कोरोनाच्या विळख्यात | Koronachya vilkhyat nibandh

कोरोनाच्या विळख्यात | Koronachya vilkhyat nibandh कोरोनाच्या विळख्यात मराठी निबंध कोरोनाच्या विळख्यात कोरोनाचा विळखा कोरोना आणि समाज Koronachya vilkhy
Admin


 कोरोनाच्या विळख्यात 



कोरोनाच्या विळख्यात | Koronachya vilkhyat nibandh

कोरोनाच्या विळख्यात | Koronachya vilkhyat nibandh 





        २०२० या नववर्षाला सुरुवात झाली न झाली तोच साऱ्या जगावर एक मोठे संकट आले . ते संकट म्हणजे कोरोन महामारीचे. चीन देशामध्ये उत्पन्न झालेला हा विषाणू सुरुवातीला आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये पसरत होता आणि अचानक सारे काही सुरळीत चालू असताना भारतात त्यने कधी शिरकाव केला काही कळले सुद्धा नाही. सुरुवातीच्या दिवसांत या कोरोना विषाणूचे साऱ्या जगावर फार मोठे परिणाम होतील असे कोणालाही वाटले नव्हते. काहीच दिवसांत सर्वत्र जगभर कोरोनाने हाहाकार माजवला. गरीब आणि विकसनशील देशांबरोबरच महासत्ता आणि विकसित असलेल्या देशांभोवती सुद्धा या कोरोनाने आपला विखाली काही कालावधीतच घातला. आधीच आर्थिक मंदी त्यातच अचानक कोरोनाच्या पदार्पणाने सर्वांची परिस्थिती अधिकच खालावली.


        दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाय योजले गेले. सगळीकडे संचारबंदी करण्यात आली आणि सुरळीत सुरु असणार सारे चक्र अचानक थांबले. सुरुवातीला लॉकडाऊन च्या काळात कामानिमित्त दुसऱ्या राज्यांत तसेच शहराच्या ठिकाणी गेलेल्या लोकांना लॉकडाऊन च्या काळात आपले घर गाठण्यासाठी कित्येक मैल उन्हातान्हातून पायी प्रवास करावा लागला. अन्ना- पाण्याशिवाय माणूस दिवस – रात्र आपल्या घराकडे जाणारी वाट तुडवत चालत होता. या साऱ्या मध्ये रस्ते अपघात होऊन अनेकांना आपणा जीव गमवाव लागला  तर काहींची प्रकृती बिघडली तर काही जण सुखरुप आपल्या घरी पोहोचले. कोरोनाचा विळखा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत होता की त्याला रोखण्यासाठी सारा देश बंद करावा लागला. शाळा, कॉलेज बंद झाले, दळणवळण व्यवस्था बंद झाली, उद्योग-धंदे बंद पडले, मंदिरे बंद झाली आणि सारे काही थांबले.


        कोरोनावर औषध मिळावे म्हणून डॉक्टर आणि शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत होते आणि लोकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जिवलग माणसांपासून दूर राहून आपल्या देशाची पोलिस सेवा करत होते. यातच काही पोलिस अधिकाऱ्यांना कोरोन विषाणू चा संसर्ग झाल्याने त्यांना देखील आपला प्राण गमावला लागला. प्रत्येक जन आपापल्या परीने मदत करून देशाला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत होता आणि अजूनही करतोय पण हा कोरोनाचा विळखा इतका घट्ट आहे की तो सुटता सुटत नाही.


        कोरोन विषाणूने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दाहक अनुभवांनंतर साऱ्या जगात. व्यापक आणि मुक्त अशी यंत्रणा कार्यरत होती. या यंत्रणेला चीन हा देश आव्हान देऊ लागल्याने, जागतिक स्तरावरील सहकार्याला मोठा तडा गेल्याने आजचे हे महाभयानक दृश्य निर्माण झाले आहे. कोरोनाचा झालेल्या जगभर प्रसार हा त्याचाच एक परिणाम आहे असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही.


        आज भारत देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिवसाला देशामध्ये १ ते २ लाखांपर्यंत कोरोना रुग्ण सापडत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात टन पडला आहे. कित्येक राज्यांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे तर काही ठिकाणी रेमडेसिव्हीर ची कमतरता असल्याने कोरोना रुग्णाच्या उपचारांत अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तर गावेच्या गावे कोरोना महामारीने पुरती हैराण झाली आहेत. कोरोनाचा हा विळखा कधी संपेल कोणीही सांगू शकत नाही सारे जण या संकटासमोर हतबल झाले आहेत. या काळात कोणीही घाबरून न जाता  आलेल्या परिस्थितीला एकजुटीने आणि धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. 

 

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 

  • कोरोनाच्या विळख्यात मराठी निबंध
  • कोरोनाच्या विळख्यात
  • कोरोनाचा विळखा
  • कोरोना आणि समाज
  • Koronachya vilkhyat Marathi nibandh
  • Koronachya vilkhyat
  • Koronacha vilkha
  • Marathi nibandh
  • Best Marathi nibandh

 

 

 

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.

तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला    COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.

 

 

धन्यवाद

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.