भारताची वैज्ञानिक प्रगती | Bharatachi vaidnyanik pragati

भारताची वैज्ञानिक प्रगती | Bharatachi vaidnyanik pragati
Admin

 

भारताची वैज्ञानिक प्रगती


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂



भारताची वैज्ञानिक प्रगती | Bharatachi vaidnyanik pragati

भारताची वैज्ञानिक प्रगती | Bharatachi vaidnyanik pragati 



✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

        २०१४ सालातील २४ सप्टेंबर हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासामध्ये ‘मंगल’ अक्षरांत कोरला जाईल. याच दिवशी भारतमातेच्या वैज्ञानिकांनी दैदिप्यमान इतिहास घडवून आणला. याच दिवशी भारताचे मंगळयान चंद्राच्या कक्षेत शिरालेआनी जगभर जल्लोष केला गेला. युरोपियन देश समूह, अमेरिका, रशिया यांच्या यशस्वी प्रयत्नानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत हा चौथा देश ठरला. हा विजय एका गोष्टीमुळे अधिक सुवर्णमय झाला ती गोष्ट म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले. म्हणून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अन्य देशांना पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झाले नाही. तमाम भारतीयांनी मिठाई वाटून, फटके वाजवून आणि ढोलताशांच्या गजरात एखाद्या सणाप्रमाणे ही ऐतिहासिक विजयाची घटना साजरी केली.


        भारताचे हे वैज्ञानिक क्षेत्रातले यश एकाएकी, एका दिवसात किंवा या एका प्रकल्पात प्राप्त झाले  असे, नाही. याची पायाभरणी भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच झाली आहे. विज्ञाननिष्ठ बलशाही भारत घडवणे हे भारतविधाते जवाहरलाला नेहरू यांचे स्वप्न होते. अनेक जातिधर्म, प्रांत, पंथ, भाषा या भिन्न घटकांनी भारतीय समाज घडलेला आहे. जोडीला पराकोटीचे अज्ञान दारिद्र होतेच. या पार्श्वभूमीवर भारताला प्रगतीच्या मार्गावर नेणे हे महाप्रहंद आव्हान होते पान्दित्नेहारू आणि त्या वेळचे अन्य भारतीय नेते यांनी हे आव्हान पेलले आणि पराकोटीचे प्रयत्न करून भारताला वैज्ञानिक प्रगती घडवून आणली.

 

        देशाची वैज्ञानिक प्रगती फ़्क़्त प्रयोगशाळेत प्रयोग करून साध्य होत नाही. त्यासाठी सर्व जनतेमध्ये विज्ञाननिष्ठ मनोभूमिका तयार होणे आवश्यक असते. याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोलाची कामगिरी पर पडली आहे. विज्ञानाला मोठा अडथळा असतो तो जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादींबाबतचा दुरभिमान आणि अज्ञान . यांसारख्या सर्व अडचणींना पर करणारा समाज घडवणारी राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. नेहरूंनी उच्च तंत्रवैज्ञानिक शिक्षण देणाऱ्या आयआयटी ची १९५० सालीच स्थापना केली. आजच्या या विज्ञानाच्या युगात आयआयटी तून बाहेर पडलेले तरुण भारताचे नाव उंचावताना दिसत आहे. आयआयटी ही विज्ञान शिक्षणातील जगभर आदर्श संस्था मानली जाते.


        वैज्ञानिकांनी मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र शिल्लक ठेवलेले नाही, जेथे विज्ञानाचा चमत्कार झालेला नाही. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा उपासमारीत जगणारा भारत आज अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. इतक्यावरच भारत थांबला नाही तर आज साऱ्या जगाची तहानभूक भागवण्यासाठी धान्य इतर देशांना निर्यात करतो! रोगांपासून पिकांचे रक्षण कारणे, अन्नपदार्थ टिकवणे, फळे पिकवण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणे, अन्नधान्याच्या नवनवीन जाती शोधून काढणे, कमी-जास्त पिक काढणे, शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे यांसारख्या अनेक बाबतींत भारतीय वैज्ञानिकांनी आश्चर्यकारक प्रगती केलेली दिसून येते.


        भारताला संशोधनासाठी व माहितीतंत्रज्ञानाच्या विकासासाठी महासंगणकाची गरज होती. अमेरिकेने याबाबत मदत करण्यास साफ नकार दिला. तेव्हा ईर्षेला पेटून भारतीय शास्त्रज्ञांनी डॉ.विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली १९९८ साली ‘परम १००००’ हा महासंगणक तयार केला. त्यानंतर ‘परमपद्म’ हा दुसरा महासंगणक तयार करण्यात आला. तो परमपेक्षा दहापट शक्तिशाली आहे. आत्ता आपण जगातल्या अन्य देशांना महासंगणक पुरवतो. २००३ साली आपल्या शास्त्रज्ञांनी तळहाता एवढा आहे. हा संगणक खिशात मावणारा ‘सिंम्पुटर’ हा संगणक निर्माण केला. तो आत्ता भारतभर लोकप्रिय ठरला आहे. आज या घडीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले आपले शास्त्रज्ञ जगभर अधिराज्य गाजवत आहेत.


        वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीने तर जगाचे डोळेच दिपून गेले आहेत. जगभरातून वैद्यकीय उपचारांसाठी इतके लोक भारतात येत आहेत की त्यामुळे ‘मेडिकल टुरीझम’ ही एक वेगळीच शाखा उदयास आली आहे. अन्नधान्ये, फळे, भाज्या, एकूणच शेती क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी मुसंडीच मारली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे बँक व्यवहार, प्रवास, खरेदी-विक्री, शासकीय व्यवहार यांच्यात क्रांती झाली आहे.


        १९६३ साली भारताने पहिले रॉकेट उडवले. त्यानंतर अनेक उपग्रह अवकाशात पाठवले, मंगळयानाच्या यशाने या क्षेत्रातील शिखर गाठले. या अवकाश संशोधनामुळे भारताने माहिती तंत्रज्ञानात व मनोरंजनाच्या क्षेत्रातही अफाट प्रगती केली आहे. आज आपण जगातील अनेक देशांना आपले उपग्रह वापरायला देतो. पृथ्वीचे निरीक्षण, पृथ्वीवरील साधनसामग्री, हवामान, अवकाशातील दीर्घकालीन वास्तव्य, दळणवळण या बाबतीत भारताने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे भारत महासत्ता होईल की कायम अशी भीती अनेक महासात्ताना वाटू लागली आहे.


        इतर लोकांना तुमच्याबद्दल असूया वाटू लागली की, बेशक समजा की तुम्ही मोठे बनला आहात. या न्यायाने भारत आजच जगात एक महान देश बनला आहे तो वैज्ञानिक प्रगतीमुळेच.


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

भारताची मंगळ यात्रा

हे यश मिळवण्यासाठी प्रगतीची पायाभरणी

नेत्यांनी केलेल्या अपार प्रयत्नांमुळे वैज्ञानिक प्रगती शक्य

भारताची विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्य्मान प्रगती

संगणक क्षेत्रात अधिराज्य

वैद्यकीय क्षेत्रातही अफाट प्रगती

अवकाश संशोधन

भारत महान ]


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • भारताची वैज्ञानिक प्रगती निबंध
  • भारताची वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध
  • Bharatachi vaidnyanik pragati nibandh
  • Bharatachi vaidnyanik pragati essay in Marathi.

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद



Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.