१)गावाकडे जत्रेसाठी येणार असल्याचे पत्र आजी/ आजोबांना लिहा.
२५५, शारदा
सदन,
कार्निवल
सोसायटी,
पुणे- ४५०
६५८ .
दिनांक: ०५ फेब्रुवारी
२०२१.
तीर्थरूप
आजोबांस,
साष्टांग
नमस्कार.
तुमचे पत्र
मिळाले. गोड शुभेच्छा देखील मिळाल्या. माझी परीक्षा २४ फेब्रुवारीपासून सुरु होत
आहे. माझी अभ्यासाची तयारी चांगली झाली आहे. मी मुंबई-पुण्यातील नावाजलेल्या
महाविद्यालयांतील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळवून सोडवल्या आहेत. त्यामुळे
माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे; पण १२वी नंतर पुढे काय करावे, याबाबतचा निर्णय देखील
माझा झाला आहे. माझे निर्णय मी स्वतः घ्यावेत असे तुमचेच म्हणणे होते. त्याप्रमाणे
मी पुढचा निर्णय घेतला आहे.
माझी
परीक्षा मार्च च्या पहिल्या आठवड्यातच संपेल. नंतर मी आपल्या गावातील
शिमगोत्सवाच्या जत्रेसाठी येण्याचा विचार केला आहे. मार्चच्या १३ तारखेला मी गावी
येण्यासाठी पुण्याहून निघण्याचे ठरवले आहे. त्या काळामध्ये तुम्ही सर्व घरीच आहात ना?
कोणत्या कामासाठी बाहेर जाणार नाहीत ना? मला आजीलाही भेटायची खूप इच्छा झाली आहे.
सुट्टीच्या निमित्ताने जत्रेला ही येत येईल आणि तुमची सर्वांची भेट देखील होईल.
ती.स्व.सौ.
आजीला देखील माझा साष्टांग नमस्कार सांगा.
तुमचाच नातू
अ.ब.क.
२) सहामाही परीक्षेचा निकाल तुमच्या वडिलांना पत्राने कळवा.
शिवार
महाविद्यालयाचे
वसतिगृह
क्रमांक ३,
खोली क्रमांक २०५,
भगवती मार्ग,
रत्नागिरी-
४१५ ६१२.
दिनांक: १० नोव्हेंबर २०२०
तीर्थरूप
बाबांस,
शिरसाष्टांग
नमस्कार.
तुमचे पत्र मिळाले. खुशाली वाचून आनंद झाला. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज आमचे महाविद्यालय पुन्हा सुरु झाले. पहिल्या सत्र परीक्षेचा निकाल मिळाला. त्यात मला मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत. खालील सर्व गुण हे १०० पैकी मिळालेले गुण आहेत:
भौतिकशास्त्र ७५ + १७ (प्रयोग परीक्षा) = ९२
रसायनशास्त्र ७२ + १८ (प्रयोग परीक्षा) = ९०
जीवशास्त्र ६९ + १६ (प्रयोग परीक्षा) = ८५
गणित
प्रश्नपत्रिका १ + प्रश्नपत्रिका २
४५ + ४७ = ९२
इंग्रजी = ५८
मराठी = ६४
शास्त्र
विषयांचा जाणीवपूर्वक खुप अभ्यास केल्यामुळे भाषा विषयांकडे दुर्लक्ष झाले व
त्यांत तुलनेने कमी गुण मिळाले आहेत. आत्ता यापुढील सत्रात मी सर्व विषयांचा समतोल
अभ्यास करण्याचे ठरवले आहे. मामाचा मुलगा सोहम मला याबाबत मदत करणार आहे. मला
खात्री आहे की, जानेवारीत होणार्या पूर्व परीक्षेत मी सर्वच विषयांत चांगले गुण
मिळवीन. जिमखान्याचा व व्यायामाचा वेळ सोडून इतर सर्व वेळ मी अभ्यासासाठी देईन.
इकडे मी ठीक
आहे. माझी प्रकृती देखील ठीक आहे. तुमची व आईची सारखी आठवण येते.
ती. सौ.
आईला शिरसाष्टांग नमस्कार.
आपला
आज्ञाधारक,
बबलू.
✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉
मित्रांनो तुम्ही वरील पत्रलेखनाचे विषय खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.👇- गावाकडे जत्रेसाठी येणार असल्याचे पत्र आजी/ आजोबांना लिहा.
- आजोबांना पत्र
- गावाकडे येणार असल्याचे पत्र आजी आजोबांना लिहा.
- अनौपचारिक पत्रलेखन
- सहामाही परीक्षेचा निकाल तुमच्या वडिलांना पत्राने कळवा.
- बाबांना पत्र लिहा.
- परीक्षेचा निकाल कळवण्यासाठी बाबांना पत्र लिहा.
- परीक्षेचा निकाल बाबांना कळवण्यासाठी पत्र लिहा.
✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉