BUY PROJECT PDF Click Here!

एका अनाथ मुलाची आत्मकथा | Eka anath mulachi aatmakatha.

एका अनाथ मुलाची आत्मकथा | Eka anath mulachi aatmakatha.
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

एका अनाथ मुलाची आत्मकथा


एका अनाथ मुलाची आत्मकथा | Eka anath mulachi aatmakatha.

एका अनाथ मुलाची आत्मकथा | Eka anath mulachi aatmakatha.


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

        मी रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळच्या बागेमध्ये खेळायला गेलो. तिथे एका कोपऱ्यातल्या बाकावर एक दुःखी मुलगा दिसला मी त्याच्याजवळ जावून त्याची विचारपूस केली तर तो मला पुढे सांगू लागला. मी एक अनाथ मुलगा आहे. या जगामध्ये माझे आपले म्हणावेत असे कोणीही नाहीत. आता धरती हीच माझी आई आहे आणि आकाश हेच माझे पिता . यांच्याच  सानिध्यात  मी माझे जीवन जगत आहे. अरे, मित्रा आज मी तुला माझ्या जीवनाची जीवनकहाणी सांगतो.


        माझा जन्म आजपासून चौदा ते पंधरा वर्षांपूर्वी याच शहरातील एका झोपडपट्टीत झाला होता. मला नाही माहित की माझे वडील कोण आहेत, माझी आई कोण आहे. मी त्यांना कधीही पाहिलं नाही. माझे बालपण एका अनाथालायामध्ये गेले. तेथेच मी बोलायला शिकलो आणि तेथेच मी चालायला शिकलो. अनाथालयातील शाळेतच मी शिक्षण घेतले. तेथेच मी लिहायला वाचायला शिकलो.


        माझ्या जीवनातली पहिली दहा वर्षे कशी तरी निघून गेली, पण नंतर मला या अनाथालायामध्ये कोंडून राहण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता. माझे मन अस्वस्थ होऊ लागले. त्या ते याचाकासारखे जगणे नकोसे होऊ लागले होते. कधी कोणीतरी श्रीमंत माणूस येऊन आम्हांला अन्नदान करून जायचा तर कधी आम्ही बाहेर जावून लोकांसमोर गाणी गावून विविध खेळ करून जेवणासाठी तांदूळ आणि पैसे मागून घेऊन येत असू आणि मिळालेल्या अन्नावरच कसे बसे आयुष्याचे चार दिवस पुढे ढकलत असू. मला वाटले, छी हे कसले जीवन आहे! असले जीवन जगण्यापेक्षा मरण कधीही चांगले!  एके दिवशी संधी साधून मी त्या अनाथालयातून पळून गेलो; आणि त्या चार भिंतींच्या पिंजऱ्यातून स्वतःची सुटका करून घेतली.


        अनाथालयाच्या चार भिंतींच्या जगातून बाहेर आल्यानंतर मी कामाच्या शोधामध्ये वणवण भटकू लागलो. एका पाणपोईवर पाणी देणाऱ्या पंडितजींनी माझी मदत केली आणि त्यांच्याच शिफारशीवरून एक दिवस एका माणसाला माझी दया आली. त्या शेठजींनी त्यांच्या छोट्या मुलाला शाळेत घेवून जायचे आणि घेऊन यायचे काम दिले. मी माझे काम प्रामाणिक पणे पार पाडू लागलो. तो लहान मुलगा रस्त्याने येता-जाताना खूप मस्ती करायचा. एक दिवस रस्त्यावरून वेगाने येणाऱ्या मोटार सायकल ला तो धडकला. त्याला थोडे दुखापत झाली आणि त्याच दिवशी त्या कामावरून शेठजींनी माझी कायमची सुट्टी केली.


        काही दिवस असेच निघून गेले. नंतर एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये मला काम मिळाले. त्या ठिकाणी मी चहा पाणी घेऊन येणे तसेच इतर छोटी मोठी कामे करत होतो. एक दिवस दुकानाचा लेखा-जोखा ठेवणाऱ्या माणसाकडून एक शंभर रुपयाची नोट हरवली गेली. त्या लेखापालाला माझ्यावर संशय आला. मी पैसे घेतले नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या लोकांनी मला मारून कामावरून काढून टाकले.


        त्यानंतर मी खूप छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण फक्त पोट भरण्या इतपतच त्यापेक्षा अधिक काही नाही मिळाले! आज सकाळीच काचेचे एक ग्लास फुटल्याने सरबतवाल्याने माझ्या दोन कानाखाली मारले. भुकेने व्याकूळ आणि त्यातच अपमान झाल्याने मी दुःखी होऊन या बागेमध्ये येऊन बसलो होतो तोच आपल्याशी माझी भेट झाली. हीच आहे मित्रा माझे आजपर्यंतचे जीवन. खरच, या जगात अनाथ लोकांचे कैवारी कोणीही नाहीत. अरे मित्रा तू मला कोठे तुझ्या ओळखीत काम मिळवून देवू शकशील का? तुझी एक मदत या अनाथ मुलाला वरदानासारखी होईल.


 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा

 

[मुद्दे:

प्रस्तावना

जन्म आणि बालपण

अनाथालयातून बाहेर पळून जाणे

नोकरी करताना आलेले वाईट अनुभव

चोरीचा घेतलेला आळ

शेवटी पदरी निराशा

एक विनंती]


  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

  • एका अनाथ बालकाची आत्मकथा
  • एका अनाथ मुलाची आत्मकथा
  • एका अनाथ मुलाचे आत्मवृत्त  
  • Eka anath balkachi aatmakatha
  • Eka anath mulachi aatmakatha
  • Eka anath mulache aatmavrutt

  

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • हा तुम्हाला निबंध कसा वाटला, आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.