संतांचे सामाजिक कार्य | Santanche samajik karya

संतांचे सामाजिक कार्य | Santanche samajik karya
Admin

 

संतांचे सामाजिक कार्य


संतांचे सामाजिक कार्य | Santanche  samajik karya


संतांचे सामाजिक कार्य | Santanche  samajik karya


➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰



जे का रंजले गांजले| त्यांसी म्हणे जो आपुले|

तोचि साधू ओळखावा| देव तेथेचि जाणावा||


            या अभंगात संत तुकाराम महाराजांनी संतांच्या कार्याचे जणू सर सांगितले आहे. दारिद्र्यात खितपत  पडलेले, दुखाच्या खाईत लोटले गेलेले अशा दीनदुबळ्या लोकांची सेवा करणारच खरा संत होय. त्याच्याच ठिकाणी देव राहत असतो. केवढा महान विचार सांगितला आहे संत तुकाराम महाराजांनी.


            संत म्हणजे फक्त देव देव करत हिंडणारे लोक, असा गैरसमज काही लोकांनी करून घेतला आहे. जसजसे मी उच्च शिक्षण घेत गेलो तास तसे मला संतांची खरीखुरी ओळख होत गेली. ते केवळ भजन करीत बसणारे नव्हते तर ते माणसांना जीवनाचा मार्ग दाखवत होते. माणुसकीचा मार्ग दाखवत होते.


            तुकाराम महाराज असोत वा अन्य कोणतेही संत असोत, ते केवळ शाब्दिक उपदेश करीत नव्हते. ते स्वतःच्या कृतीतून लोकांना उपदेश करीत होते. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मुलांसाठी घेतलेला उसाच्या कांद्या वाटेत भेटलेल्या दुसऱ्यांच्या लहान मुलांना वाटल्या, कारण त्यांना त्या लहान मुलांमध्ये स्वतःची लहान मुले दिसली. याच तुकाराम महाराजांनी दुष्काळात घारेच्या घरे उपाशी तडफडू लागली तेव्हा स्वतःच्या घरातले धान्य लोकांना मुक्तहस्ते वाटून टाकले. ज्या काळामध्ये अस्पृश्यता उघडपणे पाळली जायची, जय काळात अस्पृश्याची सावली अंगावर पडली तरी उच्चवर्णीय लोक पाप झाले असे मनात असत, त्या काळात संत एकनाथांनी एका महाराच्या व्याकूळ होऊन रडणाऱ्या बाळाला कडेवर घेतले आणि त्याला त्याच्या घरी पोहचवले. या कृतीतून संत एकनाथांनी जातीयतेविरुद्ध बंड करण्याचा विचार मांडला होता.


            संतानी भक्तीच्या क्षेत्रांत तरी जातीयतेला पूर्णपणे गाडले. म्हणूनच नामदेव शिंपी, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा, सावता माळी, बंका महार, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत सखुबाई,संत भागुबाई, अशा विविध जातीजामातींतील व्यक्तींना संतपद प्राप्त झाले. तसेच पूर्वीच्या काळी भक्तिमार्ग हा जाचक कर्मकांडांनी व्यापला होता. त्यात सामान्यजनांना प्रवेश नव्हता. संतानी ही स्थिती उधळून लावली. साध्या नाम्स्म्रानानेही भक्ती करता येते, ही त्यांनी दाखवून दिले. संत सावता माळी यांनी कांदा-मुळा भाजी यात विठ्ठल सामावला आहे, असे भक्तिभावाने संतीतले. आपले दैनंदिन कामही निष्ठेने पर पाडण्यात परमेश्वराची भक्ती सामावलेली आहे, हेच त्यांनी दाखवून दिले.


            संत नामदेवांनी भारतभर पदयात्रा करून अफाट कार्य केले. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, सिंध अशा विविध प्रांतातल्या बोलीभाषांमध्ये त्यांनी भक्तीरसाने ओथंबलेल्या काव्यरचना केल्या. त्यांना सर्व ठिकाणी अलोट प्रतिष्ठा मिळाली. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली गेली. शीख बांधवांच्या ‘ग्रंथसाहिबा’ या धर्मग्रंथात संत नामदेवांच्या रचना विराजमान झाल्या आहेत! संत नामदेव त्या काळामध्ये एक प्रकारे आंतरभारतीचे कार्य करीत होते. भारतीय एकात्मता घडवत होते.


            संत ज्ञानदेवांनी सर्वसामान्यांच्या वाणीला प्रतिष्ठा दिली आणि परंपरेला मोठे धाकी दिले. गूढ-गहन अध्यात्म उच्च दर्जाचे विचार फक्त संस्कृतमध्येच व्यक्त होऊ शकतात, मराठी भाष त्यासाठी फारच अपुरी आहे, असे त्या वेळच्या घमेंडी ब्रह्मवृंदाला वाटत होते. पण ‘माझा मराठीचा बोलू कवतिके | अमृतातेही पैजा जिंके||’ असे ज्ञानदेवांनी त्यांना ठणकावून सांगितले आणि भगवदगीतेतील उच्च दर्जाचे तत्वज्ञान त्यांना साध्याभोळ्या मराठीजनांना साध्याभोळ्या वाणीतून प्रकट केले. ही एक महान क्रांतीच होती.


            समर्थ संप्रदायाचे संत रामदास हे तर एक आगळेवेगळे संत होते. त्यांनी ‘आधी प्रपंच नेटका | मग परमार्थ साधावा ||’ असे स्पष्टीकरण दिले आहे. बलोपासनेसाठी व्यायामशाळा सुरू करणारे हे एकमेव संत. सुंदर अक्षर कसे काढावे इथपासून ते काय काय खावे इथपर्यंत जीवनातील सर्व बाबींचे अगदी तपशीलवार मार्गदर्शन त्यांनी केले आहे. ‘शहाणे करावे सकल जन’ हे व्रतच त्यांनी घेतले होते. हे सर्व लक्षात घेतले की संतानी केवढे मोठे सामाजिक कार्य केलेआहे, हे लक्षात येते. मी तर आत्ता निश्चय केला आहे की, लवकरच मी ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकारामांची गाथा’ आणि ‘दासबोध’ हे तीनही ग्रंथ बारकाईने वाचणार आहे.

 

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारा तो संत

केवळ भक्तिमार्गाचा संदेश नाही

जीवन उद्धाराचा संदेश

कृतीतून उपदेश

भक्तीच्या क्षेत्रात जातीयता नष्ट

भक्तीचा मार्ग सुलभ

संत नामदेवांचा भारतभर प्रचार

ज्ञानदेवांनी मराठीला प्रतिष्ठा दिली

समर्थ रामदासांचे व्यावहारिक जीवनासंबंधी मार्गदर्शन

शेवट ]


 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • संतांचे सामाजिक कार्य निबंध मराठी
  • संतांचे सामाजिक कार्य निबंध
  • संतांचे कार्य निबंध मराठी
  • Santanche kary Marathi nibandh
  • Santanche samajik kary nibandh Marathi
  • Santanche samajik kary nibandh

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • तुमच्या वाचनात आलेले संतांचे सामाजिक कार्य, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰


धन्यवाद



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.