आजचे चित्रपट आणि भारतीय समाज
आजचे चित्रपट आणि भारतीय समाज मराठी निबंध / वैचारिक निबंध मराठी / चित्रपट आणि समाज मराठी निबंध / आजचे चित्रपट आणि समाज निबंध मराठी / Aajche chitrapat aani bhartiy samaj Marathi nibandh / Vaicharik nibandh Marathi
आज चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. आपण
दूरदर्शन चालू केला तर त्यावर चित्रपट प्रसारित करणाऱ्या वाहिन्या आपल्याला जास्त
दिसतात. लोक त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुण हे आपली कामे आणि
अभ्यास बाजूला ठेवून, तासन तास चित्रपट पाहत बसतात आपल्या जीवनातील मौल्यवान वेळ
वाया घालवतात. त्यामुळे साहजिक याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो.
आजपासून सुमारे ९० वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके यांनी लोकांचे मनोरंजन व्हावे व त्याच मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन करता यावे यासाठी चित्रपट पहिल्यादा निर्माण केला. यामुळेच चित्रपट सृष्टीच्या प्रारंभीच्या काळामध्ये पौराणिक आणि त्याचबरोबर ऐतिहासिक विषयांवरच चित्रपट निघालेले पाहायला मिळतात; आज कधी कधी असा प्रश्न पडतो की आजचे चित्रपट खरंच मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनदेखील करतात का? या चित्रपटांचा समाजावर कोणता परिणाम घडून येतो का?
![]() |
आजचे चित्रपट आणि भारतीय समाज मराठी निबंध |
आज हे प्रश्न खरंच चिंतेत टाकतात. आजच्या चित्रपटांचा
विद्यार्थी वर्गावर वाईट परिणाम झाल्याच्या अनेक घटना आपल्या निदर्शनास येतात.
यामुळे पालकांना सतत आपल्या पाल्याची चिंता लागून राहिलेली असते. आज चित्रपटांचे
मोठ्या प्रमाणवर अंधानुकरण केले जात असल्यामुळे समाजचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत
आहे. चित्रपटांत दाखवले जाणारे रंगीबेरंगी जीवन आणि श्रामाविना मिळणारी श्रीमंती,
त्या श्रीमंतीतून येणारे ऐश्वर्य आणि उपभोग यांसारख्या चित्रपटांमध्ये दाखवल्या
जाणाऱ्या अनेक बाबी आजच्या विद्यार्थी वर्गाला आकर्षित करतात. चित्रपटांमध्ये
दाखवल्या जाणारे पोशाख असोत व वागण्या बोलण्याच्या सवयी, लकबी, एकूणच काय तर
जगण्याची शैलीच तरुण आणि विद्यार्थी वर्गाकडून लगेच आत्मसात केली जाते. चित्रपटांत
काम करणाऱ्या नायक नायिका यांचे आकर्षण वाटल्याने अनेक तरुण-तरुणी आपले घरदार सोडून
दूरवर शहरांत चित्रपटांत काम करण्याचे स्वप्न बघून येतात आणि काही वेळेला फसवणुकीला बळी
पडतात.
प्रत्येक वर्षी भारतामध्ये विविध भाषांमधून शेकडो
चित्रपट तयार होतात. कोट्यावधी रुपये या चित्रपट व्यवसायात गुंतलेले असतात.
त्यामुळे अनिष्ट मार्गाने संपत्ती मिळवलेली समाजातील वाईट लोक चित्रपट निर्मितीकडे
आपला मोर्चा वळवतात. मग या क्षेत्रात गुन्हेगारीचा देखील शिरकाव होतो.
दरवर्षी तयार होणाऱ्या या चित्रपटांमुळे समाजाचे काही
फायदे ही होतात. मनोरंजन हा त्यामधील पहिला फायदा आहे. चित्रपटसृष्टीत दरवर्षी
सुमारे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते त्यामुळेच हे क्षेत्र आणि त्याच्या इतर
क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. चित्रपट हे समाजाचे आरसे
असतात. समजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून घडते. या
दर्शनाने समाजाच्या विचार शकतील परिपक्वता येते. एकंदरीतच समाजाला घडवण्याचे काम हे
चित्रपटांच्या माध्यमातून होत असते. समाज प्रबोधन करण्याचे एक महत्वाचे साधन
म्हणून चित्रपटांकडे पहिले जाते. गेल्या काही वर्षांत आलेले, स्वदेश, तारे जमीं पर,
श्वास, श्यामची शाळा, उरी द सर्जिकल स्ट्राईक, यांसारख्या सुंदर चित्रपटांनी आशा
पल्लवित केल्या आहेत. भारतीय चित्रपट जबरदस्त ताकदीने व नव्या उमेदीने भारतीय
समाजाला योग दिशेने घेऊन यातील याची आत्ता खात्री वाटू लागली आहे.
हा निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा
हा निबंध लिहिताना त्यामध्ये खलील मुद्द्यांचा देखील
अवश्य वापर करा.
[मुद्दे:
आजच्या विद्यार्थी व तरुणांना चित्रपटाचे वेड
ध्येय, कर्तव्य आणि वास्तवाचे भान विसरून चित्रपटातील
मायावी जगाची ओढ
सामाजिक प्रबोधनाचे साधन म्हणून सुरुवातीला उपयोग
परंतु आज त्याचाच अभाव
आज चित्रपटांची निर्मिती फक्त प्रेक्षकांना आकर्षित
करण्यासाठी
चित्रपटांत दाखवल्या जाणाऱ्या दारोडे, चोऱ्या, यांसारख्या
दृश्यांचा तरुणांवर प्रभाव.
चैनीच्या सुखासाठी गुन्हेगारीचा मार्गांचा अवलंब
तरुण पिढीला सुसंकृत होण्यासाठी दर्जेदार चित्रपटांच्या
निर्मिती ची गरज.
शेवट]
आजचे चित्रपट आणि भारतीय समाज मराठी निबंध
वैचारिक निबंध मराठी
चित्रपट आणि समाज मराठी निबंध
आजचे चित्रपट आणि समाज निबंध मराठी
Aajche chitrapat aani bhartiy samaj Marathi nibandh
Vaicharik nibandh Marathi
Chitrapat aani samaj Marathi nibandh
Aajche chitrapat aani bhartiy samaj essay in Marathi