देशातील लुप्त होत जाणारे प्राणी माहिती मराठी | Deshatil lupt hot janare prani mahiti marahi

देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशतील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt h
Admin

देशातील लुप्त होत जाणारे प्राणी माहिती मराठी 


देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशतील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt honarya pranyanchi mahiti / Deshatil namshesh honarya pranyachi mahiti / Deshatil lupt honarya pranyanchya prajati / Lupt hot chalalelya deshatil pach prajati 

देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशतील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt honarya pranyanchi mahiti / Deshatil namshesh honarya pranyachi mahiti / Deshatil lupt honarya pranyanchya prajati / Lupt hot chalalelya deshatil pach prajati

देशातील लुप्त होत जाणारे प्राणी माहिती मराठी


हिम बिबट्या


शास्त्रीय वर्गीकरण

 

वंश           

पृष्ठवंशी

जात             

सस्तन

वर्ग              

मांसभक्षक

कुळ            

फेलिडे

उपकुळ          

पँथेरिने

जातकुळी        

Uncia

जीव             

U.uncia











v वैशिष्ट्ये/ वर्णन:

    हिम बिबट्याच्या अंगावरील केस हे पांढरे आणि राखाडी रंगाचे आहेत. डोक्यावर आणि मानेवर काळ्या रंगाचे डाग असलेले पाहायला मिळतात. हिम बिबट्याची शेपटी ही झुपकेदार आहे. त्याचे डोळे फिकट हिरव्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे असतात. त्याच्या शरीरावरील केस हे जड आणि ५ ते १२ सेमी. लांब असतात. हिम बिबट्याचे शरीर हे पेंथेरा या जातीच्या इतर मांजरीन पेक्षलाहन आहे. शेपटीची लांबी ८० ते १०५ सेमी. इतकी लांब असते. त्याचे वजन २२ किलो ते ५५ किलोपर्यंत असते. त्याचे सुळे(दात) २.६ मिमी. लांबीचे असून ते पेंथेरा जातीच्या इतर प्रजातींपेक्षा पातळ आहेत. त्याच्या मोठ्या अनुनासिक आहेत. त्यांचा उपयोग जास्त प्रमाणात हवा आत्ता घेण्याबरोबरच थंड असलेली हवा गरम करण्यासाठी देखील होतो. हिम बिबट्याच्या लहान गोलाकार कणांमुळे शरीरातील उष्णतेचे नुकसान कमी होते. त्याचे पसरत पंजे बर्फावर चालण्यासाठी मदत करतात तर त्याची लांब शेपटी त्याला खडकाळ प्रदेशांत संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरते.


v आढळ / अधिवास :

    हिम बिबट्या हा पूर्व अफगानिस्तान आणि उत्तर पाकिस्तान मधील काराकोरम, तिबेट पठार आणि भारत, नेपाळ आणि भूतानमधील हिमालायांतील उच्च उंचीवर आढळून येतो. भारतातील हिम बिबट्याचा अधिवास हा सुमारे ९०,००० किमी पेक्षा कमी क्षेत्रावर विस्तारला आहे. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश, या भागात वास्तव्य आढळते. त्यापैकी ३४,००० किमी. क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा अधिवास आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातील भारतीय हिम बिबट्यांची संख्या सर्वसाधारणपणे २००-६०० इतकी २५ संरक्षण क्षेत्रांमध्ये होती.

 

v प्रजातींना असलेला धोका:

§  हिम बिबट्यांच्या कातडीसाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

§  त्यांच्या अधिवासावर झालेल्या मानवी आक्रमणामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.

        प्रजातींची उध्वस्त झालेली निवासस्थाने, जंगलतोड यांमुळे त्यांची संख्या                दिवसेंदिवस घटत आहे. 

 

तांबडे अस्वल


शास्त्रीय वर्गीकरण

वंश

पृष्ठवंशी

जात

सस्तन

वर्ग

मांसभक्षक

कुळ

Ailuridae

जातकुळी

Ailurus

जीव

A.fulgens









v वैशिष्टे/ वर्णन:

    तांबडे अस्वल हा निशाचर सस्तन प्राणी आहे. त्याच्या पाठीवरचा रंग तांबूस आहे. व पोताकडून रंग कला आहे, शेपूट गडद तपकिरी रंगाचे व मोठी जड असते. शरीराच्या मानणे याचे डोके मोठे आणि नाक टोकदार असते. पाय लहान, पंजे धारदार नखांचे असतात. तांबडा पांडा झाडावर चढण्यात पटाईत असतो.

 

v आढळ:

तांबडे अस्वली मांजर हे पूर्व हिमालयातील नेपाळ अरुणाचलप्रदेश, तसेच उत्तर म्यानमार आणि दक्षिण चीन भागातील समशीतोष्ण वनात आढळतात. तांबड्या अस्वलांची सर्वाधिक घनता असलेल्या स्थानांमध्ये हिमालयातील एक क्षेत्र समाविष्ट आहे. ज्याला प्लाइस्टोसीन मधील विविध प्रजातींसाठी आश्रयस्थान म्हणून घोषित केले आहे.

तांबड्या अस्वलांचे अस्तित्व हे समुद्रसपाटीपासून २२०० ते ४८००ज मीटर इतक्या उंचीवर आढळते. मध्यम तापमान असलेल्या भागामध्ये १० ते २ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानात राहतो.

 

v प्रजातींना असलेला धोका:

§  मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे लाल अस्वलांची संख्या कमी होत आहे.

§  मोठ्या प्रमाणावर केलेली जंगलतोड.

§  दक्षिण व पश्चिम चीनमध्ये लाल रंगाच्या अस्वलांच्या शरीरावरील केसांसाठी मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते.

§  पूर्वी लाल अस्वलांना पकडून त्यांना प्राणिसंग्रहालयांमध्ये विकण्यात आले त्यामुळे त्यांच्या संखेत घट झाली आहे.

§  भारतातील काही भागात लाल अस्वले पाळीव प्राणी म्हणून ठेवतात.

§  सध्या लाल अस्वलांचा जन्मदर कमी आणि मृत्युदर वाढला आहे.

    लाल अस्वलांसाठी प्राथमिक धोके हे जंगली प्राणी , पाळीव प्राण्याशी स्पर्धा,           तसेच त्यांची उध्वस्त झालेली निवासस्थाने, जंगलतोड यांमुळे त्यांची संख्या            दिवसेंदिवस घटत आहे.


 

देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशतील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt honarya pranyanchi mahiti / Deshatil namshesh honarya pranyachi mahiti / Deshatil lupt honarya pranyanchya prajati / Lupt hot chalalelya deshatil pach prajati 


भारतीय हत्ती.


शास्त्रीय वर्गीकरण

वंश

कणाधारी

उप वंश

पृष्ठवंशी

जात

सस्तन

वर्ग

प्रोबोस्काइड

कुळ

एलेफंटाइड

उप कुळ

एलेफंटॉइड









v वैशिष्ट्ये/वर्णन:

    आशियाई हत्ती हे, आफ्रिकन हत्तींपेक्षा लहान असतात. भारतीय हत्तींच्या खांद्याची उंची २ ते ३.५ मी पर्यंत असते. आशियाई हत्तींचे वजन २०००० ते ५०००० किलो पर्यंत असते. सर्वात मोठ्या भारतीय हत्तींची खांद्यापर्यतची उंची २ ते ३.४३ मीटर इतकी आहे. हे दोन मोठे हत्ती पहिल्यांदा बर्दिया राष्ट्रीय पार्कमध्ये सापडले होते. त्यांना राजा गज आणि कांचा  हे नाव देण्यात आले. भारतीय हत्तींचे कान लहान आहेत. परंतु तुलनेने विस्तृत डोके आहे. पायाची बोटे ही रुंद असतात.

 

v आढळ:

    भारतीय हत्ती आशिया खंडातील मूळ प्रजाती आहे. आशिया खंडातील भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, थायलंड, चीन, कंबोडिया आणि व्हियेतनाम इत्यादी भागात या प्रजातींच्या हत्तीचे अस्तित्व आढळते.

या प्रजातीचे हत्ती गवताळ प्रदेश, कोरडी पर्णपाती जंगले, ओलसर पर्णपाती जंगले सदाहरित आणि निमसदाहरित जंगलांमध्ये आढळतात.

वायव्य दिशेला: उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमधील हिमालयाच्या पायथ्याशी , कातारनिया घाट अभयारण्यापासून ते यमुना नदीपर्यंत

उत्तर दिशेला: पश्चिम बंगालमधील नेपाळच्या पूर्व सीमेपासून पश्चिम आसाम व हिमालयाच्या पायथ्याशी पूर्व  अरुणाचल प्रदेशापर्यंत , ब्रह्मपुत्रा मैदानाचा काही भग आणि त्रिपुरा मिझोरम भागांत आढळतात.

मध्य भागात: ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडे असलेल्या भागात या प्रजाती आढळतात.

उत्तर दिशेला: कर्नाटक आन्नामालाई, पश्चिम घात, ब्रम्हगिरी-निलगिरी भाग पूर्व घाट तसेच सायलेंट व्ह्याली , कोयंबटूर इत्यादी भागात अस्तिव आढळते.

 

v प्रजातींना असलेला धोका:

§  आज आशियाई हत्तींच्या संखेमध्ये मोठ्या प्रमावर घात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे नष्ट झालेले अधिवास त्यांच्या राहणीमानाच्या ठिकाणाची झालेली नासधूस.

§  वाढत्या लोक्संखेमुळे, मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी वन्यजीवांचे अधिवास नष्ट केले. त्यामुळे हत्ती व शेतकऱ्यांच्या शेतात शिरून, पिकांची नासाडी करतात. पिके तुडवतात त्यामुळे मानव व हत्ती यांच्यातला संघर्ष वाढतो व त्यांची संख्या घटते.

§  जलविद्युत प्रकल्प, जलाशय, कालवे, सिंचन बंधारे, महामार्ग व रेल्वेमार्ग, खाणकाम आणि औद्योगिक विकासामुळे हत्तींच्या अधिवसाला त्यांच्या मुक्तपणे संचारला अडथळा निर्माण झाला आहे.

§  आशियातील काही भागांमध्ये हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यामुळे त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.

§  उच्च पातळीवर पोलाचालेल्या मानव-हत्ती संघर्ष आणि रेल्वे अपघात यांमुळे उत्तर-पश्चिम बंगालमधील हत्तींची संख्या घटत आहे.

§  म्यानमारमध्ये पर्यटकांसाठी वस्तू बनवण्यासाठी हस्ती दांताची मागणी मोठ्या प्रमाणवर वाढल्याने हत्तीचे प्रमाण कमी होत आहे.

§  इलेक्ट्रिक पोल आणि ट्रान्सफॉरमर्सच्या संपर्कामुळे विद्युत झटके लागून अनेक हत्ती मृत्युमुखी पडतात.

 

आशियाई सिंह


शास्त्रीय वर्गीकरण

वंश

पृष्ठवंशी

जात

सस्तन

वर्ग

मांसभक्षक

कुळ

मार्जार(फेलिडे)

जात कुळी

पँथेरा

जीव

पँथेरा लिओ









v वैशिष्ट्य/वर्णन:

    आशियाई सिंहांच्या शरीरावील केसांचा रंग पिवळसर, कला तेच थोडा राखाडी असतो. प्रकाशामध्ये हा रंग चांदिसारखा चमकतो. पूर्ण वाढ झालेल्या आशियाई नर सिंहाचे वजन १६० ते १९० किलोपर्यंत असते. आशियाई नर सिंहांची उंची ३.५ ते ४ फुटांपर्यत असते. आशियाई मादी सिंहांचे वजन १०० ते १३० किलोपर्यंत असते. नर सिंहाच्या मानेचा रंग हा प्रदेशानुसार व वयानुसार बदलत असतो.

 

 

v आढळ:

    सौराष्ट्राच्या गिर जंगलांमध्ये, आशियाई सिंह संवर्धनासाठी अभयारण्य म्हणून ५४५२.२ चौ.की.मी. क्षेत्र घोषित केले आहे. या अभयारण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सिंहांना आधार मिळाला आहे. आशियाई सिंहांचे रक्षण करण्यासाठी पाच संरक्षित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे त्यामध्ये गिर अभयारण्य, गिर राष्ट्रीय उद्यान, पाणिया अभयारण्य, निरीयाल अभयारण्य, आणि गिरनार अभयारण्य इत्यादी. गिर संवर्धन क्षेत्र हे ५६१ चौरस मैलावर पसरले आहे. हे सिंहांचे मूळ अधिवास दर्शवते.

 

v प्रजातींना असलेला धोका:

§  आशियाई सिंह सध्या एकाच उप्सामुहात अस्तित्वात आहेत. त्यामुळे आगीसारख्या घटनामुळे नामशेष होण्याचा धोका त्यांच्या प्रजातींना आहे.

§  अलीकडील वर्षांत अवैध शिकारियाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

§  विहिरीत पडून बुडून मारण्याच्या अनेक घटना ही घडल्या आहेत.

§  ऑक्टोबर २०१८ मध्ये गिर जंगलाच्या जवळपास २५ सिंह मृतावस्थेत सापडले होते. त्यापिई चार क्यानीन डीस्टेमपर व्यायारसमुळे मरण पावले होते.

शेतकऱ्यांच्या द्वारे शेताचे रक्षण करण्यासाठी उच्च विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या विद्युत कुपणांचा वापर केल्याने विजेच्या धक्क्यामुळे सिंहाचा मृत्यू होतो.

 

देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt honarya pranyanchi mahiti / Deshatil namshesh honarya pranyachi mahiti / Deshatil lupt honarya pranyanchya prajati / Lupt hot chalalelya deshatil pach prajati 


भारतीय गेंडा


शास्त्रीय वर्गीकरण

वंश

कणाधारी

जात

सस्तन

वर्ग

खुरधारी

कुळ

खड्गाद्य

गण

अयुग्मखुरी








v वैशिष्ट्ये/वर्णन:

    भारतीय गेंडा किंवा एकशिंगी गेंडा ही एक गेंड्याची प्रजाती आहे. गेंडा यालाच इंग्रजीमध्ये ऱ्हाईनोसेरॉस असे म्हणतात. हा एक शाकाहारी प्राणी आहे. सध्या जगामध्ये गेंड्याच्या पाच जाती अस्तित्वात आहेत. भारतीय गेंडा हा एक खुरधारी वर्गांतील प्राणी असून याचा गण आयुग्मखुरी आहे. अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येने खुर असतात त्यांना अयुग्मखुरी असे म्हणतात. भारतीय गेंड्याच्या पायाला तीन खुर असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यामुळे भारतीय गेंड्याला असणारे हे खरे शिंग नसून ते एक केरोटीन नावाच्या (एका तंतुमय प्रोटीन) पदार्थांपासून बनलेले आहे.

 

v आढळ:

        भारतातील काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणवर भारीत्य गेंड्याचे अस्तित्व आढळते. एक शिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगामधील एकूण गेंड्यांपैकी २/३ भारतीय गेंडे भारतामधील पश्चिम बंगाल, आसाम व उत्तर प्रदेश या प्रांतात अआधालतात तर काही नेपाळमध्ये पण दिसतात. भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या नदीपात्रांपर्यंत तसेच भारत-म्यानमार सीमेपर्यंत, बांगलादेश आणिदक्षिण नेपाळ आणि भूतानच्या दक्षिण भागापर्यंत भारीत्य गेंड्यांचे अस्तित्व आढळते. म्यानमार, दक्षिण चीन, आणि इंडोनेशियाच्या गवताळ प्रदेशांत भारतीय गेंड्याच्या प्रजातींचा अधिवास आढळतो.

 

v प्रजातींना असलेला धोका:

§  मानवी हालचाली तसेच हवामानातील बदल यांमुळे त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास झाला. त्यामुळे गेंड्यांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले.

§  गवताळ प्रदेशांमध्ये परदेशी वृक्षांच्या वाढीमुळे आणि गवताळ प्रदेशाची कमतरता यांमुळे त्याच्या संख्येत घट होत आहे.

§  भारतीय गेंडा प्रजातींना मोठा धोका आहे कारण या प्रजातीच्या गेंड्यांच्या लोकसंख्येच्या ७०% पेक्षा जास्त लोकसंख्या ही एका काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सापडतात .

§  रोग, शिकार, विकार यांसारख्या आपत्तीजनक घटनेचा भारतीय गेंड्या वर विनाशकारी परिणाम होईल.

§  पारंपारिक चीनी औषधांमध्ये हॉर्न वापरण्यासाठी शिकार करणे हा एक मुख्य धोक्यापैकी एक धोका आहे.

        गेंड्यांच्या शिन्गांसाठी मोठ्या प्रमाणवर झालेली शिकार हे भारतीय गेंड्यांच्या                संख्येतील घसरणीचे मुख्य कारण आहे.


देशतील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांची माहिती / देशतील लुप्त होणाऱ्या पाच प्राण्यांची माहिती / Deshatil lupt honarya pranyanchi mahiti / Deshatil namshesh honarya pranyachi mahiti / Deshatil lupt honarya pranyanchya prajati / Lupt hot chalalelya deshatil pach prajati 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.