मोबाईल धोकादायक आहे काय?
“अति तेथे माती”
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, तिचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. संदेशवहन सहज आणि त्वरित व्हावे यासाठी मोबाइल चा शोध लागला. परंतु अलीकडे काही घटना अशा घडतात की त्यामुळे सारा देश हादरून जातो. एका वृत्तवाहिनीवर पाहिलेली भीषण घटना. सहलीसाठी गेलेल्या मुलांपैकी ४ जण सेल्फी काढताना तोल जावून धरणात पडून मृत्युमुखी पडले.
मोबाईल धोकादायक आहे काय मराठी निबंध
मोबाईल च्या आहारी गेल्याने अतिभयंकर परिणाम होतात, यात काही शंकाच
नाही. परंतु अशा घटना आत्ता वारंवार कानावर येऊ लागल्या आहेत. आजची पिढी मोबाईल
च्या किती आहारी गेली आहे हे पाहायचे असेल, तर कॉलेज मध्ये जाणाऱ्या तरुण पिढीला
बघा. पहाव तेव्हा मोबाईल कानालाच तासनतास मोबाईल वर बोलत असतात. सतत कोणाला ना
कोणाला संदेश पाठवत असतात. नाहीतर एखादा गेम खेळताना दिसतात. आज सतत मोबाईलमध्ये
गुंतून राहिल्याने माणसामाणसांतील संवादाच कुठेतरी हरवत चालेलला दिसून येतो.
जिवाभावाच्या नात्यांपासून प्रत्येकजण दूर चालला आहे. काही वेळेला असे चित्र
पाहायला मिळते की घरातल्या माणसांशीच बोलायला वेळ मिळत नाही. आपल्याच माणसांपासून
आपण दूर जात आहोत.
मोबाईल ने माणसाच्या मनाची स्थिरता हिरावून घेतली आहे. मोबाईल च्या
अतिवापरामुळे माणसाचे मन अधीर बनले आहे. आज आजूबाजूचे चित्र पहिले तर कोणाला
शांतपणे विचार करण्याची तयारीच नसते. कोणत्याही परिस्थितीचा विचार करण्यासाठी शांतवृत्तीची
गरज असते. परंतु आज ही शांतात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे. मोबाईल च्या वापराचे
हे परिणाम पाहता काही शाळांनी आपल्याल आवारात मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.
एक गोष्ट मात्र खरी आहे; ती म्हणजे मोबाईल चे उपयोग थक्क करून टाकणारे
आहेत. याच मोबाईलमुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी आपण घरात
बसून बोलू शकतो. आपल्या कागदपत्रांची, निरोपांची किंवा फोटोंची काही क्षणात देवाणघेवाण
करू शकतो. आपल्या विचारांची देवाण-घेवाण, चर्चा किंवा कोणा एखाद्या व्यक्तीचा
सल्ला घेणे इत्यादी कामे सहजगत्या करता येतात. काही क्षणात जगातील कोणतीही माहिती
आपल्याला मोबाईलवर मिळते. कार्यालयातील कामे, बँकेतील कामे, लाईट बिले भरणे, घरबसल्या
वस्तूंची खरेदी करणे यांसारखी अनेक कामे सहज करता येतात. अभ्यासातील कोणता भाग समाजाला
नसेल तर त्या न समजलेल्या भागाबाबत सोप्या भाषेतील माहिती त्वरेने उपलब्ध होते. आपल्याला
कोणत्या तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन हवे असल्यास तेदेखील सहजतेने मिळवता येते. चित्रपट,
संगीत, टीव्हीवरील कार्यक्रम आणि बातम्या इत्यादींचा आनंद कधीही आणि कुठेही घेता
येतो. क्षणाक्षणाला घडणाऱ्या घडामोडी या आपल्याला त्वरेने समजतात.
मोबाईल चे इतके चांगले उपयोग असताना आज समाजात अश्या वाईट घटना का घडत
आहेत? सर्वच मनसे वाईट नसतात; परंतु काही थोड्या प्रमाणावर माणसे वाईट असतात. मी
सुद्धा मोबाईल चा वापर खूप करतो. माझ्या आईबाबांना देखील भीती वाटते. जेव्हा ते टीव्ही वरच्या बातम्यांमधून अशी एखादी बातमी
त्यांनी पहिली की ते मला त्यांची भीती बोलूनही दाखवतात. पण मला माझ्या आईबाबांनी
मोबाईल ची नीट माहिती करून दिली आहे आणि मी देखील माझ्या सुरक्षिततेची काळजी
वेळोवेळी घेत असतो. मोबाईल चे फायदे आणि तोटे याबाबत चांगली माहिती झाल्याने मी
योग्य त्या ठिकाणीच मी त्याचा वापर करतो. अभ्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या तर
त्यावर लगेच उत्तरही सापडते. चांगल्या गोष्टींमध्ये जास्त वेळ जात असल्याने मोबाईल
मधल्या वाईट उपयोगांकडे माझे लक्षच जात नाही.
प्रत्येक नवीन शोधाचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. प्रत्येक
नवीन शोधामुळे नवनवीन संकटे आपल्यासमोर उभी राहतात. विमान कोसळून अपघात होतात
म्हणून कोणी विमानात बसण्याचे टाळत नाही. विजेचे शॉर्ट सर्किट होऊन मोठ मोठ्या कंपन्यांची
तसेच इमारतींची राख होते पण त्यामुळे आपण विजेचा वापर करणे टाळत नाही. मग मोबाईल
वर बंदी घालायला हवी का?
या सर्व परिस्थितीवर एकच उपाय आहे. तो म्हणजे योग्य काय अयोग्य काय, चांगले
काय – वाईट काय याबाबतचे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर घरात, शाळेत मोठ्या
माणसांनी केले पाहिजेत. चित्रपटासारख्या माध्यमातून हे संस्कार केले तर अधिक
प्रभावी ठरतील. थोडक्यात सांगायचे झाले तर ही जबाबदारी समाजानेच उचलली पाहिजे.
मोबाईल वापरण्यावर बंदी घालणे, मोबाईल वापरू न देणे यांसारख्या उपायांनी काहीही
चांगले घडणार नाही.
निबंध लिहित असताना खलील मुद्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
मोबाईल च्या दुष्परिणामांची उदाहरणे
मुलांकडून होणारा मोबाईल चा दुरुपयोग
वागणुकीवर परिणाम
मोबाईल चे उपयोग
मुले मोबाईल चा उपयोग कसा करतात.
मोबाईल मोकळेपानाने वापरू देणे व समजावून सांगणे
नवीन शोधांमुळे नवी संकटे
म्हणून बंदी अयोग्य
मुलांवर योग्य संस्कार हा योग्य मार्ग
शेवट.]