आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write aatmakathanatmak nibandh

आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write aatmakathanatmak nibandh
Admin

 आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध


आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write aatmakathanatmak nibandh


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

            मित्रांनो Educationalमराठी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आत्मकथनात्मक / आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय ? त्याचा परिचय करून घेणार आहोत.

        या प्रकारच्या निबंधांचे परीक्षेमध्ये लेखन कसे करावे ? तसेच या निबंध प्रकारामध्ये कोणते - कोणते निबंध येतात याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आत्मकथनात्मक/आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय?

परिचय:

        या निबंधप्रकारामध्ये विषयाच्या शीर्षकामध्ये आत्मकथन , आत्मवृत्त, मनोगत, कैफियत, आत्मनिवेदन आणि गाऱ्हाणे  इत्यादी वेगवेगळे शब्द वापरले जातात.

उदा:

      1. पडक्या किल्ल्याचे मनोगत

        2. शेतकऱ्याची आत्मकथा

        3. एका पक्षाचे गाऱ्हाणे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आत्मकथनात्मक निबंधांचे लेखन कसे करावे?


  • या प्रकारचे निबंध लिहीत असताना. विषयात दिलेली सजीव व निर्जीव वस्तू (उदा: पुतळा, किल्लाझाड ) आपण स्वतःच आहोत असे समजावे; आणि त्या वस्तूचे चरित्रचित्रण  करावे. 
  • विषयामध्ये दिलेल्या सजीव वा निर्जीव वास्तूच्या जीवनातील काही निवडक प्रसंग निबंधामध्ये सांगावे.
  • या प्रकारचे निबंध लिहिताना त्यांना आपल्या कल्पना विलासाची जोड द्यावी. ( उदा: शेतकऱयांचे आत्मवृत्त लिहीत असताना त्या शेकऱ्याचे जीवन कसे व्यथित झाले असेल त्याची कल्पना करून निबंध लिहावा. )
  • आत्मनिवेदन लिहीत असताना. विषयामध्ये दिलेल्या सजीवाच्या किंवा निर्जीवांच्या जीवनात झालेले सुरवातीपासूनचे परिवर्तन, बदल याचे वर्ण करावे.
  • मनोगत व्यक्त करत असताना विषयातील वस्तूची एखादी पूर्ण न झालेल्या इच्छेचा समावेश केला पाहिजे.
  • मनोव्यथा, गाऱ्हाणी किंवा कैफियत लिहिताना सजीव व निर्जीव वस्तूंच्या सुख-दुःखांवर भर दिला पाहिजे. त्यांच्या  कोणत्या समस्या, तसेच कोणत्या तक्रारी आहेत त्या प्रभावीपणे मांडल्या पाहिजेत .
  • आत्मनिवेदन, कैफियत, गाऱ्हाणी, मनोगत या शब्दांनी कोणती ना कोणती अपेक्षा व्यक्त होते, असे असले तरीही ते काटेकोरपणे लिहिणे अपेक्षित नाही.
  • विषयाच्या माध्यमातून सजीव-निर्जीव वस्तू जी वाचकांशी बोलत आहे. अशी कल्पना केलेली असते. ( त्यामुळे खालील बाबी लक्षात घ्या)

➤निबंधामध्ये प्रथमपुरुषी वाक्यरचना करावी.

➤निबंधाची भाषा साधी  असाची जेणेकरून वाचकांशी जवळीक साधता येईल.

➤निबंधाच्या मांडणीमध्ये पाल्हाळ नसावे. (जास्त लांबण नसावी, वायफळ मांडणी करू     नये.)

➤निवेदनामध्ये जिव्हाळा, कळकळ तसेच भावनेचा ओलावा प्रकट झाला तरच तो आत्मकथनात्मक निबंध उत्कृष्ट आणि चटकदार बनतो.



            सजीव किंवा निर्जीव वस्तू ला बोलते करण्याचा एक मोठा फायदा  या प्रकारचे निबंध लिहिताना होतो. या सजीव वा निर्जीव वस्तूला आपण ओळखत असतो. त्यांच्याबद्दल आपल्याला थोड्या प्रमाणावर माहिती असते, विविध कारणांनी आपला त्या वस्तूशी संबंध आलेला असतो. यातूनच निबंध लेखन  करत असताना त्या वस्तूची प्रतिमा आपल्या मनात तयार होते . आपण याच प्रतिमेनुसार त्यांच्याशी वागतो.

(उदा: आपण एखादे जीर्ण झालेले पुस्तक हातात घेतले आणि पाने उलटत असताना त्याचे एखादे पान फाटले गेले. या प्रसंगामध्ये  त्या पुस्तकाला काय वाटते ? ते आपल्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिलं? याचा आपण विचार करत नाही .)

         आत्मवृत्तात्मक या निबंधाच्या माध्यमातून असे वेगवेगळ्या नजरेने स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 ✪ या निबंध प्रकारामध्ये येणारे निबंध.

    १. सैनिकाची आत्मकथा
    २. शेतकऱ्याची आत्मकथा
    ३. जीर्ण पुस्तकाचे मनोगत
    ४. मी खुर्ची बोलत आहे
    ५. गगनचुंबी इमारतीचे मनोगत
    ६. वटवृक्षाची कहाणी
    ७. मराठी भाषेची कैफियत
    ८. एका पुतळ्याचे मनोगत
    ९. मुंबईचे आत्मवृत्त
    १०. एका पडक्या किल्ल्याची आत्मकथा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


  • मित्रांनो आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय ? आणि कसे लिहावेत ? याबाबत आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा.
  • subscribe करा जेणेकरून तुम्हाला या  page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल. 
  • आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर  contact form  च्या मदतीने आम्हाला जरूर कळवा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


धन्यवाद 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.