औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan

औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ?औपचारिक पत्रे केव्हा लिहावी लागतात ? औपचारिक पत्रलेखन कसे करावे? / पत्रलेखन नम
Admin

 

औपचारिक पत्रलेखन

औपचारिक पत्रलेखन कसे करावे?  / पत्रलेखन नमुना मराठी /  औपचारिक पत्रलेखन करताना पत्रातील समाविष्ट मुद्दे / औपचारिक पत्रलेखन लिहिण्याच्या पायऱ्या 

औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan

औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan 

➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


📌औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ?

          कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते . काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.


 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


📌औपचारिक पत्रलेखन कसे करावे ?

                पत्राच्या सुरुपातीला उजव्या कोपऱ्यामध्येस्वतःचे नाव, पत्ता आणि त्याखाली दिनांक लिहावा. पत्रातील मजकूर विषयाला धरूनच लिहावा. पत्राची भाषा साधी सरळ आणि औपचारिक असावी. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात . या प्रत्राची भाषा औपचारिक असली तरीही , ती वाचणाऱ्याला पत्राचे महत्व वाटेल अशी भारदस्त असावी.त्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये प्रति असे लिहून ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचा पत्ता आणि पद लिहावे . यानंतर विषय आणि संदर्भ लिहून . पुढे पत्राच्या मजकुराला सुरुवात करावी. औपचारिक पत्राचा सविस्तर आराखडा पुढे दिला आहे. त्यानुसारच पत्राची मांडणी करावी. 


 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


📌औपचारिक पत्रे केव्हा लिहावी लागतात ?


१.सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय स्वरुपाची कामे :

             एखाद्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यासाठी तसेच मिळालेल्या  मार्गदर्शनाबद्दल , सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी लिहिलेली पत्रे.


२.शासकीय तसेच निमशासकीय कामांसंदर्भात : 

                आपला अनेक कारणांसाठी शासनाशी संबंध येतो. उदा : अपुरा वीजपुरवठा , वाढीव बिले , रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या कामांसाठी कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी .


३. सामाजिक तसेच खाजगी व्यापारी संस्था यांच्या संदर्भात कामे : 

                आपला खाजगी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी संबंध येतो. उदा: नोकरी शोधत असताना , काही गैरसोयींबद्दल तक्रार करताना वगैरे अनेक प्रसंगी लिहिलेली पत्रे .


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


📌औपचारिक पत्रे ( कार्यालयीन पत्रे ) | मायना कोणता असावा 

औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan

औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

📌हे लक्षात ठेवा :

                कधी कधी प्रश्नपत्रीकेमध्ये पत्र कोणी कोणाला लिहायचे आहे याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला असतो. आणि त्यांचे पत्ते सुद्धा दिलेले असतात. . अशा वेळेला उत्तरपत्रिकेमध्ये पत्र लिहित असताना पश्नामध्ये दिलेल्या नाव आणि पत्त्यांचा च वापर करावा. जर पत्रामध्ये नाव आणि पत्ते दिले नसतील तर उत्तर पत्रिकेमध्ये स्वतःची स्वाक्षरी अथवा स्वतःचे नाव लिहू नये . त्या ठिकाणी ‘अ.ब.क’ किंवा ‘य.र.ल.’ अशी प्रतिकात्मकअक्षरे लिहावीत.


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


📌पत्राचे स्वरूप : 
खालील imgae मध्ये दाखवल्या प्रमाणे पत्रातील तपशील त्या त्या जागीच लिहावा. 


औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan


औपचारिक पत्रलेखन | Aupacharik patralekhan 



१. या ठिकाणी पत्रलेखकाने स्वतःचे पूर्ण नाव लिहावे.

२. पत्रलेखकाने येथे स्वतःचा पत्ता लिहावा.

३. आपण पत्र ज्या तारखेला लिहित आहोत ती तारीख येथे लिहावी .

४. ‘प्रति’ असे लिहून पत्र ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद आणि पत्ता लिहावा.

५. या ठिकाणी पत्राचा विषय लिहावा.

६. पत्राला काही संदर्भ असल्यास तो या ठिकाणी लिहावा. 

७. पत्राला सुरुवात करत असताना अभिवादनपर शब्द लिहावा. (अभिवादनपर शब्द                 पाहण्यासाठी वरील तक्ता पहा.)

८. या ठिकाणी पत्राच्या मजकुराला सुरवात होते या ठिकाणी मुद्द्यांनुसार स्वतंत्र परिच्छेद         बनवावा . मजकुराची भाषा सोपी, साधी आणि औपचारिक असावी . मजकुराचा समारोप     करत असताना थोडीच वाक्य लिहावीत .

९ . या ठिकाणी पत्राचा शेवट करत असताना ‘आपला विश्वासू  / आपली विश्वासू ‘ किंवा         वरील तक्त्याप्रमाणे अनुरूप असणारे शब्द लिहावेत.आणि स्वतःची सही करावी.

१०.  काही वेळेला पत्रांसोबत अन्य कागदपत्रे किवा त्यांच्या छायाप्रती (झेरॉक्स) आपल्याला         जोडाव्या लागतात. अशी कागदपत्रे जोडल्यास त्यांची यादी येथे लिहावी.

११. काही पत्रे वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवायांसाठी पाठवावी लागतात. जी पत्रे वेगवेगळ्या       ठिकाणी पाठवली जातात त्या व्यक्तींची यादी या जागी लिहावी. 






                                                        ➰➰➰➰➰➰➰

औपचारिक पत्रलेखन कसे करावे?  / पत्रलेखन नमुना मराठी /  औपचारिक पत्रलेखन करताना पत्रातील समाविष्ट मुद्दे / औपचारिक पत्रलेखन लिहिण्याच्या पायऱ्या 



➰➰➰➰➰➰➰

  • मित्रांनो पुढील  Post मध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक पात्रांबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत.
  • माहिती  आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


धन्यवाद



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.