चंद्र उगवलाच नाही तर....
‘चांदोबा
चांदोबा भागलास का?
‘निंबोणीच्या
झाडामागे लपलास का?’
चंद्र उगवलाच नाही तर मराठी निबंध / मराठी निबंध pdf / चंद्र उगवलाच नाही तर निबंध ईन मराठी / ८ वी , ९वी मराठी निबंध
लहानपणी रात्रीचे अंगणात बसून आई आकाशातील चंद्र दाखवून हे गाव म्हणायची. तेव्हापासून ची चंद्राची आणि माझी अतूट मैत्री झाली आहे. चंद्राला लाडाने आपण ‘चांदोबा’ अशी हाक मारतो. हा असा आपला जिवाभावाचा सोबती एक दिवस आपल्यावर रुसून बसला आणि उगवलाच नाही, तर...!
चंद्र उगवलाच नाही तर.... मराठी निबंध ८वी ९वी
आकाशामध्ये
चंद्र उगवलाच नाही, तर अंधाऱ्या रात्रीला शोभा कुठून येणार? माळरानावर पडणारे
टिपूर चांदणे आपल्याला दिसणार नाही. चांदण्या रात्रीचे ते सौंदर्य, तो गारवा नष्ट
होईल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे रूप अधिकच खुलून दिसत असते. किती अल्ल्हाददायक असते!
ते मनमोहक सौंदर्य आपल्याला दिसणार नाही. ‘चांदोबा’ची शीतलता अनुभवायला मिळणार
नाही. चंद्राच्या विविध कला असतात आणि त्यातील प्रत्येक कलेतील चंद्राचे रूप
मनमोहक दिसते. द्वितीयेला आणि चतुर्थीला दिसणारी चंद्रकोर अतिशय सुंदर असलेली
पाहायला मिळतो. चंद्र जर उगवलाच नाही तर चंद्राची ही मनमोहक रूपे आपल्याला पाहता
येणार नाहीत आणि अनुभवायला देखील मिळणार नाहीत.
जर
चंद्र उगवलाच नाही तर आत्ता आयोजित केल्या जाणाऱ्या चांदण्यातील सहली कशा काय निघतील?
चित्रकारांचे काय होईल? चंद्रावरील सशाचे चित्र चित्रकार कसे काढतील? चंद्रावरची
हरणाची गाडी कशी काय दिसेल? कवींची तर पंचाईत होईल. ‘चांदोबा’ च्या सुंदर सुंदर
उपमा –उत्प्रेक्षांना हे जग मुकेल. चंद्र म्हणजेच स्वप्नांचा सौदागर! चंद्र नसेल
तर जग स्वप्न पाहणेच विसरून जाईल. सगळे जीवन रुक्ष होऊन जाईल.
आजच्या
या आधुनिक काळात माणसाने तर चंद्रावर झेप घेतली आहे. चंद्रावर जाऊन राहण्याचे
त्याचे स्वप्न आहे. पण जर चंद्र उगवलाच नाही तर हे कसे काय पूर्ण होईल?
चंद्र
उगवलाच नाही तर ही कल्पना करणे. चांगले असले तरी या सृष्टीतील चंद्र हा एक
महत्वाचा घटक आहे. आणि तो त्याच्या वेळी उगवणार आणि मावळणार देखील . आपण फक्त
कल्पना करू शकतो.
हा
निबंध तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
हा
निबंध लिहित असताना खालील अनुसरून निबंध लेखन करा.
[मुद्दे:
चंद्र न उगवण्याची कल्पना
विचारात गुंग होणे
चंद्राचे सौंदर्य अनुभवयाला न
मिळणे
रात्रीच्या सहली
चित्रकारांची मोठी पंचाईत
चंद्र स्वप्नानाचा सौदागर.
चंद्र नसेल तर जीवन रुक्ष
आपण फक्त कल्पना करू शकतो
शेवट.]