माझा महाराष्ट्र | Maza maharashtra

माझा महाराष्ट्र | Maza maharashtra free pdf file download here nibandh pdf file download
Admin

 

माझा महाराष्ट्र



माझा महाराष्ट्र | Maza maharashtra

माझा महाराष्ट्र | Maza maharashtra 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


            ‘मी मराठी ! माझा महाराष्ट्र !’ ही माझी अत्यंत प्रिय आणि अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझ्या देशाला आणि माझ्या महाराष्ट्राला मी कधीच विसरू शकत नाही. हीच प्रत्येक मराठी माणसाची स्थिती असते. आज आपण पहिले तर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळींची संमेलने साजरी होतात. मला खात्री आहे ही परंपरा वर्षानुवर्ष अशीच चालू राहील.

माझा आवडता सण : होळी 

            माझ्या महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम दिशेला आहे. भारताची इतर राज्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने मोठी आहेत. पण महाराष्ट्र मोठा – ‘महा’ – ठरला तो त्याच्या गुणांमुळेच. माझ्या महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. एका बाजूला माझ्या महाराष्ट्राला कोंकण किनारपट्टी आहे तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा कणखर कडा आहे. म्हणूनच तर कवी गोविंदाग्रज माझ्या या महाराष्ट्राचा गौरव  ‘कणखर देश’ ‘दगडांचा देश 'असा करतात. भारतामध्ये स्थित असणाऱ्या इतर राज्यांपेक्षा माझ्या महाराष्ट्राला कमी सुपीक जमीन लाभली असली तरीही इथल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला अन्नाची कधीही कमतरता भासू दिली नाही. सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या या मराठी माणसांच्या गरजाही फार मर्यादितच आहेत. त्यमुळे मिळेल ती चटणी-भाकरी खाऊन सतत खुश राहणारा मराठी माणूस आपल्या दारी आलेल्या अतिथीला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही . त्यामुईल महाराष्ट्रामध्ये चारी बाजुंनी इतर राज्यांतील माणसे आली आणि ती महाराष्ट्राचीच झाली आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन मानला जातो. म्हणून तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आज संपूर्ण भारत देशाचे प्रतिक झाली आहे.

माझा आवडता ऋतू : पावसाळा

            महाराष्ट्रामध्ये गंगा , ब्रह्मपुत्रा यांसारख्या प्रचंड नद्या असल्या तरीही गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना आणि इतर अनेक नद्यांनी महाराष्ट्राच्या भूमीला सदैव सुपीक आणि  हिरवेगार ठेवले आहे. महरष्ट्राला कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे प्राप्त झाली नाही. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले . पण त्यासाठी महाराष्ट्राला फार मोठी झुंज द्यावी लागली. त्यानंतर कोयनेच्या आणि लातूरच्या भुकंपानी महाराष्ट्राला धक्के दिले . परंतु या प्रत्येक संकटांचा मोठ्या धैर्याने सामना करून माझा महाराष्ट्र अधिकाधिक  प्रगती करू लागला.

रम्य ते शालेय जीवन

            महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी  ‘स्वराज्याची’ कल्पना याच महाराष्ट्राच्या मातीत रुजवली. पराक्रमात महाराष्ट्र हा केव्हाही मागे पडला नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर यांनी एवढी महान कामगिरी पर पडली आहे की, आपण ती कधीच विसरू शकत नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये जोतीराव फुले , महर्षी कर्वे  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. माझ्या या मायभूमीला संतांची आणि साहित्तीकांची फार मोठी परंपरा लाभली आहे. विविध कला क्षेत्रे तसेच क्रीडा क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आपली कामगिरी प्रामाणिकपणे बजावत राठीला . अजिंठा , वेरूळची लेणी आजही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकविसाव्या शतकाच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी माणूस अग्रेसर आहे.

माझा भारत महान !

            महाराष्ट्राने आपले नाव सदैव सार्थ ठरवले आहे. त्यामुळेच आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी तो अभिमानाने मराठी मातीचा टिळा लावतो. असा हा माझा महाराष्ट्र मला प्राणप्रिय आहे.  


वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

                मराठी माणसाला मराठी असल्याचा अभिमान - हा अभिमान तो असेल तेथे व्यक्त करतो - खडकाळ प्रदेश - उंच पर्वत - काष्ठाळू माणसे - गरजा कमी - सर्वाना सामाऊन घेण्याची वृत्ती - मुंबई चे स्वरूप - प्रत्येक गोष्ठीसाठी लढावे लागले - संकटातून प्रगती - नररत्नांची खाण - सर्व क्षेत्रांत प्रगती - नाव यथार्थ ठरवले ]

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 माझा महाराष्ट्र निबंध 
माझा महाराष्ट्र निबंध सातवी 
माझा महाराष्ट्र निबंध लेखन 
माझा महाराष्ट्र निबंध मराठीत 
माझा महाराष्ट्र माहिती निबंध 
Maza maharashtra nibandh 
Garja maharashtra maza nibandh
Jay Jay maharashtra maza nibandh 
Maza maharashtra nibandh marathi madhe 
Maharastra maza mahan nibandh 
Maza maharastra nibandh mahiti marathi madhe. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


  • Nibandh pdf file downlod free 

या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 





➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • माझा महाराष्ट्र या विषयावर तुमचे विचार आम्हाला नक्की COMMENT द्वारे कळवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



धन्यवाद 


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.