BUY PROJECT PDF Click Here!

'जल सुरक्षा काळाची गरज ' पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | jal suraksha kalachi garj paryavarn prakalp 11th 12th

जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्पजल संरक्षण प्रकल्प जल सुरक्षा प्रस्तावना Evs project in Marathi informationEvs project 12th commers, science, format
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

'जल सुरक्षा काळाची गरज' प्रकल्प 


Evs project in Marathi  information - Environmental project topics for college students pdf - Environmental project in Marathi project for college students - जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्प - जल संरक्षण प्रकल्प - जल सुरक्षा प्रस्तावना

पर्यावरण व जलसुरक्षा विषयाचे विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


आज आम्ही घेऊन आलो आहोत 'जल सुरक्षा काळाची गरज ' या पर्यावरण प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया 


'जल सुरक्षा काळाची गरज 'प्रकल्प प्रस्तावना


पृथ्वीचे ‘बहुरत्ना वसुंधरा’ असे वर्णन केले जाते. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या रत्नांपैकी पाणी हे एक महत्वाचे संसाधन आहे. पाणी हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. या पृथ्वीतालावरील सर्व सजीव सृष्टीची निर्मिती ही पाण्यामाधुनच झाली आहे. सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार पाणी आहे. मानवाचा इतिहास पहिला तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे त्या ठिकाणी मानव स्थिरावला आणि त्याचा विकासही तेथेच झाला. मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा यांसारख्या विविध प्राचीन संस्कृतींचा विकास हा नद्यांच्या किनाऱ्यावर झालेला आढळतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या काळजीपूर्वक वापर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि पाण्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

देशातील विविध भागांत हजारो वर्षांपासून दुष्काळाची स्थिती उद्भवते. आजही काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते. देशात पुरेसा पाऊस पडतो  तसेच धरणांची संख्यादेखील मोठी आहे. तरीही.

पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ देशातील काही ठिकाणी पाहायला मिळतो. काही ठिकाणी ओला दुष्काळ तर दुसऱ्या ठिकाणी प्यायला सुद्धा पाणी नाही. अतिरेकी भूजल उपशामुळे बहुतांश भागातील  नद्या आटू लागल्या आहेत. आज सर्व जलसाठ्यांचे स्वास्थ्य सुधारणे अत्यंत आवश्यक आहे.

आज या प्रकल्पाच्या माध्यमातून जल सुरक्षा काळाची गरज या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.


अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

जल संसाधनांची गरज व महत्व

५)

पाण्याचा तुटवडा

६)

जलप्रदूषण

७)

जल संवर्धन आणि व्यवस्थापन

८)

जल संसाधनांची गरज व महत्व

९)

निरीक्षणे

१०)

निष्कर्ष

११)

संदर्भ


जल सुरक्षा काळाची गरज ' प्रकल्प विषयाचे महत्व


पाणी हा एक सर्व सजीवांसाठी आवश्यक घटक आहे. मानवाच्या शरीरात पाण्याची महत्वाची भूमिका असते. एखादा सजीव अन्नाशिवाय काही आठवडे , महिने जीवन जगू शकतो. परंतु पाणी नसेल तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही. माणसाच्या शरीरात असलेली प्रणाली व्यवस्थितपणे कार्यरत ठेवण्यासाठी पाणी हे खूप महत्वाचे आहे.

सजीवसृष्टीमध्ये असणाऱ्या सर्व प्राणीमात्रांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच शेत्मध्ये असणारी पिके, जंगले आणि विविध प्रकारच्या वनस्पती यांनासुद्धा पाण्याची गरज आहे. माती व खडकांनी बनेलेली भूरूपे देखील पाण्यामुळे प्रभावित होतात. एकूणच काय तर पाण्याशिवाय सजीवसृष्टीचे अस्तित्वच नाही. केवळ पाण्यामुळेच निसर्गातील सर्व जैविक आणि अजैविक घटकांमध्ये संतुलन राहते आणी वनस्पती , प्राणी, कीटक, पक्षी या निसर्गातील अन्नसाखळीच्या रक्षणासाठी मदत होते.

आज पाण्याचे सर्व साठे धोक्यात आले आहेत. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये असणारी पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे. भूजलपातळी खुप खोलवर गेली आहे. जर आपल्याला पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर पाण्याच्या या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा वापर योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. म्हणूनच ‘जल सुरक्षा काळाची गरज’ हा विषय खूप महत्वाचा आहे.



प्रकल्पाची उद्दिष्टे


Ø जल संसाधनाची गरज जाणून घेणे

Ø जलसाठे सुरक्षित करणे का महत्वाचे आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.

Ø जल प्रदूषण आणि जलप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषकांचा अभ्यास करणे.

Ø जल प्रदूषणावर उपाय जाणून घेणे.

Ø जल साठ्यांमधील पाण्याची सुरक्षितता कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत माहिती मिळविणे.

Ø जलसंवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक पद्धतींचा अभ्यास करणे.



प्रकल्प कार्यपद्धती


‘जल सुरक्षा काळाची गरज’ हा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी मी पर्यावरण विषयक पुस्तिका तसेच इंटरनेट च्या माध्यमातून अधिक माहिती मिळवून त्या माहितीचा समावेश प्रकल्पामध्ये करण्यात आला. इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीवरून प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले सदर मुद्द्यांची माहिती ही पुस्तकाच्या माध्यमातून तसेच वर्तमान पत्रात छापून आलेल्या पर्यावरण विषयक लेखातून संकलित करण्यात आली. पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.



 

जल स्त्रोतांचे गरज व महत्व


पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग अ पाण्याने व्यापला आहे. असे असतानासुद्धा जगभरात पाण्याची टंचाई भासते. पृथ्वीवरील विविध भागांत पडणाऱ्या पावसापैकी ४% इतका पाऊस भारतात पडतो. तरीसुद्धा आपल्या देशातील काही प्रदेशांना पाणी टंचाई चा सामना करावा लागतो. पाण्याचा अतिवापर करणे, पाण्याचे अतिशोषण आणि पाण्याचे असमान वितरण यांमुळे आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. घरगुती तसेच औद्योगिक वापरामुळे पाण्याचे होणारे दूषितीकरण, मोठ मोठ्या रासायनिक उद्योगांतून रसायनांचे झिरपणे या सर्व गोष्टी पाण्याच्या टंचाईला जबाबदार आहेत. कारण या सर्व कारणांमुळे पाणी वापरण्यास योग्य राहत नाही.

वाढत चाललेल्या उद्योग धंद्यांचा उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांवर भार पडत आहे. वाढत चाललेल्या मानवी वस्तीमुळे भूजल स्त्रोतांवर असणारा भार वाढला. सर्वात महत्वाच्या भारताच्या जीवनदायिनी असणाऱ्या नद्या जसे, यमुना, गंगा इ. वाढत चाललेले औद्योगिकीकरण , शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धती व शहरीकरण यांमुळे प्रदूषित झाल्या आहेत.

पाणी हा  नष्ट होणारा स्त्रोत नसला तरीही उपलब्ध असलेल्या पाण्याचा चुकीच्या पद्धतीने वापर आणि अपव्यय यांमुळे जलसंसाधानानाचा ऱ्हास होत आहे. आज सगळीकडे पाण्याचे जतन , हा एक महाताचा पर्यावरणीय मुद्दा झाला आहे. पाण्याचे साठे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. पाण्याचा दरडोई होणारा वापर कमी करून पाण्याचा अपव्यय टाळणे हा जल सुरक्षेचा महत्वाचा घटक आहे.

 

Evs project topivs Marathi languages - Evs project prastavana in Marathi - Evs project 12th commers, science, format Marathi - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी

पाण्याचा तुटवडा / पाणी टंचाई


पाणी हे सर्व सजीवसृष्टीसाठी आवश्यक असे संसाधन आहे. येणाऱ्या काळात २०२५ पर्यंत भारतासह ५० पेक्षा जास्त देशांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

आपल्या देशामध्ये उपलब्ध होणारे पाणी हे मान्सून च्या पावसाच्या माध्यमातून उपलब्ध होते. भारतामध्ये सरासरी ११७ सेमी इतका पाऊस पडतो. आणि महाराष्ट्रात १०१ सेमी इतका पडतो. कोकणात पाण्याच्या उपलब्धता ३०० सेमी पेक्षा जास्त असली तरीही सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा या पूर्वेकडील भागांत पाण्याची पातळी खूप कमी म्हणजे ५० सेमी इतकी आहे. गडचिरोली, अंबोली या ठिकाणी पावसाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो तर याच ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई जाणवते. पर्वतांचे तीव्र उतार आणि पाणी साठव्ण्यासाठीची सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील सगळे पाणी डोंगर उतारावरून वाहून जाते. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई जाणवते.

 

 

जल प्रदूषण


Ø जल प्रदूषके

निरुपयोगी स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप टाकावू घटक जेव्हा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतात मिसळले जातात त्या घटकांना जलप्रदूषके असे म्हटले जाते.

Ø जल प्रदूषकांचे स्त्रोत

मानवी किंवा नैसर्गिक प्रक्रियेमधून जेव्हा पाण्याचे प्रदूषण होते. त्यांना जल प्रदूषकांचे स्त्रोत म्हणतात.

१.     घरांतून बाहेर पडणारे पदार्थ , मानवी मलमुत्र, आंघोळीचे पाणी, जनावरांचे मलमूत्र इ.

२.     औद्योगिक परिसरातून बाहेर पडलेले पदार्थ – वाहनांतून बाहेर पडणारे तेल, ग्रीस, जहाजांतून होणारी तेल गळती.

३.     शेतीतून बार पडणारे हानिकारक घटक – पिकांवर फवारली गेलेली रासायनिक कीटक नाशके, रासायनिक खते इ.घटक पाण्यात विरघळून पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळले जातात.

४.     उद्योगांतून बाहेर पडणारे सांडपाणी, खनिजद्रव्ये आणि हानिकारक रासायनिक घटक

५.     कारखान्यातून पाण्याच्या स्त्रोतात सोडले गेलेले उष्ण पाणी.

६.     सांडपाण्यातील गाळ आणि पाणलोटातील गाळ.

Ø जल प्रदूषण रोखण्यासाठी चे उपाय

१.     उद्योग धंद्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी पाण्याच्या स्त्रोतात सोडण्यापूर्वी त्यावर योग्य त्या प्रक्रिया केल्या जाव्यात आणि नंतरच ते पाणी बाहेर सोडण्यात यावे.

२.     पाणी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना दंड आकारून त्यांच्यावर वचक बसवणे.

३.     पाण्याच्या स्त्रोतात टाकावू घटक, निर्माल्य, विसर्जन करणे टाळावे.

४.     महानगरपालिका आणि इतर नागरी संस्थांनी घन व द्रव कचरा योग्य प्रकारे हाताळावा.


 

जल संवर्धन आणि व्यवस्थापन


जल संवर्धन आणि जल व्यवस्थापन करून आपण पाण्याचे स्त्रोत सुरक्षित करू शकतो. पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो.

 

·       जुन्या काळापासून चालत आलेल्या पाणी संग्रहित करणाऱ्या रचनांचे पुनरुज्जीवन.

·       जुनी तळी  आणि तलाव यांचे नूतनीकरण

·       शहरी भागांत वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे संवर्धन करणे.

·       पाण्याचा प्रभावी वापर वाढवून पाण्याची मागणी कमी करणे.

 

घटत जाणारी गोड्या पाण्याची पातळी आणि वाढती मागणी त्यामुळे पाण्याचे संवर्धन करून त्याचे साठे भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे. देशाला या जलसंवर्धन कार्यक्रमासाठी वेगाने कामाला लागणे गरजेचे आहे.  पाण्याचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने विशेष पावले उचलणे आवश्यक आहे.


प्रकल्प निरीक्षणे


जल सुरक्षेसाठी विविध राज्यांत वापरल्या जाणाऱ्या पद्धती

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करा.)

अ.क्र.

राज्य

जल संवर्धन करण्याच्या पारंपारिक पद्धती

वर्णन

राज्यस्थान

जोहाड

मातीचे बंधारे

राज्यस्थान

कुंड

जमिनीखालील तलाव

गुजरात

खादिन

वाहते पाणी अडवणारा मातीचा बांध

आंध्र प्रदेश

चेरुवा

जलसाठा

आसाम

डोंग

आदिवासींची तळी

कर्नाटक

केरे

पाझर तलाव

पश्चिम बंगाल

बिल, रवाल

तळी

महाराष्ट्र

कुंड

तलाव



निष्कर्ष


§  जल संसाधनाची गरज जाणून घेतली.

§  जलसाठे सुरक्षित करणे का महत्वाचे आहेत याबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.

§  जल प्रदूषण आणि जलप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषकांचा अभ्यास केला.

§  जल साठ्यांमधील पाण्याची सुरक्षितता कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत माहिती मिळवून त्याची नोंद घेतली.

§  जलसंवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक पद्धतींबाबत माहिती मिळवली.

 

संदर्भ



  • पर्यावरण पुस्तिका

Evs project in Marathi  information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topivs Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी जल सुरक्षा प्रकल्प pdf जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्प जल संरक्षण प्रकल्प जल सुरक्षा प्रस्तावना



PDF PASSWAD मिळविण्यासाठी खालील Subscribe To Unlock लिंक वर क्लिक करा. Subscribe करा आणि Back Button press करा.




PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.


जल सुरक्षा काळाची गरज प्रकल्प.pdf प्रकल्प 2.1MB .pdf



प्रकल्प कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा 

Evs project in Marathi  information
Environmental project topics for college students pdf
Environmental project in Marathi project for college students
Evs project topivs Marathi languages
जल सुरक्षा प्रकल्प pdf
जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्प
जल संरक्षण प्रकल्प
जल सुरक्षा प्रस्तावना  


11 comments

  1. Nice 👍
    1. Thank You !
  2. Nice
  3. So nice
  4. मस्त-छान, पण या मध्ये 'माहितीचे विश्लेषण' हा मुद्दा नाही आहे. या बद्दल नोंद घ्यावी. धन्यवाद 🙏
  5. Thank u
  6. Good
  7. Khup chan
  8. खूप छान माहिती आहे व सर्व माहिती आहे
  9. खूप छान माहिती आहे व सर्व माहिती आहे
  10. Thank you 🙂
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.