सूर्याची आत्माकथा मराठी निबंध
उत्तर:
सूर्याची आत्माकथा
रोज सकाळी उठून कोवळ्या उन्हात व्यायाम करणे हा माझा
नित्यक्रम आहे. आजही मी सकाळच्या कोवळ्या उन्हात मी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर
पडलो होतो. सूर्य डोंगराआडून वर येत होता जणू काही डोंगराआडून लपून मलाच पाहत
होता. अचानक मला कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला आजूबाजूला पहिले तर कोणीच नव्हते तेवढ्यात
पुन्हा हाक मारण्याचा आवाज आला तेव्हा माझे लक्स डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्याकडे
गेले. नीट पहिले तेव्हा आले सूर्यच माझ्याशी बोलत आहे. पुढे तो बोलू लागला.
अरे बाळा, मी सूर्य बोलतोय मी
रोज तुला माझ्या कोवळ्या सूर्यप्रकाशात व्यायाम करताना पाहतो. रोज ठरवतो की
तुझ्याशी काही महात्वास्चे बोलायचे आहे. पण राहूनच जाते. आज मी तुला माझ्या मनातील
सर्व गोष्टी सांगणार आहे. सकाळी माझ्या उदयानेच साऱ्या सृष्टीला जग येते. पहाटेची
जागी होणारी सृष्टी पाहून मला खूप आनंद होतो. सारे दृश्य मी डोळे भरून पाहत असतो.
मी माझ्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये सरी सृष्टी न्हावून निघते. पक्षी किल्विलात
करीत आकाशात उंच भारती घेतात. सर्व वृक्षवेली टवटवीत बनतात. हे सर्व पाहून मन
प्रसन्न होऊन जाते. पण दिवस जसा जसा सरत जातो तसा मी अस्ताला जातो. मी अस्ताला जात
असताना सारे पशु-पक्षी आपापल्या घरट्यात पुन्हा परततात. उदयाच्या वेली फुललेली
फुले कोमेजू लागतात. हे पाहून मला फार दुःख होते. मला कायम इथेच राहण्याची इच्छा
होते परंतु सृष्टीच्या नियमांचे पालन करावे लागत असल्याने मलाही येथून जावे लागते.
साऱ्या सृष्टीचे पालनपोषण
माझ्यामुळेच होते. आकाश गंगेमध्ये सारे ग्रह माझ्याभोवती फिरतात. पृथ्वीवर जीवसृष्टीत
मानवासारखा बुद्धिमान माणूस निर्म झाला. तो जिज्ञासूवृत्तीचा असल्याने त्याला. विविध
प्रश्न पडू लागले आणि तो त्यांची उत्तरे शोधू लागला. त्याला माझ्यास्थानाबाबत
देखील प्रश्न पडला मग त्याने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे
पृथ्वीपासूनचे माझे स्थान किती अंतरावर आहे या प्रश्नाचे उत्तर देखील त्याने शोधून
काढले तेव्हा समजले की पृथ्वीपासून माझे
स्थान सुमारे १४० करोड किलोमीटर पेक्षा थोडे जास्तच आहे.
या सृष्टीमध्ये ग्रहमालेत माझे
महत्व खूप जास्त आहे. माझ्या पासून निघणाऱ्या प्रकाश किरणांमुळेच प्रत्येक ग्रहाला
सूर्यप्रकाश मिळतो. आज पृथ्वीवर जी सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती सुद्धा माझ्यामुलेच
मीच नसेन तर या सृष्टीला सूर्यप्रकाश मिळणार
नाही, सारी सृष्टी अंधारात जाईल. भारतीय लोकांना माझ्या सौरशक्तीचे महत्व फार पूर्वीच्या काळातच समजले होते. माझ्यापासून
निघणार्या उन्हांमध्ये खाद्यपदार्थ वाळवणे , धान्य टिकवून ठेवणे, इतकेच नाही तर माझ्या
प्रखर सूर्यकिरणांमुळे घरातील वस्तू उन्हात ठेवल्याने त्या सुद्धा निर्जंतुक
होतात. माझ्या कोवळ्या उन्हांत लहान मुलांना बसवल्याने. आरोग्यासाठी आवश्यक असणारे
‘डी’ जीवनसत्व मिळते. आज तुम्ही वापरत असलेले मीठ असो वा मासे वळवणे असो यासाठी
देखील माझाच उपयोग केला जातो. आज मनावाने अनेक कृत्रिक उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
हे उपग्रह सुद्धा माझ्या सूर्यप्रकाशाच्याच शक्तीवर चालतात. आज अनेक उद्योगधंद्यांमध्ये
माझ्या सौरशक्तीचा वापर केला जातो. इतकेच नाही तर सौरचुलींद्वारे अन्नदेखील शिजवता
येते. त्यामुळे इंधनाची बचतच होते. माझ्या पासून मिळणारी सौरशक्ती हे जगातील
मानवाला लाभलेले एक वरदानच आहे.
माझ्यापासून मिळणाऱ्या सौरउर्जेचे
मानवाला अनेक फायदे होतात. आजपर्यत जी उर्जेची
साधने मानव वापरत आला आहे त्यांचे साठे
मर्यादित आहेत. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणदेखील होते. आणि वाढत्या
प्रदूषणामुळेच ओझोन ठरला छिद्र पडली आहेत. त्यामुळे माझ्यापासून निघणारी अतिनील
किरणे थेट पृथ्वीवर पोहचतात त्यामुळे कर्करोग यांसारखे गंभीर आजार होतात. हे सर्व
पहिले की मन विदीर्ण होते. सृष्टीच्या उत्पत्तीपासून मी माझी उर्जा मुबलक प्रमाणात
उपलब्ध करून देतो पण कोणीही तिचा वापर करताना दिसून येत नाही. याची मला खंत वाटते.
अरे बाळा, या सृष्टीचे भवितव्य
ततुमच्या नव्या पिढीवर अवलंबून आहे. जर प्रदूषणाची पातळी अशीच वाढत राहिली तर या
सृष्टीचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच माझ्यापासून
मिळणाऱ्या उर्जेचा वापर करून प्रदूषणाची पातळी कमी केलीत तर ही सृष्टी सुरक्षित
राहील. तुम्ही यापुढे योग्य तोच मार्ग निवडाल अशी आशा बाळगतो आणि मी तुझा निरोप
घेतो.
प्रकल्प लिहिताना समाविष्ट
करण्यासाठी मुद्दे
[मुद्दे:
उदय व अस्त या वेळेच्या भावना
स्थान
महत्व
खंत
संदेश
शेवट ]