![]() |
👉कौटुंबिक पार्श्वभूमी - वडील : गंगाधरपंत । आई :
पार्वतीबाई
लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे मूळ नाव केशव असे होते.त्यांचे वडील गंगाधरपंत मराठी
शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांच्या आईचे त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी ,तर ते सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झले.
आई- वडिलांचे छत्र हरपल्याने पुढे त्यांचा सांभाळ त्यांचे काका गोविंदपंत यांनी
केला.
👉शिक्षण -
- १८७३ मध्ये बाळ गंगाधर टिळक मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.
- १८७७ मध्ये त्यांनी गणित विषयात बी.ए. केले. पुढे त्यांनी एल.एल.बी. ची पदवी मिळवली.
- वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या व्यायाम शाळेत त्यांनी शरीरसौष्ठव प्राप्त केले.
👉विवाह -
- १८७१ मध्ये सत्यभामाबाईंशी झाला.
- १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
👉कार्य -
- शैक्षणिक कार्याद्वारे टिळकांनी कार्याला सुरवात केली.
- त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह १ जानेवारी १८८० रोजी पुण्यामध्ये 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापन केली .
- १८८१ मध्ये टिळक व आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना सुरु केला.
- ४जानेवारी १८८१ मध्ये 'केसरी ' या मराठी दैनिकाची , तर २ जानेवारी १८८१ मध्ये 'मराठा' या इंग्रजी दैनिकाची सुरुवात केली.
- १८८४ मध्ये भांडारकर, रानडे आणि आगरकर यांच्या साथीने टिळकांनी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना केली.
- २ जानेवारी १८८५ मध्ये आगरकर आणि विष्णुशात्री चिपळूणकर यांच्या साथीने डेक्कन एज्युकेशन सोसायणीच्या 'फर्ग्युसन कॉलेज' ची स्थापना केली.
- तरुणांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी टिळकांनी १८९३ मध्ये 'गणेशोत्सवाची' तर १८९५ मध्ये 'शिवजयंती'ची सुरवात केली.
- १८८९ च्या काँग्रेस अधिवेशनात टिळकांनी सहभाग घेतला.
- १९०५ मध्ये कर्झन वायलीने बंगालची फाळणी केली. हा मुद्दा फक्त बंगालपुरताच मर्यादित न ठेवता टिळकांनी तो देशभर पसरवला. लॉर्ड कर्झनविरोधात केसरीत अग्रलेख लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
- लोकमान्य टिळकांनी बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय यांच्याबरोबर स्वदेशी- बहिष्कार - राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा कार्यक्रम राबवला.
- "स्वराज्य माझा जन्मसिद्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अश्या स्पष्ट शब्दांमध्ये सगळ्यात टिळकांनी स्वराज्याची मागणी केली. यांतूनच स्वातंत्र्य लढ्याचे आंदोलन तीव्र बनत गेले.
- १९०५ मध्ये टिळक यांनी शिवरामपंत यांच्या साथीने देशामधली पहिली परदेशी कापडाची होळी केली.
- १९०७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस च्या सुरत येथील अधिवेशनात 'मवाळ' आणि 'जहाल' गटाचे नेतृत्व टिळकांकडे आले.
- १९०८ मध्ये खुदिराम बोस वृत्तपत्रामध्ये 'देशाचे दुर्दैव' आणि 'हे उपाय टिकाऊ नाहीत' हे अग्रलेख लिहिले त्याविरोधात टिळकांवर खटला भरला गेला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. याच काळामध्ये त्यांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. १७ जून १९१४ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली .
- तुरुंगातून सुटका झाल्यावर अँनी बेझंट यांच्यासह १९१६ मध्ये बेगावला होमरूल लीगची स्थापन केली आणि स्वातंत्र्याचा लढा गतिमान करण्याचा प्रयत्न केला.
- टिळकांच्या मदतीने १९१६ अधे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला.
- सर व्हॅलेटाईन चिरोल यांनी टिळकांचा उल्लेख 'भारतीय असंतोषाचे जनक' असा केला.
- १९०५ ते १९२० हा काळ टिळकांमुळे काँग्रेसमधील जहालमतवादाचा काळ मनाला जातो.
👉केसरी व मराठा-
केसरीचे संपादक म्हणून गो. ग . आगरकर तर मराठाचे संपादक म्हणून लोकमान्य टिळक काम पाहत होते पुढे आगरकर आणि टिळक यांच्यात मतभेद झाल्याने पुढे टिळक हे केसरीचे संपादक झाले.
कोल्हापूर संथानचे दिवाण बर्वे यांच्यावर वृत्तपत्रातून
केलेल्या टीकेमुळे टिळक आणि आगरकर यांवर बर्वे यांनी खटला भरला त्यात दोघांना
साडेतीन महिने तुरुंगवास
१८९७ साली 'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे' व 'सरकारचे डोके ठिकाणावर
आहे काय ? ' हे अग्रलेख छापून आले, त्यावरून
टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला भरण्यात आला. यात लोकमान्य टिळकांना अठरा
महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.
👉ग्रंथसंपदा -
- ओरायन
- आर्क्टिक होम ऑफ द वेदाज
- गीता रहस्य
- 'देव जर अस्पृश्यता पाळणारा असेल तर मी देवाला मुळीच मानणार नाही' (अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, १९१८ मुंबई)
- 'हिंसा या साधनांचा वापर विवेकाने करा. अविवेक किंवा साहस आत्मघातकी ठरू शकतो. ( टिळक क्रांतीकारकांना सल्ला देताना.)
👉मृत्यू -
- १ऑगस्ट १९२०
- lokmanya tilak information Pdf file free download
या माहितीची Pdf file download करण्यासाठी खालील link वर click करा. 👇
Bal Gangadhar Tilak. | लोकमान्य टिळक. Pdf file free download
𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋𑁋
मित्रांनो या Page वरील आपल्या समाजसुधारकांची माहिती आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा. subscribe करा जेणेकरून तुम्हाला या page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल. आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर जरूर कळवा.
धन्यवाद