BUY PROJECT PDF Click Here!

आज शिवाजीराजे असते तर... | Aaj shivajiraje aste tar... mrathi nibandh

आज शिवाजीराजे असते तर कल्पनात्मक निबंध आज शिवाजी महाराज असते तर मराठी निबंध आज शिवाजी महाराज असते तर निबंध Aaj shivaji maharaja sate tar nibandh Essay
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

आज शिवाजीराजे असते तर...



आज शिवाजीराजे असते तर... | Aaj shivajiraje aste tar... mrathi nibandh

आज शिवाजीराजे असते तर... | Aaj shivajiraje aste tar...



        सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची उणीव भासते, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने आठवण येते ती भूतकाळातील कर्तव्यनिष्ठ थोर व्यक्तींची सध्याचा आपला देशातील विस्कळीत झालेला राज्यकारभार पहिला की, मनात सहजच विचार येतो, ‘आज छत्रपती शिवाजीराजे असते तर...!


        शिवाजीमहाराजांना राज्यकारभारातील शहाणपण उपजतच सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून शिवाजीराजांनी उत्तरेकडे असणारा औरंगजेब, दक्षिणेला ठाण मांडून कुतुबशहा आणि आदिलशहा आणि पश्चिम किरार्यावर आपला हक्क सांगणार्या इंग्रज व पोर्तुगीज या सगळ्यांचा बंदोबस्त करून स्वराज्य निर्माण केले. आज शिवाजीराजे असते, तर चीन आणि पाकिस्तान या शत्रूंची वारंवार हल्ले करण्याची, त्रास देण्याची हिंमतच झाली नसती.


        शून्यातून  स्वराज्य निर्माण केले ते शिवाजी महाराजांनी पण त्यांना स्वराज्याबद्दल लालसा कधीच नव्हती. हे स्वराज्य साऱ्या प्रजेचे आहे, ही जाणीव त्यांच्या मनामध्ये सतत होती. रयतेतील सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्यदल घडवले होते. प्रजाहितदक्ष राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. राजांना अन्यायाची, तसेच भ्रष्टाचाराची त्यांना अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी व अन्यायी लोकांना त्या वेळी कडक शासन केले जात होते. आताच्या काळात जर शिवाजी महाराज असते तर आज कोणाला न जुमानता चालू असलेले भ्रष्टाचार, अन्याय करण्याचे कोणी धाडसच केले नसते.


        आजच्या या आधुनिक जगामध्ये जगणारी स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आणि तरीही तिच्यावर अत्याचार होतात. आज राजे असते तर स्त्रियांची यातून सुटका झाली असती. प्रत्येक स्त्री निर्भयपणे जगू शकली असती; कारण राजे स्वतः परस्त्रीला आपल्या मातेसमान मानत असत. आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्याला चौरंग करण्याची शिक्षा म्हणजेच हातपाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत.


        आज भेडसावणारा प्रदूषणाचा प्रश्न शिवाजी राजांच्या काळात नव्हता. परंतु पर्यावरणातील समतोलाची राजांना कल्पना होती म्हणूनच तर त्या वेळी विविध झाडांच्या संवर्धनाची त्यांनी विशेष काळजी घेतली होती. शिवाजीराजे धर्मनिष्ठ होते. पण त्यांनी कधी इतर धर्मांचा कधी द्वेष केला नाही त्यांचाही सन्मानाच केला. त्यामुळे आज राजे असते तर धर्माच्या नावावर चालू असलेली समाजविघातक कृत्ये आणि राजकारण कोणी केले नसते.


        महाराज्यांनी राज्यकारभार करण्यासाठी राज्यव्यवहारकोश तयार केले होते. राजांचे स्वभाषेवर अतोनात प्रेम होते. आज भाषेच्या बाबतीत केले जाणारे राजकारण आणि गोंधळ राजे असते तर आज झालाच नसता. आज राजे असते तर मातृभाषेला उच्च स्तन डून आव्शुअक त्या ठिकाणीच इंग्रजीचा वापर केला असता पण परकीय भाषांचे आक्रमण कधीही खपवून घेतले नसते. महाराज विविध शस्त्रविद्यांमध्ये पारंगत होते पण त्याचबरोबर नवनवीन शस्त्रास्त्रांकडे नेहमी महाराजांचे लक्ष असे. हे सर्व आठवल्यावर असे वाटते की, राजे असते तर आज लष्कर, आरमार, हवाई दल या सर्व सुरक्षेच्या फळ्या राजांनी नेहमी अत्याधुनिक ठेवल्या असत्या यात काही शंकाच नाही.


        आज राजे असते तर लोकशाही राज्यापाढती, धर्मनिरपेक्षता या भारताने स्वीकारलेल्या मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते. सांस्कृतिक मुल्यांची जपणूक, सांस्कृतिक वर्षांचे जातं, कर्तव्यदक्ष शासन, स्वच्छ राज्यकारभार इत्यादींचे जतन झाले असते. भारताची शं दुपटीने वाढली असती. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून नावारूपाला आले असते त्याचबरोबर परकियांच्या मनामध्ये भारताबाबत दबदबा निर्माण झाला असता.


        आजच्या या अंधारयुगात  या पुण्यश्लोक महामानवाने पुन्हा या धरतीवर अवतार घ्यावा, असे लक्षावधींना वाटते.


जय भवानी , जय शिवाजी

 

 

निबंध लिहिताना  खली दिलेल्या मुद्यांचा अवश्य वापर करा.


[मुद्दे:

  • आजच्या भोवतालच्या विस्कळीत राज्यकारभार पाहून शिवाजी महाराजांची आठवण
  • शिवाजीराजांकडून शत्रूचा चोख बंदोबस्त
  • आज राजे असते तर चीन आणि पाकिस्तान ची कुरापत करण्याची हिंमतच झाली नसती.
  • शिवाजी महाराज असते तर भ्रष्टाचार घडले नसते.
  • स्त्रिया सुरक्षित राहू शकल्या असत्या
  • पर्यावरणाचा ऱ्हास होऊ दिला नसता
  • धर्माच्या नावावर केले जाणारे राजकारण थांबले असते
  • भूदल, वायुदल आणि नौदल या संरक्षण भिंती अत्याधुनिक ठेवल्या असत्या
  • लोकशाही देशातील मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते
  • आज शिवाजी राजे हवेच होते.]

 


 निबंधाची  pdf फाईल downlod करण्यासाठी  खालील GO TO THE DOWNLOD PAGE बटन वर  क्लिक  करा.👇






मित्रांनो हा निबंध तुम्ही खालील प्रकारे देखील शोधू शकता.


आज शिवाजीराजे असते तर कल्पनात्मक निबंध
आज शिवाजी महाराज असते तर मराठी निबंध
आज शिवाजी महाराज असते तर निबंध
Aaj shivaji maharaja sate tar nibandh
Essay on aaj shivaji maharaj aste tar…
Aaj shivaji maharaj aste tar kalpanatmak nibandh
Aaj raje aste tar….

marathi nibandha

essay in mrathi 
 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.