महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत | महाविद्यालयात रेड रिबिन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत | बातमी लेखन |Batami lekhan

तुमच्या महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत तयार करा महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सव वृत्तांत मराठी बातमी लेखन वर्षा महोत
Admin

बातमी लेखन नमुना 

बातमी लेखन / वृत्तांत लेखन नमुना / बातमी लेखन नमुना / महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत / 
बातमी लेखन मराठी मध्ये


१.    तुमच्या महाविद्यालयात रेड रिबिन  क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत तयार करा.

बातमी लेखन / वृत्तांत लेखन नमुना / बातमी लेखन नमुना / महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत /  बातमी लेखन मराठी मध्ये  १.    तुमच्या महाविद्यालयात रेड रिबिन  क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत तयार करा.

बातमी लेखन |Batami lekhan


उत्तर:  

रेड रिबिन  क्लब : काळाची गरज


रत्नागिरी, दिनांक 16 : राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रत्नागिरी येथील शारदा महाविद्यालयामध्ये ‘रेड रिबीन क्लब’ चे उद्घाटन शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत राजाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य मोहन लवंदे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी प्राध्यापक विकास देऊळकर प्राध्यापक घेतात नलावडे आणि मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयीन तरुणांमध्ये एड्स बद्दल जनजागृती घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये पावर पॉइंट प्रेझेंटेशन, स्लाईड शो, व्हिडिओ क्लिप्स, प्रदर्शन यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या वर्षी विज्ञान शाखेतील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या निखील गावखडकर याचे विद्यार्थी क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर २५ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर राज्याध्यक्ष यांनी ‘एड्स प्रतिकारासाठी’ नवीन उपाय या विषयावर महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन केले. एड्स ग्रस्तांची जागतिक आणि भारतातील संख्येविषयी माहिती दिली. रिबीन चिन्हाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने भित्तीपत्रकांचे  प्रदर्शन भरविण्यात आले होते. महाविद्यालयाचा विद्यार्थी सार्थक तेंडुलकर याने सर्वांचे आभार मानले व या कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी लेखन
वृत्तांत लेखन नमुना
बातमी लेखन नमुना
महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत
बातमी लेखन मराठी मध्ये

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

२)तुमच्या महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवाचा स्थानिक दैनिकात देण्यासाठी तयार करा.

तुमच्या महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत तयार करा महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सव वृत्तांत मराठी बातमी लेखन वर्षा महोत्सवाचा वृत्तांत बातमी लेखन नववी दहावी बातमी लेखन नमुना बातमी लेखन नमुना

बातमी लेखन |Batami lekhan

उत्तर:

पावसाची बरसात आणि कलाविष्कार


रत्नागिरी, दिनांक२९ ऑगस्ट : पाच वर्ष रत्नागिरी शहरांमधील सर्व महाविद्यालये एकत्रित पणे वर्षा महोत्सव साजरा करतात. यंदाचे हे या कार्यक्रमाचे सहावे वर्ष रत्नागिरीच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात दिनांक 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरे झाले.  रत्नागिरीतील आठही महाविद्यालयांनी या महोत्सवात या महोत्सवात सहभाग दर्शविला होता. बाहेर कोसळणाऱ्या जलधारांच्या साक्षीने सुमारे 150 विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार या ठिकाणी सादर केला.

या महोत्सवात वक्तृत्व निबंध शास्त्रीय गायन नृत्य एकांकिका समूह गायन चित्रकला गायन निबंध यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी पार पडलेले परीक्षक लाभले होते. उत्सवाचा सांगता समारंभ रत्नागिरीच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्य यांच्या अधिपत्याखाली पार पडला. वीरांगना लक्ष्मीबाई महाविद्यालयाने सर्वांगीण नेतृत्वाची ढाल मिळविली. उपस्थित प्रेक्षकांनी सर्व कार्यक्रमांचा आनंद मनसोक्त लुटला.


तुमच्या महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत तयार करा
महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सव वृत्तांत
मराठी बातमी लेखन
वर्षा महोत्सवाचा वृत्तांत बातमी लेखन
नववी दहावी बातमी लेखन नमुना
बातमी लेखन नमुना


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.