Veleche mahatwa | वेळेचे महत्व (वैचारिक निबंध)

Veleche mahatwa | वेळेचे महत्व (वैचारिक निबंध). nibandh pdf file free download.
Admin

 

           वेळेचे महत्व



Veleche mahatwa | वेळेचे महत्व (वैचारिक निबंध)

Veleche mahatwa | वेळेचे महत्व (वैचारिक निबंध)



        फ्रांस चा सम्राट नेपोलियन बोनापार्ट एक महान विजेता होता. पण वाटरलू  येथे इंग्रजांबरोबर झालेल्या युद्धामध्ये त्याची अतिशय वाईट  झाली. त्याच्या  पराभवाचे कारण होते की, त्याच्या एका सेनापतीचे मदतीसाठी अर्धा तास उशीत पोहोचणे. जर नेपोलियनला त्याच्या सेनापतीची मदत वेळेवर मिळाली असती, तर तो या घोर पराभवापाससून वाचू शकाल असता. यावरून हे समजते की आपल्या जीवनामध्ये वेळेला किती महत्व आहे.


            खरंच ! वेळ ही अतिशय महत्वाची आहे. गेलेले धन पुन्हा प्राप्त करता येते पण निघून गेलेली वेळ कधीच  परत येत नाही. आपल्या जीवनातला एक-एक क्षण मौल्यवान आहे. वेळ वाया घालवणे म्हणजे आपले जीवन वाया घालवण्यासारखे आहे. म्हणून वेळेचे महत्व जाणून घेऊन वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायला पाहिजे.


            योग्य वेळी योग्य काम करणे हेच बुद्धिमान माणसाचे लक्षण आहे. शेतकऱ्याने जर वेळेवर  सर्व कामे केली तर त्याच्या परिवाराला खाण्यापिण्याचा तुटवडा भासत नाही. व्यापाऱ्याने जर वेळेनुसार त्याचा  त्याचा व्यापार चालवला तर  त्याची तिजोरी कायम भरलेली राहते. युद्धामध्ये सैन्याने आपल्या शत्रूवर वेळेवर आक्रमण केले  त्या सैन्याचा नक्कीच विजय होतो. जो विद्यार्थी आपला अभ्यास वेळेवर करतो. तो परीक्षेमध्ये कधी नापास होत नाही. शहरातल्या धावपळीच्या जीवनामध्ये  वेळेचे नियोजन करणे खूपच गरजेचे असते. ऑफिसला वेळेवर पोहचलो नाही तर ऑफिस मधील उच्च पदस्य अधिकाऱ्यांचा ओरडा खावा लागतो.  महिलांची कामे करण्याची वेळ चुकली तर त्यांना नळाचे पाणी सुद्धा भारत येत नाही. म्हणून आपण वेळेचे  महत्व लक्षात घेऊन तिचा योग्य वापर केला पाहिजे.


            वेळेचे महत्व समजून न घेणे हा वेडेपणा आहे. काही लोक उशिरापर्यंत झोपून राहतात. विविध खेळ खेळण्यात तसेच गप्पा मारण्यात आपला किंमती वेळ घालवतात. वेळेचे महत्व समजून न घेणाऱ्या माणसांचे जीवन बरबाद होऊन जाते. जे लोक वेळ वाया घालवतात, वेळ त्यांचे आयुष्य वाया घालवते.


            वेळेचा सदुपयोग करण्याचा चांगला उपाय म्हणजे, आपल्या कार्यानुसार आपल्या वेळेचे नियोजन करणे, व त्याचे पालन करणे. अभ्यास , खेळ, व्यायाम, जेवण, मनोरंजन यासाठी वेळेचे विभाजन करणे. आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे; असे केल्यामुळे सगळी महत्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील आणि पश्चातापाची वेळ आपल्यावर  येणार नाही.


            सगळ्या महापुरुषांनी वेळेला महत्व दिल्याचे आपल्याला आढळते. गांधीजी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये  राहायचे . पंडित जवाहरलाल नेहरू रोज अठरा तास काम करायचे. सर्व महापुरुषांनी वेळेला महत्व दिले आणि त्यामुळेच ते अमर झाले !



✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎


मित्रांनो निबंध लिहिताना या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.👇


[मुद्दे:     

प्रस्तावना - वेळ अनमोल आहे - वेळेचे महत्व समजून घेण्याचे फायदे - वेळेचे महत्व समजून न घेतल्याने होणारा तोटा - वेळेचा अपव्यय करणे ही सर्वात मोठी चूक - वेळ आणि महापुरुष]


✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 


  • वेळेचे नियोजन निबंध
  • वेळेचे सदुपयोग मराठी निबंध
  • वेळेचे महत्व निबंध मराठी
  • वेळेचे महत्व निबंध in marathi
  • वेळेचे महत्व निबंध लेखन
  • वेळेचे महत्व निबंध मराठीमध्ये


✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎


Nibandh pdf file downlod free 

Nibadh Pdf file: 
या निबंधाची Pdf file downlod  करण्यासाठी खालील link वर click  करा. 


वेळेचे महत्व निबंध Pdf file 


✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन कसे करता ?आम्हाला  नक्की COMMENT द्वारे कळवा.


                      ✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎✎


धन्यवाद.


 

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.