BUY PROJECT PDF Click Here!

हरितलेखापरीक्षण महत्व पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Harit lekhapariskahn paryavarn prakalp 11th 12th marathi

हरित लेखापरीक्षण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf पर्यावरण प्रकल्प विषयाची निवडParyavarn prakalp Marathi
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 हरितलेखापरीक्षण पर्यावरण  प्रकल्प ११वी १२वी

Educationalमराठी या वेबसाईटवर ११वी,१२ वी पर्यावरण विषयक प्रकल्पांची पुढील मुद्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्प प्रस्तावनाप्रकल्पाची उद्दिष्ट्येप्रकल्प विषयाचे महत्वप्रकल्प कार्यपद्धतीविश्लेषणनिरीक्षणेनिष्कर्षअहवाल लेखन, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

EDUCATIONALमराठी वर उपलब्ध असलेले ११वी १२वी पर्यावरण विषयक प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 



हरित लेखापरीक्षण प्रकल्प प्रस्तावना 


स्थानिक, प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर होत वेगाने होत असलेले शहरीकरण आणि आर्थिक विकास यांमुळे  अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या समस्यांना सामोरे जावे लागत आहे . ही जर परिस्थिती पहिली तर आज सर्व संस्थासाठी पर्यावरण लेखापरीक्षण या प्रणालीचा  अवलंब करणे अधिक आवश्यक आहे. ज्यामुळे शाश्वत विकास होण्यास मदत होईल . पर्यावरणीय शाश्वतता हा एक महत्त्वाचा विषय देशासाठी होत चालला आहे. त्यासाठी संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे .

लेखापरीक्षणाचे मुख्य उददिष्ट असते ते म्हणजे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके  कमी करणे हे  उद्दिष्ट  आहे . यामध्ये संस्थेद्वारे  पर्यावरणावर  परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतीचे विशेषण केले जाते.

आज आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘हरित लेखापरीक्षण’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

हरितलेखापरीक्षण महत्व पर्यावरण   प्रकल्प ११वी १२वी

अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती

४)

हरित लेखापरीक्षणात समाविष्ट असणारे घटक

५)

हरित लेखापरीक्षणाचे फायदे

६)

उर्जा लेखापरीक्षण

७)

निरीक्षणे

८)

विश्लेषण

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ

११)

प्रकल्पाचा अहवाल

 


हरित लेखापरीक्षण प्रकल्प विषयाचे महत्व.

 

हरित लेखापरीक्षण ही एक अनोखी प्रक्रिया आहे . हरित लेखापरीक्षणा द्वारे एखाद्या संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा म्हणजेच  ऊर्जा , पाण्याची गुणवत्ता , जागा आणि हवेची गुणवत्ता इत्यादी गोष्टी जाणून घेते . हरित लेखापरीक्षण ही विविध आस्थापनांच्या पर्यावरणीय विविधतेच्या घटकांची पदधतशीर ओळख , प्रमाणीकरण , नोंद , अहवाल आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे . संस्थांच्या विविध कामांमुळे  ज्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण यांना धोका निर्माण होऊ शकतो का , याचे परीक्षण करण्याच्या हेतूने हरित लेखापरीक्षण या प्रक्रियेची सुरुवात १९७० पासून करण्यात आली .

संस्था सर्वात जास्त ऊर्जा , पाणी किंवा इतर संसाधने कुठे वापरली जात आहेत  हे निर्धारित करण्यासाठी हरित लेखापरीक्षण ही एक उपयुक्त पद्धत आहे. त्यानुसार संस्था बदल कसे करायचे  आणि संवर्धन कसे करायचे याचा विचार करू शकते. यांमुळे हरित लेखापरीक्षण हे आजच्या आधुनिक जगात खूप महत्वाचे आहे. आणि त्याची माहिती सर्वांनी करून देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. म्हणून हरित लेखापरीक्षण हा विषण खूप महत्वाचा आहे.

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

·       हरित लेखापरीक्षण म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेणे .

·       हरित लेखापरीक्षणामध्ये कोण कोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो याची माहिती मिळवणे.

·       हरित लेखापरीक्षणात कोणते घटक समाविष्ट असतात याबाबत माहिती मिळवणे.

·        हरित लेखापरीक्षणाचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊन त्या माहितीचे संकलन करणे.

·       हरित लेखापरीक्षण यामध्ये समविष्ट असणाऱ्या उर्जा लेखा परीक्षण या घटकाबाबत अधिक माहिती मिळविणे.

·       हरित लेखा परीक्षण याबाबत अधिक माहिती इतरांना देखील करून देणे.



हरित लेखापरीक्षण प्रकल्प कार्यपद्धती


‘हरित लेखापरीक्षण’ या विषयावरचा अभ्यास करत असताना माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट आणि पर्यावरण विषयक पुस्तकांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतला. प्रकल्पाबाबत माहिती मिळवत असताना या विषयावर प्रकल्प करणे का गरजेचे आह?  त्याचे महत्त्व काय आहे?  इत्यादी माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे संकलित करण्यात आली. हरित लेखापरीक्षण म्हणजे काय ? हरित लेखापरीक्षणामध्ये कोण कोणते घटक समविष्ट असतात, तसेच हरित लेखापरीक्षणाच्या पायऱ्या कोणत्या आहेत  इ. यावर आधारित मुद्द्यांचा वापर करून प्रकल्पाच्या विषयाला अनुसरून योग्य त्या मुद्द्यांच्या आधारे या प्रकल्पात माहिती समविष्ट केली आहे.

माहिती मिळवताना तयार झालेल्या तयार मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

हरित लेखापरीक्षण प्रकल्प प्रस्तावना / हरित लेखापरीक्षण प्रकल्प ११वी १२वी / हरित लेखापरीक्षण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf / पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड / पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती

हरित लेखापरीक्षणात समाविष्ट असणारे घटक


 

·       कचरा लेखापरीक्षण –

कचरा लेखापरीक्षणामध्ये कचऱ्याचा प्रकार कोणता आहे तसेच त्याचे प्रमाण किती आहे हे निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे किंवा पुनर्चक्रीकरण इत्यादी कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे प्रकल्प राबवण्यास मदत होते . यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण , पुनर्वापर , पुर्नचक्रीकरण व कंपोस्ट या पद्धतींचा अवलंब करून कचरा निर्मिती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते . कचरा संकलन आणि विल्हेवाट करणारी यंत्रणा तपासून, कोणत्या बाबी वाया जातात हे तपासून आणि शून्य कचरा परिसर कशा प्रकारे तयार करायचे हे समजण्यास मदत होते .

 

·       जल लेखापरीक्षण-

     पाणी वापर त्याचप्रमाणे सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी असलेल्या सुविधा यांचे मूल्यांकन जल  लेखापरीक्षणा मध्ये केले जाते. या द्वारे पाण्याची एकूण आवश्यकता तसेच उपलब्ध झालेल्या आणि  पुनर्वापर केलेल्या पाण्याचे प्रमाण किती आहे हे ठरवले जाते किंवा मोजले जाते . पाण्याची मागणी व पुरवठा यांमध्ये संतुलन राखणे , पाण्याची साठवणूक करणे आणि ते पाणी टंचाईच्या वेळी उपयोगात आणणे हे  जल लेखापरीक्षणाचे मुख्य उदिष्ट आहे.

 

·       ऊजालेखापरीक्षण –

उर्जा लेखापरीक्षणाद्वारे उर्जेचे संवर्धन , उर्जेचा वापर आणि वापरल्या जाणाऱ्या उर्जेचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या पद्धतीचे मूल्यांकन  केले जाते. या द्वारे ऊर्जा वापरण्याच्या पदधतीवर लक्ष केंद्रित केले जाते आणि  उर्जा संवर्धन करण्याची विविध तंत्रे  सुचवली जातात.

 

·       परिस्थितिकीय लेखापरीक्षण –

परिस्थितिकीय लेखापरीक्षणा द्वारे एखाद्या  संस्थेचे हरित क्षेत्र मोजणे , त्या ठिकाणी असणारी जैवविविधता ओळखणे आणि पर्यावरणाशी असलेले संबंध समजून घेणे आणि  संस्थेच्या जमिनीच्या वापरावर लक्ष केंद्रित करणे इत्यादी मुद्दे हाताळले जातात . यामध्ये एखाद्या संस्थेच्या हरित भागाची टक्केवारी मोजली जाते . एखाद्या संस्थेमध्ये हरित क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असते . कारण ते वायू प्रदूषण कमी करते आणि जैव विविधतेस मदत करते . परिस्थितिकीय लेखापारीक्षण कीडनाशके आणि पर्यावरणास सुरक्षित पर्यायांचा वापर करून पर्यावरणाची देखभाल करण्यासाठी सदर संस्था किती पुढाकार घेते याची तपासणी करते.

 

 

हरित लेखापरीक्षणाचे फायदे


Ø हरित लेखापरीक्षण संस्थेला पर्यावरणासंबंधी अधिक चांगले काम करण्यासाठी सक्षम करते .

Ø संस्थेमध्ये उपलब्ध संसाधनांची यादी तयार करण्यास मदत होते.

Ø संस्थांना पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे स्वत : चे मार्ग चांगल्या प्रकारे शोधण्यासाठी हरित लेखापरीक्षण हे उपयुक्त ठरते.

Ø एखादया संस्थेला पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आहे की नाही  हरित लेखापरीक्षणाच्या अभिप्रायाद्वारे सूचित केले जाते.

Ø संसाधनाच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतींचा प्रसार केला जातो.

 

 

उर्जा लेखापरीक्षण


उर्जा लेखापरीक्षण म्हणजे घरे, उदयोग, संस्था , शाळा यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वीज, गॅस  , आणि उपलब्ध असलेल्या इंधन उर्जा साधनांच्या वापराची तपासणी आणि पडताळणी करणे होय. या द्वारे इंधन वापरामध्ये कोठे सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कोठे सुधारणा करू शकतो. याबाबत माहिती सांगितली जाते.

 

एखाद्या संस्थेचे उर्जा लेखापरीक्षण हे पुढील निकषांच्या आधारे केले जाते.

१)उर्जा वापराचे प्रकार

२)प्रतिदिन उर्जा वापराचे प्रमाण

३) उर्जेचा कार्यक्षमतेने  वापर आणि ऊर्जेचे संवर्धन

 

 

ऊर्जा लेखापरीक्षणामध्ये समविष्ट असलेल्या पायऱ्या


v पहिली पायरी : संस्थेच्या इमारतींचे बांधकाम ,तसेच इमारतीच्या  रचनांची वैशिष्ट्ये , वापरकर्त्यांच्या सवयी , पद्धती आणि इमारतींची देखभाल विचारात घेऊन सर्वेक्षण प्रश्नावली तयार केली जाते.

v दूसरी पायरी - संस्थेत वापरल्या जाणाऱ्या विविध ऊर्जा उपकरणांची संख्या आणि ऊर्जा वापरामुळे होणारे खर्च यांचा शोध घेणे.

v तिसरी पायरी - विभाग स्तरावर ऊर्जेचा वापर शोधते.

v चौथी पायरी - संस्था किती ऊर्जा वापरते याची गणना केली जाते ज्या ठिकाणी उर्जेचा अपव्यय होतो अशी ठिकाणे शोधली जातात .

v पाचवी पायरी - पर्यायी पुनर्नवीकरणीय ऊर्जास्रोतांची वापराची शिफारस करते . उदा . सौरऊर्जा

 

उर्जा बचत कशी करावी

 

• ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे सौर ऊर्जेसारख्या ऊर्जास्रोतांचा वापर करणे .

• खोली किंवा वर्गाबाहेर जाताना दिवे , पंखेयांसारखी  इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे .

 • लिफ्टऐवजी खाली येताना जिन्याचा वापर करणे.

• पाणी वाया न घालवता त्याचा जपून वापर करणे.

 

 

प्रकल्प निरीक्षणे 


हरित लेखापरीक्षणाचे महत्व


पर्यावरण संरक्षण अधिनियम १९७० अनुसार भारतामध्ये  पर्यावरणीय लेखापरीक्षण हे औद्योगिक प्रक्रिया तसेच इतर उपक्रम, टाकावू कचरा, ध्वनी इत्यादी गोष्टींचे स्वरूप पर्यावरणाला घातक किंवा धोकादायक आहे का, याचे मूल्यमापन केले जाते. टाकावू घटक आणि उद्योगधंदे यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या माध्यमातून पर्यावरणामध्ये किती घटक सोडले जात आहेत, हे समजून घेणे हे पर्यावरणीय लेखापरीक्षणाचे प्रमुख काम आहे. पर्यावरणीय लेखापरीक्षण पारदर्शक आणि स्वतंत्र पाहिजे. पर्यावरण लेखापरीक्षणाच्या माध्यमातून  पर्यावरणास असलेले धोके कमी करण्यासाठी सल्ला आणि शिफारशी केल्या जातात.

भारत हा जगातील पहिला देश आहे की ज्याने पर्यावरणीय लेखापरीक्षण अनिवार्य केले आहे. १३ मार्च १९९२ रोजी भारत सरकारने राजपत्रामध्ये केलेल्या अधिसूचना क्र. जीएसआर ३२६ (ई) अनुसार सर्व उद्योगांना तसेच संस्थांना त्यांच्या सर्व औद्योगिक प्रक्रियांच्या कामाच्या सर्दार्भातला प्रत्येक वर्षाचा  पर्यावरणीय लेखापरीक्षण अहवाल तयार करणे  बंधनकारक केले आहे. पर्यावरणीय लेखापरीक्षणामुळे  एकदा उद्योग, कंपनी किंवा  संस्था इत्यादींद्वारा संसाधनांचा कमीत कमी वापर आणि कमीत कमी टाकाऊ पदार्थांची निर्मिती तसेच  हा पर्यावरणीय लेखापरीक्षणाचा उल्लेख आहे.

पर्यावरणीय लेखापरीक्षणा मध्ये समाविष्ट असणारे घटक.

ऊर्जा लेखापरीक्षण

जल लेखापरीक्षण 

आरोग्य व सुरक्षा ऑडिट

पर्यावरण गुणवत्ता लेखापरीक्षण 

कचरा लेखापरीक्षण 

अभियांत्रिकी लेखापरीक्षण

 


विश्लेषण

 

स्थानिक, प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर होत वेगाने होत असलेले शहरीकरण आणि आर्थिक विकास यांमुळे  अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाचा आणि जलद आणि सोयीस्कर वाहतुकीचा प्रदूषण हा एक अपरिहार्य परिणाम आहे. परंतु अत्यधिक प्रदूषण माणसाच्या आरोग्यावर आणि त्याच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात व्यत्यय आणू शकतो.  पर्यावरणाला प्रदूषणाच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आत्ता  समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून प्रयत्न करण्याची गरज  निर्माण झाली आहे. लेखापरीक्षण म्हणजे ऑडीटिंग हा शब्द आपल्याला आर्थिक दृष्टीने माहिती आहे यामध्ये नोंदी तपासल्या जातात. पर्यावरणाचे लेखापरीक्षण म्हणजे  म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा म्हणजेच  ऊर्जा , पाण्याची गुणवत्ता , जागा आणि हवेची गुणवत्ता इत्यादी गोष्टी जाणून घेणे.

 

 

निष्कर्ष

·       हरित लेखापरीक्षण म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेतली.

·       हरित लेखापरीक्षणामध्ये कोण कोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो याची माहिती मिळवली.

·       हरित लेखापरीक्षणात कोणते घटक समाविष्ट असतात याबाबत अधिक माहिती मिळवून तिचे संकलन केले.

·        हरित लेखापरीक्षणाचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊन त्या माहितीचे संकलन केले.

·       हरित लेखापरीक्षण यामध्ये समविष्ट असणाऱ्या उर्जा लेखा परीक्षण या घटकाबाबत अधिक माहिती संकलित केली.

 

संदर्भ


www.edudcationalmarathi.com

www.mazaabhyas.com

पर्यावरण पुस्तिका 


प्रकल्प अहवाल


स्थानिक, प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर होत वेगाने होत असलेले शहरीकरण आणि आर्थिक विकास यांमुळे  अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लेखापरीक्षणाचे मुख्य उददिष्ट असते ते म्हणजे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके  कमी करणे हे  उद्दिष्ट  आहे . यामध्ये संस्थेद्वारे  पर्यावरणावर  परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतीचे विशेषण केले जाते.

मी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘हरित लेखापरीक्षण’. या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी या विषयावरचा अभ्यास करत असताना माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट आणि पर्यावरण विषयक पुस्तकांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतला आणि तयार केलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहितीचे संकलन करण्यात आले.

प्रकल्पाच्या विषयानुसार हरित लेखापरीक्षण म्हणजे काय ? हरित लेखापरीक्षणामध्ये कोण कोणते घटक समविष्ट असतात, तसेच हरित लेखापरीक्षणाच्या पायऱ्या कोणत्या आहेत  तसेच हरित लेखापरीक्षणाचे महत्व काय आहे यावर आधारित माहितीचे संकलन केले. हा प्रकल्प करत असताना पर्यावरणीय लेखापरीक्षणा मध्ये समाविष्ट ऊर्जा लेखापरीक्षण, जल लेखापरीक्षण , आरोग्य व सुरक्षा ऑडिट, पर्यावरण गुणवत्ता लेखापरीक्षण  , कचरा लेखापरीक्षण  यांसारख्या हरित लेखापरीक्षणाच्या पायऱ्या निदर्शनास आल्या.

उपलब्ध माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरक्षणाची नोंद केली. तसेच निष्कर्ष काढण्यात आला. अशा प्रकारे पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.

 

११वी १२वी पर्यावरण प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

येथे क्लिक करा.


हरित लेखापरीक्षण प्रकल्प प्रस्तावना / हरित लेखापरीक्षण प्रकल्प ११वी १२वी / हरित लेखापरीक्षण प्रकल्प कार्यपद्धती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण प्रकल्प १२ वी विषय pdf / पर्यावरण प्रकल्प विषयाची निवड / पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती
पर्यावरण प्रकल्प १२वी मराठी pdf / पर्यावरण प्रकल्प मराठी / Paryavarn prakalp Marathi 12th / Paryavarn prakalp pdf / Paryavarn prakalp karypadhati / Paryavarn prakalp in Marathi pdf download




Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.