pollution project college s
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 जल प्रदूषण पर्यावरण प्रकल्प | Water pollution project pdf in marathi 


जल प्रदूषण प्रकल्प कार्य पद्धती pdf | जल प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये मराठी | जल प्रदूषण प्रकल्प कार्य पद्धती | जल प्रदूषण प्रकल्प निरीक्षण | जल प्रदूषण प्रस्तावना

www.educationalmarathi.com pr

जल प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना 


जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणात्मक समस्या आहे . पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते . पाण्याला रसायनांचा राजा असे म्हटले आहे . हे एक निसर्गातले आश्चर्यकारक रसायन असून हजारो पदार्थांना स्वतः मध्ये सामावून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ' वैश्विक दावण ' ( Universal Solvent ) असे म्हटले आहे.

आज मानवासमोर अनेक मोठ मोठ्या समस्या आहेत, त्यापैकीच जलप्रदूषण ही  एक समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. बेसुमार वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे अशक्य होताना दिसत आहे. आज विकसनशील देशातील देशांतील लोकांना पाण्याच्या समस्येला मोठ्या प्राणावर सामोरे जावे लागत आहे.

भविष्यात प्रत्येकाची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचे  योग्य ते व्यवस्थापन आत्तापासूनच करणे आवश्यक आहे. आज पाण्याच्या व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करून पाण्याची आत्तापासूनच बचत करणे गरजेचे आहे. आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘जल प्रदूषण’ या विषयाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.



जल प्रदूषण सेमिनार  जल प्रदूषणाचे परिणाम  जल प्रदूषणावरील उपाय  जल प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी  जल प्रदूषण प्रकल्प विषयाचे महत्व  जल प्रदूषण निरीक्षण मराठी pdf  जल प्रदूषण उद्दिष्ट्ये  Water pollution project pdf  Water pollution project for college in Marathi pdf  Water pollution project pdf in Marathi  Water pollution project writing  Water pollution project pdf in Marathi language  Water pollution information in Marathi for project  Water pollution in Marathi information


जल प्रदूषण प्रकल्प अनुक्रमणिका 


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

४)

निरीक्षणे

 

५)

निष्कर्ष

 

६)

संदर्भ

 

























जल प्रदूषण सेमिनार | जल प्रदूषणाचे परिणाम | जल प्रदूषणावरील उपाय | जल प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी



जलप्रदूषण  प्रकल्प उद्दिष्ट्ये


  • पाण्याच्या प्रदूषिकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
  • पाण्याचे महत्व समजून घेणे.
  • पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास करणे.
  • पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांचा अभ्यास करणे.
  • जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करणे.

जलप्रदूषण प्रकल्प विषयाचे महत्व 


पाणी हे सर्वात महत्वाचे आणि मौल्यवान असे पृथ्वीवरील संसाधन आहे. आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी पाण्याची गरज भासते . पाण्याचा वापर इतक्यावरच मर्यादित नाही तर सिंचनासाठी, शेतीसाठी , वीजनिर्मितीसाठी तसेच मोठ मोठ्या कारखान्यांमध्ये, पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. हे पाणी भूगर्भातून उपसा करून मोठ्या प्रमाणावर मिळवले जाते त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी देखील कमी होताना दिसत आहे.

विविध प्रकारच्या कारखान्यांतून तसेच लोकवस्तीतून बाहेर पडणारे दुषित पाणी हे जसेच्या तसे पाण्याच्या स्वच्छ स्त्रोतात सोडले जाते. त्यामुळे शुद्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणवर प्रदूषण घडून येते. जलप्रदूषणाची ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जर हे असेच चालत राहिले तर येणाऱ्या काळात मानवाला मोठ्या प्रमाणवर जल प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. हे सारे थांबण्यासाठी यावर आत्ताचा योग्य त्या उपाय योजना आखून जल प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. म्हणूनच जल प्रदूषण हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे.

हे सुद्धा पहा: 

 १) मृदा प्रदूषण प्रकल्प मराठी pdf 
२) राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पर्यावरण चळवळी विषयक माहिती प्रकल्प pdf 
३)जंगलतोड प्रकल्प pdf 
४)भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प


जल प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती 


जल प्रदूषण’ हा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली. प्रकल्पाच्या विषयानुसार पाण्याचा मोठ्या प्रमाणात होत असेलेल जल प्रदूषण आणि त्यामुळे होत असलेले मानवी जीवनावर परिणाम तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यावरील माहिती मिळविण्यासाठी मी मुलाखत, प्रश्नावली व क्षेत्रभेट या कार्यपद्धतीचा अवलंब केला.

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील वाढत्या जल प्रदूषण पातळी बाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

जल प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी | जल प्रदूषण प्रकल्प विषयाचे महत्व | जल प्रदूषण निरीक्षण मराठी pdf | जल प्रदूषण उद्दिष्ट्ये

प्रकल्प निरीक्षणे 


जलप्रदूषण अर्थ , कारणे , परिणाम व उपाय 

 

जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणात्मक समस्या आहे . पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते . पाण्याला रसायनांचा राजा असे म्हटले आहे . हे एक निसर्गातले आश्चर्यकारक रसायन असून हजारो पदार्थांना स्वतः मध्ये सामावून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ' वैश्विक दावण ' ( Universal Solvent ) असे म्हटले आहे . पाणी म्हणजे संजीवनी . पाण्याला खूप उपमा दिल्या आहेत . एकवेळ मानव अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्यावाचून तो जगू शकत नाही . पण हेच पाणी प्रदूषित झाले तर मानवाला मृत्युसुद्धा येतो . अनेक मानवेतर सजीव देखील दूषित पाण्यामुळे उध्वस्त होतात . म्हणूनच ' जल प्रदूषणाचा ' गांभीर्याने विचार करणे आवश्यक ठरते . जलप्रदूषणाचा अर्थ खालीलप्रमाणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे . " मानवी आरोग्य किंवा कोणत्याही सजीवास किंवा मानवी संपत्तीस धोकादायक ठरू शकणाऱ्या पाण्याच्या भौतिक रासायनिक किंवा जैविक गुणधर्मात होणाऱ्या बदलास जलप्रदूषण असे म्हणतात .

पृथ्वीवर १४१ कोटी घन कि.मी. जलसाठा आहे. त्यापैकी  ९७ % पाणी क्षारयुक्त सागरजल म्हणून उपलब्ध आहे . उरलेल्या पाण्यापैकी २.११ % पाणी बर्फ / हिमाच्या घनरुपात व केवळ ०९ % पाणी गोड्या पाण्याच्या किंवा पिण्यायोग्य पाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे . हे ०.९ % पाणी नद्या , विहीरी, तलाव , सरोवरे यांच्यामध्ये आढळून येते .

पाणी प्रदूषित झाले की त्यामधील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊ लागते . युरोपमधील अनेक देशांची जीवनरेषा समजली जाणारी र्हाईन नदी खूपच दूषित झाली आहे . भारतातील गंगा आता गटारगंगा झाली आहे .

O.S. South wick (New York) ) ने जलप्रदूषणाची केलेली केलेली व्याख्या :

" जलप्रदूषण म्हणजे पाण्याचे प्राकृतिक रासायनिक जीवशास्त्रीय गुणधर्म मानवी हालचालींमुळे ( क्रियांमुळे ) व नैसर्गिक प्रक्रियांद्वारे मलिन / नष्ट होतात व पाणी घाणेरडे , विषारी होते .

"W.H.O. 1996 मध्ये केलेली व्याख्या ( World Health Organization):

" नैसर्गिक किंवा इतर बाह्य पदार्थांच्या मिश्रणाने पाणी अस्वच्छ विषारी , घाण होते , पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते व त्या पाण्यामुळे सजीवांना अपाय होतो त्यामुळे साथीचे रोग पसरतात . त्याला जलप्रदूषण म्हणतात .

अशा विविध व्याख्यातून जलप्रदूषणाचा अर्थ स्पष्ट होतो . जलप्रदूषणाचा गंभीर अध्ययन आवश्यक आहे . याचसाठी जलप्रदूषणाच्या कारणांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते .

जलप्रदूषण कारणे

अनेक अभ्यासक संशोधकांनी जलप्रदूषणाची सांगितलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत .

नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन प्रकारची कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत .

१ . नैसर्गिक कारणे

१ ) अतिपाऊस

२ ) सेंद्रीय पदार्थांचे विघटन

३ ) भूकंप

४ ) ज्वालामुखी

५ ) पूर

६ ) उल्कापात

७ ) वादळे वगैरे

अशी कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात .

 

मानवनिर्मित कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे . कारण निसर्गनिर्मित कारणापेक्षा मानवनिर्मित कारणे ही मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला जबाबदार असतात . ती कारणे व त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे .

 

२.मानवनिर्मित कारणे :

१ ) मानवी वसाहतीतील दैनंदिन व्यवहार

२ ) कारखानदारी / वाढते औद्योगिकरण

३ ) शेतीतील जंतूनाशके किटकनाशकांच्या अतिरिक्त फवारणी / हरितक्रांती.

४ ) रासायनिक खतांचा वापर

५ ) सागरी वाहतूक

६ ) प्लॅस्टिक व केरकचरा जलाशयात विसर्जन


हे सुद्धा पहा: 

१) शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प
२)परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प 
३) नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 
४) जागतिक तापमानवाढ प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 
५)ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण



जलप्रदूषण नैसर्गिक कारणे  

१ ) अतिप्रमाणातील पाऊस : पाऊस जर अतिप्रमाणात पडत असेल तर जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते . नद्या त्यांच्या मर्यादेच्या पातळीपेक्षा वर जाऊन जमिनीवरील धूळ , घाण , कचरा , टाकाऊ पदार्थ पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होते .

 

२ ) सेंद्रिय पदार्थाचे विघटन : " विघटन ' ही एक महत्त्वाची नैसर्गिक किचकट प्रक्रिया आहे . अनेक सजीवांचे मोठ्या प्रमाणात जमिनीवर , पाण्यात विघटन चालू असते . विघटन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया यामुळेही मोठ्या प्रमाणात जीवाणू , विषाणूंची निर्मिती होऊन पावसामुळे हे पदार्थ जमिनीवरून पाण्यात मिसळतात व जलप्रदूषण घडून येते .

 

३ ) भूकंप :  बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा जगभरात भूकंप घडत असतात . यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व इतरही हानी होतेच पण त्याच वेळी अनेक सजीवांच्या विघटनाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होते . पडझडही मोठ्या प्रमाणात झाल्याने जलप्रदूषणाला चालना मिळते . म्हणजे भूकंप हे ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते .

 ४ ) ज्वालामुखी : ज्वालामुखी ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . विशिष्ट परिस्थितीत जमीनीतील ज्वालारस ज्यावेळी पृथ्वीच्या पोटातून मोठ्या प्रमाणात उसळून बाहेर येतो तेव्हा त्याला ज्वालामुखी असे म्हणतात . यामुळे ही पृथ्वीच्या पोटातील विविध विषारी रसायने पृथ्वीतलावर येतात व पृथ्वीवरील व आतील अशी अनेक विघातक घटक विविध प्रकारे पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदूषण होते .

 

५ ) पूर : पुर ही नैसर्गिक परिस्थिती जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . अतिपावसाचाच हा परिणाम .

Water pollution project writing | Water pollution project pdf in Marathi language | Water pollution information in Marathi for project | Water pollution in Marathi information

जलप्रदूषण मानवनिर्मित कारणे 


१) रासायनिक खतांचा वापर : हरित क्रांतीमुळे केवळ किटकनाशकांचा शोध लागला नाही तर भरघोस पीक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होऊ लागला . जास्त पिकाच्या हव्यासापोटी अधिकाधिक रासायनिक खते वापरली जाऊ लागली . खतांची अतिरिक्त मात्रा शेतात जमीनीवर पडते . ती पुन्हा पावसामुळे वाहून नदी - नाले समुद्राला मिळते . पाणी प्रदूषित होते .

 

२ ) सागरी वाहतूक:  आज जागतिकीकरणात जागतिक / आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले . त्यामुळे मोठ्या प्रमाणात सागरी वाहतूक चालू असते . बोटी , नावा , जहाजे यंत्रावर चालणारी जहाजे यांची संख्या प्रचंड वाढली . यामुळे इंधन गळती या वाहतूकीदरम्यान प्रचंड होते . त्यामुळे पेट्रोल , ऑईल , डिझेलच्या तवंगच्या तवंग सागरी पाण्यावर दिसतात . तसे इतर अन्य कारणामुळेही सागरी प्रदूषण वाढत आहे . मुंबईच्या सांडपाण्यामुळे माहिमची खाड़ी डासांचे कोठार बनली आहे . कारखानदारीतून बाहेर पडणारे शिशाचे कण हवेतून माती व त्यातून पाण्यात मिसळतात . अत्यंत विषारी औद्योगिक प्रदूषक म्हणजे ' पारा ' होय . हा पाराही पाण्यात मिसळतो . मिथेन , मर्क्युरी प्राणघातक असते . १ ९ ५३ ते १ ९ ६१ या काळात जपानमधील क्युशू बेटावरील मिनामाता आजार हा पाऱ्याच्या जलप्रदूषणातून निर्माण झाला होता .

३) प्लॅस्टिक , केरकचरा : जलाशयातील विसर्जन सांस्कृतिककारण इतर अनेक दैनंदिन व्यवहार , उद्योगधंद्याची वाढ यामुळे प्लॅस्टिक केरकचरा यांच्या जलाशयातील सरमिसळीमुळे जलप्रदूषण होतेच पण गणपती उत्सव , विविध गावातील यात्रा , जत्रा यामुळे देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते . कारण प्लॅस्टिक , केरकचरा व इतर अशा अनेक घटकांचा प्रादूर्भाव या वेगवेगळ्या प्रसंगी विपुल प्रमाणात चालना मिळते .

 

४ ) इतर कारणे : वरील अनेक घटकाबरोबर विविध वीजप्रकल्प विघटनशील व अविघटनशील पदार्थ , पाळीव प्राण्यामुळे , विविध किरणोत्सारी टाकाऊ पदार्थ , युद्धे , अणुस्फोट अशी असंख्य मानवनिर्मित कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात . 

जलप्रदूषणाचे परिणाम 



जलप्रदूषणाचे अगदी डोके दुखणे , मळमळणे या साध्या परिणामापासून मृत्युपर्यंत विविध परिणाम दिसतात . त्वचारोग , कॅन्सर , कावीळ , अतिसार , आतड्यांचे विकार , धाप लागणे , श्वसन मार्गाचे विकार , पचनसंस्थेत बिघाड , चेतासंस्थेवर वाईट परिणाम , विषमज्वर , सर्दी , खोकला , असे अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात . हे मानव प्राण्यामध्ये दिसून येणारे परिणाम आहेत . मानवेतर प्राणी , वनस्पती व अजैवी घटकांवर देखील याचे विपरित परिणाम होतात . उदा . विविध प्रकारच्या पाण्यातील घटकामुळे उदा . अतिरिक्त

प्रमाणात पाण्यात अमोनिया असल्याने माशामध्ये कर्करोगाचा धोका संभवतो. पाण्यातील किटक , छोटे जीव यांच्यातील पुनर्उत्पादन क्षमता घटते . अनेक वनस्पतींची वाढ खुंटते तर काही पाणवनस्पतींची बेसुमार वाढ होते . आम्लधर्मीय पाण्यामुळे जमिनीतील कित्येक धातू पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर नजीकच्या जलसाठ्यात येऊन सजीवांत साठून राहतात . त्याला जैव संचयन असे म्हणतात . जलप्रदूषणामुळे पाण्यातील जलसंसाधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . अन्नसाखळ्यांवर विपरित परिणाम होत आहे .


 हे सुद्धा पहा: 


Water pollution project pdf| Water pollution project for college in Marathi pdf | Water pollution project pdf in Marathi | Water pollution project writing

जलप्रदुषणावरील उपाय 


जलप्रदूषणाचा अर्थ , कारणे आणि परिणाम पाहिल्यानंतर जलप्रदूषणावरील उपाय आपण पाहू . अगदी डोकेदुखी सारख्या परिणामापासून मृत्युपर्यंत गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसतात . म्हणून त्याच्या उपायाचा विचार करून परिणामांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे .

१ ) समुद्रजलावर खनिजतेल पसरले तर ते जाळून टाकावे .

२ ) शहरातील किंवा वस्तीतील गटारातील मैला सांडपाणी नद्यांमध्ये सोडू नये . ते प्रक्रिया करून शुद्ध करावे व टाकाऊ पदार्थापासून खत निर्माण करावे .

३) सांडपाण्याचा वापर शेती पिकांसाठी करावा . दूषीत पाणी शुद्ध करावे .

४ ) पोटॅशियम परमँगनेट ( KMno4 ) व ओझोन यांचा पाण्यातील घाण द्रव्ये भस्मीकरणासाठी वापर करावा . विषारी , अशुद्ध पाणी पातळ चाळण्यांमधून गाळून प्यावे . पाण्यात ब्लिचींग पावडर टाकावी . त्यात क्लोरीन सोडावा म्हणजे शुद्धीकरण होईल . भारतात गुजरातमध्ये बडोदा येथे सांडपाणी व औद्योगिक कचरा , घाण यांच्यावर वापर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे . असे प्रकल्प सर्वत्र उभारावेत .

 ५ ) ग्रामीण भागातील साखर कारखाने प्रदूषणाची केंद्रे होऊ नयेत म्हणून कारखान्यातील मळी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सोय सक्तीने बंधनकारक करावी .

६ ) काही रूढी परंपरा ही जलप्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या आहेत . याबाबत रूढीपेक्षा , परंपरेपेक्षा वास्तव विज्ञान व्यवहार पर्यावरण संरक्षण या दृष्टीने महत्त्वाचे आहे हा विचार लोकांना पटवून दिला जावा .

 


 जल प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष 

  • पाण्याच्या प्रदूषिकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
  • पाण्याचे महत्व समजून घेण्यास मदत झाली.
  • पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्त्रोतांचा अभ्यास केला.
  • पाण्याच्या प्रदूषणाने होणाऱ्या घातक परिणामांची माहिती घेऊन त्या माहितीचे संकलन केले.
  • जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास केला.
  • जलसुरक्षा अभियानाबाबत अधिक माहिती मिळवली.


प्रकल्प संदर्भ 


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका



  • प्रकल्प आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
  • तुमच्या काही प्र्काल्पाबत सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंट करा. 

PDF PASSWAD मिळविण्यासाठी खालील Subscribe To Unlock लिंक वर क्लिक करा. Subscribe करा आणि Back Button press करा.

SUBSCRIBE TO UNLOCK 

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

जल प्रदूषण प्रकल्प.pdf प्रकल्प 2.2MB .pdf

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.