BUY PROJECT PDF Click Here!

ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण | Ddhawni pradshan prakalp 11th 12th project

ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना ध्वनी प्रदूषण अहवालध्वनी प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष मराठी माहितीDwani pradushan proje
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी


.            Educationalमराठी  आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत.११वी,१२ वी पर्यावरण विषयक प्रकल्प. या प्रकल्पांची पुढील मुद्यांच्या आधारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, प्रकल्प विषयाचेमहत्व, प्रकल्पकार्यपद्धती, विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष, अहवाल लेखन, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.


EDUCATIONALमराठी वर उपलब्ध असलेले ११वी १२वी पर्यावरण विषयक प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 


ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना / ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी ध्वनी प्रदूषण
ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती मराठी / ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी / ध्वनी प्रदूषण अहवाल / ध्वनी प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष मराठी माहिती


ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना / ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती मराठी / ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी / ध्वनी प्रदूषण अहवाल / ध्वनी प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष मराठी माहिती

ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना

NAUSEA या ल्याटिन शब्दापासून NOISE या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. या शब्दाचा अर्थ विनाकारण किंवा अप्रिय आवाज असा आहे. ज्याच्यामुळे अस्वस्थता येते. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज म्हणून ध्वनी ही संकल्पना परिभाषित केली जाऊ शकते.

जेव्हा आवाज हा गोंगाटामध्ये रुपांतरीत होते तेव्हा त्याचा प्राणी, प्रक्षी आणि मानव यांच्या श्रवण संस्थेवर विपरीत परिणाम घडून येतो. जगभरातील शहरी भागांमध्ये ध्वनी प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून ओळखले गेले आहे.

   वाढत जाणारे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे त्याचे गंभीर परिणाम यांमुळे आज ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वांनी अधिक माहिती जाणून घेणे आज महत्वाचे ठरत आहे. म्हणून आज ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक , तसेच ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजना तसेच परिसरातील वाढते ध्वनी प्रदूषण या विषयाबाबत सविस्तर माहिती आपण या प्रक्लापामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

ध्वनी प्रदूषणाची कारणे.

१२

५)

ध्वनी प्रदूषणाचे परिणाम

१३

६)

ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याचे उपाय.

१५

७)

ध्वनी प्रदूषण नियम २०१७

१७

८)

निरीक्षणे

१८

९)

विश्लेषण

२०

१०)

निष्कर्ष

२२

११)

संदर्भ

२३

१२)

प्रकल्प अहवाल

२४
ध्वनी प्रदूषण प्रकल्प विषयाचे महत्व


ज्या वेगाने  आज सर्वत्र ध्वनी प्रदूषण पसरत आहे, त्याचा विचार केला तर येत्या काही वर्षांत आपल्या परिसरात ध्वनी प्रदूषणामुळे अनेक लोकांना कानाचे आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतील अशी भीती निर्माण झाली होती.  ध्वनी प्रदूषणाची पातळी आज अनेक ठिकाणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ही पातळी जास्त आहे त्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये ऐकण्याचे आणि चीड चीड होणे आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होणे यांसारखे ध्वनी प्रदूषणाचे परिणाम दिसू लागले आहेत.

ध्वनी प्रदूषणाची पातळी अशीच वाढत राहिली तर ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत आहे त्या परीसारतील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्या परिसरातील प्राणी, पक्षी यांवर परिणाम होऊन त्यांची त्या परीसरातील संख्या कमी होण्याचा धोका निर्माण होतो. हे सर्व थांबवायचे असल्यास वाढत जाणारे प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. आधुनिक  यंत्रे, वाढत जाणारे वाहनांचे प्रमाण, वाढती कारखान्यांची संख्या यांच्या आवाजाबाबत आत्ताच योग्य ती नियमावली तयार करून किंवा आहे त्या नियमावलीचा योग्य ती अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे.

वाढत जाणारे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे त्याचे गंभीर परिणाम यांमुळे आज ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वांनी अधिक माहिती जाणून घेणे आजच्या जीवनात महत्वाचे ठरत आहे. म्हणून आज ‘ध्वनी प्रदूषण’ या विषयाबाबत सविस्तर माहिती करून घेणे महत्वाचे आहे.

        

ध्वनी प्रदूषण प्रकल्पाची उद्दिष्ट्ये


Ø ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ? ते समजून घेणे .

Ø वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे  पर्यावरणावर कोणते परिणाम होतात त्याची सविस्तर माहिती जाणून घेणे.

Ø ध्वनी प्रदूषण होण्यामागे कोणती कारणे आहेत त्यांचा अभ्यास करणे.

 Ø ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी च्या योजल्या जाणाऱ्या उपाय योजनांबाबत सविस्तर माहिती घेणे.

Ø ध्वनी प्रदूषणाबाबत सरकारने केलेले नियम आणि कायदे याबाबत माहिती घेणे.

 Ø ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती सर्वांना मिळवून देणे ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृतीस मदत करणे.


ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती


‘ध्वनी प्रदूषण’ या विषयाचा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी मी क्षेत्रभेट, प्रश्नावली या कार्यपद्धतीचा अवलंब केला. तसेच दैनिक वर्तमान पत्रांत आलेल्या बातम्या आणि लेख यांचा उपयोग केला आणि वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून  प्रकल्पाबाबत माहितीचे संकलन केले. प्रकल्प विषयानुसार वाढत चालेले ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे होत असलेले दुष्परिणाम आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना या मुद्द्यांचा अवलंब केला.

प्रकल्पाची अधिक माहिती मिळवण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे वाढत चाललेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.

परिसरातील लोकांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावलीचा नमुना

सर्वेक्षण ठिकाण : . (या ठिकाणी तुमच्या परिसराचे नाव लिहा.)

नमुनाः परिसरातील  व्यक्तींना विचारलेली प्रश्नावली.

परिसरातील मी या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्नावली आणि मुलाखत  अभ्यासपद्धतीचा अवलंब केला आहे . वर्षानुवर्ष वाढत चाललेली ध्वनी प्रदूषणाची पातळी , त्यामुळे परिसरात वास्तव्य करणाऱ्या लोकांवर आणि प्राण्यांवर होणारे परिणाम , त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपयायोजना इत्यादी मुद्दे हे या प्रश्नावली आणि मुलाखत माध्यमातून स्पष्ट होतील.

सर्वेक्षणाची प्रश्नावली खालीलप्रमाणे :

१ )तुमच्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली आहे का ?

उत्तर: हो किंवा नाही.

२ ) वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तुमच्या परिसरात दुष्परिणाम होत आहेत का  ?

उत्तर: हो किंवा नाही .

३ ) वाहनांनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढत आहे का ?

 उत्तर: हो किंवा नाही .

४ ) ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी परिसरात नियमावली तयार केली आहे का ?

उत्तर: हो किंवा नाही .

५) शासनाच्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जाते का ?

उत्तर: हो किंवा नाही .

६) शाळा, रुग्णालये या परिसरात ध्वनी प्रदूषणाची पातळी योग्य राखली जाते का?

उत्तर: हो किंवा नाही .

७) परिसरात पर्यावरणाची काळजी घेतली जाते का?

 उत्तर: हो किंवा नाही .

८ ) ध्वनी प्रदूषणा चा परिसरातील प्राण्यांवर परिणाम झालेला आढळला का ?

 उत्तर: हो किंवा नाही .

९ )या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण होण्याच्या दृष्टीने नियम पाळले जातात का ?

उत्तर: हो किंवा नाही .

१०) पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी काही नियमावली तयार केली आहे  का?

   उत्तर: हो किंवा नाही.ध्वनी प्रदूषणाची कारणे.


 • शहरांमधील सभोवतालच्या आवाजाची पातळी ही प्रामुख्याने मानवनिर्मित कारणांमुळे वाढत चालली आहे.
 • आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासातील प्रमुख तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण आहे.
 • आवाजाची तीव्रता ही दाट लोकवस्तीच्या क्षेत्रामध्ये उदा. महानगर, औद्योगिक क्षेत्रे, विमानतळ, बस्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी जास्त असलेले आढळते.
 • अवजड यंत्रसामग्रीच्या उच्च गतीमुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध तीव्रतेचे ध्वनी निर्माण होतात, त्यामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडते.
 • बांधकामाच्या ठिकाणी जि यंत्रे वापरली जातात, तसेच वाहनांचे आवाज, इ. ध्वनी प्रदूषणास कारणीभूत घटक आहेत.

 


ध्वनी प्रदूषणाचे परिणाम


 • ध्वनी प्रदूषणामुळे प्राणी तसेच मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असलेले आत्तापर्यतच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
 • सततचा ध्वनी हा मानवाच्या मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्या परिणाम घडवून आणत असतो.
 • तीव्र आवाजामुळे लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात बिघाड निर्माण होतो.
 • सततच्या आवाजामुळे वृद्ध व्यक्तींचा रक्तदाब वाढून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
 • ध्वनी प्रदूषणामुळे माणसांमध्ये  श्रावणशक्ती कमी होणे, रक्तदाब वाढणे, तणाव यांसारखे शारीरिक परिणाम दिसून येतात.
 • वेदना, मळमळ, उलट्या यासाठी सुद्धा ध्वनी प्रदूषणच कारणीभूत आहे.
 • ज्या उद्योगामध्ये सतत यंत्रांचा आवाज असतो त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या वर्तनात बदल घडून येतात. उदा. चिडचिड, डोकेदुखी, चक्कर येणे. उदासीनता. इत्यादी.
 • उद्योगांमध्ये असलेला उच्च तीव्रतेच आवाज तसेच सुपरसोनिक विमानाचा आवाज जेव्हा जास्त काळ चालू असतो तेव्हा श्रवण शक्तीचे कायमचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.

 

ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याचे उपाय.


 • ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होण्यास प्रारंभ होतो तेथेच त्याला रोखले गेले पाहिजे.
 • जास्त आवाज निर्माण करणारी साधने / तसेच भाग प्रभावीपणे बदलणे, कंप कमी करण्यासाठी योग्य कुशन, यंत्राचे होणारे घर्षण कमी करण्यासाठी वेळोवेळी ग्रीसिंग आणि योग्य सायलेन्सर चा वापर करणे हे ध्वनी प्रदूषणाच्या उगम स्थानावर करता येण्यासारखे उपाय आहेत.
 • जास्त आवाजाच्या ठिकाणी ध्वनीरोधक भिंती, छत , आणि दारे बांधून कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या आवाजावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते.
 • जास्त आवाजाच्या यंत्रावर काम करणाऱ्या कामगारांना कानातील इअर प्लग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
 • बसस्थानक, रेल्वे, स्टेशन, विमानतळ आणि औद्योगिक क्षेत्राजवळ निवासी इमारती  बांधण्याचे टाळावे.
 • सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या लाउड स्पीकर्सच्या वापरावर योग्य ते नियमन केले पाहिजे.
 • वाहनांच्या इंजिनमधून येणारा आवाज कमी करण्यासाठी वाहनांची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे.
 • जे लोक पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.
 • हरित पट्टे विकसित करून, विशिष्ट प्रजातींच्या  वृक्ष लागवडीमुळे औद्योगिक आणि इतर गोंगाट कमी होण्यास मदत होते. ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याचे उपाय.


1.                               §  ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होण्यास प्रारंभ होतो तेथेच त्याला रोखले गेले पाहिजे.

§  जास्त आवाज निर्माण करणारी साधने / तसेच भाग प्रभावीपणे बदलणे, कंप कमी करण्यासाठी योग्य कुशन, यंत्राचे होणारे घर्षण कमी करण्यासाठी वेळोवेळी ग्रीसिंग आणि योग्य सायलेन्सर चा वापर करणे हे ध्वनी प्रदूषणाच्या उगम स्थानावर करता येण्यासारखे उपाय आहेत.

§  जास्त आवाजाच्या ठिकाणी ध्वनीरोधक भिंती, छत , आणि दारे बांधून कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या आवाजावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते.

§  जास्त आवाजाच्या यंत्रावर काम करणाऱ्या कामगारांना कानातील इअर प्लग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

§  बसस्थानक, रेल्वे, स्टेशन, विमानतळ आणि औद्योगिक क्षेत्राजवळ निवासी इमारती  बांधण्याचे टाळावे.

§  सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या लाउड स्पीकर्सच्या वापरावर योग्य ते नियमन केले पाहिजे.

§  वाहनांच्या इंजिनमधून येणारा आवाज कमी करण्यासाठी वाहनांची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे.

§  जे लोक पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.

§  हरित पट्टे विकसित करून, विशिष्ट प्रजातींच्या  वृक्ष लागवडीमुळे औद्योगिक आणि इतर गोंगाट कमी होण्यास मदत होते. 

 

ध्वनी प्रदूषण नियम २०१७


 

सरकारने जे वेगवेगळे विभाग ठरवून दिले आहेत. त्या विभागांसाठी उच्चतम ध्वनी पातळीचे निकष हे या नियमांनी कायम केले गेले आहेत.

सुधारणा केलेल्या नियमानुसार राज्य सरकारे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालये इत्यादींच्या सभोवताली असणाऱ्या १००मीटर इतक्या परिसरामध्ये शांतता क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात.

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास हवा ( प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) या कायद्याच्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा केली जाते. ध्वनी प्रदूषणाचे नियमन करणारी नोडल एजन्सी ही त्या ठिकाणी पोलिस ठाणे असते.

Dhwani pradushan in Marathi / Dwani pradushan project in Marathi / Dwani pradushan prakalp Marathi 11vi 12vi / Paryavarn prakalp 11th 12th Marathi / Dwahni pradushan prakalp educational Marathi / ध्वनी प्रदूषण प्रकल्प educational मराठी


ध्वनी प्रदूषण प्रकल निरीक्षणे


सर्वेक्षणानंतर लोकांकडून मिळालेला प्रतिसाद खालील तक्त्यामध्ये दर्शविला आहे

१ )तुमच्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली आहे का ?

२ ) वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तुमच्या परिसरात दुष्परिणाम होत आहेत का  ?

३ ) वाहनांनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढत आहे का ?

४ ) ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी व्हावी यासाठी परिसरात नियमावली तयार केली आहे का ?

५) शासनाच्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जाते का ?

६) शाळा, रुग्णालये या परिसरात ध्वनी प्रदूषणाची पातळी योग्य राखली जाते का?

७) परिसरात पर्यावरणाची काळजी घेतली जाते का?

८ ) ध्वनी प्रदूषणा चा परिसरातील प्राण्यांवर परिणाम झालेला आढळला का ?

९ )या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण होण्याच्या दृष्टीने नियम पाळले जातात का ?

१०) पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी काही नियमावली तयार केली आहे  का?

प्रश्न क्रमांक

प्रतिसाद

हो

नाही

८०%

२०%

७०%

३०%

७५%

२५%

४०%

६०%

९०%

१०%

५०%

५०%

६०%

४०%

४५%

५५%

८०%

२०%

१०

१००%

०%

 


ध्वनी प्रदूषण मानके.

(हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा (tilt) करून पहा )

अ.क्र.

विभाग

रात्री (१० ते सकाळी ६)डेसिबल

दिवस (सकाळी ६ ते रात्री १०)डेसिबल

१.

शांतता क्षेत्रे (रुगणालय व शैक्षणिक संस्था यांच्या सभोवतालची क्षेत्रे)

५०

४०

२.

निवासी क्षेत्रे

५५

४५

३.

व्यावसायिक  क्षेत्रे

६५

५५

४.

औद्योगिक क्षेत्रे

७५

७०

विश्लेषण

ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या वृक्षांची यादी

1.    आंबा

2.    कडूनिंब

3.    ऑस्ट्रेलियन बाभूळ

4.    करंज

5.    बांबू

6.    वड

7.    पिंपळ

8.   उंबर  इत्यादी.


ध्वनी प्रदुषणासाठी कारणीभूत घटक

ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती मराठी ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी ध्वनी प्रदूषण अहवाल ध्वनी प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष मराठी माहिती Dhwani pradushan in Marathi Dwani pradushan project in Marathi Dwani pradushan prakalp Marathi 11vi 12vi Paryavarn prakalp 11th 12th Marathi Dwahni pradushan prakalp educational Marathi ध्वनी प्रदूषण प्रकल्प educational मराठीनिष्कर्ष


Ø ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ? ध्वनी प्रदूषणाची संकल्पना समजून घेता आली.

Ø वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे  पर्यावरणावर कोणते परिणाम होतात त्याची सविस्तर  माहिती मिळवून तिचे संकलन केले.

Ø ध्वनी प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबत अधिक माहिती मिळाली.

Ø ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी च्या योजल्या जाणाऱ्या उपाय योजनांबाबत  माहिती मिळवून ती संग्रहित केली.

Ø ध्वनी प्रदूषणाबाबत सरकारने केलेले नियम आणि कायदे याबाबत सविस्तर माहिती मिळवली.संदर्भ


·      www.educationalmarathi.com

·      www.mazaabhyas.com

·      पर्यावरण पुस्तिका


प्रकल्प अहवाल


जेव्हा आवाज हा गोंगाटामध्ये रुपांतरीत होते तेव्हा त्याचा प्राणी, प्रक्षी आणि मानव यांच्या श्रवण संस्थेवर विपरीत परिणाम घडून येतो. जगभरातील शहरी भागांमध्ये ध्वनी प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून ओळखले गेले आहे. वाढत जाणारे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे त्याचे गंभीर परिणाम यांमुळे आज ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वांनी अधिक माहिती जाणून घेणे आजच्या जीवनात महत्वाचे ठरत आहे. म्हणून आज ‘ध्वनी प्रदूषण’ या विषयाबाबत सविस्तर माहिती करून घेणे महत्वाचे आहे.

मी शैक्षणिक वर्ष २०२०-२१  मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘ध्वनी प्रदूषण’ या विषयाची निवड केली. ‘ध्वनी प्रदूषण’ या विषयाचा प्रकल्प करीत असताना प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी मी क्षेत्रभेट, प्रश्नावली या कार्यपद्धतीचा अवलंब केला. तसेच दैनिक वर्तमान पत्रांत आलेल्या बातम्या आणि लेख यांचा उपयोग केला आणि वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून  प्रकल्पाबाबत माहितीचे संकलन केले.

     निरीक्षणांच्या माध्यमातून असे लक्षात आले की दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. तसेच आवाजाची योग्य तीव्रता किती असते याबाबत माहिती संकलित केली.

मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण केले. तसेच निष्कर्ष काढण्यात आला अशा प्रकारे ‘पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भू-जल पातळीत झालेली घट’ पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.

**************

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रकल्प 4.5MB pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW


ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना
ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी
पर्यावरण प्रकल्प ११ वी १२वी ध्वनी प्रदूषण
ध्वनी प्रदूषण प्रकल्प कार्यपद्धती मराठी
ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना मराठी
ध्वनी प्रदूषण अहवाल
ध्वनी प्रदूषण प्रकल्प निष्कर्ष मराठी माहिती
Dhwani pradushan in Marathi
Dwani pradushan project in Marathi
Dwani pradushan prakalp Marathi 11vi 12vi
Paryavarn prakalp 11th 12th Marathi
Dwahni pradushan prakalp educational Marathi
ध्वनी प्रदूषण प्रकल्प
educational मराठी

1 comment

 1. Dhanyawad 👍👍
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.