बैलगाडीची कैफियत | Bailgadichi kaifiyat

बैलगाडीची कैफियत | Bailgadichi kaifiyat
Admin

 

बैलगाडीची कैफियत

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


बैलगाडीची कैफियत | Bailgadichi kaifiyat

बैलगाडीची कैफियत | Bailgadichi kaifiyat 

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


        एके दिवशी  शाळा सुटल्यानंतर मी चालत चालत घराच्या दिशेने निघालो होतो. माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतीचे मळे आहेत. दुपारची वेळ असल्याने मला तहान लागली. पाणी पिण्यासाठी म्हणून मी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील एका मोठ्या आंब्याच्या सावलीत जावून बसलो. पाण्याचा एक घोट पितो न पितो तोच माझ्या कानावर कण्हत हक मारल्याचा आवाज आला. ‘अरे बाळा’ मला आधी काही समजलेच नाही. नंतर उठून आजूबाजूला पहिले  तेव्हा मला झाडाच्या मागव्ह्या बाजूला एक बैलगाडी उभी असलेली दिसली. खर तर ती बैलगाडीच माझ्याशी बोलत होती. आणि ती पुढे बोलू लागली.


        ‘अरे बाळा’ आज मला खूप दुःख होत आहे रे. माझे शरीर आत्ता क्षीण होत चालले आहे. आज मी तुला मझ्या जीवनातील घडत आलेल्या काही घडामोडी सांगणार आहे. आत्ता माझी कोणीही काळजी घेत नाही. अरे बाळा माणसाचा इतिहास पडताळून पाहिलास, तर मानवी जीवनाच्या उत्त्पात्तीपासून मी माणसाची सोबत करीत आली आहे. आदिमानवाने जेव्हा चाकाचा शोध लावला, त्यानंतर माझा जन्म झाला. माणूस अधिकाधिक भ्रमती करण्यासाठी माझा वापर करू लागला. आणि माझा विकास होत गेला. माणसाच्या आजवरच्या झालेल्या दळणवळणातील  प्रगतीची मी साक्षीदार आहे. दळणवळणासाठी तयार केलेले पहिले वाहन मीच आहे.


        माणसाच्या उत्पात्तीनंतर सुरुवातीचा काळ फार कष्टमय आणि खडतर होता. सुरुवातीचे रस्ते काट्याकुट्यांनी भरलेले असायचे. त्यावरून पुढे सरकत असताना रस्त्यावरील असंक्या काटे माझ्या पायांत रुतायाचे त्यामुळे मला असंख्य वेदना होत असत. खरचटत , ठेचकाळत, रक्ताळलेल्या पायांनी मला पुढची वाटचाल करावी लागे. परंतु माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यासाठी मी साऱ्या वेदना सहन करून पुढे चालत असे. किंबहुना तेच माझ्या जीवनाचे कार्य आहे. माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत असे तो पाहून मन अगदी प्रफुल्लीत होऊन जात असे. मानसच्या सुखाच्या वाटेवर मी पुरेपूर साथ दिली आहे. माणसाने केलेल्या आजवरच्या प्रगतीची मी साक्षीदार आहे.


        अरे बाला, माणसाबरोबर मीसुद्धा खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत. आत्ताचे माझे रूप जसे सुंदर आहे. माझ्या चाकांवर लोखंडाची धावपट्टी बसवलेली दिसते तशी पूर्वीच्या काळी नसायची. लाकडाची चाके हे माझे प्रारंभीचे रूप. माझ्या वापरामुळे छोट्या असणाऱ्या वाताम रस्ते रुंद होऊ लागले. माणसाचे जीवन जसजसे बदलत गेले त्याप्रमाणे माझे रूप सुद्धा बदलत गेले.


        माझा वापर माणूस मोठ्या प्रमाणवर माल वाहण्यासाठी करायचा, शेतातील धान्य असो, गाई – गुरांना चारा घेऊन जायचे असो. माझा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. शेतकरी माझ्यावर ओझे लादून घेऊन जात असे.मला ओढून नेण्यासाठी तो वैलांचा वापर करीत असे. त्या दोन वैलांशी माझे एक अतूट नाते जमत असे. आम्ही कायम सोबतच जात असू कोणतेही खडतर काम असो. आम्ही सर्वमिळून अगदी आनंदाने पर पाडायचो . कितीही थकलो तरीही आमच्या मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद बधून आम्ही पुन्हा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात करायचो.


        विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सारे दिवसच पालटून गेले. माणसाने विज्ञानाचा हात हाती घेतला आणि माझ्यापासून दुरावला गेला. माणसाने पैशाच्या जोरावर अनेक सुक, समृद्धीची साधने एकत्र केली. माणसाने विज्ञान तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती करून मोटारीचा शोध लावला. आणि त्यानंतर त्याच्या जीवनातील माझे स्थान कमी कमी होत गेले. स्वतःच्या सुखासाठी माणूस मला विसरू लागला. खरे बघायला गेलो तर विसरलाच म्हणा ना !


        माणसाला मोटार गाडीच्या वापरासाठी सर्वत्र गुळगुळीत रस्त्यांचे जाळे तयार करावे लागले. गुळगुळीत रस्ते तयार करण्यासाठी अमाप पिसा त्याने खर्च केला. मोटारगाड्यांच्या वापरासाठी फक्त गुळगुळीत रस्ते असून उपयोग नाही. तर तिला गती देण्यासाठी इंधनाची आवश्यकता भासते. त्या इंधनाच्या किमती देखील महागड्या असतात. शिवाय मोतार्गादीचा वेळोवेळी करावयास लागणारा देखभालीचा खर्च तर वेगळाच जर मोटारगाडी चा देखभालीचा खर्च केला नाही तर मोगार्गडी व्यवस्थितपणे काम सुद्धा करत नाही. त्यामुळे तिचे हे महागडे चोचले माणसाला पुरवावेच लागतात. पण माझे तसे नाही माझे कोणतेही चोचले पुरवावे लागत नाहीत. मी साधी आणि कष्टाळू आहे. माझ्या मालकाच्या सुखातच माझे सुख सामावलेले असायचे.


        अरे बाळा, एका बाजूला माणसाने स्वतःच्या सुखसोईचा विचार केला खरा पण मोटारींच्या बेसुमार वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. आणि त्याचा परिणाम साऱ्या सजीवसृष्टीला भोगावा लागत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सारी पृथ्वी धोक्यात आली आहे आणि नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की जास्तीत जास्त वायुप्रदूषण हे मोटारींमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे होते. मोटार एका बाजूला आणि मी एका बाजूला. माझ्या मुले कोणतेही प्रदूषण होत नव्हते ना पर्यावरणाचा ऱ्हास होत होता. मी सर्वांचा समतोल सांभाळून माझे कार्य पर पाडीत होते . कोणालाही इजा न पोहचवता.


        पण बदलत्या जगाबरोबर माणूसदेखील बदलत गेला. आधुनिक जगाच्या दिशेने वाटचाल करीत असताना तो मला पुरत विसरून गेला. हळू हळू काळांतराने माणसाने आम्हाला अडगळीचा रस्ता दाखवला. तेव्हापासून कित्येक वर्षे झाली मी आणि माझे सगे सोबती एका ठिकाणी पडून आहोत. जुन्या आठवणींमध्ये मी कसे बसे जीवनाचे शेवटचे दिवस जगत आहे. आत्ता मात्र बाळा माझी शेवटची इच्छा आहे की मी तुमच्यासाठी जाळण्याच्या स्वरुपात उपयोगाला आले तर स्वतःच्या जीवनाचे सार्थक झाले असे समजेन. आणि हो मी तुम्हाला आजवर दिलेली साथ तुम्ही कायम स्मरणात ठेवाल अशी मी आशा बाळगते. आणि तुमच्या वाटचालीस शुभेच्या देते.


  ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

  • माणसाचे पहिले वाहन
  • हजारो वर्षे साथ दिली
  • माणसाची सेवा केलीच, खाचखळगे, काटेकुटे यांनी व्यापलेल्या रस्त्यांवरून माणसाला सुरक्षित नेले
  • माल वाहिला
  • आत्ता विज्ञानाने हात दिला, हाती पैसा आला तेव्हा माणूस मला विसरला
  • मोटारगाडीच्या मागे लागला
  • मोटारगाडीसाठी गुळगुळीत रस्ते महागडे इंधन, महागडी देखभाल
  • मी कष्टाळू, कोणतेही चोचले नाहीत
  • प्रदूषण करीत नाही
  • पण माणसाने मला अडगळीत टाकले
  • शेवटची इच्छा ]

  ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • मी बैलगाडी बोलतेय
  • बैलगाडीची कैफियत
  • बैलगाडीचे आत्मकथन
  • बैलगाडीची आत्मकथा
  • मी बैलगाडी बोलत आहे.
  • बैलगाडीची व्यथा
  • Mi bailagadi boalat aahe
  • Bailgadiche manogat
  • Bailgadichi vyatha
  • Bailgadichi kaifiyat
  • Bailgadiche aatmakathan
  • Mi bailgadi boltey
  • Bailgadichi aatmakatha

 

  ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.