मी मुख्याध्यापक झालो तर.. मराठी निबंध | Mi mukhyadhyapak zalo tar marathi nibandh

५वी , ६वी, ७वी, ८वी, ९वी , १०वी ,११वी, १२वी मराठी निबंध pdf मराठी निबंध मी मुख्याध्यापक झालो तर... Mi mukhyadhaypak zalo tr Marathi nibandh
Admin

मी मुख्याध्यापक झालो तर...


मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध / मी मुख्याध्यापक झालो तर कल्पनात्मक मराठी निबंध / ५वी , ६वी, ७वी, ८वी, ९वी १०वी ,११वी, १२वी  मराठी निबंध pdf / मराठी निबंध मी मुख्याध्यापक झालो तर...



        आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हे योग्य आणि प्रतिभाशाली व्यक्ती आहेत. त्यांच्या कामात ते खूपच काटेकोर आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यांना पाहिलं की माझ्या मनात विचार येतो की मी मोठा होऊन, या शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाले तर.... मी या आमच्या शाळेचा मुख्याध्यापक झालो तर...

मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध मी मुख्याध्यापक झालो तर कल्पनात्मक मराठी निबंध ५वी , ६वी, ७वी, ८वी, ९वी , १०वी ,११वी, १२वी  मराठी निबंध pdf मराठी निबंध मी मुख्याध्यापक झालो तर... Mi mukhyadhaypak zalo tr Marathi nibandh If I become a principal of my school essay in Marathi language Marathi nibandh mi mukhyadhyapak zalo tr… Mi mukhyadhyapak zalo tar marahi nibandh pdf

मी मुख्याध्यापक झालो तर.. मराठी निबंध



        खरंच, मी मुख्याध्यापक झालो तर.. आमच्या शाळेला या शहरातील एक सर्वात चांगली शाळा बनवण्याचा प्रयत्न केला असता. विद्यार्थ्यांच्या ज्ञानची पातळी वाढवण्यासाठी त्यांना चांगल्या प्रतीचे ज्ञान मिळावे यासाठी मी कुशल, कार्यक्षम आणि प्रत्येक विषयामध्ये जे उत्तम शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केली असती,. मी विज्ञान या विषयाकडे जास्त लक्ष दिले असते. त्यासाठी शाळेमध्ये असणाऱ्या प्रयोग शाळेचे रुपांतर एका मोठ्या , सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळेत करण्याचा प्रयत्न केला असता. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक  असणारी सगळी पुस्तके उपलब्ध करून दिली असती. विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांना विविध भाषा अवगत होण्यासाठी वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली असती जेणेकरून वाचनाबरोबरच त्यांना चालू घडामोडींबाबत देखील माहिती मिळाली असती. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला, संगीत आणि संगणक प्रशिक्षण यांचे विशेष वर्ग चालू केले असते.


        विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे मी विशेष लक्ष दिले असते. आमच्या विद्यालयात वेळोवेळी वाद-विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, तसेच  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांसारख्या साप्र्धांचे वेळोवेळी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला असता. त्याचप्रमाणे विशेष दिवशी तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यावर भर दिला असता.

Marathi nibandh mi mukhyadhyapak zalo tr…
Mi mukhyadhyapak zalo tar marahi nibandh pdf

        मी मुख्याध्यापक झालो तर मी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी विशेष महत्व दिले असते. शाळेत विविध खेळांचे त्याचप्रमाणे व्यायामाचे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले असते. जे विद्यार्थी खूप हुशार आहेत त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष  दिले जाईल त्यामुळे ते पुढे जावून उच्च पदावर काम करून शाळेचे नाव नक्कीच उज्वल करतील. माझ्या शाळेचे उपहारगृह इतके स्वच्छ आणि टापटीप असेल की, विद्यार्थ्यांना बाहेरील वस्तू खाण्याची गरजच पडली नसती.


        मी शिस्त आणि विद्यार्थ्यांचे चरित्र कसे सुंदर होईल याकडे जास्त लक्ष दिले असते. त्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घातले असते. मी माझ्या साध्या जीवन आणि उच्च विचारसरणीणे विद्यार्थी व शिक्षक एक अनुकरणीय आदर्श उभा केला असता. माझ्या सोबत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्वभाव माझ्यासारखाच मधुर झाला असता.


        मी मुख्याद्यापक झालो तर या प्रकारे मी माझ्या शाळेला एक आदर्श आणि लोकप्रिय शाळा बनवण्याचा प्रयत्न केला असता.

 

अजून निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा.


हा निबंध लिहित असताना खालील दिलेले मुद्दे निबंधात अवश्य समाविष्ट करा.


[मुद्दे:

मुख्याध्यापक बनण्याची कल्पना

शिक्षणाची योग्य व्यवस्था

गुणकौशल्यांना प्रोत्साहन

मुख्याध्यापकाच्या रुपामध्ये सर्वांसमोर आदर्श प्रस्थापित करणे

माझ्या शाळेला शहरातील सर्वात चांगली शाळा बनवण्याचा निर्धार

शेवट]

 

मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध
मी मुख्याध्यापक झालो तर कल्पनात्मक मराठी निबंध
५वी , ६वी, ७वी, ८वी, ९वी , १०वी ,११वी, १२वी  मराठी निबंध pdf
मराठी निबंध मी मुख्याध्यापक झालो तर...
Mi mukhyadhaypak zalo tr Marathi nibandh
If I become a principal of my school essay in Marathi language
Marathi nibandh mi mukhyadhyapak zalo tr…
Mi mukhyadhyapak zalo tar marahi nibandh pdf

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.