BUY PROJECT PDF Click Here!

माणूस बोलणे विसरला तर.. | Manus hasane visarala tar...

माणूस बोलणे विसरला तर.. | Manus hasane visarala tar... mansane hasnyachi shakti gamavali tar...
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

माणूस बोलणे विसरला तर..



माणूस बोलणे विसरला तर.. | Manus hasane visarala tar...

माणूस बोलणे विसरला तर.. | Manus hasane visarala tar...


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


            राजूची आई एकदा कोणत्या तरी कारणावरून राजूवर रागावली होती. रागाच्या भरात ती राजूला म्हणाली, गप्प बस ! तोंडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस”! नाहीतर मुस्कटात देईन ! त्याच रागाच्या भारामध्ये तिने घरातील सर्वाना दरडावून सांगितले – याच्याशी कोणीही एक शब्दसुद्धा बोलायचे नाही! मी हे सारे ऐकत होतो. माझ्या मनामध्ये विचार आला- राजू आत्ता शब्दांच्या दुनियेतून हद्दपार झाला. ! तो एक शब्दसुद्धा उच्चारू शकत नव्हता की, त्याच्या कानावर एकही शब्द पडणार नव्हता. किती दुःख झाले असेल त्याला! मला वाटू लागले की माणूस बोलणेच विसरून गेला तर ? तर किती बरे झाले असते! निदान राजूची अशी दयनीय स्थिती झाली नसती.


            राजुचीच कशाला? अशा दयनीय स्थितीतून अनेकांची सुटका झाली असती. नव्हे, अशी दयनीय स्थिती उद्भवलीच नसती.. शब्द हे दुधारी शस्त्र आहे, हे आपल्याला ठावूकच आहे. अत्यंत कटू बोलांनी माणसे अनेकदा इतरांची हृदये विदीर्ण करतात. एखादेवेळ शास्त्रांनी झालेल्या जखमा भरून निघतात पण शब्दांनी केलेल्या जखमा या कधीही भरून निघत नाहीत. बोलण्यामुळे निर्माण झालेले वैर लोकांमध्ये कायमचे वैर निर्माण करते. या जखमेमुळे काही वेळा कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत.  कटू शब्दांनी महाभारतात हैदोस घातला आहे. हे सर्वज्ञातच आहे. माणसाजवळ बोलण्याची क्षमता नसती, तर मानवी जीवनातील हा दुःखद भाग नाहीसा झाला असता.


            माणूस बोलणे विसरला असता तर, एक फार चांगला परिणाम घडला असता. तोंडाने बोलायचे नसल्याने हावभाव, हातवारे करून बोलावे लागले असते. त्यामुळे रस्ता, बाजार इत्यादी ठिकाणचा गोंगाट पूर्णपणे नष्ट झाला असता. माणसाची ध्वनिप्रदूषणापासून सुटका झाली असती. मात्र त्याच वेळी आजूबाजूला विनोदी दृश्यांची रेलचेल झाली असती. नुसती आपण कल्पना केली तर – दोन शेजारणी एकमेकींशी जोरजोरात भांडत आहेत किंवा बी वर्गात शिकवत आहेत किंवा एखादी गृहणी भाजीवालीशी भाजीच्या दरात घासाघीस करीत आहेत. किंवा सभेमध्ये विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षावर तावातावाने घणाघाती टीका करीत आहे! किती बहारदार दृश्ये असतील ही!


            ते काहीही असो, परंतु बोलणे नसतेच, तर आपण खूप काही गमावले असते. बोलणे ही माणसाची फार मोठी शक्ती आहे; माणूस आपल्या भावना, आपले विअचार बोलण्यातूनच व्यक्त करत असतो. मनासाखेरीज अन्य कोणत्याही प्राण्याकडे ही शक्ती नाही. अन्य कोणत्याही प्राण्याकडे ही शक्ती नाही. या शक्तीमुळेच तर माणूस हा श्रेष्ठ प्राणी बनला आहे!


            बोलण्याची शक्तीच नसती तर माणसाने मोबाईलवरून कसा काय संवाद साधला असता? त्याला रेडिओ कसा काय एकता आला असता. त्याचप्रमाणे लाऊडस्पीकर ची गरजच निर्माण झाली नसती.  दूरचित्रवाणी, चित्रवाणी, चित्रपट हे तर मुके बनले असते! बोलणे नसते तर लेखनकला निर्माण झाली नसती, छपाईची कला नसती. श्रीमद् भगवद्गीता, रामायण-महाभारत, बायबल यांसारखे ग्रंथ आणि शेक्सपिअर, कालिदास यांसारख्या थोर लेखकांचे वाङ्मय निर्माण झाले नसते. आज आपण कित्येक हजार वर्षांपूर्वीच्या माणसाचे लेखन वाचू शकतो. त्यामुळे मान्सास्च्या बोल्न्यदेअरे आपण आल्या विचार, कल्पना, भावना व्यक्त करतो; माहितीचा प्रसार करोत. शब्दांत आपले ज्ञान साठवतो. म्हणून शब्दांनीच माणसाच्या ज्ञानाचे जतन केले आहे, प्रसार केला आहे. हे सर्व आपण गमावले असते. म्हणजे आपण आजची प्रगती साधलीच नसती. आपण आदिमानवाच्या पातळीवरच राहिलो असतो.


            शब्द ही अनमोल रत्नाप्रमाणे आहेत. आईने दिलेली शाबासकी, बाबांनी केलेला उपदेश, मित्राची सदिच्छा हे सर्व शब्दांतच असते. काही शब्दांनी तर इतिहास घडवला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील ‘वंदे मातरम्’ हे मंतरलेले शब्द किंवा सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची ‘चलो दिल्ली’ ही घोषणा या शब्दांनी कोट्यावधी भारतीयांची अंतकरणे चेतवली आहेत. बोलणे नसते, तर हे शब्दही नसते. हे शब्द म्हणजे नुसते ध्वनी नव्हेत. त्यांत माणसाची सारी संकृती आहे. माणसाचे सर्व सामर्थ्य त्यांत एकवटले आहे. अशा या शब्दांना, या बोलण्याला माणूस नाहीसे कसे होऊ देईल?

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

ही कल्पना मनात निर्माण करणारा प्रसंग

कटू बोलण्याने निर्माण होणारे दुःखद प्रसंग टळतील

ध्वनिप्रदूषणापासून सुटका

बोलणे, भाषा या शक्तीला माणूस मुकला असता.

दूरध्वनी, रेडिओ इत्यादींचा शोध लागला नसता.

अनेक शोध संशोधने ज्ञानाचा प्रसार इत्यादी सर्व दूर

प्रगती अशक्य

भाषेत भावभावना, विचार यांचा साठा

माणूस बोलणे विसरणे अशक्य  

शेवट ]

 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

माणूस बोलण्याची शक्ती हरवून बसला तर

माणूस बोलणे विसरला तर

बोलण्याची क्षमता नसती तर

Bolnyachi Shakti harvun basala tar

Manus bolane visarla tar

Bolnyachi skhamata nasti tar.

 


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • माणूस बोलणे विसरला तर... या कल्पनेबाबत तुम्हाला काय वाटते? आम्हाला COMMENT द्वारे कळवा.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.