मी यंत्रमानव बनले तर... | Mi yantramanva banale tar... (कल्पनात्मक निबंध)

मी यंत्रमानव बनले तर... | Mi yantramanva banale tar... essay in marathi.
Admin

 

मी यंत्रमानव बनले तर...


मी यंत्रमानव बनले तर... | Mi yantramanva banale tar... (कल्पनात्मक निबंध)

मी यंत्रमानव बनले तर... | Mi yantramanva banale tar...


🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖


        आईची आज घरातील कामे आवरता आवरता पुरती दमछाक झाली होती. आज आमच्या घरी बाबांचे मित्र येणार होते. त्यांचा पाहुणचारासाठी आई कोणता तरी खास पदार्थ बनवत होती. त्यातच बाबांची हक आली, माझा टॉवेल दे ग. आई टॉवेल द्यायला चालली होती, तेवढ्यात दादा त्रागा करीत, करवादत म्हणाला, अग आई, त्या इस्त्रीवाल्याने माझे कपडेच आणले नाहीत. तू मला बोलली का नाहीस? आत्ता मी काय करू? त्याच वेळी आई बाबांचा जेवणाचा डबा भरत होती. तेवढ्यात घरातला फोन वाजला. दादा ओरडून म्हणाला, आई , तो फोने आत्ता मी मुळीच घेणार नाही. काय हव ते करा. आई फोनकडे धावली. आज पाहुणे येणार म्हणून आज आईने रजा घेतली होती. तर हा ऑफिस मधून फोन होता. आई कोणाला तरी परोपरीने समजावून सांगत होती; पण समोरच्या माणसाच्या लक्षात ते येत नव्हते बहुतेक. फोन ठेऊन आई त्रासिक चेहऱ्याने वळत होती, तोच दारावरची बेल वाजली. घरातला कचरा नेणारे कर्मचारी आले होते. आई माझ्यावर डाफरली, काय ग, तुला ती तेवढी कचऱ्याची पिशाविसुद्धा उचलून देता येत नाही का? खरे तर मी सुद्धा घाईतच होते; पण आईची मला दया आली. माझी मनापासून इच्छा होती-आईला मदत करावी. पण मला कॉलेजला जायला उशीर होत होता. काहीतरी युक्ती कवी होती. घरातली सर्व कामे करूनही माझे काम करण्याची. न थकता. न कंटाळता. कितीही वेळ... झर्रकन मनात एक कल्पना आली- यंत्रमानव! होय, मला यंत्रमानव होता आले असते तर? हवे तेव्हा यंत्रमानव व्हायचे आणि हवे तेव्हा माझे रूप धारण करायचे.


        खरेच मी यंत्रमानव बनले असते, तर आज आईला झालेला त्रास झालाच नसता. आईची सकाळ प्रसन्न केली असती. रोज सगळ्यांचे कपडे धुणे; धुतलेले कपडे घडी करून ठेवणे; इस्त्री कारणे; कापते लावणे; सगळ्यांच्या फायली, पुस्तके नीट लावणे; अंथरून-पांघरूणाच्या घड्या घालून ठेवणे; केरकचरा काढणे इत्यादी सर्व कामे भराभर केली असती. स्वयंपाक घराचा ओटा न्हाणीघर एकदम चकाचक केले असते, रोजच्या रोज जेवणाचा मेनू आधीच स्मृतिकोशात भरून ठेवला असता. मग वेळच्या वेळी यादीप्रमाणे मीठमसाले प्रमाणशीर घेऊन स्वयंपाक आटपला असता. कोणालाच त्रास झाला नसता.


        मला यंत्रमानव होता आले असते, तर जेव्हा आम्ही गावी जातो, त्या वेळी खूप उपयोग झाला असता. गुरांना चरायला घेऊन जाणे, त्यांना पाणी देणे, आंघोळ घालणे, वाडा स्वच्छ करणे ही कामे तर मी लीलया व चुटकीसरशी केली असती. आमचे गावाचे घर तर मोठाले, ऐसपैस आहे. घराचे छत, पोटमाळा व अडगळीची खोलीसुद्धा चकाचक केली असती. गावी तर सगळेजण माझी वाटच पाहत बसले असते.


        मला यंत्रमानव होता आले, तर के गोष्ट खूप चांगली होईल. माणसाला नोकर म्हणून राबवायची गरज राहणार नाही. गुलामी वृत्ती नाहीशी व्हायला सुरुवात होईल.


        आणखी एक चांगली गोष्ट घडेल. घरातल्या सगळ्यांना त्यांची कामे आटोपल्यावर मुबलक मोकळा वेळ मिळेल. आजोबांनी निवांतपणे वाचता यावे म्हणून वर्तमानपत्रातील खूप कात्रणे काढून ठेवली आहेत. त्यांना विषयानुसार त्यांच्या फायली बनवून वाचायला सुरुवात करता येईल. काही पुस्तकांची यादीही केली आहे त्यांनी. तीही एकेक करून वाचता येतील. बाबा नेहमी एक काहंत बोलून दाखवतात, तुम्हा तरुणांना संगणक छान हाताळता येतो. त्याचे उपयोग भरभर करू शकता. मोकळा वेळ मिळाल्यामुळे बाबा संगणक शिकून घेतील व प्रभुत्व मिळवतील. तसेच, त्यांना जगभरातील दर्जेदार सिनेमे पहायचे आहेत. तेही पाहता येतील. आईने तर तिची गाणे शिकण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. तिला मनोसोक्त शिकता येईल. आईबाबांची, दोघांचीही आणखी एक इच्छा आहे. आपण मुंबईत जन्मलो, मुंबईत वाढलो; पण संपूर्ण मुंबई कधी पहिलीच नाही. ही मुंबई निवांतपणे पाहण्याची त्यांची इच्छा त्यांना पूर्ण करता येईल.


        थोडक्यात, घरातल्या सगळ्यांना स्वतःचा वेळा हवा तसा वापरता येईल. स्वतःच्या आवडीनिवडी पूर्ण करता येतील. छंद जोपासता येतील. स्वतःच्या सर्व गुणांचा मुक्त विकास करता येईल. हाच व्यक्तिमत्त्व विकास नाही का ? बघा, मला यंत्रमानव होता आले, तर घरातल्या सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध होणार आहे.

 

🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

घरात आईची तारांबळ

तिला मदत करण्यासाठी यंत्रमानव होण्याची कल्पना

यंत्रमानव होता आले, तर सगळ्यांची तारांबळ संपेल

सगळ्यांची कामे, घरातील कष्टाची व वेळखाऊ कामे भराभर होतील

गावी सुद्धा अनेक कामांत मदत होईल

माणसाला नोकर बनण्याची गरज संपेल

सगळ्यांना मुबलक वेळ

आवडीनिवडी व छंद जोपासता येतील

व्यक्तिमत्व विकास साधेल.]


 🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • मी यंत्रमानव झालो तर...
  • मी यंत्रमानव बनलो तर...
  • मला यंत्रमानव बनण्याची शक्ती मिळाली तर...
  • Mi yantramanav zalo tar
  • Mi yantramanv banalo tar
  • Mala yantramanv bananyachi Shakti milali tar…

🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖🤖

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.