माझी आई.(कथनात्मक निबंध) | Mazi aai

Admin

 

माझी आई   




स्वामी तिन्ही जगाचा ।

आई विना  भिकारी ।।


        या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत असेल. जरी तो तिन्हि जगाचा स्वामी असला, पण त्याच्याकडे आईची प्रेमाची उब नसेल तर त्याच्याकडे असणाऱ्या संपत्तीला, ऐश्वर्याला काहीच किंमत उरत नाही. आई शिवाय कोणताही माणूस अपूर्णच असतो. आई... किती ब्रह्मांड भरलंय ना या स्वरांत आणि त्या स्वरांतून साकारणाऱ्या त्या मूर्तीत! खरंच, कधी विचार केलाय का की आईइतकं आपलं जवळच नातं दुसरं असत का ? व्यक्ती म्हणून आपण तिचा फार उशिरा विचार करायला लागतो. तिला खूप ग्राह्य धरतो. पण तीच प्रेम आंधळं असत.तिने जणू ते मान्यच केलेलं असत. जन्मल्यांनंतर बाळाची आईची जोडलेली नाळ कापली जाते आणि आपण स्वतंत्र होतो; पण आईसाठी मात्र ती जोडलेलीच असते. खरंच ! किती गोडवा आहे ना 'आई' या शब्दामध्ये. आई या शब्दाचा उच्चार करताच वासल्याची जिवंत मूर्तीच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. आई या छोट्याश्या शब्दामध्ये ममतेचे भांडार भरून ठेवले आहे.


माझी आई.(कथनात्मक निबंध) | Mazi aai

माझी आई.(कथनात्मक निबंध) | Mazi aai


        माझी आई दिवसभर काही ना काही काम करत राहते. घरातील सर्व गोष्टींवर तिचे नीट लक्ष असते. ती घरातल्या प्रत्येकाची नेहमी काळजी घेते. आणि घराला नेहमीच सजून स्वच्छ आणि नीटनेटके ठेवते. बाबांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची मदत करते. माझा अभ्यास, जेवण, कपडे इत्यादी सर्व गोष्टी माझी आईच पाहत असते.


        माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. पण शिस्तीच्या बाबतीतही ती तेवढीच कडक आहे. नेहमीच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते. माझी आई मनमिळाऊ आणि दयाळू आहे. ती घरामध्ये आलेल्या नातेवाईकांचे तसेच पाहुण्यांचे खूप आनंदाने स्वागत करते. माझ्या मित्राना आणि बहिणीच्या मैत्रिणींना ती खूप प्रेम करते.


        माझी आई धार्मिक विचारांची आहे. आमच्या घराशेजारी असणाऱ्या मंदिरात ती पूजेसाठी जाते. आमच्या घरामध्ये सुद्धा एक छोटं मंदिर आहे. ती रोज सकाळी आणि सायंकाळी या मंदिरामध्ये दिवा लावते सायंकाळी देवासमोर हात जोडूनि 'शुभंकरोती'  म्हणायचे तिनेच तर आम्हाला लहान्पणपऊन शिकविले. माझी आई जास्त शिकलेली नाही परंतु ती अंधश्रद्धा आणि वाईट रूढींना मानत नाही. आईचे एकाच स्वप्न आहे की , आम्हाला खप शिकवायचं आणि मोठं करायचं. तिला लहानपणी शिकण्याची खूप आवड होती परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे तिला जास्त शिक्षण घेता आले नाही. पण तिच्याकडे जे समाजात कसे वागावे, कसे बोलावे, आपले आचरण कसे असावे यांचे ज्ञान तिच्याकडे भरभरून आहे . तिला आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचंय आणि एक इमानदार आणि एक उत्कृष्ट नागरिक बनवायचं आहे.


        माझ्यासाठी माझी आईच सर्वकाही आहे. माझी पहिली गुरु तीच आहे अशा माझ्या प्रेमळ आईला कोटी कोटी प्रणाम. 



टिप : हा निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 



हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता. 

  • Majhi aai nibandh in marathi writing

  • Majhi aai nibandh marathi mein

  • Majhi aai mahiti

  • majhi aai nibandh in marathi

  • Mazi aai essay in marathi 

  • Majhi aai nibandh in marathi in short

  • Aai nibandh marathitun

  • aai nibandh marathi download

  • माझी आई मराठी निबंध लेखन 

  • माझी आई निबंध ५वी,६वी,७वी,८वी. 

 



निबंध pdf file download:

मित्रांनो या निबंधाची  Pdf  फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा

माझी आई निबंध.Pdf file. 




  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 

  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 

  • तुमच्या आईविषयी तुम्हाला काय वाटते , तुमचे मत आम्हाला नक्की  COMMENT द्वारे कळवा.




धन्यवाद. 



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.