BUY PROJECT PDF Click Here!

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प | Paryavarn prakalp 11vi 12vi Bhartatil aadivasi samuhanchi mahiti

आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Bhartatil aadivasi samuhanchi rajynihay yaadi prakalp
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि
 आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प  

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी प्रकल्प माहिती / आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प माहिती / प्रकल्प कार्यपद्धती माहिती / प्रकल्प विषय निवड प्रस्तावना  कशी लिहावी / प्रकल्प लेखन नमुना / प्रकल्प  कार्यपद्धती माहिती


प्रकल्प विषय :

               भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी तयार करा. प्रत्येक समूहाची खास वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरांचे वर्णन करा.


प्रकल्प प्रस्तावना


आदिवासी या शब्दाचा अर्थ अगदी सुरुवातीपासून ज्यांचे अस्तित्व आहे. पण आज बदलत्या काळाशी स्पर्धा करता करता आपले सारे सर्वस्व हरवून बसलेला समाज या नावाने आजचा समाज त्यांना ओळखतो. पूर्वीच्या काळी जेव्हा आर्यांचे हिंदुस्थानात आगमनही झाले नव्हते तेव्हापासून आदिवासी हे या देशात वास्तव्य करीत होते. हिंदुस्तानावर आर्यांनी केलेल्या आक्रमणामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आदिवासी लोकांचे समूह दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलामध्ये वास्तव्य करू लागले. त्यामुळेच भारतामध्ये असणाऱ्या आदिवासींना ‘भूमिजन’ किंवा ‘भूमिज’ या नावाने देखील त्यांना ओळखले जाते. ते कायम जंगलात अरण्यात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ‘अरण्यक’ असे देखील संबोधले जाते. आदिवासी जमातींना भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जमाती असे म्हटले आहे.


भारतामध्ये कोणकोणते आदिवासी समूह आहेत? त्यांची प्रत्येक राज्यात कोण कोणते आदिवासी समूह आहेत? त्यांची राज्यानुसार यादी आणि आदिवासी जमातींची वैशिष्ट्ये कोण कोणती आहेत. तसेच आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा कोण कोणत्या आहेत याबबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

 

भारतातील आदिवासी जमाती माहिती भारतातील एकूण आदिवासी जमाती प्रकल्प कार्यपद्धती माहिती प्रकल्प विषय निवड प्रस्तावना  कशी लिहावी प्रकल्प लेखन नमुना प्रकल्प  कार्यपद्धती माहिती भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी प्रकल्प माहिती आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Bhartatil aadivasi samuhanchi rajynihay yaadi prakalp mahiti Aadivasi samuhachya paryavarn jatan karnyachya parampara mahiti Paryavarn praklap 11vi 12vi Prakalp vishy nivad prastavana Prakalp karyapadhati paryavarn prakalp 11vi 12vi 11vi 12vi prakalp vishayanchi yadi

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा 



 अनुक्रमणिका 


अ.क्र.

घटक

१)

विषयाचे महत्व

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

४)

भारतातील आदिवासी जमाती

५)

भारतातील आदिवासींची राज्यनिहाय माहिती

६)

आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा


७)

निरीक्षण

८)

विश्लेषण

९)

निष्कर्ष

१०)

संदर्भ


 















प्रकल्प विषयाचे महत्व


भारताच्या विविध भागांत प्रत्येक गोष्टींमध्ये विविधता आढळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारता चा जगात सातवा क्रमांक लागतो. चीन नंतर दुसऱ्या स्थानावर येणारा भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १६ टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये आढळते. भारत हा लोकसंख्येची घनता जास्त असलेला देश आहे. या ठिकाणी विविध धर्म, जाती , पंथ, उपजाती, देव-देवता, भाषा आणि चालीरीती आहेत. या ठिकाणी आर्थिक तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता दिसून येते.


भारतामध्ये आदिवासी समाज हा नागरी संस्कृतीपासून वेगळा दूरवर, जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करतो. या ठिकाणी नागरी संस्कृतीपेक्षा वेगळ्या चालीरीती आपल्याला पाहायला मिळतात. पर्यावरण संरक्षण करण्यात आणि पर्यावरणाची जपणूक करण्यात आदिवासींचा खूप मोठा हातभार आहे. ते निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करीत असताना स्वतःबरोबर निसर्गाची देखील काळजी घेतात. ते निसर्गाला देव मानतात , निसर्गाची पूजा करतात म्हणून त्यांना निसर्गपूजक असेही म्हटले जाते.


भारतामध्ये कोणकोणत्या आदिवासींच्या जमाती आहेत. त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत . आणि राज्यानुसार त्यांची विभागणी कशाप्रकारे विभागणी झालेली आहे त्याबाबत अधिक माहिती आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रकल्प विषय महत्वाचा आहे.

 

 हे सुद्धा पहा :  हवा प्रदूषण प्रकल्प


प्रकल्पाची उद्दिष्टे


Ø    आदिवासी जमाती म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेणे.

Ø    भारतातील आदिवासी जमातींची माहिती घेणे.

Ø    राज्यनिहाय आदिवासी जमातींचे वर्गीकरण करून माहिती घेणे.

Ø    आदिवासी जमातींची वैशिष्ट्ये जाणून घेणे.

Ø    आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा जाणून घेणे.

Ø    भारतातील आदिवासी जमातींची माहिती इतरांना करून देणे.

 


प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती


‘भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा’ हा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली. प्रकल्पाच्या विषयानुसार पाण्याचा मोठ्या प्रमाणात भारतात कोण कोणत्या आदिवासी जमाती आहेत? त्यांची पप्रत्येक राज्यानुसार विभागणी कशा प्रकारे करण्यात आली आहे. आणि आदिवासी जमातींच्या पर्यावरणपूरक परंपरा . इत्यादी मुद्द्यांच्या आधारे या प्रकल्प विषयाची माहिती एकत्रित करण्यात आली.  


तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.


Bhartatil aadivasi samuhanchi rajynihay yaadi prakalp mahiti / Aadivasi samuhachya paryavarn jatan karnyachya parampara mahiti / Paryavarn praklap 11vi 12vi / Prakalp vishy nivad prastavana / Prakalp karyapadhati paryavarn prakalp 11vi 12vi / 11vi 12vi prakalp vishayanchi yadi


भारतातील आदिवासी जमाती


जीवन जगत असताना समोर येणाऱ्या परिस्थितीचा सामना करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मानव सातत्याने धडपडत असतो. अन्नाचे  उत्पादन कसे घेतले जाते याबाबत चे कोणतेच ज्ञान नसल्याने निसर्गाच्या सान्निध्यात जे काही अन्न मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समूहांची उदाहरणे आजही आल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे. नदीच्या किनाऱ्यावर उगवलेले रानटीभात गोळा करण्यासाठी ताम्रवर्णीय इंडियन हे मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यावरून नाव नेतात.बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या जमाती बोरासारखी फळे आवडीने खातात.

भारतामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमातींपैकी काही जमाती या अन्नाच्या शोधात सातत्याने भ्रमण करीत असतात. दक्षिण भारतामध्ये आढळणाऱ्या कुरुंबा ,. कादर पलीयन येनाडी मध्य प्रदेश मधील गोंड आणि बैगा तसेच बिहार मध्ये आढळणाऱ्या बिहोर तर ठाकर आणि भिल्ल या महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या जमाती असोत या घनदाट जंगलामध्ये फळे, मध, कंदमुळे यांसारखे अन्नपदार्थ गोळा करून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. परंतु अशा प्रकारे अन्न एकत्र करणे सोपे नसते. जंगलामध्ये कोणत्या भागात कंदमुळे मिळतील वा शिकार मिळेल हे निश्चित नसते. तरीही आपला जीव धोक्यात घालून अन्नासाठी भटकंती करत असतात. संकटांपासून वाचता यावे यासाठी ते समूहा समूहाने अन्न संकलन करतात.

 

हे सुद्धा पहा: आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प


भारतातील आदिवासींची राज्यनिहाय माहिती


आसाम:

आसाम राज्यात आढळणाऱ्या आदिवासी जमाती या निसर्गपूजक आहेत. या ठिकाणची शेती ही मागासलेली आहे आणि तिचा दर्जा खूपच निकृष्ट आहे. गारो आणि खांसी या टेकड्यांवर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी जमाती या स्थलांतरित शेती करण्यावर भर देतात आणि जंगलामधून मिळणाऱ्या लहान मोठ्या उत्पादनांवर आपला उदरनिर्वाह करत असतात. खांसी या हिमालयाच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या आदिवासिंसारख्या निलगिरी डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या ‘टोडा’ जमाती आहेत. या जमातींचे उदरनिर्वाह करण्याचे मुख्य साधन हे पशुपालन आहे.

 

आंध्रप्रदेश:

आंध्रप्रदेश मध्ये एकूण ३२ आदिवासींच्या जमाती आढळून येतात. यामध्ये बंजारा, गोंड, सवरा, चेंचू, येरकुला , बंजारा, कोया इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत. या सर्व जमातींची लोकसंख्या ही १५ लाखांच्या जवळपास आहे. चेंचू ही या ठिकाणची सर्वात प्राचीन जमत आहे. भटक्या जमातींमध्ये ‘येरकुला’ या आदिवासी जमातीचा समावेश होतो. जंगलामध्ये सापडणारे मध, टोपल्या, औषधी वनस्पती गोळा करणे आणि ते विकणे इत्यादी कामे या ठिकाणच्या जमाती करतात.

 

ओडीसा:

भारतातील सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारे ओडीसा ही दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. भारताच्या पूर्वेला ही राज्य स्थित असून या ठिकाणी अजूनही फारसा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. या राज्यातील आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत शेती करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जंगलतोड या ठिकाणी आदिवासींकडून केली जाते. या स्थलांतरित शेतीला ‘पोडू’ या नावाने ओळखले जाते. ओडीसा राज्यत देसिया कोंड ही एक मुख्य आदिवासी जमात आहे. या आदिवासी जमातीची लोकसंख्या सुमारे ८२ लाख इतकी आहे. खोंड, सवरा,गडवा, जटायू, परजा, बोवडा, भुंजीया, कोटा, बोंडा इत्यादी जमाती ओडीसा राज्यात आढळतात. शेती, विणकाम आणी शेतमजुरी इत्यादी कामे या जमातींतील लोक करतात.

 

केरळ:

केरळ राज्यात ५३१८ चौ.मैल इतका भूभाग हा जंगलाने व्यापला आहे. केरळ राज्यात सुमारे ३६ आदिवासी जमाती आढळतात. या ठिकाणी आढळणाऱ्या काही प्राचीन आदिवासी जमाती या अजूनही आदिमानव अवस्थेत आहेत. केरळच्या पश्चिमेकडे असणाऱ्या डोंगराळ भागात आदिवासी समूहाचे वास्तव्य आढळते. केरळ राज्या लगत असलेल्या तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील येथल्या आदिवासींनी स्थलांतर केले आहे. हायरायर, पनियाज, मुथूवन, इरुलर, करिच्छन इत्यादी आदिवासी जमाती या केरळ राज्यात आढळतात. येथील आदिवासी जमाती या देशाच्या इतर भागांत आढळणाऱ्या आदिवासी जमातींपेक्षा खूपच मागास आहेत. शेती हे या ठिकाणच्या आदिवासी जमातींचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन असून यापैकी काही जमाती या शिकार, मासेमारी, इत्यादी कामे करतात.



गुजरात:

आदिवासी लोकसंख्येमध्ये गुजरात हे चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. गुजरात राज्यात एकूण २८ आदिवासी जमाती आढळतात. त्यामध्ये कोकणा, वारली, धानका, भिल्ल, घोडिया, दुबळा आणि राठवा इत्यादी मुख्य जमाती आहेत. या ठिकाणी भिल्ल जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आढळते. राठवा ही आदिवासी जमात शेती आणि शेतमजुरी करतात. ते वर्षातून दोन वेळा पिक घेतात. याशिवाय गुजरात मध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती या शेती, शिकार पशुपालन आणि वन्य पदार्थ गोळा करणे इत्यादी गोष्टी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी करतात. या जमाती प्रामुख्याने नदीकिनारी तसेच पाणथळ जागी वास्तव्य करतात.

 

बिहार:

आदिवासींची संख्या बिहार राज्यामध्ये खूपच जास्त आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९ % इतकी लोकसंख्या फक्त आदिवासी जमातींची आहे. बिहारमध्ये आदिवासींच्या एकूण ३१ जमाती आढळतात त्यापैकी संथाळांची संख्या  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती हा आहे. अरण्याच्या अगदी आतील भागामध्ये संथाळ या जमातीचे वास्तव्य आढळते. हो, खारीया, आणि मुंडा या जमाती सुद्धा या ठिकाणी आढळतात.

 

कर्नाटक:

आदिवासींच्या एकूण ४४ जमाती या कर्नाटक राज्यात आढळतात. त्यामधील काही जमाती तर अगदी कमी लोकसंख्येच्या आहेत. या ठिकाणी ‘मारगी’ ही भटकी जामात आढळते. ‘नायकडा’ ही काही प्रमाणत विकसित अशी जमात आहे. शेती आणि शेतमजुरी हा या ठिकाणाचा प्रमुख व्यवसाय आहे. ‘कुमरी’ या पद्धतीची शेती येतील आदिवासी जमाती करतात.

 

मणिपूर:

मणिपूर राज्यामध्ये जवळपास ७.५ लाख इतकी आदिवासींची लोकसंख्या आढळते. त्यामधील ‘थडाओ’या आदिवासी जमातीची लोकसंख्या सर्वात जात आहे. मणिपूर मधील आदिवासी जमाती या सपाट भूभागावर  जेथे भात, फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन घेणे शक्य आहेत त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याचप्रमाणे डोंगर उतारावर पायऱ्या पाडून त्यामध्ये शेती करतात. या ठिकाणी वर्षातून दोन वेळा भाताचे पिक घेतले जाते. मणिपूरच्या खोऱ्यात राहणाऱ्या काही आदिवासी जमाती या काही प्रमाणात सुधारलेल्या आहेत.

 

मध्यप्रदेश:

मध्यप्रदेश राज्यामध्ये गोंड आदिवासी जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. त्यापेक्षा कमी भिल्ल जमातीची लोकसंख्या आढळते. मध्यप्रदेश राज्यात आदिवासींच्या एकूण ५९ जमाती आहेत. येथील आदिवासी जमाती या भाज्या, फळे, इत्यादींचे उत्पादन तसेच बांबूपासून चटया बनवणे, टोपल्या बनविणे, मच्छिमारी आणि मजुरी करणे इत्यादी साधनांचा वापर येतील जमाती उदरनिर्वाह करण्यासाठी करतात. मध्यप्रदेश मधील आदिवासी जमाती या स्थलांतरित शेती करतात. सुपीक मैदानी भागात वर्षातून तीन वेळा उत्पादन घेतले जाते.

 

हिमाचल प्रदेश:

हिमाचल प्रदेश मधील एकूण लोकसंख्येतील सुमारे ३ लाख इतकी लोकसंख्या ही आदिवासी लोकसंख्या आहे. गुज्जर, लाहोल, बोध, जाडलंबा, किन्नोर, इत्यादी अधिवासी जमाती या राज्यात प्रामुख्याने आढळतात. या आदिवासी जमातींपैकी ‘लाहोल’ आणि ‘पांगा’ या जमातीं दऱ्याखोऱ्यात राहतात. हिमाचल प्रदेश मध्ये यांना घाटी असे म्हणतात. गुज्जर ही भटकी आदिवासी जमत आहे. ते पशुपालन करतात. या भागातील आदिवासी उदरनिर्वाहास शेतीवर अवलंबून आहेत.

 

राजस्थान:

आदिवासी लोकसंख्येत राज्यस्थान राज्याच्या भारतात सहावा  क्रमांक येतो. या ठिकाणी आदिवासींच्या एकूण सहा जमाती आढळतात. त्याचबरोबर भिल्ल, गरासिया, डामोर आणि काथकरी इत्यादी जमाती आहेत. या भागातील साक्षरतेचे प्रमाण हे केवळ १२% इतके आहे.

 

महाराष्ट्र:

आदिवासी जमाती या इतरांपासून दूर डोंगरदऱ्यात वास्तव्य करतात. महाराष्ट्रात भिल्ल, महोदव, कोळी, ठाकर, कोकणा, वारली, कोरकू, गावित, आंध, कोलान, हुबळ, धोडीया, माडिया इत्यादी आदिवासी जमाती आढळतात. आदिवासी लोकसंख्येत महाराष्ट्र हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे राज्य आहे. बांबूपासून वस्तू तयार करणे, डिंक, मध गोळा करणे, शेती करणे इत्यादी कामे येथील आदिवासी लोक करतात.


 भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी प्रकल्प माहिती / आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प माहिती / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी
Bhartatil aadivasi samuhanchi rajynihay yaadi prakalp mahiti / Aadivasi samuhachya paryavarn jatan karnyachya parampara mahiti / Paryavarn praklap 11vi 12vi

आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा

 

 

निसर्गाला आपली आई समान मानणारे आणि पाणी , वनसंपदा  आणि जमिनीला परमेश्वराचा  दर्जा देणाऱ्या आदिवासींनी कित्येक शतकांपासून कोणत्याही स्वार्थाशिवाय निसर्गाचे रक्षण केले आहे. आदिवासींच्या जीवनात निसर्गाला अनन्यसाधारण  महत्त्व दिले गेले आहे.

 

Ø आदिम काळापासून आदिवासी समुदाय हा जंगलामध्ये वास्तव्य करीत आहे. निसर्ग संरक्षणाची प्रबळ इच्छा असलेला आदिवासी समाज हा निसर्गातून आवश्यक तेवढे घेतो , जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास होऊ नये आणि पुढच्या पिढ्यांनाही साधनसंपत्ती उपलब्ध राहील.

 

Ø आदिवासी समाजामध्ये अगदी  लग्न असो वा कोणता ही सण असो प्रत्येक कार्य हे , झाडांना साक्षीदार मानून पूर्ण केले जाते. आदिवासींच्या विवाह सोहळ्यामध्ये  सेमल पाने असणे हा एक विशेष विधी मानला जातो.

 

Ø आदिवासी जंगलातून वनौषधी गोळा करतात, फळे आणि फुले, भाज्या गोळा करतात, लाकूड कापतात, शहरांमध्ये विकून त्यांचा  उदरनिर्वाह करतात. त्या बदल्यात ते मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड  करतात, विशेषत: पावसाळ्यानंतर, ते मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची झाडे वाढवतात. एकदा लावलेले झाड मोठे होईपर्यत ते त्या झाडाची काळजी घेतात.

 

Ø अगदी पूर्वीपासून आदिवासी जमाती या जंगल संवर्धन, वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांचे संवर्धन करीत आल्या आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या या कौशल्यामुळे त्यांनी आजपर्यंत पर्वत, दऱ्या आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलित ठेवले आहे.

 

Ø केवळ आदिवासींनाच समजते की नैसर्गिक जंगले उगवता येत नाहीत, ती स्वतः निर्माण केली जातात. आदिवासींनी त्यांच्या समाजव्यवस्थेअंतर्गत स्वतःवर काही निर्बंध लादले आहेत, या बंधनामध्ये  ते आंबा, करंज, जांभूळ इत्यादी झाडे कापत नाहीत.

 

Ø जळाऊ लाकडासाठी ते नेहमी सुकलेली झाडे कापतात, त्यामुळे जिथे आदिवासी आहेत, तिथे जंगले शिल्लक आहेत आणि जिथे ते नाहीत, त्या जंगलाच्या खुणा मिटल्या आहेत.

 

Ø आदिवासींमुळे, पाणी, जंगल आणि जमिनीच्या संवर्धनामुळे पर्यावरण शुद्ध राहिले आहे. त्यांनी केलेल्या पाणी, जंगले आणि जमिनीच्या संरक्षणामुळे आज वातावरण शुद्ध आहे. त्यामुळे नियमित पाऊस, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि  सुपीक जमीन यांसारखी संसाधने उपलब्ध आहेत.

 

हे सुद्धा पहा : पाण्याचे स्थानिक स्त्रोत , प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प

प्रकल्प निरीक्षणे

राज्यानुसार आदिवासी जमातींची विभागणी

 

 

राज्य

आदिवासी जमाती

१.

महाराष्ट्र

भिल्ल, महोदव, कोळी, ठाकर, कोकणा, वारली, कोरकू, गावित, आंध, कोलान, हुबळ, धोडीया, माडिया

२.

तामिळनाडू

तोडा, कोट, बदगा

३.

नागालँड

नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

४.

पश्चिम बंगाल

संथाल, ओरान

५.

आसाम

गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

६.

गुजरात

भिल्ल

७.

केरळ

मोपला, उरली

८.

सिक्कीम

लेपचा

९.

झारखंड

गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

१०.

मेघालय

गारो, खासी, जैतिया

११.

आंध्र प्रदेश

कोळम, चेंचू, बंजारा, गोंड, सवरा, चेंचू, येरकुला , बंजारा, कोया

१२.

त्रिपुरा

चकमा, लुसाई

१३.

छत्तीसगड

कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

१४.

उत्तरांचल

भुतिया

१५.

मणिपूर

थडाओ

१६.

राज्यस्थान

भिल्ल, गरासिया, डामोर आणि काथकरी

१७.

कर्नाटक

नायकडा, मारगी

१८.

बिहार

हो, खारीया, संथाळ, मुंडा

१९.

हिमाचल प्रदेश

गुज्जर, लाहोल, बोध, जाडलंबा, किन्नोर

२०.

गुजरात

कोकणा, वारली, धानका, भिल्ल, घोडिया, दुबळा , राठवा


प्रकल्प विश्लेषण



·       भारतातील अनुसूचित जमातीची राज्यनिहाय लोकसंख्या (जनगणना २००१) (आकडे हजारात)

 

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा (tilt) करा.)

अ.क्र.

राज्य व केंद्र शासित प्रदेश

एकूण लोकसंख्या

आदिवासी लोकसंख्या

आंध्रप्रदेश

762.10

50.24

अरुणाचलप्रदेश

10.98

7.05

आसाम

266.55

33.09

बिहार

829.98

7.08

छत्तीसगड

208.34

66.17

दिल्ली

138.51

-

गोवा

13.48

0.01

गुजरात

506.71

74.81

हरियाणा

211.44

-

१०

हिमाचल प्रदेश

60.78

2.45

११

जम्मू व काश्मीर

101.43

11.06

१२

झारखंड

269.46

70.87

१३

कर्नाटक

528.51

34.64

१४

केरळ

318.41

3.64

१५.

मध्यप्रदेश

603.48

122.34

१६

महाराष्ट्र

968.79

85.77

१७

मणिपूर

21.67

7.41

१८

मेघालय

23.19

19.93

१९

मिझोरम

8.89

8.39

२०

नागालँड

19.90

17.74

२१

ओरिसा

368.05

87.45

२२

पंजाब

249.59

-

२३

राज्यस्थान

565.07

70.98

२४

सिक्कीम

5.41

1.11

२५

तामिळनाडू

624.06

6.51

२६

त्रिपुरा

31.99

9.93

२७

उत्तरप्रदेश

1661.98

1.08

२८

उत्तरांचल प्रदेश

84.89

2.56

२९

प. बंगाल

801.76

44.07

३०

केंद्रशासित प्रदेश

 

 

३१

अंदमान निकोबार

3.56

0.30

३२

चंदीगड

9.01

-

३३

दादरा, नगर व हवेली

2.20

1.37

३४

दिव व दमन

1.58

0.14

३५

लक्षद्वीप

0.61

0.57

३६

पौंडीचेरी

9.74

-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 































निष्कर्ष


ü    आदिवासी जमाती म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेतली.

ü    भारतातील आदिवासी जमातींची माहिती मिळवून संकलित केली.

ü    राज्यनिहाय आदिवासी जमातींचे वर्गीकरण कसे आहे त्याची माहिती   

घेतली.

ü    आदिवासी जमातींची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याबाबत माहिती मिळाली.

ü    आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा कोणत्या आहेत ते

 जाणून घेतली.

 

 

संदर्भ



§     www.educationalmarathi.com

§     www.mazaabhyas.com

§     पर्यावरण पुस्तिका ( पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा)

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

4 comments

  1. 👍👍👍nice content thx
    1. You’re welcome.
  2. तुम्हाला धन्यवाद कस सांगु कळत नाही पण तुमचं खुप खुप आभार.
    धन्यवाद! 🙏🙏
    1. You’re welcome
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.