BUY PROJECT PDF Click Here!

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड! | Girlfriend-Boyfriend careear madhil motthi dhond!

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड! | Girlfriend-Boyfriend careear madhil motthi dhond!
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड!


गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड! | Girlfriend-Boyfriend careear madhil motthi dhond!

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड! 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

        गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हा विषय आमच्या कॉलेजला काही नवा नाही. आमच्या कॉलेजात जवळजवळ प्रत्तेकाची गर्लफ्रेंड आहे आणि जवळजवळ प्रत्येकीचा बॉयफ्रेंड आहे. येथे झटपट जोड्या बनतात. काही अवधीत जोडीदार बदलतात; पण जोड्या असतातच. ही माझी आधीची गर्लफ्रेंडआणि हा माझा आधीचा बॉयफ्रेंड अशी आपल्या सध्याचा जोडीदाराला बिनधास्त ओळख करून दिली जाते. उदात्त प्रेम, प्रेमातील निष्ठा, एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांसाठी करायचा त्याग असल्या कोणत्याही भावनांचा लवलेशही कोणाजवळ नसतो. सतत एकमेकांना टाळ्या देत बोलत राहणे, खांद्यावर हात ठेवणे, कमरेभोवती हात घालणे व एकमेकाला बिलगून राहणे हेच प्रेम... आणि हे फक्त आमच्याच कॉलेजात आहे असे नाही; तर सर्वच कॉलेजांमध्ये असेच आहे.


        आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश का घेतो? उत्तम करिअर प्राप्त करण्यासाठी योग्य शिक्षण मिळावे म्हणून. पण घडते भलतेच. बहुतेकजण वर्गात बसत नाहीत. बसले तर शिकवण्याकडे त्यांचे लक्ष नसते. बसले नाहीत तर असतात कॅन्टीनमध्ये किंवा कॉलेजच्या आवारातील एखाद्या अड्ड्यावर किंवा जवळपासच्या एखाद्या हॉटेलात. या अवधीत कोणीही अभ्यासाबद्दल एक चकार शब्दही बोलत नाहीत. परीक्षेच्या वेळी धावतपळत कशीबशी तयारी करतात. नाहीतर केत्येकजण चक्क कॉपीचा प्रयत्न करतात. त्यामुळे करिअर घडवण्याचा उद्देश पूर्ण फसतो.


        खरे तर उत्तम करिअर केले तर उत्तम जोडीदार मिळण्याची शक्यता असते. मग प्राधान्य कशाला द्यायचे? आंम्ही अजून मतदान करायलाही पात्र झालेलो नाही. जगण्याच्या व्यवहाराची, कराव्या  लागणाऱ्या तडजोडींची काही कल्पना नसते. घरात पैसे कुठून येतात. कसा व किती खर्च होतो हे काहीही माहित नसते. मोबाईल च्या किंमती व कार्ड रिचार्ज करायला येणारा खर्च याखेरीज अर्थकारण माहित नसते. अशा अडाणी वयात जोडीदाराचा शोध घेणे किती वेडेपणाचे आहे!


        या अडाणी वयातल्या प्रेमप्रकरणांमुळे काही वेळा संकटेही निर्माण होतात. आकारण पैसे खर्च होत राहतात. पण प्रत्येकवेळी पिसे मिळू शकत नाहीत. मग मित्रांकडे व घरी ताणताणाव निर्माण होतात. कधी कधी एकच मुलगी अनेकांना आवडते किंवा एकच मुलगा अनेक मुलींना आवडतो. त्यामुळे फार मोठे तणाव निर्माण होतात. भांडणे व माऱ्यामाऱ्याही होतात. क्वचित प्रसंगी पोलिस स्टेशनच्या फेर्या माराव्या लागतात. यात आईवडिलांची होरपळ होते. एकदा एका मुलाने एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला केला जातो आणि त्यांचे कुटुंब पुरते उध्वस्त होऊन जाते. मुलगा तुरुंगात गेला आणि आईवडील घरदार विकून गावी जाऊन राहिले. हे असे घडू देण्याएवजी थोडा संयम का बाळगू नये.


        कुणाला कल्पना येणार नाही; पण भयंकर परिस्थिती आहे. माझ्या मनामध्ये बऱ्याच वेळा येते – लग्नाच्या वेळी यांतला प्रत्येकजण पूर्वायुष्यात बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड असणार. मग लग्नानंतर त्यांच्यात किती भांडणे होतील? त्यांना कसे सुख मिळेल? खरे म्हणजे आधी शिक्षण – मग नोकरी – मग घर – जोडीदाराचा शोध – त्यानंतर लग्न, असा क्रम हवा. पण इथे तर सारे वेगळेच चित्र आपल्याला पहावयास मिळते. सर्वात आधी जोडीदार – मग शिक्षण – मग मिळेल तशी नोकरी – त्यानंतर लग्न, असस विपरीत क्रम दिसतो. अजून नोकरीचे व लग्नाचे वय होण्यासही सहा ते तीन वर्षे बाकी आहेत. तरी चालले जोडीदार शोधायला!


        या विषयावर गंभीरपणे विचार केला नाही तर खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. मला मी चोखळलेला मार्ग योग्य वाटतो. आपण, भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, कोणते करिअर करायचे आहे, हा विचार प्रथम करायचा. मी आयएसएसची परीक्षा देण्याचे ठरविले आहे. माझ्या आईबाबांनी यात खूप मदत केली आहे. ही परीक्षा खूप कठीण आहे आणि खूप अभ्यास करावा लागणार आहे, हे कळले आहे. त्यामुळे मी आत्तापासून तयारी करीत आहे. माझे काही मित्र व मैत्रिणी हेसुद्धा स्वच्या करिअर संबंधी तयारी करीत आहेत. आम्ही एकत्र अभ्यास करतो. खूप मजा येते. आम्ही चांगले मित्रमैत्रिणी असूनही कोणी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनायच्या घाईत नसतो.


        कॉलेजांमध्ये नेहमीच्या अभ्यासाखेरीज व्यवसाय मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. तसेच घरीही वेगळे प्रयात्न केले पाहिजेत. माझी आहे मला रोज रात्री आमच्या घरचा जमाखर्च लिहायला बसवते; तिला मांडत करण्यासाठी म्हणून. पण त्यामुळे, आमच्या घरात किती पैसे येतात, कशाकशावर किती खर्च होतो, महिन्याची शिल्लक किती, भविष्यातले खर्च कोणकोणते हे सगळे मला कळले आहे. मला काही हवे असेल, तर हा जमाखर्च माझ्या डोळ्यांसमोर येतो आणि मीच ठरवतो, आईकडे मागायचे की नाही ते. घरात व कॉलेजात गंभीरपणे प्रयत्न झाले तर सगळ्यांना जबाबदारीची जनीन होईल आणि वर्तनात फरक पडेल.

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे: 

समस्या दाखवणारा एक प्रसंग

कॉलेजात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड याच्या सर्रास जोड्या

खरे प्रेम नाही केवळ शारीरिक सलगी

कॉलेजात शिक्षण घेण्याच्या हेतूने विस्मरण

चुकीच्या वयात जोडीदार निवडण्याचा प्रयत्न

प्रेमप्रकरणांमुळे संकटे

चुकीच्या वयातील प्रेमप्रकरणांचा भावी आयुष्यावर परिणाम यावर परिणाम म्हणून करिअर चा विचार रुजवणे

कोलेजातही व्यवसाय मार्गदर्शन आवर्जून असावे

घराच्या व्यवहारांत मुलांना सामील करून घ्यायला हवे.]


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड – करिअरमधील मोठ्ठी धोंड!
  • गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि करिअर
  • Girlfriend-boyfriend careear madhil motthi dhond!
  • Gairlfriend boyfriend aani careear

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.