वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write varnanatmak nibadh.

वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write varnanatmak nibadh.
Admin

 वर्णनात्मक निबंध


वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? | How to write varnanatmak nibadh.


        मित्रांनो Educationalमराठी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण वर्णनात्मक निबंध म्हणजे काय ? त्याचा परिचय करून घेणार आहोत. या प्रकारच्या निबंधांचे परीक्षेमध्ये कसे लेखन करावे

        तसेच या निबंध प्रकारामध्ये कोणते-कोणते निबंध येतात याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

(सदर  माहिती  ही १०वी, ११वी,१२वी, यांच्या सुधारित नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे.)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

👉वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय?


परिचय:

            एखाद्या प्राण्याचे, वस्तूचें माणसाचे, वास्तूचे किंवा  आपण पाहिलेल्या एका प्रसंगाचे व दृश्याचे सांगोपांग वर्णन  करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


👉निबंधांचे लेखन कसे करावे ?


            आपण ज्या प्रसंगाचे वर्ण केले आहे. त्या प्रसंगामधील , दृष्यामधील, मानवी स्वभावांतील बारकाव्यांचा सविस्तर तपशील वर्णनात्मक निबंधामध्ये लिहिणे आवश्यक असते.

           ( उदा: समजा आपण निबंधामध्ये एका व्यक्तीचे वर्ण करीत असताना; त्या निबंधामध्ये त्या व्यक्तीच्या सद्गुणांबरोबरच त्या व्यक्तीमध्ये कोणत्या कोणत्या उणीव आहेत. त्या देखील निबंधामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत.)

            तसेच, त्या व्यक्तीच्या हालचालीलकबीसवयी यांतील बारकावे सांगितले पाहिजेत. जर आपण निबंधामध्ये वर्णन  केलेली ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अशा प्रकारे निबंध लेखन  घडले तर तो उत्कृष्ट वर्णनात्मक निबंध ठरेल.

            आपण ज्याप्रमाणे व्यक्तीचे वर्णन करतो तशाचप्रकारे वस्तू , दृश्य, प्रसंग, ठिकाण , यांचेही हुबेहूब वर्णन  लिहिणे गरजेचे आहे.

            आपण वर्णन केलेले ते  ठिकाण,ती वस्तू आपण समोर उभी राहून पाहत आहोत, असा प्रत्यय आला पाहिजे. 

            प्रत्यकारकता हा वर्णनात्मक निबंधाचा महत्वाचा पैलू आहे. एक प्रकारे या प्रकारच्या निबंधाच्या माध्यमातून एक जिवंत, हुबेहूब शब्दचित्र तयार व्हावे लागते.


👉लक्षात ठेवा :

  • र्णनात्मक निबंधाची भाषा  चित्रदर्शी असावी.
  • या प्रकारच्या निबंधांचे लेखन ओघवत्या भाषेत असावे.
  • आपण ज्या विषयाचे वर्णन करत आहोत तो प्रसंग वाचकांसमोर साकार व्हायला हवा.
  • वर्णनात्मक निबंध म्हणजे आपण जो विषय निवडला आहे. त्याचे फक्त वरवरचे किंवा बाह्य वर्णन नाही तर प्रत्यक्ष पाहिलेला आहे, असे गृहीत धरून लेखन करावे.

                त्या प्रसंगामुळे आपल्या मनावर काहीएक परिणाम होतो भावना उत्पन्न होतात.आपल्यावर झालेला हा परिणाम व्यक्त करण्यासाठी प्रकट करण्यासाठी. वर्णन  केलेल्या विषयाची वैशिट्यपूर्णता, आपल्याला भावलेले रूप शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यामुळे आपण केलेले वर्णन हे वरवरचे किंवा कोरडे राहत नाही. त्यामध्ये भावनात्मकता येते. आणि निबंध हा वाचनीय आणि प्रभावी होतो.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


या निबंध प्रकारामध्ये येणारे निबंध.

    १. रम्य ते शालेय जीवन

    २. माझा भारत महान !

    ३. आजचा संसारी माणूस

    ४. चांदण्यातील सहल

    ५. आमच्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलन

    ६. एक थंड हवेचे ठिकाण

    ७. अविस्मरणीय प्रसंग

    ८. माझा महाराष्ट्र

    ९. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका

    १०. दुष्काळ- एक आपत्ती


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



  • वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?याबाबत आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला comment करून जरूर कळवा.
  • subscribe करा जेणेकरून तुम्हाला या  page वरील माहिती लगेच उपलब्ध होईल. 
  • आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर  contact form  च्या मदतीने आम्हाला जरूर कळवा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


धन्यवाद 












Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.