आपत्ती व्यवस्थापन
मित्रांनो आज आपण आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचा उपयोग शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांना प्रकल्प करताना किंवा दैनंदिन जीवनात आपत्तीचा सामना करताना होऊ शकतो. ही माहिती प्रकल्पाच्या स्वरूपात आपल्यासमोर दिली आहे.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
प्रकल्प free pdf लिंक खाली देण्यात आली आहे.
Aapatti vyavsthapan | आपत्ती व्यवस्थापन |
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
प्रस्तावना
२१ व्या शतकामध्ये विज्ञान - तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच अनेक प्रकारच्या आपतींमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आपत्ती काळामध्ये बचावकार्य करण्यासाठी योग्य तो निर्णय जलद गतीने घेणे आवश्यक असते. आपत्तीकाळातून बाहेर पडण्यासाठी योग्य त्या उपायोजना करणे गरजेचं असते. आपल्यावर येणाऱ्या आपत्ती या काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या देशामध्ये सातत्याने नवनवीन आपतींमध्ये वाढ होत असल्याचे आपण पाहताच आहोत. देशामध्ये पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या आपतींविषयी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात भारताने ज्या ज्या आपत्तीचा सामना केला. त्यांच्या मागे असणाऱ्या विविध कारणांचा आणि त्या आपतींवर असणाऱ्या उपायांचा खोलवर जाऊन अभयस करणे आज काळाची गरज बनत चालले आहे.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
अनुक्रमणिका
अ.क्र. घटक
1.1 प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
1.2 विषयाची निवड
1.3 आपत्ती व्यवस्थापन :
काळाची गरज
1.4 आपत्ती संकल्पना
1.5 आपत्ती व्यवस्थापन संकल्पना
1.6 आपत्ती व्यवस्थापन
कायदा 2005
1.7 आपत्ती कशामुळे येतात ?
1.8 उपायोजना
1.9 प्रथमोपचार
1.10 संदर्भ
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.1 प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
- आपत्ती संकल्पना समजून घेणे.
- आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय व कसे करावे हे जाणून घेणे.
- आपत्तीच्या काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेणे.
- आपत्तीच्या काळात करायचे प्रथमोपचार याबाबत अधिक माहिती घेणे.
- आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहीती लोकांना करून देणे.
1.2 विषयाची निवड
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ? त्याची संकल्पना काय आहे हे जाणून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे. आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे. या युगात आपल्या समोर अनेक संकटे ठाण मांडून बसलेली आहे. मग ती नैसर्गिक असो व मानवनिर्मित अशा संकटांचा सामना करणे गरजेचे आहेत. आपत्ती काळातून बचाव करण्यासाठी येणारी आपत्तींचा सक्षम पणे सामना करण्यासाठी आपण सज्ज राहायला हवे. आपत्ती व्यवस्थापन हा त्याचाच एक भाग आहे. आपत्ती येण्यापूर्वी काय करावे अथवा आपत्तीनंतर काय करावे याचे व्यवस्थापन असले पाहिजे. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. ‘आपत्ती व्यवस्थापन’ या बाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी मी या विषयाची निवड केली आहे.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.3 आपत्ती व्यवस्थापन : काळाची गरज/ महत्व
नैसर्गिक आपत्ती रोखणे कोणाच्याही हातात नसते; परंतु अशा आपतींनंतर योग्य खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी मात्र टाळता येऊ शकते. त्यासाठी आवश्यकता असते ती सावधगिरीची, सामंजस्याची एकोप्याची मानव किती हतबल आहे हे या काळात जाणवते. तथापि अशा घडून आलेल्या आपतींनंतर एकजुटीने व धैर्याने त्याला सामोरे जाऊन त्याच्याशी सामना करणे व त्यातून लवकर सावरणे यातच खरे कौशल्य आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे कार्य या काळामध्ये 'व्यवस्थापनाच्या माध्यमातून विशेष कार्य केले गेले तर अधिक परिणामकारक ठरते.' २६ जानेवारी २००१ या दिवशी गुजरात राज्याला भूकंपाचा तडाखा बसला.. आजूबाजूचा प्रदेश हि हादरला मात्र गुजरातला बसलेला भूकंपाचा तडाखा अभूतपूर्व होता. या भूकंपात जाजारो माणसांचे बळी गेले, बेघर झाले, तर जनावरांचे काय झाले हे समजलेच नाही. कारण त्यांच्याकडे लक्ष द्यावयास कोणाला वेळच मिळालेला नव्हता. केवळ एका मिनिटामध्ये हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या त्याखाली हजेवो माणसे गाडली गेली. एवढी दाहकता या आपत्तीमध्ये होती. आपत्ती व्यवस्थापनाच्या prepredness , Responce व Reconstruction म्हणजे, प्रतिसाद व जनजीवन पूर्वपदावर आणणे हे तीन टप्पे महत्वाचे असतात. त्यासाठी संवाद व समन्वय हे पैलू महत्वाचे ठरतात.
जपानमध्ये वारंवार भूकंप होतात ; परंतु तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत नाही . याचे कारण म्हणजे तेथील इमारती भूकंपाचा विचार करून विशिष्ट प्रकारच्या बांधलेल्या आहेत ; तसेच याकाळामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात धडे सर्वाना शाळेत दिले जातात. भारतातही हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे . यावरून आपत्ती व्यवस्थापनाला जपानसारख्या देशात विशेष महत्त्व दिले जाते , असे लक्षात येते. आपत्ती घडून येण्यापूर्वी सतर्कतेची यंत्रणा, आणि आपत्ती काळात याची माहिती सुसूत्रीतपणे व्यवस्थापनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येते, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.4 आपत्ती संकल्पना
आपत्ती म्हणजे काय?
आपत्ती व्याख्या ( Disaster Meaning ) :
अचानक उदभवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.
सजीव सृष्टीवर अचानक ओढवलेले संकट किंवा अरिष्ट, अपघात किंवा दुःखद घटना ( महापूर, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, आग, वादळ - वारा, बॉम्ब स्फोट, युध्द , विज कोसळणे , रोगराई , अवर्षण, जलप्रलय, वायु गळती इत्यादी ) म्हणजेच आपत्ती होय . आपत्ती ही पर्यावरणीय विनाशकारी घटना आहे. आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी होत असते. मानवी जीवनाची जीवनपध्दती बदलविणारी आपत्ती नैसर्गिक स्वरुपाची किंवा मानवी स्वरुपाची असू शकते. आपत्तींनमुळे मानवाला मोठया प्रमाणात हानी सहन करावी लागते. त्यामुळे आपत्तीकारक घटना थांबविणे किंवा त्या आपत्तीचे नियंत्रण, व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
आपत्ती: महापूर |
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.5 आपत्ती व्यवस्थापन संकल्पना
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?
लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे फार आहे आपत्ती, आपतींना तोंड तयार असणे त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपतींमध्ये टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनची जास्त गरज असते.
आपत्तींनमुळे मानवाला मोठया प्रमाणात हानी सहन करावी लागते. त्यामुळे आपत्तीकारक घटना थांबविणे किंवा त्या आपत्तीचे नियंत्रण, व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आपत्ती व्यवस्थापनामध्येच मानवी हित दडलेले असते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होऊ शकत नाही. व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयी सूचना, माहिती मिळाली तर जीवितहानी कमी होऊ शकते. आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे , म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीचा सामना करण्याची क्षमता प्राप्त करणे, त्या क्षमतेत वाढ करणे , त्यासाठी प्रतिबंधात्मक योजना आखणे , आपत्ती निवारण तसेच आपतकालीन व्यक्तीचे पुनर्वसन, पुनर्निर्माण इत्यादी घटकांचा विचार करुन कृती आराखडा करणे, योग्य सूत्रसंचालन करुन कमीत कमी वेळात मानसिक स्थैर्यता मिळवणे अपेक्षित असते.
- १९९३ मध्ये लातुर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंपामुळे लोकांचा मृत्यू झाला होता.
- जुलै २००५ आठवला, की आजही मुंबईकरांच्याअंगावर काटा राहतो. कारण त्या वेळी मुसळधार पावसाने पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले.
- जुलै २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यांदेखत उध्वस्त झाले, तेथील डोंगरकडा कोसळल्याने याच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली.
- नोव्हेंबर २०१५ मध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले.
- डिसेंबर २०१९ पासून जगभर सुरु झालेली कोरोना महामारीमध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.
आपत्ती : भूकंप |
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.6 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005
1.7 आपत्ती कशामुळे येतात ?
आपत्ती ची कारणे :
- अतिवृष्टीमुळे येणारा महापूर.
- भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी.
- जंगलांना जंगलांना लागणारी अचानक आग.
- वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता.
- बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे.
- पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल.
- दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.8 उपायोजना
आपल्यासमोर मानवनिर्मित अथवा निरागनिर्मित आपत्तीची उद्भवण्यापूर्वी आणि उध्दभवल्यानांत आपण काय दक्षता घ्यायला हवी ते पाहूया.
- रेडिओ, टीव्ही वर दिल्या जाणारी बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा.
- बॅटरीवर चालणारे रेडिओ व मोबाइल यांचा उपयोग करा.
- हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे डोंगरउतारावर दरडी कोसळतात, अशा
- पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उंचावर थांबा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका.
- भूकंपामध्ये रस्ते खचतात, जमिनीला भेगा पडतात , अशा वेळी मार्गक्रमण करताना पुढील मार्ग सुरक्षित आहे कि नाही ते पाहून मार्गक्रमण करा.
- मदतकेंद्रे किंवा छावणीच्या ठिकाणी थांबा जेणेकरून, औषधे, अन्न, पाणी आणि प्रथमोपचार इत्यादी मदत लवकरात लवकर मिळू शकेल.
1.9 प्रथमोपचार
रोजच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही आपत्ती लहान असतात तर काही आपत्ती मोठ्या असतात. अचानक निर्माण होणाऱ्या आपत्तींनवर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्वरित उपाययोजना, उपचार करणे गरजेचे असते.
- रक्तस्त्राव :
बाह्य रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीस सोयिस्कररीत्या, त्याला आराम वाटेल अशा स्थितीमध्ये बसवा किंवा झोपावा ज्या अवयवातून रक्तस्त्राव होत आहे; तो शरीराचा भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठरवा आणि जखम पाण्याने स्वच्छ करा.
2.भाजणे व पोळणे.
किरकोळ भाजल्यास:
- जखम झालेला भाग पाण्याने धुवून घ्या किंवा पाण्यात बुडवून ठेवा.
- रुग्णाला प्यायला पाणी द्या.
- निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कापड भिजवून जखम हळुवारपणे पुसा.
- तेलकट असणारे मला जखमेवर लावू नका.
- झालेली जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवा.
गंभीर भाजल्यास:
- रुग्णाला मानसिक आधार द्या.
- स्वच,निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकून घ्या.
- रुग्णाचे , दागिने बूट, आणि इतर वस्तू काढून ठेवा.
- तेलकट असणारे मलम जखमेवर लावू नका.
- रुग्णाच्या शरीराला कपडे चिकटले असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करू नका.
- रुग्ण शुद्धीत आल्यास / असल्यास पाणी पिण्यास द्या.
- चहा, कॉफी यांसारखी पेय देऊ नका.
- लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.
3.सर्पदंश:
पृथ्वीवर सापाच्या अनेक जाती आढळतात. काही जाती विषारी तर काही बिनविषारी आहेत. परंतु काही वेळा भीतीमुळे रुग्णाला मानसिक धक्का बसतो आणि त्याची योग्य काळजी न घेतल्यास मनुष्यावर मृत्यू ओढवतो.असे झाल्यास
- जखम झालेला भाग पाण्याने धुऊन घ्या.
- रुग्णाला मानसिक आधार द्या.
- जून ठिकाणी दंश झालेलं आहे त्याच्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधा.
- शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची मदत घ्या.
4.उष्माघात:
उष्माघात हा तीव्र उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने तसेच शरीरातील पाणी आणि क्षार यांचे प्रमाण कमी झाल्याने होतो. असे झाल्यास
- रुग्णाला सावलीत किंवा थंड ठिकाणी घेऊन जा.
- शरीर थंड पाण्याने पुसून घ्या.
- रुग्णाच्या मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा.
- भरपूर पाणी आणि सरबतासारखी पेय रुग्णास प्यायला द्या.
- तातडीने दवाखान्यात घेऊन जा.
5.कुत्रा चावणे:
कुत्रा चावल्याने माणसाच्या शरीरातील रक्तात विष मिसळून ते दूषित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रथमोपचाराची आणि वैद्यकीय मदतीची गरज असते.असे झाल्यास
- रुग्णाची जखम निर्जंतुक द्रावणाने किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने स्वच धुवा.
- जखमेवर स्वच कोरडे कापड ठेऊन जखम झाकून ठेवा.
- डॉक्टरांकडून त्वरित उपचार घ्या, अँटीरेबीज इंजेकशन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
1.10 संदर्भ
विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा
VIEWPDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.
PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा
DOWNLOADनवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.