BUY PROJECT PDF Click Here!

Mala pankh aste tar | मला पंख असते तर.. (कल्पनात्मक निबंध)

Mala pankh aste tar | मला पंख असते तर.. (कल्पनात्मक निबंध) निबंधाची pdf file downlod करा. येथून
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

मला पंख असते तर.. 


मला पंख असते तर.. (कल्पनात्मक निबंध) | Mala pankh aste tar...

मला पंख असते तर.. | Mala pankh aste tar... 

        मला पंख असते तर.... . मित्रांनो Educationalमराठी वर तुमचे स्वागत आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात, प्रवास करताना गर्दी आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागले. तेव्हा मनात विचार येतो मला पंख असते तर ... आणि आपण त्यावर विचार करायला लागतो . असाच एक निबंध आज खास विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूया. 

  • निबंधाची Pdf file downlod करण्यासाठी लिंक खाली दिली आहे तेथून तुम्ही निबंध डाउनलोड करू शकता.  


        शिक्षणासाठी शहरातल्या शाळेत प्रवेश घेतल्यापासून मला घरापासून दूर, शहराच्या ठिकाणी राहावे लागले आहे. आता दीड वर्ष व्हायला आली तरी काही घराची ओढ कमी होत नाही त्यात अचानक शाळेला दोन दिवस सुट्टी मिळाली. रविवार जोडून आल्याने तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती. मला घरी जावेसे वाटत होते पण त्यासाठी गाडीभाडे खर्च करणे परवडणारे नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आत्ता मला पंख असते तर.. तर मी माझे पंख पसरून क्षणात भरारी मारली असती आणि उडत-उडत घराच्या अंगणातील झाडावर जाऊन बसलो असतो. आईला आश्चर्याचा धक्काच दिला असता. पण मला पंख असते तर मी  घर सोडून कशाला येथे शहरामध्ये राहायला आलो असतो. रोज उडत-उडत महाविद्यालयात आलो असतो नाही का ?


        पण... हे केव्हा शक्य होते, मला पंख असते तर. मला फिरण्याची खूप आवड आहे. नव-नवीन ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणाची माहिती जाणून घ्यावी, असे मला वाटते. पण आज तरी ते मला परवडणारे नाही. मग मी माझी ही प्रवासाची आवड, दुधाची तहान ताकावर भागवावी या रीतीने पूर्ण करतो. मी भरपूर प्रवासवर्णने वाचतो आणि जणू त्या स्थळांना मी प्रत्यक्षात भेटी दिल्या आहेत असे समजून आनंद उपभोगतो. मला पंख असते तर मी काश्मीरला जाऊन आलो असतो. कन्याकुमारीला जाऊन विवेकानंद स्मारक पाहून आलो असतो आणि ,मुख्य म्हणजे या धावपळीच्या जीवनातून थोडी उसंत मिळवून कोकणातील निसर्ग न्ह्याहाळून सगळा क्षीण घालवला असता. पंख असते तर प्रवासावर होणार मोठा खर्च वाचलाच असता. पण त्याचबरोबर प्रवासातील इतर अनेक कटकटी-गर्दी, आगाऊ तिकिटे काढणे, जागा राखून ठेवणे या गोष्टी टळल्या असत्या.


        मला पंख असते तर पासपोर्ट, व्हिसा यांसारख्या कटकटींपासून सुटका मिळाली असती. परदेशांतील विविध शाळांना भेटी देऊन मी विविध स्थानाचे वर्ण करून अनेक पुस्तके लिहिली असती व प्रसिद्धी मिळवली असती. मला पंख असते तर मी अनेक गिर्यारोहकांना साथ दिली असती. सप्तसागरांचे भ्रमण केले असते. पंख मिळाल्यावर माझा प्रवास होणार तो अवकाशातून मग मी आकाशात उंचच-उंच भरारी घेतली असती. पक्षांसोबत उडण्याची शर्यत लावली असती. गर्द निळ्या आकाशाला डोळ्यांमध्ये भरले असते. उंचावरून उडत असताना ढग देखील मला स्पर्श करून पुढे निघून गेले असते. इंद्रधनुष्यातील रंगांना मी खुप जवळून पाहू शकलो असतो. तसेच प्रवासाच्या वेळी वाहनाच्या गर्दीचा त्रास मला चुकवता येणार! पण माझ्याप्रमाणे अनेकांना असे पंख लाभले तर पुढे आकाशमार्गावरही गर्दी उसळायची !


        माझे खूप मित्र माझ्यापासून दूर राहतात. त्यांच्या वाढदिवसाच्या समारंभाला ते मला आमंत्रण देखील देतात, पण ते दूर राहत असल्याने मला त्यांच्यापर्यंत जाणे शक्य होत नाही. मला पंख असते तर मी एका क्षणात भरारी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचलो असतो. आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालो असतो. आजारी मित्रांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली असती. शिक्षणासाठी दुसऱ्या शहरामध्ये राहणारी माझी ताई रक्षाबंधनाला मला पोस्टाने राखी पाठवते. मला पंख असते, तर मी रक्षाबंधनाच्या दिवशी तिला भेटायला गेलो असतो . आणि तिच्याकडून राखी बांढून घेतली असती.


        उडण्याहची शक्ती माझ्याकडे असल्यामुळे. जेव्हा कुठे अपघात झाला असता किंवा कोणती आपत्ती ओढवली असती तर त्या वेळी त्या अपघातामध्ये अडकलेल्या लोकांना तात्काळ मदत करायला गेलो असतो. पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपतींमध्ये लोकांना वाचवण्याचे व सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याच्या कामामध्ये मी मदत केली असती.


        याचप्रकारे पंख असल्याने  मला खूप फायदा झाला असता. कुठे यायला जायला पैशांची गरजच लागली नसती. शाळेमध्ये उडत उडत पोहचलो असतो. आईने बाजारातून सामान आणायला सांगितले असते तर मी लगेच तिला आणून दिले असते.


        मला पंख लाभले तर, लहान मुले माझी गणना पऱ्यांमध्ये करू लागतील. कारण त्यांनी वाचलेल्या परीकथांतील पऱ्यांना , राजकुमारांना पंख असतात. मग माझा भाव वाढेल आणि मला पाहण्यासाठी मोठी गर्दी उडेल. म्हातारपणात या पंखाचा मला फार उपयोग होईल. कारण बहुतांश वयस्कर माणसांचे गुढगे म्हतारपणात त्यांची साथ देत नाहीत ते दुखू लागतात. आणि त्यांना चालायला जमत नाही. पण म्हातारपणी माझ्या या पंखांत तरी शक्ती राहील का ?


        आज मात्र या पंखांमुळे मला झोपणे जरा अवघडच होईल, मग काही काळ पंख बाजूला काढून ठेवता येतील का ?  नाहीतर वाटते नको बाबा हे पंख ! त्यापेक्षा आपले पायच बरे ! हवे तेव्हा पोटाशी घेता येतात.


        सत्य हे आहे की, मला पंख कधी असणारच नाही. परंतु पंख असण्याची कल्पना कार्यातही केवढा आनंद आहे. !




मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇


[मुद्दे:

  • शिक्षणासाठी घरापासून दूर
  • घरी जाण्याची ओढ
  • पंख मिळाले;असते तर यावर मात करता आली असती.
  • भरपूर प्रवास केला असता
  • प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी टाळया असत्या
  • प्रवासवर्णने  गिर्यारोहण
  • भरभरून आकाशाची सैर
  • दुसऱ्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटणे शक्य
  • संकटात सापडलेल्यांची मदत
  • अनेक प्रकारःचे फायदे
  • पऱ्यांशी साम्य
  • भटारपणी फायदा
  • झोपताना अडचण
  • कल्पना खूप आनंददायी. ]




हा निबंध खालील प्रकारे शोधू शकता. 

  • Mala pankh aste tar

  • Mala pankh futale.

  • Essay on if i had wings in marathi language

  • Mala pankh aste tar nibandh in marathi

  • Mala pankh aste tar short essay in marathi. 

  • मला पंख असते तर निबंध 

  • मला पंख असते तर मराठी निबंध 

  • मला पंख असते तर हा निबंध 

  • मला पंख असते तर essay 

  • मला पंख असते तर essay in marathi 





निबंध pdf file :

मित्रांनो या निबंधाची  Pdf  फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा

मला पंख असते तर... निबंध.Pdf file. 




  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुम्हाला जर पंख असते तर तुम्ही काय काय केला असतात, तुमच्या कल्पना आणि तुमची मते आम्हाला नक्की  COMMENT द्वारे कळवा.


धन्यवाद. 


 



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.