महापूर मराठी निबंध | Mahapur nibandh in marathi

महापूर एक समस्या मराठी निबंध पूर मराठी निबंध Mahapur nibandh marathi mahapur essay in marathi महापूर निबंध मराठी महापुराचे थैमान मराठी निबंध
Admin

महापूर मराठी निबंध 

महापूर निबंध मराठी / महापुराचे थैमान मराठी निबंध / महापूर एक समस्या मराठी निबंध पूर मराठी निबंध / Mahapur nibandh marathi  / mahapur essay in marathi   / mahapurache thaiman marahti nibandh  / pur marathi nibandh 

            महापूर हे एक निसर्गाचे रौद्ररूप आहे. जेव्हा पाऊस पडत नाही, तेव्हा दुष्काळ पडतो.  पण जेव्हा अतिप्रमाणात पाऊस पडतो तेव्हा नद्यांना पूर येतो. पुराचे पाणी नदीपात्राबाहेर पडून दूर दूर वर पसरते. कधी कधी तर जोरदार पाऊस पडल्याने कोणत्या तरी नदीवर बांधलेले धरण फुटते. धरण फुटल्याने महापुराची भीषण परिस्थिती निर्माण होते. यामध्ये गावेच्या गावे पाण्याबरोबर वाहून जातात. आपल्या देशामध्ये गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, घाघरा, गोदावरी, नर्मदा इत्यादी नद्यांना पावसाळ्यात अनेक वेळा भीषण पूर येतो. आणि जन जीवन विस्कळीत होऊन जाते.

                

महापूर निबंध मराठी महापुराचे थैमान मराठी निबंध महापूर एक समस्या मराठी निबंध पूर मराठी निबंध Mahapur nibandh marathi  mahapur essay in marathi  mahapurache thaiman marahti nibandh  pur marathi nibandh

महापूर मराठी निबंध


            पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर मोठ मोठी झाडे मुळासकट उपटून पाण्याबरोबर वाहून जातात. पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसते. गावातील कच्ची घरे या पाण्याने कोसळतात. शेतातील पिके पाण्यामुळे नष्ट होऊन जातात. कधी कधी तर पाणी इतके वाढते त्यामध्ये गाई-गुरे, आणि इतर जनावरेसुद्धा वाहून जातात. पुराच्या पाण्यात अडकलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी मोठ मोठ्या झाडांवर तसेच डोंगरावर चढून आपला जीव वाचवतात. पुरापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी ते सुरक्षित ठिकाणी आसरा घेतात.

                पूर आल्याने मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी होते. शेकडो माणसे आणि जनावरे या संकटात आपला जीव गमावतात. घरांची पडझड झाल्याने अनेक लोक बेघर होतात. लोकांना कधी कधी अन्न पाणी सुद्धा मिळणे मुश्कील होऊन जाते. महापुरामध्ये रस्ते खचतात, रेल्वे चे रूळ उखडले जातात. यामुळे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होते. यामुळे लोक जिथल्या तिथे अडकून पडतात. पुराचे पाणी ओसरल्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरते. सगळीकडे कचरा, चिखल आणि दुर्गंधी पसरते. यामुळे विविध प्रकारचे आजार आणि साठीचे रोग निर्माण होतात.

                भीषण पूरस्थितीमध्ये सरकार आवश्यक त्या ठिकाणी मदत पाठवते. सामाजिक संस्थासुद्धा मदतीसाठी धावून येतात. या संस्थांमधील स्वयंसेवक पुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्याच्या कामाला गुंततात. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना नावेतून आणि हेलिकॉप्टर च्या सहाय्याने खाण्या पिण्याच्या वस्तू पोहचवल्या जातात. सेवाभावी संस्था आपत्तीग्रस्त लोकांना कपडे आणि इतर सामानाचे वाटप करतात.

                या प्रकारच्या मदतीने आपत्ती ग्रस्त लोकांना काही प्रमाणावर मदत मिळते. विनाश, दुखः आणि निराशेच्या दिवसांत मानवतेचे दर्शन घडते. परंतु तरीही या पूर परिस्थिती निर्माण होण्यावर काहीतरी उपाय नक्कीच केला गेला पाहिजे.


 अजून निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

येथे क्लिक करा. 


हा निबंध लिहित असताना खालील मुद्द्यांचा अवश्य वापर करा.

[मुद्दे:

पूर येण्याचे कारण

पुरामुळे होणारे नुकसान

पुराचा परिणाम

आपत्ती ग्रस्तांना मदत

सेवाभावी संस्थांचे सहकार्य

या समस्येवर उपाय योजना करणे गरजेचे.]

 

महापूर निबंध मराठी
महापुराचे थैमान मराठी निबंध
महापूर एक समस्या मराठी निबंध
पूर मराठी निबंध
Mahapur nibandh marathi 
mahapur essay in marathi 
mahapurache thaiman marahti nibandh 
pur marathi nibandh 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.