अनौपचारिक पत्रलेखन
![]() |
अनौपचारिक पत्रलेखन | ANOUPCHARIK PATRALEKHAN |
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
आई-वडील , भाऊ, बहिण, किंवा इतर कोणी नातेवाईक किंवा
मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे होत. या प्रकारच्या पत्रांमध्ये आपल्याला
ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे ती व्यक्ती आणि पत्र लेखकाचे तिच्याशी असलेले
नाते यांवर अनौपचारिक पत्रांचा मायना ठरतो आणि पत्राचा शेवट ठरत असतो.
पत्रालेखानामध्ये कोणाला कोणता मायना लिहायचा, याची माहिती पुढे दिली आहे.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
📌अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे ?
पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचे नाव,
पत्ता व त्याखाली दिनांक लिहावा. अनौपचारिक पत्रांमध्ये स्वतःचे नाव लिहिले नाही
तरी चालते. पत्रातील मजकूर सविस्तर विषयाला धरूनच असावा. या पत्राची भाषा साधी आणि
सरळ आणि जिव्हाळ्याची असावी. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना पत्र लिहित
असताना त्यातून नम्रता व्यक्त व्हायला हवी. घरगुती पत्रांचा प्रारंभ आणि शेवट हा
अनौपचारिक मजकूर व घरगुती चौकशी यांनी
करावा.
📌अनौपचारिक पत्रे ( घरगुती पत्रे ) | मायना कोणता असावा
अनौपचारिक पत्रलेखन | ANOUPCHARIK PATRALEKHAN |
📌हे लक्षात ठेवा :
कधी कधी प्रश्नपत्रीकेमध्ये पत्र कोणी कोणाला लिहायचे आहे याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला असतो. आणि त्यांचे पत्ते सुद्धा दिलेले असतात. अशा वेळेला उत्तरपत्रिकेमध्ये पत्र लिहित असताना पश्नामध्ये दिलेल्या नाव आणि पत्त्यांचा च वापर करावा. जर पत्रामध्ये नाव आणि पत्ते दिले नसतील तर उत्तर पत्रिकेमध्ये स्वतःची स्वाक्षरी अथवा स्वतःचे नाव लिहू नये . त्या ठिकाणी ‘अ.ब.क’ किंवा ‘य.र.ल.’ अशी प्रतिकात्मकअक्षरे लिहावीत.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
📌पत्राचे स्वरूप :
खालील imgae मध्ये दाखवल्या प्रमाणे पत्रातील तपशील त्या त्या जागीच लिहावा.
२. २. येथे
पत्रलेखकाने स्वतःचा पत्ता लिहावा.
३. या
ठिकाणी पत्र लिहिल्याच्या दिनांक लिहावा.
४ ४. ‘प्रति’
असे लिहून पत्र स्विकारणाऱ्याचे नाव लिहावे .
५. येथे
पत्राचा विषय लिहावा.
६. ६. पत्राला
सुरुवात करत असताना अभिवादन पर शब्द लिहावा.
७. ७. या ठिकाणी पत्राच्या मजकुराला सुरवात होते या ठिकाणी मुद्द्यांनुसार स्वतंत्र परिच्छेद बनवावा . मजकुराची भाषा सोपी, साधी आणि अनौपचारिक असावी . मजकुराचा समारोप करत असताना थोडीच वाक्य लिहावीत .
८. या ठिकाणी पत्राचा शेवट करत असताना ‘आपला / आपली' किंवा वरील तक्त्याप्रमाणे अनुरूप असणारे शब्द लिहावेत. आणि आपली सही करावी.
पत्र लेखन | Letter writing marathi.part 1
Patra lekhan marathi 2020
Patra lekhan marathi 2020 10th class
patra lekhn marathimadhe
- मित्रांनो पुढील Post मध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक पात्रांबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत.
- माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.