BUY PROJECT PDF Click Here!

मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Project mruda pradushan 11th 12th environmental project

- मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प  ११वी  १२वी


मृदा प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प pdf - मृदा प्रदूषण मराठी-मृदा प्रदूषण निष्कर्ष - मृदा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना - मृदा प्रदूषण करणे - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये 

पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

आज आम्ही घेऊन आलो आहोत मृदा प्रदूषण या पर्यावरण प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया 

मृदा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना


पर्यावरणात असणारे काही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो. आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच, मुख्यत्वे जैविक घटकांच्या असतीत्वावर होतो. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन मानवासमोर मोठ मोठ्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. मृदा प्रदूषण ही त्यापैक एक प्रमुख समस्या आहे .  सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे किंवा पदार्थाचे झालेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. पर्यावरणीय प्रदूषण हे नैसर्गिक घटनांमुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे निर्माण होते.

हवा पाणी यांच्याबरोबरच  जमीन हासुद्धा एक उपयुक्त आणि अत्यंत महत्वाचा पर्यावरणातील घटक आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या जमिनीचा वापर माणूस विविध कारणांसाठी करतो. त्यामध्ये वसाहती, शेती, वनस्पती , उद्योगधंदे, खाणकाम, जलसाठे इ. घटकांचा समावेश होतो. उपलब्ध जमिनीपैकी काही जमीन ही लोकवस्ती साठी वापरली जाते, काही जमीन शेती क्षेत्राखाली आणली जाते तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळवंटे आहेत.

भरमसाठ वाढती लोकसंख्या, परिणामी शहरांचा होत असलेला विस्तार , वाढती कारखानदारी, यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटकांची विल्हेवाट जमिनीत लावावी लागते. विषारी घटक जमिनीत मिसळल्याने निसर्गातील मृदा प्रदूषित होते. यातूनच  भूमिप्रदूषणाच्या  समस्या निर्माण होतात.

या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण मृदा प्रदूषणासाठी कारणीभूत घटक कोणते आहेत? मृदा प्रदूषणाचे होणारे परिणाम तसेच मृदा प्रदूषण होऊ नये म्हणून करायच्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.




अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्प  विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

 

४)

मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत:

 

५)

मृदा प्रदूषणाचे परिणाम

 

६)

मृदा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

 

७)

मातीच्या गुणवत्तेचे मुल्यांकन

 

८)

पर्यावरण ऱ्हासाची कारणे

 

९)

प्रकल्प  निरीक्षणे

 

१०)

प्रकल्प  निष्कर्ष

 

११)

संदर्भ

 




मृदा प्रदूषण प्रकल विषयाचे महत्व


पृथ्वीवर इतर घटकांप्रमाणेच माती हा देखील एक महत्वाचा घटक आहे. परंतु आज उद्योग धंद्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया न करता जसेच्या तसे जमिनीमध्ये  सोडल्याने मोठ्या प्रमाणावर माती प्रडून घडून येते. त्याचप्रमाणे शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने तसेच कचरा जाळल्याने मृदा प्रदूषित होते. वाढत्या लोकसंख्येला निवारा उपलब्ध व्हावा यासाठी जंगलतोड करून जागा उपलब्ध केली जाते , परंतु मोठ्या प्रमाणावर केलेल्या या जंगलतोडीमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. मृदेचे प्रदूषण रोखण्यासाठी मृदा प्रदूषणाचे स्त्रोत शोधून त्यांचे निर्मुलन कशा प्रकारे करता येईल यावर उपाय शोधणे आज गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे सजीवांना पाणी आणि हवा अत्यंत महत्वाची आहे, त्याचप्रमाणे मातीही तितक्याच प्रमाणात महत्वाची आहे. माती वनस्पतींना आधार देते आणि त्या मातीवरच सर्व सजीव अवलंबून असतात. मृदा तयार होण्याच्या प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु असते की माती एक  अपुनर्नवीकरणीय स्त्रोत म्हणून ओळखली जाते. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये पुढील पुढील भूमिका महत्वाच्या आहेत. संरक्षक, संघटक, मार्गदर्शक.  माती खूप मौल्यवान आहे. म्हणूनच, मृदा प्रदूषणाचा अभ्यास करणे आज महत्वाचे ठरत आहे.



मृदा प्रदूषण  प्रकल्पाची उद्दिष्टे


Ø मृदा प्रदूषण संकल्पना समजून घेणे.

Ø मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे.

Ø मृदा प्रदूषणाच्या  कारणांचा अभ्यास करणे.

Ø मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.

Ø मृदाप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती घेणे.

Ø मृदा प्रदूषण या विषयाबाबत  सर्वांना माहिती उपलब्ध करून देणे.

 

Evs project topivs Marathi languages / Evs project prastavana in Marathi / Evs project 12th commers, science, format Marathi / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी 

मृदा प्रदूषण  प्रकल्प कार्यपद्धती


‘मृदा प्रदूषण प्रकल्प’ हा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी मी पर्यावरण विषयक पुस्तिका तसेच इंटरनेट च्या माध्यमातून अधिक माहिती मिळवून त्या माहितीचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला. इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीवरून प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले सदर मुद्द्यांची माहिती ही पुस्तकाच्या माध्यमातून तसेच वर्तमान पत्रात छापून आलेल्या पर्यावरण विषयक लेखातून संकलित करण्यात आली. पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.



मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत


जमिनीच्या भौतिक  तसेच रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अनेक घटक विपरीत परिणाम घडवून आणतात. त्यांच्यामुळे मृदेची गुणवत्ता खालावते. पुढील काही घटक मृदा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरतात.

1.   मातीची धूप:

जमिनीच्या वरच्या थरातील माती वाऱ्याच्या प्रक्रीयामुळे तसेच वाहत्या पाण्याबरोबर वाहून जाने ही एक  नैसर्गिक घटना आहे.  मातीची मोठ्या प्रमाणावर धूप ही पावसामुळे होते, पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होऊन जाते. तसेच बांधकाम , शेती , अतिचाराई, आणि जंगलतोड ही मानवनिर्मित करणे सुद्धा मातीची धूप होण्यास तितकीच महत्वाची ठरत आहेत.

 

2.   शेतीसाठी वापरली जाणारी खते:

जमिनीमध्ये  K , N आणि P संयुगे यांसारखी  सूक्ष्म पोषक तत्वे असतात. त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी B, Zn आणि Mn सारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.  या अन्नद्रव्यांचे  प्रमाण रासायनिक खतांचा वापर करून वाढवता येते आणि  उत्पादन वाढवता यते. मात्र, या खतांचा अतिरेकी वापर करून एकच पीक वारंवार उगवल्याने शेवटी जमिनीची सुपीकता नष्ट होते.

 

3.   कीटकनाशके:

जीवाणू, बुरशी इ. यांसारख्या रोगजनकांमुळे होणा-या विविध कीटक आणि रोगांपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची कीटकनाशके वापरली जातात.  त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणी योग्य प्रमाणात केला पाहिजे. कारण शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके ही पर्यावरणात खूप काळ टिकून राहतात, जर त्यांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर ते जमिनीमध्ये जमा होऊन मातीच्या सुपीकतेमध्ये अडथला निर्माण करतात. पुढे हेच पदार्थ पाण्याच्या स्त्रोतात पाझरतात  ज्यामुळे जलप्रदूषण होते.

 

4.   सिंचन:

बागायती शेतजमिनीला पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जमिनीच्या तुलनेत जास्त क्षारयुक्त पाणी मिळते.  कोरड्या हवामानात अशा पाण्याच्या बाष्पीभवनामुळे क्षार साठून त्याची क्षारता वाढते.  याला सलिनायझेशन(Salinization)असे  म्हणतात. यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होतो आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होते.  कालांतराने अशी जमीन नापीक होण्याचा किंवा शेतीसाठी अयोग्य होण्याचा धोकाही संभवतो.  शेतातील पाण्याचा प्रभावीपणे निचरा न केल्यास जास्त सिंचनामुळे पाणी साचण्याची शक्यता असते. क्षारयुक्त पाणी मुळांद्वारे शोषले जाते ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. 

 

5.   औद्योगिक सांडपाणी:

प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी ज्यामध्ये जड धातूंसारखे प्रदूषक असतात त्या पाण्याची योगरीत्या विल्हेवाट लावली गेली नाही तर ते पाणी जमिनीत झिरपते आणी त्यामध्ये असणारी प्रदूषके जमिनीत जमा होतात परिणामी तेथील मृदा नापीक होते.

6. मानवनिर्मित कचरा आणि इतर घनकचरा:

जैविक कचरा जसे की मूत्र आणि विष्ठा तसेच इतर मातीचा कचरा जसे की कचरा, प्लॅस्टिक उत्पादने इत्यादी घटकांची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर हे घटक मातीत मिसळून ती प्रदूषित आणि नापीक बनते. 

 


 मृदा प्रदूषणाचे परिणाम


१.कीडनाशके, तणनाशके तसेच विविध प्रकारची रसायने यांचा शेतीसाठी अतिवापर केल्याने त्यांतील घातक पदार्थ मातीत मिसळतात आणि त्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते.

२. भरपूर पिक येण्यासाठी वापरली जाणारी खाते आणि रसायने मातीमधील पोषक जीवांचा नाश करतात परिणामी मृदेची सुपीकता खालावते.

३.लोकांच्या चुकीच्या अनारोग्यादायी सवयींमुळे मृदा प्रदूषणात भर पडते.

४. उघड्यावर फेकलेल्या कचर्यामध्ये तसेच विष्ठेमध्ये असणाऱ्या रोगकारक जंतूंमुळे माती दुषित होते व त्या मातीत पिकवलेल्या भाजीपाला व पिकामुळे मानवाला आणि पाळीव जनावरांना विविध प्रकारचे रोग जडतात.

५.शेतीसाठी सिंचनाचा अतिवापर केल्याने जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि जमीन क्षारयुक्त बनते.क्षारयुक्त माती वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम घडवून आणते.

६.मोठ मोठ्या उद्योगधंद्यांतील क्षारयुक्त , आम्लयुकात पाणी, मातीत मिसळल्याने  माती नापिक बनते.

७.किरणोत्सारी पदार्थ आणि इतर प्रदूषके मातीमधून पाणी, पिके आणि मानव अशा अन्नसाखळीद्वारे प्रवास करतात.

८. मृदा प्रदूषण झाल्याने जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये मातीमधून जवळच्या पाण्याच्या स्त्रोतात पाझरतात.

 

 

मृदा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना


१.  शेतीसाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. रासायनिक खतांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात कमी करावा.

२.  शेतीवर फवारणीसाठी जैविक कीडनियंत्रकाचा वापर करून रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करता येऊ शकतो.

३.  शेतातील शेण आणि कचरा यांचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी करणे.

४. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने मातीची धूप रोखली जाऊन मृदा संवर्धनास मदत होईल.

 

मृदा प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प pdf - मृदा प्रदूषण मराठी-मृदा प्रदूषण निष्कर्ष - मृदा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना - मृदा प्रदूषण करणे - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये 

मातीच्या गुणवत्तेचे मुल्यांकन


मातीमधील पोषकतत्वांच्या उपलब्धतेनुसार मातीचे कमी, मध्यम आणी उच्च अशा प्रकारचे वर्गीकरण राष्ट्रीय स्तरावर केले जाते.

(खालील तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा (Tilt) करा.)

अ.क्र

मातीतील पोषक द्रव्ये

मातीच्या सुपीकतेचे मुलांकन

कमी

मध्यम

जास्त

१.

सेंद्रिय कार्बनच्या रुपात मोजला जाणारा उपलब्ध नायट्रोजन

(%)

<०.५

०.५ – ०.७५

> ०.७५

२.

उपलब्ध नायट्रोजन

(किलोग्रॅम / हेक्टर)

< २८०

२८० – ५६०

 > ५६०

३.

उपलब्ध फॉस्फरस (P) (अल्कलीयुक्त जमिनीत ) (किलोग्रॅम / हेक्टर)

< १०

१० – २४.६

 > २४.६

४.

उपलब्ध पोटॅशिअम (किलोग्रॅम / हेक्टर)

< १०८

१०८– २८०

>२८०

स्त्रोत / संदर्भ : कृषी मंत्रालय , भारत सरकार

 


पर्यावरण ऱ्हासाची कारणे


पर्यावरण ऱ्हासाची कारणे या मुद्द्याबाबत माहिती मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि समोर आलेल्या पानावरील ‘जैवविविधतेला असलेले धोके’ या मुद्द्यामध्ये समाविष्ट असलेल्या माहितीचा उपयोग करा.

येथे क्लिक करा.

 

मृदा प्रदूषण प्रकल्प  निरीक्षणे


मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध


घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रुपांतर न करत तो चुकीच्या पद्धतीने फेकून दिल्यास तो त्या ठिकाणी सडतो, कुजतो आणि त्या ठिकाणी हानिकारक रोगजंतूंची वाढ होते हेच रोगजंतू वाहत्या पाण्यात तसेच पाण्याच्या स्त्रोतात मिसळून जलप्रदूषण होते.

शेतात मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके तसेच रासायनिक खते आणि तणनाशके यांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदा प्रदूषण होते. शेतीसाठी रासायनिक कीटकनाशके आणि तणनाशके यांची फवारणी करत असताना ही रसायने हवेत मिसळली जातात. आणि यामुळे हवा प्रदूषित होते तसेच रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणवर वापर केल्याने ही रसायने पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होते.

पशु-पक्षी यांची विष्ठा तसेच मानवी मलमूत्र मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही सर्व घाण तिथे तशीच राहिल्यास त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे घातक वायू बाहेर पडतात आणि दुर्गंधी पसरते हे वायू हवेत मिसळल्याने हवा प्रदूषण होते. तसेच हीच घाण पाण्यात मिसळल्याने पाणी प्रदूषण होते.



मृदा प्रदूषण प्रकल्प  निष्कर्ष

 

Ø मृदा प्रदूषण संकल्पना समजून घेणे शक्य झाले.

Ø मृदा प्रदूषकांचे प्रकार आणि स्त्रोत याबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.

Ø मृदा प्रदूषणाच्या  कारणांचा अभ्यास अभ्यास करून त्यांची नोंद घेतली.

Ø मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करता आला.

Ø मृदाप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती घेतली.


 

संदर्भ

  • पर्यावरण पुस्तिका 
  • कृषी मंत्रालय भारत सरकार


Evs project topivs Marathi languages / Evs project prastavana in Marathi / Evs project 12th commers, science, format Marathi / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Evs project in Marathi pdf download
Evs project in Marathi for 12th std
Evs project in Marathi  information
Environmental project topics for college students pdf
Environmental project in Marathi project for college students 

3 comments

  1. Khup chan mahiti dili thank you 🥰 so much
  2. Khup chan mahiti dili
    Tnx educational marathi.com
  3. khup sundar aani particularly mahiti aahe
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.