आपले राष्ट्रीय सण | Aapale rashtriy sana

Admin

 

आपले राष्ट्रीय सण

आपले राष्ट्रीय सण | Aapale rashtriy sana
आपले राष्ट्रीय सण 


📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


        आपला भारत देश हे फार प्राचीन राष्ट्र आहे. ब्रिटीशांच्या शासनातून मुक्त झाल्यानंतर आणि स्वतंत्र भारताचे नवे संविधान तयार झाल्यानंतर राष्ट्रीयातेच्या कल्पनेला नवी व्याख्या आणि चेतना मिळाली आहे. स्वतंत्र भारतामध्ये आपण परंपरागत चालत आलेले धार्मिक आणि सामाजिक सण उत्सवांबरोबरच आपले राष्ट्रीय सण सुद्धा खूप उत्साहामध्ये साजरे करतो.


        आपल्या राष्ट्रीय सण-उत्सवांचा संबंध त्या महत्वपूर्ण घटनांशी आणि व्यक्तींशी जोडला गेला आहे जे लोकांनी भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी आणि तिच्या प्रगती च्या कार्यात मोलाचे कार्य केले आहे.


        १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणूनच आपण दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस ‘स्वातंत्र्य-दिन’ म्हणून साजरा करतो. याचप्रमाणे आपण २६ जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो. कारण, २६ जानेवारी १९५० साली प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाला. आपण गांधी जयंती, टिळक जयंती, बाल दिन (नेहरू जयंती), शहीद दिन आणि एकता दिन यांसारख्या अनेक महत्वाचे दिवस राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करतो.


        राष्ट्रीय सणांच्या दिवशी सर्वाना सुट्टी असते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावागावांत आणि शहरांमध्ये ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सकाळी राजधानी दिल्ली मध्ये प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतात आणि तेथून राष्ट्राला संबोधित करतात. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आपला राष्ट्राप्रती असणारा संदेश प्रसारित करतात. या दिवशी दिल्लीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गांधी जयंतीच्या दिवशी विविध ठिकाणी प्रार्थनांचे आयोजन केले जाते. टिळक जयंतीच्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या लोकमान्य टिळकांचे स्मरण केले जाते. बाल दिनाच्या दिवशी विविध ठिकाणी लहान मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. एवढेच नाही तर शाळांमध्ये सुद्धा बालदिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. एकता दिनाच्या दिवशी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


        राष्ट्रीय सन-उत्सव हे जनतेसाठी एक प्रकारचे प्रेरणास्त्रोत असतात. या सण-उत्सवांतून राष्ट्राप्रती असणारी नागरिकांची एकतेची भावना दृढ होते, यांतून सर्वाना स्वदेशाभिमान आणि स्वदेश प्रेमाची शिकवण मिळते. सारा देश एकतेच्या रंगामध्ये रंगून जातो. एकतेचा आणि राष्ट्रीयतेचा हा रंग आपल्या सर्वाना एक नवा जोश भरतो उत्साह भरतो. महान देशभक्त, राष्ट्रसेवक तसेच अनेक शूरवीरांच्या गौरवगाथा आपल्या राष्ट्रप्रेमाला अधिक भक्कम बनवतात.


आपण आपले राष्ट्रीय सण दरवर्षी साजरे करतो. परंतु आज त्यांमध्ये उत्साहाची कमतरता दिसून येते. सरकारी ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी थोड्या प्रमाणवर उत्साह पाहायला मिळतो. सामन्य जनता या कार्यक्रमांपासून वंचितच राहते. राष्ट्राचे खरे स्वरूप हे जनता आहे. म्हणून आपल्या राष्ट्रीय सणांमध्ये जनतेने मोठ्या उत्साहाने आनंदाने सहभागी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत हे राष्ट्रीय सण जनसामान्यांशी नाही जोडले जात तो पर्यंत ते सार्थक नाही होऊ शकत.


        आज स्वतंत्र भारताची जनता अनेक समस्यांनी पिडीत आहे, परंतु या जनतेला हे विसरून नाही चालणार की भारत जनतेचा आहे आणि जनता ही भारताची आहे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय त्योहार हृदयपूर्वक साजरे केले पाहिजेत.


 📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


 मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

प्रस्तावना

राष्ट्रीय सणांचा परिचय

राष्ट्रीय सणांचे वर्तमानातील रूप

राष्ट्रीय सणांचे महत्व

राष्ट्रीय सणांचे आदर्श स्वरूप

राष्ट्रीय सण सर्वांनी मनापासून साजरे केले पाहिजेत.

समारोप.]


 📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता 

  • आपले राष्ट्रीय सण
  • राष्ट्रीय सण
  • Aapale rashtriy sana
  • Rashtriy san
  • National days


 📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.