BUY PROJECT PDF Click Here!

जागतिक तापमानवाढ प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | Jagatik tapmanvadh prakalp 11th 12th paryavarn prakalp

जागतिक तापमानवाढ महत्व जागतिक तापमानवाढ अभ्यास पद्धती/कार्यपद्धती जागतिक तापमानवाढ प्रकल्प निरीक्षणे जागतिक तापमानवाढ पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

  जागतिक तापमानवाढ प्रकल्प 

पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी आणि इतर इयत्तांसाठी 

            जागतिक तापमानवाढ कारणे, परिणाम आणि उपाययोजना

जागतिक तापमानवाढ प्रकल्प उद्दिष्ट्ये / जागतिक तापमानवाढ प्रकल्प निवड / जागतिक तापमानवाढ प्रकल्प प्रस्तावना / जागतिक तापमानवाढ महत्व / जागतिक तापमानवाढ अभ्यास पद्धती/कार्यपद्धती / जागतिक तापमानवाढ प्रकल्प निरीक्षणे / जागतिक तापमानवाढ पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

 

जागतिक तापमानवाढ प्रकल्प प्रस्तावना


        आज पर्यावरण प्रदुषण हा फार मोठ्या समस्येचा विषय आहे. जागतिक तापमान वाढ हा देखील पर्यावरणीय प्रदूषणाशी निगडीत असणारा विषय आहे. पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर खूप वेळा पृथ्वीवर तापमान वाढ झालेली आढळून आली पण तेव्हा झालेली तापमान वाढ ही पूर्णत नैसर्गिक होती. तेव्हासुद्धा पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनेक बदल घडून आले होते. आज होत असलेली तापमान वाढ ही मानवी कृत्यांमुळे घडून येत आहे. ती पूर्णतः मानवनिर्मित आहे. हरितवायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होताना दिसून येत आहे आणि क्योटो प्रोटोकॉल हा याच गोष्टींशी निगडीत आहे. हरित वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रोटोकॉल मध्ये तरतूद करण्यात आली आहे आणि त्याचा अनेक देशांनी स्वीकार केला आहे.

        आज अतिप्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. सर्व ठिकाणी उद्योग धंदे उभे राहिले आहेत. यांमधून बाहेर पडणारे वविध प्रकारचे वायू हे जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. त्याचप्रमाणे  हरित गृहांमधून बाहेर बाहेर पडणाऱ्या विविध वायूंच्या परिणामी तापमानवाढ होते. जर अशीच तापमानवाढ होत राहिली तर सारी सजीवसृष्टी धोक्यात येईल.

        तपामावाढीवर जर आपल्याला मात करायची असेल तर त्यासाठी आपल्याला तापमान वाढीची कारणे कोणती आहेत. तापमावढीचे सजीव सृष्टीवर परिणाम कोणते होतात. आणि पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर  माहिती करून घेणे गरजेचे आहे.

        आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जागतिक तापमानवाढ कारणे, परिणाम आणि उपाययोजना’ याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

 

 

 


अनुक्रमणिका

 

अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

 

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

३)

जगातिक तापमान वाढीची कारणे

 

४)

जागतिक तापमान वाढीचे परिणाम

 

५)

जागतिक तापमानवाढ उपाययोजना

 

६)

निरीक्षण

 

७)

निष्कर्ष

 

८)

संदर्भ

 

९)

प्रकल्पाचा अहवाल

 

 

जागतिक तापमानवाढ प्रकल्प विषयाचे महत्व


        आज २१ व्या शतकात मोठ्या प्रमाणवर औद्योगिकरण झाले आहे. उद्योग धंदे आणी हरित गृहांतून बाहेर पडणारे वायू ही हवेतील तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात. जर ही अशीच तापमान वाढ होत राहिली तर पृथ्वीवरील जलसाठे आटायला लागून सारी जीवसृष्टी संकटात येईल.

         तापमानवाढीवर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे; यामध्ये तापमान वाढीची कारणे कोणती आहेत. तापमावढीचे सजीव सृष्टीवर परिणाम कोणते होतात. आणि सजीवसृष्टीवर होणारे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी कोणत्या-कोणत्या  उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर  माहिती करून घेणे गरजेचे आहे. 

        आपल्या येणाऱ्या पिढीला जागतिक तापमानवाढीच्या संकटापासून वाचवायचे असेल तर. जागतिक तपामान वाढीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणून ‘जागतिक तापमानवाढ कारणे, परिणाम आणि उपाययोजना’ हा विषय पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे.



जागतिक तापमानवाढ प्रकल्पाची उद्दिष्टे

 

·       जागतिक तापमानवाढ संकल्पना समजून घेणे.

 

·       जागतिक तापमानवाढीच्या कारणांचा अभ्यास करणे.

 

·       तापमान वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.

 

·       तापमान वाढ कमी करण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची माहिती घेणे.

 

·       जागतिक तापमान वाढीबाबत अधिक माहिती इतरांना करून देणे.

 

जागतिक तापमानवाढ अभ्यासपद्धती / कार्यपद्धती

 

        जागतिक तापमानवाढ या विषयावरचा प्रकल्प करत असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्यपद्धतिचा / अभ्यासपद्धतीचा अवलंब केला. जागतिक तापमानवाढ या प्रकल्पाबाबत माहिती एकत्रित करीत असताना या विषयवरचा प्रकल्प करणे का महत्वाचे आहे ? या विषयाचे आजच्या काळात काय स्थान आहे. इत्यादी माहिती जाणून घेतली. या विषयची माहिती जाणून घेत असताना मी आंतरजालावर आणि वर्तमानपत्रातून आलेल्या लेखांचा माहिती मिळविण्यासाठी उपयोग केला. तापमान वाढीची पूर्वी स्थिती काय होती कशाप्रकारे तापमानवाढ होत होती आणि तापमान वाढ होण्यास कोणते घटक पूर्वीच्या काळी कारणीभूत होते आणि आत्ता कोणते घटक जागतिक तापमानवाढीवर परिणाम करीत आहे यावर आधारित मुद्द्यांचा वापर करून मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यास सुरुवात केली.

        प्रकल्पाची माहिती संकलित करताना मी सुरुवातीला दैनिक वृत्तपत्रातून छापून आलेल्या जागतिक तापमानवाढ आणि ती होण्यास कारणीभूत असणारे घटक यांची माहिती एकत्र केली. जागतिक तापमान वाढीचे पर्यावरणावर कोणते परिणाम घडून येत आहेत त्याचप्रमाणे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना करता येतील. याबाबत मुद्दे एकत्रित केले गेले.

        एकत्रित केलेल्या मुद्यांबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेल्या विविद वेबसाईट चा वापर केला.  तसेच काही पर्यावरण विषयक पुस्तकांचा देखील अभ्यास केला. आणि एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणे, विश्लेषण, आणि शेवटी निष्कर्षाची नोंद करून हा पर्यावरण विषयक प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

Jagatik tapmanvadh paryavarn prakal p11th 12th / Jagatik tapmanvadh abhyaspadhti / Jagatik tapmanvadh prastavana / Paryavarn prakalp educationalmarathi


जगातिक तापमान वाढीची कारणे


Ø जगाची वाढती लोकसंख्या –

        जगाच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या परिणामी निसर्गात उत्सर्जन होणाऱ्या कार्बनडायऑक्साइड कच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Ø प्राण्यांची वाढती संख्या –

        कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढत जाण्याची अनेक करणे आहेत त्यापैकि एक कारण म्हणजे प्राण्यांची वाढत जाणारी संख्या.  इतर देशांचा विचार केला तर अमेरिकेमध्ये असणारे कडक कायदे टाळण्यासाठी त्या ठिकाणी असणारे वराहापालक हे मेक्सिकोत वराहपालन केंद्रे स्थापन करतात. त्या ठिकाणी एका एका जागी लाखांमध्ये प्राणी पाळलेले असतात. कॅलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणवर गाईंची संख्या आहे. हे सर्व प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजन चा मोठ्या प्रमाणवर वापर करतात आणि कार्बनडायऑक्साईड पर्यावरणात सोडतात.  इतकेच नाही तर त्यांच्या मलमूत्रातून मिथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायूबाहेर पडतो. मिथेन वायू कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक आहे.

 

Ø सूर्याकिरणांची दाहकता-

        सूर्यकिरणांची दाहकता जर वाढली तर जागतिक तापमान वाढ होते. पण आजच्या परिस्थितीमध्ये सूर्यापासून निर्माण होणारी उष्णता ही योग्य प्रमाणात आहे. सूर्य किरणांचे तापमान कमी जास्त झाल्यास तापमानात लगेच फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. परंतु अशी परिस्थिती सध्या निदर्शनास आलेली नाही त्यामुळे वाढत्या तापमान वाढीला हरितगृह परिणामाच जबाबदार आहे.

 

Ø ज्वालामुखींचे उत्सर्जन-

        ज्वालामुखींच्या उत्सर्ज झाल्याने जागतिक तापमानात अमुलाग्र बदल घडून येऊ शकतात. परंतु ज्वालामुखींच्या उत्सर्जनामुळे होणारी तापमान वाढ ही १ ते २ वर्ष इतकीच मर्यादित असते. त्यामुळे त्याचा परिणाम हा मर्यादित कालावधीसाठी असतो.

 

Ø 'औद्योगिक क्रांती' –

        औद्योगिक क्रांती नंतर मानवाने जंगलांतील नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमावर इंधन म्हणून वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडायऑक्साईड या वायूचे उत्सर्जन होते. तसेच लाकूड आणि दगडी कोळसा यांचा ज्वलनासाठी वापर केल्याने  वातावरणात कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. दगडी कोळसा ज्वलन होत असताना कार्बन डायऑक्साईड वायूबरोबर इतरही ऑक्साईडे हवेत मिसळू लागली. आजच्या आधुनिक काळात  खनिज तेल आणि इंधन यांच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू यांचा इतका मोठ्या प्रमाणवर वापर सुरु झाला की आज त्यामुळे परिणाम वाढू लागला.

 

 

जागतिक तापमान वाढीचे परिणाम

        तापमान वाढीची सरासरी ही २ ते ३ अंश होताना दिसत असली तरीही त्यामुळे पृथ्वीवर भयंकर परिणाम घडून येताना दिसत आहेत. या आधीही ज्या ज्या वेळी तापमान वाढ होऊन आली त्यावेळीही वातावरणात अमुलाग्र बदल घडून आले होते. या तापमान वाढीचा सर्वात मोठा परिणाम झालेला दिसून येतो तो म्हणजे हवामानावर. आज हेच परिणाम आपल्याला विविध नैसर्गिक संकटांच्या माध्यमातून दिसू लागले आहेत.

 

v हिमनद्यांचे वितळणे:


        पृथ्वीवरचे वाढत जाणाऱ्या तापमानामुळे मोठ्याप्रमाणावर हिम नद्या वितळू लागल्याने साऱ्या जगाला चिंता सतावू लागली आहे.

        विविध भागातील होणाऱ्या बदलांचा सविस्तर अभ्यास करण्याट आला आला आणि त्यातून तापमान वाढीचा सर्वात जास्त परिणाम हा हिमनद्यांवर होत असल्याचे स्पष्ट झाले. या नद्या वितळण्याचे कारण म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळून जाणाऱ्या बर्फाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढू लागले आहे. अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर इ.स. १९६० पर्यंत मोठ्या प्रमाणात बर्फ होता पण आज या ठिकाणी अत्यंत कमी बर्फ उरला आहे. हिमालय, आल्प्स, यांसारख्या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही हेच चित्र निदर्शनास आले आहे. हिमनद्या या वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या नद्यांतील हिम वितळून नष्ट झाला तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्या भागाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

 

v हिमनगांचे वितळणे:


        हिमनद्यांच्या वितळण्याच्या समस्येसोबतच आर्टिक व अंटार्टिका त्याचप्रमाणे ग्रीनलॅंड या ध्रुवीय प्रदेशात मोठ मोठ्या हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे. जागतिक तापमान होण्या आधी देखील या हिमनगांचे वितळणे चलू हते. परंतु तापमान वाढ झाल्याने नवीन बर्फ पडण्याचे प्रमाण कमी होऊन असलेला बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. बर्फाच्या वितळण्याने तयार झालेले पाणी हे समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे अलीकडच्या काळात समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणत वाढली आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्यापैकी सुमारे जवळपास ३ टक्के इतके पाणी ही या हिमनगांमध्ये सामावलेले आहे. ग्रीनलॅंड मध्ये उपलब्ध असणारा बर्फ वितळला तर पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची पाण्याची पातळी दोन ते तीनमीटरने वाढेल. आजी जर अंटार्टिकावरील सगळा बर्फ वितळला तर महासागराची पातळी २० मीटरने वाढेल आणि परिणामी आज अस्तित्वात असणारा कोणताही समुद्र किनारा पाहायला मिळणार नाही. समुद्राच्या काठावर असणारी मुंबई सारखी शहरे ही पाण्याखाली जातील.

 

v हवामानातील बदल:

 

मुंबई महापूर-

        हवामानातील बदल हा तापवाढीमुळे दिसून येणारा परिणाम आहे. अलीकडच्या काळात तापमानवाढीमुळे झालेल्या बदलांचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.  तापमान वाढीचे परिणामांचा अनेक देशातील लोकांनी सामना केला आहे. पृथ्वीवरील हवामानाची स्थिती ही अनेक घटकांवर आधारलेली असते. त्यापैकी समुद्राच्या पाण्याचे तापमान हा महत्वाचा घटक  आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून  बाष्पीभवनाचा वेग वाढतो , याचा परिणाम म्हणून आज आपल्याला पावसाचे प्रमाण, चक्रिवादळांची तीव्रता आणि संख्या यांमध्ये वाढ झाली आहे. व त्यांची तीव्रता वाढलेली आहे.

        अमेरिकेमध्ये २००५ साली आलेल्या कतरिना चक्रिवादळाने मोठ्या प्रमाणवर विध्वंस घडवून आणला. त्याच वर्षी २६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. गेल्या काही वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिका या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.  बर्फ वृष्टी चे प्रमाण कमी झाल्याने आत्ता पूर्वीसारखी थंडी अनुभवायला मिळत नाही. पावसाचे प्रमाण हे काही ठिकाणी मोठ्या प्रमणावर वाढले आहे तर काही ठिकाणी अत्यंत कमी असलेले आपल्याला पाहायला मिळते. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण कमी झालेले आढळून आले आहे त्याचप्रमाणे भारताच्या ईशान्य भागात सुद्धा पावसाचचे प्रमाण हे अनियमित आहे.

        समुद्राच्या पाण्याच्या तापमानात बदल घडून आल्याने समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याची शक्यता असते. अशा प्रकारे प्रवाहांची दिशा बदलल्यास मोठ्या प्रमाणावर संकटे निर्माण होऊन पृथ्वीवर महाकाय बदल घडून येण्याची शक्यता असते.

 

जागतिक तापमानवाढ उपाययोजना


        तापमानवाढीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर वातावरणातील  कार्बन डायऑक्साईड हा वायू कमी करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. यातलाच एक उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणवर वृक्ष लागवड करणे. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड ची निर्मिती कमी करणे महत्वाचे आहे. उपलब्ध असलेल्या भूभावर चार ते पाच पट जमीन ही जंगलाच्या अच्छादनाखाली आणली पाहिजे. दुसरा उपाय म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची निर्मिती मोठ्या प्रमाणवर होते त्या ठिकाणाचा कार्बनडायऑक्साईड एकत्र करून समुद्रामध्ये सोडण्याची यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला गेला पाहिजे.

 

        सध्याच्या युगात कोणताही कोणत्याही देशाला उर्जेचा वापर कमी करून आपल्या प्रगतीत अडथला येऊ देणे परवडणार नाही. विकसित देशांमध्ये केल्या जाणाऱ्या उर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. परंतु उर्जेचा वापर करण्याचे प्रमाण स्थिर झाले आहे. या राष्ट्रांसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमीत कमी कशा प्रकारे केला जाईल.चीन, भारत या देशांचे दरडोई उत्पन्न कमी प्रमणात असले तरीही उर्जा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.उर्जेचा वापर आणि लोकसंख्या यांचा विचार केला तर हे देश काही वर्षांतच इतर देशांना हरित वायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत ही हीच गोष्ट लागू होते. म्हणून सध्याच्या काळात तापमानवाढीवर मात करणे अवघड आहे. कार्बन डायॉक्साईड या हरितवायूला वातावरणात सोडण्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे हे शास्त्रज्ञांचे मत आहे.

 

v कार्बन डायॉक्साईडचे रोखणे व साठवण

        कारखान्यांतील कामे असोत किंवा घरातील कामे असोत ती पार पाडण्यासाठी गरज असते ती उर्जेची. आणि हीच उर्जा निर्मिती कोळसा, पेट्रोल, यांचे ज्वलनाच्या माध्यमातून निर्माण केली जाते. या कार्बनी पदार्थांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर कार्बनडायऑक्साईड ची निर्मिती होते. शास्त्रज्ञांकडून सुचवल्या गेलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात मिसळण्यापासून रोखण्याच्या अनेक प्रक्रियांचा अभ्यास चालू आहे. यामध्ये कार्बनडायऑक्साईड च्या निर्मिती नंतर तो वेगळा करून भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा हे त्यापैकी एक.

        कोळशाचे ज्वलन हे  हवेऐजवी फक्त ऑक्सिजन चा वापर करून केले गेले तर कोळसा जाळल्यानंतर फक्त कार्बन डाय ऑक्साईड वायू निर्माण होईल. आणि तो सहज वेगळा करत येऊ शकतो . याच पद्धतीला ऑक्सिफ्युएल फायरिंग (oxyfuel firing) असे म्हटले जाते.


जागतिक तापमानवाढ प्रकल्प प्रस्तावना / जागतिक तापमानवाढ महत्व / जागतिक तापमानवाढ अभ्यास पद्धती/कार्यपद्धती / जागतिक तापमानवाढ प्रकल्प निरीक्षणे / जागतिक तापमानवाढ पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी


v नवीन प्रकारची इंधने

        कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर वेगळे करून त्याची साठवण करणे हे वीजनिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये शक्य होऊ शकते कारण त्या ठिकाणी ३५ ते ४० टक्क्यांपर्यत प्रदूषकांची निर्मिती होत असते. त्यामुळे त्यांवर प्रक्रिया करून ते वेगळे करणे शक्य आहे. वाहनांमध्ये सुद्धा इंधानाचे ज्वलन होऊन मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. एका अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले की  ३३ ते ३७ टक्के कार्बन चे उत्सर्जन हे वाहनांमुळेच होते. या बाहेर पडणाऱ्या कार्बन वर नियंत्रण मिळविणे अशक्य आहे त्यामुळे आत्ता अशी इंधने वापरली गेली अफिजेत ज्यांच्यामधून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही.

 

v जैविक इंधने

        शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने असे म्हटले जाते. जैविक इंधने ही सूर्यप्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे होतात. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळणे शक्य नसले तरी खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून होणारी  कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने कार्बन डायॉक्साईडची  न्यूट्रल मानण्यात येतात. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत.

 

 

जागतिक तापमानवाढ प्रकल्प निरीक्षणे


१)   जगातिक तापमान वाढीची कारणे

·       जगाची वाढती लोकसंख्या

·       प्राण्यांची वाढती लोकसंख्या

·       सूर्याकिरणांची दाहकता

·       जंगलतोड

·       ज्वालामुखींचे उत्सर्जन

२)   जागतिक तापमान वाढीचे परिणाम

o   हिमनद्यांचे वितळणे

o   हिमनगांचे वितळणे

o   हवामानातील झालेले बदल

३)   जागतिक तापमान वाढीवर उपाययोजना

·       जैविक इंधने

·       नवीन प्रकारची इंधने

·       कार्बन डायॉक्साईडचे रोखणे व साठवण

·       वृक्षलागवड




जागतिक तापमानवाढ प्रकल्प निष्कर्ष


·       जागतिक तापमानवाढ संकल्पना समजून घेतली.

 

·       जागतिक तापमानवाढीच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला.

 

·       तापमान वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अभ्यास केला.

 

·       तापमान वाढ कमी करण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

 


संदर्भ


·       www.educationalmarathi.com

·       www.mazaabhyas.com

·       पर्यावरण पुस्तिका.

 

 

प्रकल्प अहवाल


        आज अतिप्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. सर्व ठिकाणी उद्योग धंदे उभे राहिले आहेत. यांमधून बाहेर पडणारे वविध प्रकारचे वायू हे जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. त्याचप्रमाणे  हरित गृहांमधून बाहेर बाहेर पडणाऱ्या विविध वायूंच्या परिणामी तापमानवाढ होते. जर अशीच तापमानवाढ होत राहिली तर सारी सजीवसृष्टी धोक्यात येईल. जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे बनले आहे.

        मी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१  मध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘जागतिक तापमानवाढ कारणे, परिणाम आणि उपाययोजना’ या विषयाची निवड केली. या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी मी  आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग केला. आज साऱ्या जगाला जागतिक तापमानवाढीचे संकट सतावत आहे. नव्या पिढीला जागतिक तपामान्वाधीच्या संकटापासून वाचवायचे असेल तर. जागतिक तपामान वाढीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणून ‘जागतिक तापमानवाढ कारणे, परिणाम आणि उपाययोजना’ हा विषय पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे.

        प्रकल्पाच्या विषयानुसार जगातिक तापमान वाढीची कारणे कोणती आहेत याचा शोध घेण्यात आला. जागतिक तापमान वाढ झाल्याने निसर्गावर तासेक मानवी जीवनावर कोणते अनिष्ट परिणाम होतील याबाबत सविस्तर माहिती मिळवली आणि तिची नोंद केली. जागतिक तापमानवाढिस कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती करून घेण्यात आली. यामध्ये हरितगृह वायू, कार्बनडाय ऑक्साईड यांसारख्या घटकांची माहिती करून घेतली. हरित गृहातून बाहेर पडणारे वायू हे  निसर्गातील तापमान वाढीस कारणीभूत ठरतात. याबाबत माहिती मिळवली. जर जागतिक तापमानवाढ काही प्रमाणावर कमी करायची असेल तर कोणते उपाय योजावे लागतील याबाबत माहिती मिळवली व ती नोंद करून घेतली.

        मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरक्षणाची नोंद केली. तसेच निष्कर्ष काढण्यात आला. अशा प्रकारे पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.

 

*************

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

जागतिक तापमानवाढ प्रकल्प प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.