प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन

प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन
Admin

 

वृतांत लेखन

प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन

वृतांत लेखन


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


१)                तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाचे वृतांत लेखन करा.

 

प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन

 

रत्नागिरी, दि. २७ जानेवारी: रत्नागिरी मधील शारदा महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. शामराव पाटील यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य शामरावजी पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर शामारावजी पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकांचे निरीक्षण केले. पथकात एन.सी.सी. , एम. सी.सी. , स्काउट गाईड इत्यादी. महाविद्यालयामध्ये असलेल्या विभागांचा समावेश होता. यानंतर सराव पथकांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सदर केली. या मध्ये विद्यार्थांनी सादर केलेल्या मल्लखांबावरील कसरतींनी उपस्थित साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उप. प्राचार्य कौस्तुभ चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर उपस्थित सर्वाना जिलेबी चा गोड खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


 2) वृक्षारोपण या कार्यक्रमावर आधारित वृत्तलेखन करा.


वृक्षवल्ली आम्हां सोयरी


पुणे, दि. १५ जुलै: दिवसेंदिवस उजाड होत चाललेल्या पुण्याला फक्त झाडेच संजीवनी देऊन वाचणार आहेत; अन्य कोणताही ही ताकद नाही. अशा या जीवनदात्या  वृक्षादेवाची आपण प्राधान्याने  जोपासना केली पाहिजे, असे उद्गार पुण्याचे महापौर  डॉ. वाळिंबे यांनी महापालिकेच्या कार्यक्रमाच्या प्रारंभीच काढले.

वृक्ष आपल्याला किती बाबतींत मदत करतात, याचे विवेचन करून माणसाचे जीवन वृक्षांनी कसे व्यापून राहिले आहे, हे त्यांनी समप्रमाणात दाखवून दिले. आज पुणे महापालिकेतर्फे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या दहा हजार वृक्षांची जोपासना व संरक्षण पुणे महापालिकाच करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


3) राज्यस्तरीय एकपात्री संहिता लेखन स्पर्धा नुकतीच भरत नाट्यमंदिर , यांच्या वतीने झाली. त्याचा वृत्तान्त तयार करा.

 

एकांकिका लेखन स्पर्धा - काळाची गरज


पुणे , दि . १५ सप्टें . : पुणे येथील ' तरुण हौशी नाट्य मंडळ ' यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती . १५ ऑगस्टपर्यंत आपल्या एकांकिकेचे हस्तलिखित सादर करायचे होते . आनंदाची गोष्ट म्हणजे एकूण ३५ हस्तलिखिते सादर झाली होती , त्यांपैकी तीन तर महाराष्ट्राच्या बाहेरून आली होती . या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम दि . १३ सप्टेंबरला पुणे येथील भरत नाट्यमंदिर येथे झाला कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी खूप गर्दी केली होती . प्रसिद्ध नाटककार श्री . राजेश सोमण यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते .

एकांकिकेचे परीक्षण श्रीमती माया कुलकर्णी , श्रीमती नीता दाभोळकर , श्री . पुष्कर बागवे यांनी केले . मुंबईच्या रुईया कॉलेजच्या अरुण दर्शने यांच्या एकांकिकेला पहिले पारितोषिक व सोलापूरच्या मिता मोहितेच्या एकांकिकेला दुसरे पारितोषिक मिळाले . इतर पाच एकांकिकाना उत्तेजनपर पारितोषिके देण्यात आली .

" आज मोठी नाटके वा दीर्घाक पाहण्यास प्रेक्षकांजवळ वेळ नाही , तेव्हा प्रेक्षकांना एकांकिका पाहायलाच आवडतात . म्हणून एकांकिका लेखन ही आजच्या काळाची गरज आहे . " असे विचार प्रमुख पाहुणे श्री राजेश सोमण यांनी व्यक्त केले . एकांकिकांसाठी निवडलेल्या विषयांतील वैविध्याचे परीक्षकांनी कौतुक केले .


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏ 

 

 [टीप: सदर वृतांत लेखनामध्ये अधोरेखित (underline) केलेल्या शब्द किंवा वाक्यांच्या जागी विद्यार्थी आपल्या सोयीनुसार बदल करू शकतो.]

 

मित्रांनो हे वृतांत लेखन तुम्ही या प्रकारे सुद्धा शोधू शकता.

  • प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन मराठी मध्ये
  • प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन.
  • Prajasattak din vrutant lekhn Marathi madhe
  • Prajsattak din vrutant lekhn
  • वृक्षारोपण कार्यक्रमावर आधारित वृतांत लेखन
  • वृक्षारोपण वृतांत लेखन
  • Vruksharopan karykramavar aadharit vrutant lekhan
  • Vruksharopan vrutant lekhan
  • एकांकिका लेखन स्पर्धा वृतांत लेखन
  • स्पर्धेचे वृतांत लेखन
  • Ekankika lekhan spardha vrutant lekhan
  • Spardheche vrutant lekhn.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

  • वृतांत लेखन आवडल्यास आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.