माणसातला देवमाणूस मराठी निबंध | Mansatala devmanus marathi niabandh.

माणसातला देवमाणूस मराठी निबंध / माणसातला देवमाणूस / Mansatala devmanus Marathi nibandh / Marathi nibandh
Admin

माणसातला देवमाणूस मराठी निबंध 

 

माणसातला देवमाणूस मराठी निबंध / माणसातला देवमाणूस / Mansatala devmanus Marathi nibandh / Marathi nibandh

                   

                    आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशाला संस्कार जपणारा देश म्हणून ओळखले जाते. पण आज भारतीय समाज हेच संस्कार कुठेतरी विसरताना दिसतोय. याची खंत वाटते. आजकाल कोणाचा अपघात झाला किंवा कोणती वाईट घटना डोळ्यांसमोर घडत असेल तर माणसे फक्त बघ्याची भूमिका निभावतात. समाजात जर अशी एखादी घटना  डोळ्यांसमोर घडत असेल तर लोक फोटो काढणे, चित्रफिती बनवणे इतकेच जमलेल्या गर्तीडील लोक करत असतात.  अशा प्रकारचे दृश्य कुठे पहिले तर की मन विदीर्ण होऊन जाते.

माणसातला देवमाणूस मराठी निबंध माणसातला देवमाणूस Mansatala devmanus Marathi nibandh Marathi nibandh

माणसातला देवमाणूस मराठी निबंध



                    परंतु आज समाजामध्ये असेही माणसे आहेत. जी कोणी संकटात असेल, कोणी मदतीसाठी हाका मारत असेल तर त्या वेळेला बघ्याची भूमिका न निभावतात, आपल्याल जीवाची परवा न करता संकटात अडकलेल्यांना जो मदत करतो तोच खरा देवमाणूस होय. संकटात अडकलेल्या व्यक्तींना प्राण्यांना वाचवणारा प्रत्येक माणूस हा देवमाणूस असतो.


                      आज माणुसकी हरवून बसलेल्या या जगात आपल्याला अनेक वेळा माणसातल्या देवमाणसाचे दर्शन होते. सध्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोन महामारीमुळे सारे जनजीवन ठप्प झाले. कोरोन विषाणूमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले . प्रत्येकजण घाबरून घरात बसू लागला. पण त्याच वेळी डॉक्टर आपल्या घरापासून, कुटुंबापासून अलिप्त राहून दिवसरात्र कोरोन संक्रमित रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. जणू डॉक्टरांच्या रूपाने देवच माणसांना या कोरोन महामारीतून वाचवायला आला आहे. पोलीस दलातील प्रत्येक पोलीस हा या महामारीत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देशसेवेसाठी झटत होता. यामध्ये अनेक डॉक्टर आणि पोलिसांनी आपले प्राणदेखील गमावले. या अशा संकटकाळातील परिस्थितीमध्ये मदत करणारा प्रत्येक माणूस हा देवमाणूसच म्हणावा लागेल.


                    प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठे नं कुठेतरी देवमाणूस दडलेला असतो आणि तो संकटांच्या वेली, आपत्तीच्या वेली सार्या जगासमोर येतो. गेल्या काही दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील रत्नागिरी,चिपळूण, खेड, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी पुराचे थैमान पाहायला मिळाले या काळात निसर्गाचे रौद्ररूप काही कालावधीतचसाऱ्या जगाने पहिले.


                    पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या माणसांना वाचवण्यासाठी बचाव पथके, तसेच स्थानिक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून मदतकार्य सुरु केले. काहींनी माणसांचा जीव वाचवला तर काहींनी पुराच्या पाण्यातून वाहत जाणाऱ्या मुक्या प्राण्यांना जणू नवे जीवन दिले. या परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढे सरसावलेला प्रत्येक माणूस हा देवमाणूसच आहे.


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


माणसातला देवमाणूस मराठी निबंध
माणसातला देवमाणूस
Mansatala devmanus Marathi nibandh
Marathi nibandh

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.