आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत | Aajchya mahavidyalayin vidyarthache manogat.

आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत | Aajchya mahavidyalayin vidyarthache manogat. free pdf file downlod essay
Admin

 

आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत


आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत | Aajchya mahavidyalayin vidyarthache manogat.

आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थाचे मनोगत | Aajchya mahavidyalayin vidyarthache manogat.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


            वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा मी एक सामान्य विद्यार्थी आहे. जेव्हा मी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता; तेव्हा सर्वांनी महाविद्यालयीन जीवनाचे वर्णन ‘फुलपाखरी जीवन' असे केले होते. महाविद्यालयातील जीवन म्हणजे ‘मज्जाच मज्जा' अशाच प्रकारचे चित्र सर्वजण रंगवतात. पण मला तरी तसा अनुभव आला नाही. महाविद्यालयामध्ये प्रवेश करताना प्रथम माझ्यावर मात्र फार मोठे दडपण होते. आमच्या शाळेतील वातावरण अगदी वेगळे होते. त्यामुळे त्या शाळेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. महाविद्यालयामध्ये हा जिव्हाळा मला कुठेच मिळाला नाही. महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी आपले गट करून असतात. पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्ठी साठीच.बरीचशी मुले आपला महाविद्यालयातील वेळ कॅन्टीन मध्ये किंवा वर्गाबाहेर कट्ट्यावर घालवतात.

            

            महाविद्यालयांमध्ये वर्गामध्ये विद्यार्थांची संख्या एवढी जास्त असते की, आपण शिकवतोय ते या विद्यार्थांना कळले आहे की नाही याकडे प्राध्यापक लक्षही देऊ शकत नाहीत. बहुसंख्य विद्यार्थी हे कुठे ना कुठे खाजगी शिकवणी वर्गात जात असल्याकारणाने विद्यार्थ्यांना हे महाविद्यालयातील शिक्षण महत्वाचे वाटत नाही. ज्या विद्यार्थांची खाजगी शिकवणी वर्गात प्रवेश घेण्याइतपत परिस्थिती नसते. त्यांचे मात्र नुकसान होते. त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, अभिनय, गायन, खेळ यांसारखे अनेक उपक्रम चालू असतात, पण खरे सांगायचे तर, या उपक्रमांमध्ये तर महाविद्यालयातील ठराविक मुलेच सहभागी होतात. बहुसंख्य विद्यार्थी हे प्रेक्षक असतात, काही वेळेला तर क्लास बंक करण्याचा बेत आखला जातो तर काही वेळेला सामुदायिक सुट्टी घेण्याचा कार्यक्रम आखला जातो. मात्र, महाविद्यालयातील विविध  ‘डे’ ज महाविद्यालयातील रोजचे वातावरणच बदलून टाकतात. आणि रंगीबेरंगी बनवतात. त्या वातावरणामध्ये आपण सारे न्हाऊन निघतो. रोझ डे , फ्रेन्डशिप डे, यांसारख्या विविध ‘डे’ ज च्या माध्यमातून महाविद्यालयातील वातावरणाला बहर येतो.


            महाविद्यालयांमध्ये अनेक चांगल्या  गोष्टींसोबत वाईट गोष्टींची लागण लागलेली असते. काही विद्यार्थांना वाईट व्यसने लागलेली असतात. छुपेपणाने त्यांचा प्रसार चालू असतो . या सर्वांपासून स्वतःला वेगळे ठेवणे काही विद्यार्थांना फार अवघड जाते. महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे परीक्षार्थी असतात.ज्ञानार्थी विद्यार्थी या ठिकाणी कमीच आढळतात. हे खरे शिक्षण ठरेल का ?


            आज आपण पहिले तर महाविद्यालयीन शिक्षण महाग बनत चालले आहे. त्याचबरोबर हे शिक्षण घेतल्यावर आपले भविष्य चांगले होईल याबाबत विद्यार्थांना खात्री नसते. किंबहुना पदवी प्राप्त केल्यानंतर ही तो अनेकदा बेकारी च्या प्रवाहात गटांगळ्या खात राहतो. मग त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो ‘ काय उपयोग महाविद्यालयीन शिक्षणाचा ?’


 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

महाविद्यालयात प्रवेश घेताना असलेल्या अपेक्षा – प्रयाक्ष अनुभ – शालेय जीवनाची महाविद्यालयीन जीवनाशी तुलना -  अभ्यासातील गैरसोयी – अभ्यासेतर उपक्रम – व्यसनाधीनता – परीक्षार्थी वृत्ती – खऱ्या ज्ञानापासून दूर – महाविद्यालयीन शिक्षण महाग – त्यानंतरही नोकरीबाबत संभ्रम .]

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 aajchya mahavidyalayin vidyarthyache manogat

vidyarthache manogat

vidyarthache manogat in marathi

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


  • Nibandh pdf file downlod free 

या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनाविषयी तुम्हाला काय वाटते , आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



धन्यवाद 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.