मी पाऊस बोलतोय .....
रेडीओ वर पावसाचे गीत चालू
होते. दाही दिशांमध्ये पावसाच्या आगमनाची जणू तयारीच सुरु झाली होती. रेडीओ वर लागलेल्या
गाण्याचे सगळेच शब्द हे पावसात पार भिजले होते. आसमंतात मातीचा सुगंध दरवळत होता.
पावसाने या गीताचे बोल ऐकले आणि तो स्वतःच व्याकूळ झाला. त्याच्या मनात असणारी
माणसाविषयी भावना जागृत झाली. आणि त्याच्या मुखातून बोल निघू लागले.... “किती
मधुर स्वर! माणसाने मला स्वतःच्या मनात किती खोलवर घट्ट धरून ठेवले आहे! परंतु
काही वेळेला हाच माणूस निसर्गाचा विध्वंस करतो. त्यामुळे या निसर्ग चक्राला धक्का
लागेल की काय, अशी भीती मनात दाटून येते आणि याबाबत मला त्याचा रागही येतो अनेकदा.
मी पाऊस बोलतोय मराठी निबंध / मी पाऊस बोलतोय निबंध ईन मराठी / मी पाऊस बोलतोय आत्मकथन / मी पाऊस बोलतोय आत्मकथन निबंध / Mi paus boltoy Marathi nibandh / Mi paus boltoy nibandh in Marathi / Mi paus boltoy
पण एक गोष्ट मात्र खरी आहे.
माणूस अंतर्यामी कोमलच आहे. माझ्या सहवासाने तो हळुवार, मृदुल बनतो. माझ्या
येण्याने त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात. आणि मग मी त्याच्य्साठी या
साऱ्या सृष्टीवर हिरवागार शालू पांघरून देतो. त्या सृष्टीच्या मनमोहक रूपाने तो हरखून जातो. त्यावेळचा त्याचा चेहऱ्यावरची
प्रसन्नता पाहून माझ्या मनाला सुख मिळते. म्हणून त्याला वेगवेगळ्या रुपात जाऊन
भेटणे हा तर माझा छंदच झाला आहे. वर्षातून चार महिने मी त्याच्या सहवसात राहतो . पण
मध्येच कधी लहर आली की थोडे दिवस विश्रांती देखील घेतो. वर्षभर कामात गुंतलेला
माणूस मे महिना सरत आल्यावर माझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसतो. थोडा जरी का मला यायला
उशीर झाला तरी त्याचे मन बैचेन होतो. वर्षभराच्या विरहानंतर मलाही त्याला
भेटण्याची ओढ लागलेली असते. मी माझ्या ढगांच्या रथात स्वार होतो आणि वायू वेगाने
त्याच्या भेटीसाठी प्रस्थान करतो.
“काय
वर्णन करावे त्या सोहळ्याचे! सारे आकाश ढगांनी व्यापून जाते. सूर्य ढगांच्या आड
झाकला जाऊन सगळीकडे काळोख पसरतो. वारा द्वाड मुलाप्रमाणे मजा मस्ती करू लागतो. आणि
काही क्षणांत मी टपोऱ्या पाण्याच्या थेंबाच्या रुपात साऱ्या सृष्टीवर माझ्या शीतलतेचा
वर्षाव करतो. कधी कधी तर मी इतका कोसळू लागतो की, मला थांबावेसेच वाटत नाही.
साऱ्या आसमंतात फक्त मी एकटाच असतो. फक्त मी! शेतात, माळरानावर , घराजवळ, डोंगर
दऱ्यांमध्ये सर्वत्र माझेच साम्राज्य पसरते. माझ्या स्वागतासाठी लहान मुले सुद्धा
नाचू-गाऊ लागतात. मी त्यांना माझ्या वर्षावाने चिंब भिजून टाकतो. खरे तर मी सुद्धा
लहान होऊन त्या लहानग्यांसोबत नाचत असतो.
“ पण
हे असे कायम धो धो कोसळत राहून मी पण थकतो. मग मी थोडी विश्रांती घेऊन अलगत रिमझिम
रिमझिम करत पुन्हा येतो. माझ्या हळुवार स्पर्शाने त्या माणसाचे मनच मृदुल बनून
जाते. कधी कधी सूर्य किरणे देखील मला भेटायला येतात ती आल्यावर आम्ही पकडा पकडी चा
खेळ सुरु करतो आणि खेळ खेळताखेळता कधी दोघेही एकमेकांत मिसळून जातो , काही कळतच
नाही. माझ्या प्रत्येक थेंबामध्ये सूर्याची सोनेरी किरणे वीरघळतात आणि ती सुद्धा
शीतल होऊन जातात. मी सुद्धा त्या प्रकाश किरणांनी न्हावून निघतो. जेव्हा प्रकाश
किरण माझ्यात न्हाऊन पुढे जातात तेव्हा आकाशात सप्तरंगाचे इंद्रधनू दिसू लागते.
“ कधी कधी हा माणूस फक्त स्वतःच्या हव्यासापोटी या
पर्यावरणाचा ऱ्हास करायला लागला आहे. माणसाने आज इतकी प्रदूषणाची पातळी वाढत चालली
आहे की, या प्रदुषणापुढे मी देखील हतबल होऊन जातो. माझ्या देहातील पाणी आटून जाते.
माझ्यात त्राणच उरत नाहीत. मी माझे ढग घेऊन सर्वत्र जातो परंतु पाऊस पाडू शकत
नाही. जमीन पार कोरडी पडून जाते, भेगाळते. पाण्यासाठी सारी सृष्टी मला साद घालत
असते. पण मी काहीही करू शकत नाही. ,मग लॉक म्हणतात की- दुष्काळ पडला!
“ कधी
कधी तर या साऱ्याच्या उलट घडते. वाढत्या प्रदूषणामुळे तापमान प्रचंड प्रमाणत
वाढते. समुद्राचे पाणी वाफ होऊन वर जाते आणि ढग पाण्यांनी तुडुंब भरून जातात.
त्यांचे वजन इतके जास्त होऊन जाते की मला स्वतःचे वजन सावरेनासे होते. आणि मी
अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये सगळीकडे धो-धो कोसळतो. आणि सगळीकडे एकच विध्वंस माजतो.
माणसाच्या हाती अजूनही वेळ आहे. जर त्याने आपली वागणूक सुधारली, तरच त्याची आणि
माझी ही वर्षानुवर्षाची मैत्री चिरकाल टिकू शकेल.
हा निबंध लिहित असताना खालील अनुसरून निबंध लेखन करा.
[मुद्दे:
पावसाच्या बोलण्याचा प्रसंग
पावसाचे आणि माणसाचे घट्ट नाते
पावसाची माणसाला नियमित भेट
पाऊस आणि माणूस या दोघांनाही
एकमेकांची ओढ
दुवाधार पावसाचे रूप
माणसाचा उत्साह
पावसाचे रिमझिम रूप
प्रदूषणामुळे दुष्काळात वाढ
कधी कधी अतिवृष्टी, महापूर
माणसाने आपली वर्तवणूक सुधारण्याची
गरज
शेवट.]